दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळ ज. पंडित यांना श्रद्धांजली. ते क्रिकेटव्यतिरिक्त इतर लेखनही करायचे असं काहीसं मला आठवतं. त्यांचा एक धडा आम्हाला मराठीला अभ्यासाला होता असं अंधुकसं आठवतं. त्यांना शांती लाभो. Sad
-गा.पै.

देवा...काय विलक्षण योगायोग हा...

परवाच पुण्यात आणि अन्य परिसरात झालेल्या मुसळधार पावसाच्या अनुभवाने वा सुखद दर्शनाने रामदास कामत सरांचे हेच गाणे लागले होते....त्यातील एका कडव्याच्या ह्या ओळी तर आता ऐकताना वीणाताईंच्या लेखणीची आणि संगीतकलेची प्रतिभा लक्षात येत आहे....विलक्षण.....कामतसरांचा आवाजही असाच...

"..जलधारेच्या वर्षावाने, हिरव्या कोमल अनुरागाने
वसुंधरेच्या श्वासाने हा गंधीत होई वारा....".

टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेता मोहन भंडारी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.

MBH.jpg

मोहन भंडारींना विनम्र श्रद्धांजली. डीडीवर त्यांनी एक लोकप्रिय इमेज तयार केली होती.

ओह! मोहन भन्डारी!
ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट दुरदर्शनच्या काळातला आवडता कलाकार! चुनौती, मुजरीम हाजीर... अशा किती मालिकात काम केलेले त्यान्नी!

श्रद्धान्जली! Sad

भावपूर्ण श्रद्धांजली!
ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट दुरदर्शनच्या काळातला आवडता कलाकार!चुनौती, मुजरीम हाजीर... अशा किती मालिकात काम केलेले त्यान्नी! >>>>> +१

मोहन भंडारींना श्रद्धांजली..
डीडीवर त्यांनी एक लोकप्रिय इमेज तयार केली होती>> +१

यात्रेतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरुंना विनम्र श्रद्धांजली
७०० म्हणजे काय Angry

सॅड. Sad

मावशीच्या वाढदिवसाच्या दिवशीच, अरेरे.

चिनुक्स स्कॉटलंडमधे निधन झालं हेमंत भोसले यांचे, अशी न्युज चॅनेलवरुन न्युज जातेय.

श्रध्दांजली हेमंत भोसले आणि मोहन भंडारी यांना.

श्रध्दांजली। मागच्या वर्षी मुलीने..
आशाताईंसाठी वाईट वाटतंय... हेही दु:ख सहन करण्याची ताकद देवो ...

कर्करोग Sad

शारद सुंदर चंदेरी राती, जा जा जा रे नको बोलू जाना ,मी ही अशी भोळी कशी ग, जो जो गाई अंगाई गाते या मराठी गीतांचे संगीतकार. हिंदीत तेरी मेरी कहानी हा चित्रपट.

हेमंत भोसलेंना श्रद्धांजली !
आशाताईंचं माझं ऑल टाइम फेवरेट ' जा जा जा रे, नको बोलू जा ना' हे गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं होतं एवढीच त्यांच्याबद्दल वाचनात आलेली माहिती ! Sad

हेमंत भोसले ह्यांना श्रद्धांजली.

'भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले' .... आशा भोसले ह्यांच्यासाठी वाईट वाटते. सुरुवातीपासून किती संघर्ष असावा एखाद्याच्या आयुष्यात ! Sad

श्रद्धांजली.
आशा भोसले ह्यांच्यासाठी वाईट वाटते. सुरुवातीपासून किती संघर्ष असावा एखाद्याच्या आयुष्यात >> +१ Sad

Pages