बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याने खुप संयमित डान्स केला आहे.नाहीतर तर्तार तर्तार.. रामजी की चाल देखो वर डान्स जातोय की काय्य्य अशी भिती वाटत होती मला.

फायनली आज आता मल्हारी गाणे बघायचा मुहुर्त मिळाला.

जर पिंगा गाणे कोणाला आक्षेपार्ह वाटले असेल तर या मल्हारीत आचरटपणाचा कळस आहे. फुल्लटू सौथेंडीयन रजनीकांत स्टाईल धिंगाणा आहे. बहुधा पिंगा गाण्यात पेशवेकालीन स्त्रिया नाचताना दाखवल्याने त्यावर जास्त दंगा झाला असावा. मल्हारीत बाप्यागड्यांनी थोडे लटक झटक नाचणे चालून गेले असावे.

मल्हारी,पिन्गा! आता नो कॉमेन्टच म्हणलेले बरे! अ‍ॅकच्युली प्रोमोवरुन तरी रणविरलाच भुमिकेच बेअरिन्ग जमलय अस वाटतय,
तरी सलमान-अ‍ॅशच् फाटायच्या आत त्याना घेवुन करायला हवा होता सलिभने... तसाही इतिहासकालिन सदर्भ वैगरे न वापरता सिनेमॅटिक लिबर्टी घेत..एका पुस्तकावरुन सिनेमा काढायचा होता तर जमल असत की...

पेशवे वंशजांनी पिंगा आणि मल्हारी दोन्ही गाण्यांवर आक्षेप घेतलाय आणि चित्रपट प्रदर्शनाआधी आम्हाला दाखवावा असं सांगितलं आहे त्यांनी.

दीपांजली,

लेखाचे शीर्षक वाचूनच हसलो ... आणि पुढील लेखन वाचून अजूनच हसलो. ह्यांनी इतिहासाची एवढी मोडतोड केलीय तर त्या भन्साळींनी काहीच केली नाही असे म्हणेल Wink

"बाजीराव शाहू महाराजांचा नोकर होता" हेच महत्त्वाचं असल्यासारखं तीन तीन वेळा लिहिलेय Happy बाकी लेखाचा काही पॉइन्टच कळत नाहीये.

पण त्या दिवशी प्रताप सरनाईक तर भेट्ले होते सीएमना, चित्रपटविरोध व्यक्त करायला. मग नंतर काय झालं. बातमी दाखवली होती.

लेखाचा मला लागलेला अर्थ , एवढा शुर शिवाजिचा सरदार,त्याच्यावर भन्साळीने पिक्चर काढलाय ना, त्यानिमित्ताने प्र्सिद्धी मिळतेय ना! बाकी इतीहासाची मोडतोड काय विशेष महत्वाची नाही..

गाण्यांवर ऑब्जेक्शन घेउ नका , आमच्याकडून सपोर्ट मिळणार नाही एवढाच सुर दिसला >>> का??? एकदम संजय लीला भन्साळी बद्दल शिवसेनेला पुळका का आला? Wink गो फिगर.
बाकी त्या आर्टीकलबद्दल काय बोलावे? काही बोलायच्या लायकीचे आहे का?

काल परवा पर्यंत "बाजीराव मस्तानी" चित्रपटाचा विरोध करणारे आता "दिलवाले" चित्रपटाचा विरोध करु लागले आहे आणि सर्वांना थोर बाजीरावांवर बनलेला पहिला भव्य चित्रपट म्हणून "बाजीराव मस्तानी"च चित्रपटगृहात जाऊन बघा असे आवाहन करत आहे .

Rofl Proud काय एक एक असतात नाही Wink

ऋन्मेऽऽष,

तुझ्या ५ तारखेच्या अक्ख्या पोस्टीला अनुमोदन Happy
ते मल्हारी गाणे महान वाईट आहे, तुम्ही किती ही म्हणा की तुम्हाला पहायचा नसेल तर तुम्ही पाहु नका, आपण आरडा-ओरडा करुन काय होणार वगैरे वगैरे, पण तरी ही हे मान्य करावेच लागेल की भन्साळ्यानी फुल्ल टु काशी केलीये इतिहासाची...उगाच जातिय तेढ वाढेल वगैरे गोष्टी बोलल्या जातील पण जोधा-अकबर मधे अकबराला असे हिडीस नाचताना, जोधा बरोबर ओलेता रोमान्स करताना आणि जोधाबाई इतर ४ सवतींबरोबर "सवत माझी लाडकी" म्हणुन "पिंगा" घालताना दाखविलेले चालले असते का ? रच्याकने...जोधा-अकबर मधे ही अकबर "धिक्र" करताना म्हणजे त्या ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यात तो गोल गोल नाचताना दाखवलाय, त्या मधे पण त्याचा आणि जोधा चा रोमान्स दाखविलाय पण अतिशय संयत पणे गोवारीकर साहेबांनी हे सगळे हाताळले आहे....

