दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विको उद्योगसमूहाचे गजानन पेंढारकर यांना श्रद्धांजली.

संगीतकार व गायक रविन्द्र जैन यांनाही श्रद्धांजली.

रविंद्र जैन यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! _/\_
त्यांच्या सारखा कलाकार फारच विरळा.
त्यांनी त्यांच्या गीत, संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.
संगीतकार आणि गायक असे दुहेरी काम करणारे अनेकजण होते/आहेत.
पण गीतकार आणि संगीतकार असे फारच कमी लोक असतील.

संगितकार रविंद्र जैन यांना श्रद्धांजली!!!

जन्मतः असलेल्या अंधत्वावर मात करुन त्यांनी ज्या चित्रपटांना संगित दिलं ते केवळ अप्रतिम!

विकोच्या गजानन पेंढारकरांनाही श्रद्धांजली!

स्व. रवींद्र जैन आणि स्व. गजाननराव पेंढारकर यांना श्रद्धांजली. Sad
-गा.पै.

निल्या कुलकर्णी | 5 October, 2015 - 12:24 <<<< ही तुमची पोस्ट प्लीज डिलीट कराल का?

विको उद्योगसमूहाचे गजानन पेंढारकर आणि गीतकार व संगीतकार रवींद्र जैन यांना, भावपूर्ण श्रद्धांजली!! Sad

येथे एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी सर्वात प्रथम देणार्‍यान्नी बातमीच्या सत्यतेची शहानिशा करणे गरजेचे आहे असे वाटते. खुप नाही पण किमान दोन खात्रीलायक स्त्रोत तपासुन बघा.

नुसत्या फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप ह्यान्च्या आधारावर एखाद्या घटनेची माहिती देणे नेट-अफवा प्रकारात येतात, हे स्त्रोत खात्रीलायक नाहीत. तुमच्या नकळत तुम्ही नेट-अफवा पसरवायला मदत करत आहात.

काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे, शक्ती कपूर यांविषयीही अशाच अफवा उडविण्यात आल्या होत्या.

दुःखद निधन
आखिल भारतीय हिंदुमहासभेच्या भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष्या, स्वा.वि.दा.सावरकरांच्या नातसून श्रीमती हिमानीताई सावरकर यांचे रविवार, दिनांक 11.10.2015 रोजी सायंकाळी 7.00 वा. दुःखद निधन झाले. ईश्वर गतात्म्यास सद्गती प्रदान करो. त्यांचे पार्थिव सोमवार, दिनांक 12.10.2015 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 या वेळात 'सावरकर सदन', दक्षिणमुखी मारुती मंदिरामागे, शनिवार पेठ, पुणे येथे त्यांचे राहते घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी सकाळी 10.00 वा. वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे...

हिमानी सावरकर यान श्रद्धान्जली. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष हुसैन जमादार यान्चे निधन झाले त्याना श्रद्धान्जली. हाडाचे कार्यकर्ते आणी समाजसेवक होते ते. आन्तर भारती मन्डळात पण त्यान्चे नाव वाचले होते. मटा मध्ये अल्प परीचय आलाय.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/hussain-jama...

भूतपूर्व इंग्लिश बॅट्स्मन टॉम ग्रेव्हनी याचे दु:खद निधन.

शिरिष कणेकरांच्या आजोबांनी 'महा हलकट' म्हटलेला हाच तो ग्रेव्हनी!

श्रद्धांजली!

पॅरिस हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली !!! अतिशय दु:खद आणि घृणास्पद हल्ला.

Pages