Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बजरंगी भाईजान बघितला एक हळवा
बजरंगी भाईजान बघितला एक हळवा सुंदर चित्रपट आहे. सलमान व त्या लहान मुलीची केमिस्ट्री अप्रतिम जमली आहे. नवाजउद्दीन सिम्पली ग्रेट ....सर्व परिवारा सोबत बसून पाहण्यासारखा चित्रपट. ...
नवाजुद्दीन, छोट कार्टून अगदी
नवाजुद्दीन, छोट कार्टून अगदी धमाल आहेत. कधी लागला केबलवर तर मागवा पिझ्झा आणि टीव्हीसमोर ठाण मांडा.
नवाजुद्दिन चा नवा चित्रपट
नवाजुद्दिन चा नवा चित्रपट येतोय.. Manjhi - The Mountain Man
राधिका आपटे पण आहे संगतीला..पोस्टरवरुन तर मस्तच वाटतोय..
बहुतेक सत्य घटनेवर आधारित आहे अस दिसतय त्यावरुन..
नाव नै आठवत पण उत्तर भारतातील एका व्यक्तीच्या बायको मरण पावली. का ? तर दवाखान्यात जाण्याइतपत वेळ न मिळाल्यामुळे/ कि पोहचायला उशीर झाल्यामुळे.गाव आणि शहराच्या दरम्यान असलेल्या डोंगरामुळे दळणवळणाचा रस्ता खुप लांब पडतो आणि त्यामुळे अडीअडचणीला मदत लवकर पोहचत नाही म्हणुन बायको मरण पावल्यानंतर आपल्यासारखी परिस्थिति इतरांवर येऊ नये म्हणून त्याने एकट्याने तो डोंगर फोडून रस्ता तयार केला..
पोस्टरमधे नवाजुद्दिन च्या चेहर्यावरील भाव अशक्य आहेत.. या माणसाचा चेहरा म्हणजे एक पुस्तक आहे. काय क्लास अॅक्टींग करतो..जबरदस्त.
चला २१ ऑगस्ट ची वाट आहे आता..
आत्ताच ट्रेलर बघीतल.. त्याच
आत्ताच ट्रेलर बघीतल..
त्याच घटनेवर आधारित आहे .. मजा आली ट्रेलर बघताना.. आता तो कसा निभावला असणार बघणे आले.
हो हि सत्य घटना आहे.
हो हि सत्य घटना आहे.
दशरथ मांझी यांच्या जिवनावर
दशरथ मांझी यांच्या जिवनावर आधारीत आहे. बिहार मधे गेलहर येथे त्यांनी एकट्याने डोंगर फोडून रस्ता बांधला.त्यांना बहुतेक पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे असे वाचल्यासार्खे वाटते.
अरे , तो राधिका आपटेचा '
अरे , तो राधिका आपटेचा ' अहिल्या' बघितला? शोर्ट फिल्म आहे , फार थ्रिलर आहे अस नाही पण धक्कातंत्राचा अवलंब आहे
.
कित्ती गोड आणि सहज वावरते ती राधिका आपटे .
राधिका आपटे . - घो मला असला
राधिका आपटे . - घो मला असला हवा बघा . मस्त आहे
राधिका आपटे ही उत्तम
राधिका आपटे ही उत्तम अभिनेत्री आहे. ती डायलॉगपण छान म्हणते, तिचा आवाज ऐकायलापण छान वाटतो. टीव्हीवर मुलाखत देताना पण इतक्या सहजपणे देते कि तिच्याबरोबर दुसरे कलाकार असतात त्यांच्याकडे लक्षच जात नाही. मस्त मला आवडते.
रधिका आपटे आता रजनीकांतची
रधिका आपटे आता रजनीकांतची हिरॉईन बनणार आहे. ताजी बातमी.
bahubali pahila, uttam
bahubali pahila, uttam digdarshnala uttam abhinayachi ani nirmitichi jod
काल दृश्यम पाहिला. चांगला
काल दृश्यम पाहिला.
चांगला आहे.
देवगण ओके.
तब्बू सुमार.
रजत कपूर उत्तम.
बाकी सगळं ठीक ठाक. उत्तम वेगवान कथानक. त्यामुळे वन्स वॉचेबल.
रसप तुला श्रेया सरन म्हणायचे
रसप तुला श्रेया सरन म्हणायचे आहे का?
नाही तब्बुच म्हणायच असाव, ती
नाही तब्बुच म्हणायच असाव, ती पण आहे की लिड रोलमधे!
ओके. हल्ली सुमार सहसा तब्बू
ओके. हल्ली सुमार सहसा तब्बू बरोबर वापरले जात नाही, पण पसंद अपनी अपनी.