Anjali, you said it, करेक्ट.

माझ्या मनात मांडवली शब्द होता, पण तो इथे लिहु का नको विचार करत होते.

हेच जर अन्य कोणा ऐतिहासिक व्यक्तीबाबत दाखवले गेले असते तर आत्तापर्यंत बरीच मोडतोड, जाळपोळ, शाई फेकणे, पुतळे जाळणे, आणि अगदी हल्ले करणे पण झाले असते.
बाजीरावाचे दुर्दैव की हे असे अत्युच्च हालकट आणि फालतू काहीतरी घडत आहे त्याच्या नावावर. Sad

मयेशराव,

भारतात कायपण करायला व्होटब्यांक लागते. तेव्हा बाजीरावभोंची व्होटब्यांक नसन त काय व्हनार न्हाय.

पब्लिकचे काय सान्गता येणार नाही. मस्त टाकीजात जाऊन बाजीराव फुल्टु हिट पण करतील. आणी ततड ततड करत नाचतील. भन्साळी येडाय. त्याला वाटल २ गाणी हिट गेली की पैसा वसुल. पण नेमके त्याच गाण्यावर हरकत घेतली जाईल हे डोक्यात नाही आले त्याच्या?:अओ: आता १८ ला टाकीजात येईल. बघु काय होते. कोण पिन्गा घालत आणी कोण ततड करत नाचत.

मी पण पाहणार थेट्रात. दीपिका साठी कायपण. शिवाय काय काशी घातलीय इतिहासाची तेही बघाव लागेल.. याची देही याची डोळा

मी दोन्ही चित्रपटांची बुकिंग केली.
>>>
मी आणि माझ्या गर्लफ्रेंडनेही एकाच वेळच्या शोची दोन्ही चित्रपटांची एकेकच तिकीट बूक केली.
ईंटरव्हलनंटर तिकीटी एक्स्चेंज करणार आणि दोन्ही चित्रपट अर्धे अर्धे बघणार.
मग एकमेकांना आपण पाहिलेल्या अर्ध्याची स्टोरी सांगणार.
एकाच तिकीटाच्या पैश्यात आणि एकाच चित्रपटाच्या वेळेत डबल चित्रपट मजा Happy

आमच्याकडे पण हेच होणारेय बहुदा Uhoh
मी दिलवालेच पहाणार आणि पुर्ण पहाणार
मित्राला दिपिका साठी बाजीराव पाहिचाय Angry त्याला कालच टोचण दिलं असले सिनेमे पहात जाऊ नकोस म्हनूण Proud

ऋन्म्या, जर तिथे तुला तुझ्या बाजूला मस्तानी भेटली तर तुझ्या गर्लफ्रेंडची काशी व्हायची रे बाबा. Proud
काहीही बोल पण फेकतोस मस्त.. Wink

मी दोन्ही चित्रपटांची बुकिंग केली.
>>>
मी आणि माझ्या गर्लफ्रेंडनेही एकाच वेळच्या शोची दोन्ही चित्रपटांची एकेकच तिकीट बूक केली.
ईंटरव्हलनंटर तिकीटी एक्स्चेंज करणार आणि दोन्ही चित्रपट अर्धे अर्धे बघणार.
मग एकमेकांना आपण पाहिलेल्या अर्ध्याची स्टोरी सांगणार.
एकाच तिकीटाच्या पैश्यात आणि एकाच चित्रपटाच्या वेळेत डबल चित्रपट मजा स्मितGF.jpg

ऋन्म्या, जर तिथे तुला तुझ्या बाजूला मस्तानी भेटली तर तुझ्या गर्लफ्रेंडची काशी व्हायची रे बाबा. फिदीफिदी
काहीही बोल पण फेकतोस मस्त.. डोळा मारा >>

चुकून ग फ्रे ला शेजारी एखादा बाजीराव भेटला तर Rofl

Pages