दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

हा धागा वर आला की खरचं धडधडतं. Sad

limbutimbu,

वाईट घटना आहेत. मात्र तरीही त्यांतून सावरून तुम्ही त्यांच्या पुढच्या प्रवासांच्या जय्यत तयाऱ्या करून द्याल याची खात्री आहे. दोघींना चिरशांती मिळो.

आ.न.,
-गा.पै.

लिंबू,
आपलं माणूस गमावण्याचं दु:ख आहेच पण तरीही त्यांच्या पुढील शांत-समाधानी प्रवासाकरता आपण शांत राहून परमेश्वराची प्रार्थना करावी.
तुमच्या दु:खात सहभागी आहे. या दु:खातून लवकर सावरण्याची परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो.
दोन्ही माऊलींना भावपूर्वक श्रद्धांजली. _/\_

वय कोणतेही असले तरी ज्यावेळी "आई" निघून जाते परत न येण्याच्या प्रवासावर, तेव्हा मुलगा म्हणून जे दु:ख सहन करावे लागते ते अपार असते. अशावेळी लिंबूटिंबू तुमच्या सोबतीला तुमचे घरचे, नातेवाईक तसेच मित्रमंडळ सोबतीला असणे फार जरूरीचे असते.

मनःपूर्वक श्रद्धांजली.

लिंबू तुझ्या मातोश्रींना आणि सासुबाईंना श्रद्धांजली.
खरंतर भाग्यच म्हणायचं इतक्या वयापर्यंत आईचा सहवास लाभला तुम्हा दोघांनाही.

लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्री आणि सासूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

हा धागा वर आला की खरचं धडधडतं. + १

लिंबूटिंबू, तुमच्या मातोश्रींना आणि सासुबाईंना श्रद्धांजली

ओह! लिंबुदादा आणि लिंबी, तुमच्या दुःखात सहभागी आहे. दोन्ही आयांना श्रद्धांजली.

माबोकरांचे मनःपुर्वक आभार !

माझ्या पुतणीच्या अवेळी जाण्याचं दुःख आयुष्यभर राहील सोबत. पण अशा वेळी तुम्ही जो मानसिक आधार दिलात तो खूप महत्वाचा आहे.

हसण्या खेळण्याच्या वयात हा असा मृत्यु येणं घरच्यांसाठी खूप त्रासदायकआहे. त्यात लगेचच आलेले सणासुदीचे दिवस .... पावलोपावली तिची आठवण रडवतेय.

काळ हेच एकमेव उपाय आहे हे कळतय पण वळत नाहीये.

महेश , लिंबू तुम्हाला ह्या प्रसंगात सावरण्याचं बळ मिळो, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

क्रिकेट समालोचक बाळ ज पंडित यान्चे निधन. Sad मला त्यान्चे मराठी समालोचन आजही आठवते.

लिंबूटिंबू आणि महेश तुमच्या दुःखात सहभागी आहे.

Pages