चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देऊळबंद पाहिला.

दक्षिणेकडे डोके करून झोपु नये असे स्वामी सांगत५त ... चुंबक , अशुद्ध रक्त वगैरे बोलतात.

Proud

ओव्हरॉल ठीक अहे... रविंद्र महाजनीचा मुलगाही छान आहे...

दक्षिणेकडे डोके करून झोपु नये असे स्वामी सांगत५त ... >>> पाय करून झोपु नये.
आमच्याघरी पण नाही झोपु देत, यमाची दिशा आहे ती असे आई म्हणते.

असे कसे? मांझीचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले होते . पाहिला का तुम्ही तो ?
सर्वसाधारणपणे कोणत्याही चित्रपट समीक्षकांचा समीक्षणाचा सूर चित्रपटाची टर उडवणाराच असतो.

अगदीच 'नाईलाज 'झाला तर ते बरे , चांगले, उत्तम असे त्याबद्दल लिहितात...

labadkolha11 | 12 September, 2015 - 11:58 नवीन
तुम्हाला कोणताच पिक्चर खास वाटत नाही.

>> अरे लबाडा.. वाचत तरी जा मी काय लिहितोय ते ! अख्खा जुलै महिना सर्व चित्रपटांची तोंड भरून स्तुती केली नंतर मांझीवर तर पाच तारे उधळले, तरी तुझा शूळ शमेना ! Light 1

http://m.imdb.com/title/tt0368913/

ओसामा: अफगाणिस्तानमध्ये एक लहान मुलगी घरात एकही पुरुष नसल्याने मुलगा बनून चार पैसे कमवायचा प्रयत्न करते. तालिबानी राजवटीत हे खूपच धोकादायक असते. काय होते ते या चित्रपटात पहा. एक अत्युत्तम कलाकृती. सुन्दर छान वगैरे विशेषणे अश्या चित्रपटांना देण्यास मन धजावत नाही कारण हे विषयच असे भयानक आहेत. लायब्ररीत मिळाला तर आवर्जून बघा

पुल देशपांडे म्हणतात ....

समीक्षक हे बोहारणीसारखे असतात. नवा करकरीत शालु दिला तरी तोंड वैंगाडतात.

Proud

अपमान कसा होइल ?

हल्ली बोहारणीना काम नसल्याने त्याच वेष पालटून चित्रपट समीक्षण लिहायचे काम करतात , असे कोणतर म्हणत होते.

बोहारणीच्या धंद्यात किती खस्ता खाव्या लागतात ! बुट्टीत भांडी घाला , उचला , उन्हातान्हातून फिरा ,आरोळी ठोका .... मग शालू बघून नाक मुरडायचे.

त्यामानाने हे बरे आहे... फुकटचे तिकिट घेऊन मॉलमध्ये एसीत बसायचे. पॉपकॉर्न खात नाक मुरडायचे !

Proud

बोहारणीकडे एकात एक बसणारे पाच वाडगे असतात .. कितीही चांगला कपडा दिला तरी पहिला किंवा दुसराच लहान वाडगा मिळणार.

समीक्षकांकडे पाच चांदण्या असतात !

Proud

बोहारणीकडे एकात एक बसणारे पाच वाडगे असतात .. कितीही चांगला कपडा दिला तरी पहिला किंवा दुसराच लहान वाडगा मिळणार.

समीक्षकांकडे पाच चांदण्या असतात ! >>> Lol

अफगाणिस्तानमध्ये एक लहान मुलगी घरात एकही पुरुष नसल्याने मुलगा बनून चार पैसे कमवायचा प्रयत्न करते.

>>> डेबोरा एलिसच्या 'द ब्रेडविनर' पुस्तकाची हीच थीम आहे ना? पुस्तकावरून घेतलेला सिनेमा आहे का?

अफगाणिस्तानमध्ये एक लहान मुलगी घरात एकही पुरुष नसल्याने मुलगा बनून चार पैसे कमवायचा प्रयत्न करते.

>>> डेबोरा एलिसच्या 'द ब्रेडविनर' पुस्तकाची हीच थीम आहे ना? पुस्तकावरून घेतलेला सिनेमा आहे का?>>

अगदी अगदी. मी हे हेच विचारायला आलेय.

ब्रेडविनर वर आहे का? हेच विचारायचे आहे मला. अपर्णा वेलणकरने अनुवाद केलाय. त्याचे पुढचे दोन भाग पण आहेत. छान पुस्तके.

