चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसपने इथे लिहिले होते, तो अग्ली सिनेमा फ्लाईटमधे बघितला... प्रचंड अस्वस्थ करून जातो हा सिनेमा. भारतीय चित्रपटातल्या सर्वच साचेबद्ध प्रतिमांना पार उस्कटून टाकतो.

प्रत्येक भुमिकेसाठी अचूक पात्रनिवड केलीय. शिवांगीला पुर्वी कधी पडद्यावर बघितल्याचे आठवत नाही. इथे मात्र अगदी चपखल रोल आहे. ज्या सीनमधे कुठल्याही कलाकाराची "नीना गुप्ता" झाली असती, त्या सीनमधेही तिने उत्तम बेअरींग ठेवलेय.

गिरिश कुलकर्णी मला कुठ्ल्याच मराठी चित्रपटात आवडला नाही,इथे मात्र तो परफेक्ट आहे. मुलगी हरवली आहे अशी तक्रार नोंदवतानाचा सीन तर एकाचवेळी उबग आणणारा आणि कमालीचा वास्तव उतरलाय.

बघणार असाल तर थोडे धैर्य गोळा करून बघा.

मला वळुमधे आवडलेला अगदी पर्फेक्ट गावकरी वाटतो तो!
चागला आहे की तो! म्हणजे सामान्य चेहर्‍याचा असल्याने त्याला आतापर्यत मिळालेल्या भुमिकेत समरसुन जातो, अपवाद पुणे@+ असा कुठलासा पिक्चर ...
असो आवड आपलीआपली!

चागला आहे की तो! म्हणजे सामान्य चेहर्‍याचा असल्याने >>> प्राजक्ता तू आमच्याच गावची का? :). कोणते ते लिहायची गरज नाही.

तो पुणे ५२. मला आधी वाटले शिफ्ट लॉक झाले लिहीताना. पण मग पुणे%@ होईल Happy

फोकस मध्ये लिटरली दोन सीन्स चांगले असतील! थिएटरमध्ये तर फार बोअर झाला सिनेमा मला तो. Sad
विल स्मिथचा दुसरा महाबोअर झालेला सिनेमा.. त्या आधीचा हॅनकॉक पण रटाळ वाटला होता..

फा Lol

फा! मी त्या शहराची नाही पण त्या शहराच हवा-पाणि लहानपणापासुन चाखलेल असल्याने विशिष्ठ गुण लागलाय खरा..
पुणे ५२ तला आकडा खरच आठवत नव्हता.

रसपने इथे लिहिले होते, तो अग्ली सिनेमा फ्लाईटमधे बघितला...

>> दि.दा, शप्पथ सांगतो मी काहीच नाही लिहिलं 'अग्ली'बद्दल ! Sad

गिरिश कुलकर्णी मला कुठ्ल्याच मराठी चित्रपटात आवडला नाही

>> अगदी अगदी ! दिसणं वगैरे आपल्या हातात नसतं. पण वावर तरी चांगला असावा. 'पुणे ५२' मध्ये तर असह्य होतो.

काल युट्युबवर अग्ली पाहिला. मला अगदी साधारण वाटला. पाहताना अग्लीनेस जाणवतो पण ख-या आयुष्यात हल्ली इतका अग्लीनेस दिसतोय की चित्रपटातला अग्लीनेस अंगावर येत नाही. इंद्राणी मुकर्जीप्रकरण वाचल्यानंतर हा चित्रपट पाहिल्याने कदाचित जास्त फरक पडला असावा Sad

चित्रपटातली पात्रे अशी का वागतात याचे ठळक स्पष्टीकरण कुठेही नसले तरी फारसे काही बिघडत नाही. इतकी संत्री सोलायला कुठे वेळ असतो चित्रपटात आताशा आणि असला तरी कुणाला वेळ असतो ते पाहात बसायला. बोसच सगळ्यात जास्त अग्ली आहे हे पहिल्या प्रसंगापाहुन वाटत राहते ते अगदी शेवटच्या प्रसंगापर्यंत. त्याच्यानंतर नंबर त्याच्या बायकोचा.

पण याव्यतिरिक्त जे काही कमकुवत दुवे आहेत ते खटकतात. उदा. राहुल फरार होतो ते त्याला ट्रायलसाठी म्हणुन चाचपणी करताना. आता त्याला पोलिस लॉकपमध्ये न ठेवता तिथे का ठेवलेले देव जाणे. तो काही एवढा जालिम गुन्हेगार नव्हता की साऊण्डप्रुफ खोलीत त्याला ठेवलेले (खोलीच्या भिंती पाहुन तसे वाटले, कदचित तसे नसेलही). फराराला पकडायचे असते हे पोलिसांच्या गावीच नव्हते ते जाऊद्या. पण तो सोबत सर्विस रिवॉल्वर घेऊन पळाला याचेही त्यांना काही वाटले नाही. ते शोधायचे कष्ट घेतले नाही. पुढे राहुलच ते त्याच्या कामासाठी हवे म्हणुन शोधतो.

