पहाट २
Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 December, 2017 - 03:22
पहाट २
गंधर्वाच गाणं गाते पहाट
मस्तानी दहीवरात न्हाते पहाट
नववधू सासरी लाजते पहाट
पाचूंच्या बनात कुजबुजते पहाट
गार गार हवेत शिरशिरते पहाट
साजनाच्या कुशीत बहरते पहाट
कुंकुम केशर मस्तकी भाळते पहाट
चैत्यन्यगंध केसात माळते पहाट
प्राजक्त वेचत वेचत आली दारात
श्रांत समई देवघरात तेवते पहाट
घरोघरी सुगरण होते पहाट
तनामनात उमंग पेरते पहाट
दत्तात्रय साळुंके
विषय: