नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वाह!! छान माहिती दिली शशांक!!
वाह!! छान माहिती दिली शशांक!!
सुदूपार, हे एका नर्सतीत
सुदूपार, हे एका नर्सतीत टिपलेलं...
सायु, सोनचाफ्याचा असा म्हणजेया अँगलने फोटो क्वचितच काढला जातो !>>> झाडावरचा का दा?
गेल्या आठवड्यात पिवळ्या
गेल्या आठवड्यात पिवळ्या अबोलीचे रोप मिळाले..:) लागले आहे, छान ताठ उभे आहे...
हा मैत्रीणीकडचा फोटो....

सोनु.. सोनचाफ्याच्या फुलाचा
सोनु.. सोनचाफ्याच्या फुलाचा शक्यतो साईडनेच काढतात फोटो ( चाफेकळी नाक वगैरे ) असा वरून पुर्ण गोलाकार क्वचित बघितलाय.
अबोलीचा रंग छानै !
सायु चाफा मस्त! इथपर्यन्त
सायु चाफा मस्त! इथपर्यन्त सुवास परिमळला! माहेराची आठवण झाली.

सध्या खूप वेगवेगळी फुलपाखरं आहेत बागेत.
काय एकेके सुंदर फोटो. सर्व
काय एकेके सुंदर फोटो. सर्व वरची माहिती वाचते नंतर.
बरेच दिवस झाले मी इथे फोटो
बरेच दिवस झाले मी इथे फोटो नाही टाकले.. ( आज कसर भरुन काढतो
)
एकदा बाजारातून आणलेल्या चेरी टोमॅटोज पैकी एक खराब निघाला, तो मी सहज कुंडीत टाकला. त्यालाही बरेच महिने झाले. मग त्यातल्या बिया रुजल्या. हे टोमॅटोचे झाड भराभर वाढले. त्याला फुलेही गुच्छानेच येताहेत.
तर ही फुले..
आणि हे टोमॅटोज.
आमच्याकडे पावसाचा असा खास
आमच्याकडे पावसाचा असा खास सिझन नसतो, तो कधीही पडतो. अश्याच एका पावसाळी सकाळी टिपलेली फुले.
आपल्याकडे पाणथळ जागी एक
आपल्याकडे पाणथळ जागी एक हिरव्या फुलासारखी पाने असणारी रानफुले उगवतात. त्याला पिवळी फुलेही येतात पण ती एकेकटी येतात. ( खात्री नाही पण बहुतेक क्लोव्हर असे नाव आहे ) त्याच्याच जातकुळीतले एक झाड इथे दिसले. पाने बरीच मोठी आणि फुले जांभळी आणि गुच्छात येतात.
फुलपाखराची नक्कल करणारी हि
फुलपाखराची नक्कल करणारी हि पाने.
पण या झाडाला कधी फुले आलेली दिसली नाहीत.
जिंजर लिली हे तसे कॉमन नाव
जिंजर लिली हे तसे कॉमन नाव आहे. सोनटक्क्यापासून अनेक झाडांना हेच नाव वापरतात. अर्थातच याचे कूळ आले हळदीचेच आणि, या कुळाचे वैशिष्ठ असणारा देखणा पुष्पकोश यातही दिसतोच. इथे याचा आकारच फुलासारखा असतो.
हे झाड कुडींत लावण्याच्या योग्यतेचे नाही कारण बराच पसारा होतो. पाने सहज १० / १२ फुट वाढतात. फुले, सॉरी पुष्पकोश थेट जमिनीतून येतात. यात फिक्कट गुलाबी आणि गडद गुलाबी असे दोन रंग दिसतात.
हे झाड
हे गुलाबी "फूल"
आणि हे गडद गुलाबी "फूल"
याची कळी उमलायलाच महिनाभर
याची कळी उमलायलाच महिनाभर लावते आणि उमलल्यावर सहज दोन आठवडे टिकते.
दिनेशदा कसले एकेक भारी फोटो
दिनेशदा कसले एकेक भारी फोटो आहेत. लवली,कलरफुल.
वा दिनेशदा - काय एकेक सुंदर
वा दिनेशदा - काय एकेक सुंदर सुंदर फुले, फळे आहेत तुमच्याकडे .... फारच प्रसन्न वाटले सारे फोटो पाहून ....
पाने बरीच मोठी आणि फुले जांभळी आणि गुच्छात येतात. >>>>> ही सोरेल (sorrel) कुळातील फुले आहेत..
फुलपाखराची नक्कल करणारी हि
फुलपाखराची नक्कल करणारी हि पाने. >>>>> ही बिगोनिया/ बेगोनिया (begonia) वाटताहेत ...
दिनेशदा, जिंजर लिलीला अजून एक
दिनेशदा, जिंजर लिलीला अजून एक नाव आहे - टॉर्च लिली. मला हे टॉर्च लिली नाव फार पसंत आले कारण ह्या लिलिचा देठ बॅतरी सारखा जाड असतो आणि फुल खूप नाही पण तरीही भडक असते की खरच दिवा लागला की काय असे वाटते.
दिनेशदा कसले एकेक भारी फोटो
दिनेशदा कसले एकेक भारी फोटो आहेत. लवली,>>>>>> +१
दिनेशदा कसले एकेक भारी फोटो
दिनेशदा कसले एकेक भारी फोटो आहेत. लवली,>>>>>> +१
व्वा दिनेश दा, खुप सुरेख
व्वा दिनेश दा, खुप सुरेख प्र.ची,
चेरी टमाटे कीत्ती गोड..
आणी जिंजर लीली, आ हा हा!
ही घरची काकडी...