हसताना तिचा जबडा जवळुन पहा. >> म्हणजे हेलन ऑफ ट्रॉय सारखे का? "हाच तो जबडा, जिच्या बापाने त्याच्या पिक्चर मधे अनेकांचे जबडे तोडले" Happy

फारे, काय कळ्ल नाय. खुपखुप आडवा जबडा आहे तिचा. काल कलर्सवर 'कॉमेडी नाईट्स' मधे आली होती तेव्हा पाहिले.

अथिया शेट्टी ऑलरेडी स्वतःला फार मोठी स्टार समजू लागली आहे का? कलर्सवर वैतागल्यासारखी कशाला बसली होती.

अख्खा कलर्सच्या एपिसोडमधेय सलमान क्वचित बोललाय बाकी इतर वेळ फक्त हसतोच आहे इतका हसलाय की दोन तीनदा त्याला ठसका लागलाय. मी तो एपिसोड केवळ त्याच्या हसण्यासाठी पाहिला.

बाकी, रोस्टचा फॉरमॅट वापरून केलेला हा नवीन शो बकवास आणि टुक्कार आहे. तेच तेच घिसेपीटे जोक्स आणि तेच फालतू होस्ट. भारती फार आधी कॉमेडीयन् म्हणून आवडली होती, आता मात्र किळसवाणी वाटत. येईल त्या पुरूषाच्या अंगचटीला काय जाते, प्रत्येकावरच लाईन काय मारते. दुसरे काही विनोद नाहीतच का?

त्या श्रुती सेठचा आणि विनोदाचा दूरान्वयेही काही संबंध नाही. काल त्या रेड ड्रेसमध्ये कसली चीप दिसत होती.

रॉहु, थ्यान्क्यु. बहुचर्चित जबडा. Happy Happy ... दात दाखवुन हसताना तर तो फारच मनमोकळेपणाने दिसतो. हसत नसताना इतका जाणवत नाहिये.

बहुचर्चित जबडा>>> हे वाचून नाना पटेकरचा लेख आठवला. तिने (मंदिरा बेदी) परत आडवे केळे खाल्ले Lol

कॉफी आणि बरंच काही, या मराठी चित्रपटाबद्दल कुणी लिहिल्याचं दिसले नाही ( चूभू... )
मी सिडीवर बघितला, यू ट्यूबवर पण आहे.

मला खुप आवडला. अगदी साधी कथा. जूनाट रोमँटीक कल्पना उराशी बाळगून असलेली नायिका, आणि मुखदुर्बळ नायक.. अगदी परिचित प्लॉट. पण हाताळणी सुरेख.

तसे बघायला गेलं तर यात बरेच घटक नाहीत. टिपीकल प्रेम नाही, प्रेमगीत नाही, स्वप्नदृष्य नाही, विनोद नाही, उपदेशाचे ज्यादा डोस नाहीत, प्रेमळ आ़जी आजोबा नाहीत, हयात नसलेली आई फोटोत नाही, नाच नाही, मुद्दाम सजवलेल्या फ्रेम्स नाहीत, ( स्वजो नाही, सता नाही )

पण सर्वच पात्रे अगदी कुठेही सहज भेटतील अशी. सगळ्यांचा घरातला आणि ऑफिसमधला वावर नैसर्गिक. भाषा त्या त्या पात्राला शोभेल अशीच. खास करून आय टी कंपन्याम्मधली भाषा खासच.

बहीण, मित्र, बाबा, मावशी हि नाती पण असावी तशीच. गाणी पण दोनच आणि तिही छान.
पुण्याचे छान चित्रण.

प्रार्थना बेहरे सुरेख दिसलीय, वैभव ( याचे आडनाव कळले नाही ) पण यथायोग्य. अवश्य बघा.

कॉफी आणि बरंच काही मला पण आवडला. साधी सरळ गोष्ट.
ते कॅफे कुठलं आहे हे विसरुन गेलो. छान वाटलं आणि शेवटला दिलीप प्रभावळकरांच छोटेखानी भाषण पण आवडलं.

बोहारणीकडे एकात एक बसणारे पाच वाडगे असतात .. कितीही चांगला कपडा दिला तरी पहिला किंवा दुसराच लहान वाडगा मिळणार.

समीक्षकांकडे पाच चांदण्या असतात ! >>> Lol समिक्षकांकडनं किती चांदण्या मिळतात , अर्धा , पाव , पाऊण ? Proud
हीरोत सुनील शेट्टीची मुलगी आहे. हसताना तिचा जबडा जवळुन पहा. >>> आता अजुन किती जवळुन पहायचा Lol

Pages