दृश्यम पाहिला... चित्रपट
दृश्यम पाहिला... चित्रपट मध्यांतर पर्यंत थोडा स्लो आहे पण नंतर जी पकड घेतो ती शेवट पर्यंत. ....तब्बु , अजय देवगण, रजत कपूर यांची कामे उत्तमच आहेत पण नंबर वन चित्रपटाची कथा ....एकदा पाहण्यासारखा आहे
एम.आय ५ बघितला . इथन हन्ट
एम.आय ५ बघितला .
इथन हन्ट च्या चाहत्यांसाठी अर्थातच ट्रीट आहे.
पण या वेळेला भाव खाउन जातात ते बेन्जी , एजन्ट बेन्ड ( एम.आय ४ वाला अॅनलिस्ट) आणि नविन "हन्ट गर्ल" एल्सा. या वेळेला गॅजेटस जरा कमी वापरले आहेत आणि मास्कही .:)
दृश्यम आवडला मलाही. मस्त
दृश्यम आवडला मलाही. मस्त फास्ट कथानक. अजय देवगण आणि कमलेश सावंत (गायतोंडे) रॉक्स.
तबू अजिबात नाही आवडली.
गिरीश कुलकर्णी चा हायवे कुणी
गिरीश कुलकर्णी चा हायवे कुणी पाहिलाय आहे का. ? कसा आहे?
क्काय? रीलीज कधी झाला तो???
क्काय? रीलीज कधी झाला तो???
रिलिज व्हायचा आहे अजून
रिलिज व्हायचा आहे अजून 'हायवे'. २८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटभर तब्बू एकसुरी आवाजात
चित्रपटभर तब्बू एकसुरी आवाजात आवाजाह बोलत रहाते.
सरळ सरळ पाट्या टाकल्या आहेत तिने !
बाकी मूळ चित्रपटाचा फॅन असल्याने पास
एम.आय ५ बघितला . इथन हन्ट
एम.आय ५ बघितला .

इथन हन्ट च्या चाहत्यांसाठी अर्थातच ट्रीट आहे. >>
एमआय५ अत्यंत विस्कळीत चित्रपट
एमआय५ अत्यंत विस्कळीत चित्रपट म्हणून ओळखला जाईल. एमआय सिरीज मधले एक चित्रपट पडतो तर त्याच्यानंतरचा गाजतो. मागील घोस्ट प्रोटोकॉल उल्लेखनिय होता. तर त्याआधीचा एम.आय ३ अजिबात प्रभाव पाडू शकला नाही. याचित्रपटातची स्टोरी साफ गंडलेली आहे. फक्त स्टंट्स विभागात उत्तम आहे. इतक्या मोठ्या प्रभावशाली सिंडीकेट्स गृपचा लीडर अवघ्या ५-६ लोकांच्या बळावर चालत असतो. मोठ मोठ्या कामगिरींचे श्रेय देताना त्यात त्याची काय भुमिका होती कुठेही स्पष्ट केले नाही. बरेच काही आहे जे पटत ही नाही वर हास्यास्पद जास्त वाटते.
स्टंट बघा विसरून जा.
उलट मला अगोदरचे चित्रपट
उलट मला अगोदरचे चित्रपट विस्कळीत वाटतात , एका गोष्टीची दूसरीला लिन्क लावता लावता दमछाक होते.
आय.एम.एफ ची टीम या देशातून त्या देशात फिरत असते .
घोस्ट प्रोटोकॉल मध्ये इन्डीयन कनेक्शन अनाकलनीय .
यात निदान वर्ल्ड टूर नाही आहे. आणि प्रामाणिकपणे केवळ भारांभार गॅजेट्स नाहीत आणि मस्त मारामारी करणारी एल्सा यामुळे फार आवडला .
निदान वर्ल्ड टूर नाही आहे>
निदान वर्ल्ड टूर नाही आहे> किमान ४-५ देश फिरतात ना. बेलारुस, इंग्लंड, फ्रांस, मोरोक्को, ऑस्ट्रेया
बॉन्ड पट (फक्त पीअर्स
बॉन्ड पट (फक्त पीअर्स ब्रॉस्नन) आणि इथन हन्ट पट केवळ त्या दोघांसाठीच बघायचे. स्टोरी कोण बघतंय!
निम्बूतै .... शेकडो , लाखो ,
निम्बूतै .... शेकडो , लाखो , करोडो धन्यवाद त्या वाक्यासाठी .
एम.आय. ५ बघताना नविन बॉण्डपटाचे ट्रेलर लागले .

नवरा सरसावून बसला लगेच . मी म्हटल , मला क्रेग अजिबात आवडत नाही बॉण्ड म्हणून , आपला फेव. फक्त पीअर्स ब्रॉस्नन
आपला फेव. फक्त पीअर्स
आपला फेव. फक्त पीअर्स ब्रॉस्नन >> डिट्टो!!
मला क्रेग अजिबात आवडत नाही
मला क्रेग अजिबात आवडत नाही बॉण्ड म्हणून , आपला फेव. फक्त पीअर्स ब्रॉस्नन>> येस्स.. मी पण फॅन क्लबात
Pages