दिनेश, फोटो मस्त आहेत सगळेच.
दिनेश, फोटो मस्त आहेत सगळेच. त्या चेरी टॉमेटोची पाने बाजूला दिसत आहेत तीच आहेत का? जिंजर लिलीचं फूल देखणं आणि वेगळंच आहे.
https://goo.gl/photos/uUiEnVt
https://goo.gl/photos/uUiEnVtMkZcxodbGA
20151001095943_1.JPG (29.13
20151001095943_1.JPG (29.13 KB)
हे दुर वरच्या खिडकीत बरेच
हे दुर वरच्या खिडकीत बरेच दिवस येत होत...आता नाही येत...I miss him/her
मानुषि ताई, ते फुल पाखरु, तो
मानुषि ताई, ते फुल पाखरु, तो भिंतीचा रंग आणि ती खिडकी, एखादे पेन्टींगच वाटते आहे..:) फार सुंदर टीपलयस..
वैशाली, मस्तच आहे घुबड..
वैशाली, मस्तच आहे घुबड..
ही माझी
ही माझी रिक्षा..:)
http://www.maayboli.com/node/56237
बी, टॉर्च लिली, खरेच छान नाव
बी,
टॉर्च लिली, खरेच छान नाव आहे. माझ्या आठवणीप्रमाणे ही फुले ( म्हणजे कळ्या ) खाण्यासाठी पण वापरतात.
अश्विनी, हो तीच पाने. हे झाड जरा वेलीसारखे वाढले. ४/५ फूट उंच झाले. जिंजर लिली मी आपल्याकडच्या काही पुष्प प्रदर्शनात बघितलीय. पण हिची लागवड करायला बरीच मोठी जागा पाहिजे. फोटोतल्या झाडाला दोन वर्षाने फुले आलीत. नियमित येतात का ते माहीत नाही, बहुतेक नसावीत.
चला येणार का निसर्ग भटकंतीला
चला येणार का निसर्ग भटकंतीला ??
स_सा , पहिला फोटो एकदम झकास!
स_सा , पहिला फोटो एकदम झकास!
हे दुर वरच्या खिडकीत बरेच
हे दुर वरच्या खिडकीत बरेच दिवस येत होत... >> Barn owl मस्तच
दिनेशदा कसले एकेक भारी फोटो आहेत. लवली,>>>>>> +१
Pages