"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणीतरी अबोली आणा बरं बाप्पाला.. जाई, जुई, साधा मोगरा, कुंदा, मदनबाण.. अजून कोण कोण बरं राहीलंय.. शेवंती आली का ? सोनचाफा आणि अश्टर आणते मी वेळ झाला की..

IMG_0864.JPG

अश्टर..

ही घ्या अबोली..
abolicho-valesar_0.jpg

तळटीपः फोटो मीच काढलेला आहे. सभेच्या समोर संदीप सावंत आणि डॉ प्रसाद देवधर बसलेले दिसतील तुम्हाला.

गूगलवर सर्च? इथे स्वतः काढलेले फोटो अपेक्षित आहेत. हा फोटो मोठा करून दाखवू का समोरच्या बाजूला संदीप सावंत आणि डॉ प्रसाद देवधर बसलेले आहेत. हुमरसच्या शाळेतल्या पालकांच्या एका सभेमधला फोटो आहे हा.

ही आमच्या चिंचवडच्या बागेतली सदाफुली... घरून निघताना घरच्या आठवणी कॅमेर्‍यात बंदिस्त करून घेण्याचा अजून एक भाबडा प्रयत्न Happy

IMG_1386.jpg

OgAAAAqjFIEqw2X9YU6SvDXdfW7nR5fnZWghaZCs-F9rxFp99iuRmJMo2rwTEUQOOYokYiGj3APl1UliROGNTF1xsmQAm1T1UJSxf5C7qw-_GUuA45LYakyFY73y.jpg

किती दिवसांनी बकुळीची फुलं दिसली. मजा आली. लहान असताना गावाला गेलो की संध्याकाळी पडलेल्या बकुळीचा सडा काय मस्त दिसायचा. मग जेवढी मिळतील तेवढी गजरे करून केस कापलेले असूनही आई आमच्या डोक्याभर माळायची. काय दिवस होते ते. फुल पांढर शुभ्र असलं तरच उचलायचं. थोडस ही पाकळ्याच्या टोकाला ब्राऊन झालं असल तरी कटाप. काय मिजास होती. आणि आता फोटोनेही केवढं समाधान दिलं.

संयोजकांचे मनापासून आभार आणि फोटो टाकलेल्यांचेपण.

आर्च मग हे खास तुझ्यासाठी. माझ्या मामाकडे पण बकुळीचे झाड होते. तेथे कधी खाली पडलेली फुलं उचललीच नाही. झाडावरचीच ताजी फुलंच काढायचे मी.
दादरला ज्ञानेश्वर उद्यान व बाजीराव उद्यान एकत्र करुन फार सुंदर पार्क बनवले आहे. ह्यावर्षीच्या मुंबई भेटीत बाबांनी आवर्जून तिथे नेले. तिथे मुलांना झोपाळ्यावर खेळवताना बकुळीच्या वासावरुनच जिमखान्यापाठी ही झाडं सापडली (पूर्वी दादर चौपाटीवर कुठच्याही कानाकोपर्‍यात चौकस नजरेने बघायची काय सोय नव्हती ;-))मी पण कित्येक वर्षांनी फुलं टीपली.

bakul_1.JPG.

IMG_1424.JPG

Pages