मुलगी हरवताना त्यात राहुल आणि चैतन्यचा हात नसतो असे कली सापडल्यानंतर मला वाटले. ती हरवली या घटनेचा पैसे मिळवण्यासाठी फायदा घ्यायची कल्पना त्यांना नंतर सुचली असावी. पण हे एका शेवटच्या प्रसंगावरुन कळते. त्याआधी ते दोघे एकत्र असतानाही त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यातुन हे अजिबात सुचीत होत नाही. ते दोघेही काही नाणावलेले गुन्हेगार नव्हते की त्यांना कुठल्या प्रसंगात कशी अ‍ॅक्टींग करुन पोलिसांना गंडवावे हे आपोआप सुचेल. (संदर्भ, चैतन्य तुरुंगात असताना राहुल भेटायला येतो तेव्हा).

कली का हरवली याचे स्पष्टीकरण मला अतिशय खोटे वाटले. अर्थात चित्रपट माणसांतल्या अग्लीनेसवर आहे. माणसे वेगवेगळ्या प्रकारे अग्ली आहेत हे दाखवायचे होते, कुठल्या प्रसंगामुळे हा अग्लीनेस दिसला हे कदाचित महत्वाचे नसेल. पण तरीही ज्या प्रसंगावर चित्रपट बेतलाय त्या प्रसंगाला नीट क्लोजर द्यायला हवे होते. कली कुठे आहे हे त्या बाईला कसे कळाले हा एक प्रश्न. आणि आधीपासुनच माहित होते तर तिने काहीही का केले नाही हा दुसरा प्रश्न. तिचा जो धंदा होता त्याला अनुसरुन ती पुढची पावले उचलु शकली असती. पण ती गप्प बसुन राहते आणि शेवटी पोलिस थोडी जनाची भिती दाखवतात तेव्हा ती जागी होते. मला अजिबात पटले नाही.

चित्रपट अनुराग कश्यपचा आहे म्हणुन एवढे टंकायचा खटाटोप. नाहीतर बाहुबली बघुन मला पडलेले प्रश्न मी तसेच चित्रपटगृहात ठेऊन बाहेर आले, ते तसेच तिथेच सोडायचे असतात हे मला माहित आहे Happy

बाकी गिरीश कुलकर्णीचे काम आवडले. पहिल्याच प्रसंगात अतिशय चिड वाटली पोलिसाची. लोक किती गंभीर तक्रार घेऊन येतात आणि पोलिस ते किती लाईटली घेतात. Sad

प्रत्येक भुमिकेसाठी अचूक पात्रनिवड केलीय. शिवांगीला पुर्वी कधी पडद्यावर बघितल्याचे आठवत नाही. इथे मात्र अगदी चपखल रोल आहे. ज्या सीनमधे कुठल्याही कलाकाराची "नीना गुप्ता" झाली असती, त्या सीनमधेही तिने उत्तम बेअरींग ठेवलेय

ती तेजस्विनी कोल्हापुरे आहे. शिवांगी नाही. मी आजपावेतो तिचे काम जरी पाहिले नसले तरी तिने १० चित्रपटात काम केलेय असे विकि सांगतोय. नीना गुप्ता कमेंट कळली नाही, मी युट्युबवर पाहिला असल्याने काटछाट झाली असावी.

पापनाशम बघितला .
तीच कथा तिसर्यान्दा बघताना खरतर कंटाळा आला होता , पण तरीही कमल हसन साठी बघितला .

हा मूळ चित्रपटाची डिट्टो कॉपी नाही आहे . बरेच प्रसंग बदलले आहेत.
अर्थातच कमल हसन आवडला . ती मोठी मुलगी फार म्हणजे फारच गोड आहे .
अनेक छोटे छोटे प्रसंग मस्त घेतले आहे .
मोठी मुलगी त्याला नेचर कॅम्प बद्दल तिथे काय काय झालं ते सांगत असते तो विशेश आवडला .
त्याचे स्वभावविशेश कळतात .
त्याची बायको वयाने फार मोठी वाटते .
शेवटी तो पेरुमल( गाय्तोन्डे ) त्याला मार मार मारतो - ते फार भडक आहे .

ओ रसप, चित्रपटासंबंधी लक्षात राहण्याजोगे लेखन आणि रसप ही सांगड मनात रुजलीय म्हणून असेल.

साधना, एवढे बारकावे लक्षात नाही आले माझ्या. त्याला जेरबंद करतात ती पोलिस कॉलनी असते एवढा उल्लेख आहे संवादात असे आठवतेय. तेजस्विनी का ती ? नाव ओळखीचे वाटतेय.

नीना गुप्ता आणि तिच्या बरोबर एफ टी आय आय मधून आलेल्या अभिनेत्रींची एक खास ( पण एकच ) स्टाईल होती. भावनांचा अतिरेक झाला कि आक्रस्ताळेपणाने आवाज चढवून त्या संवाद म्हणत असत. त्या वेळी आपल्या लूक्स बाबत त्या फिकीर करत नसत ( विस्कटलेले केस, वाहते काजळ, तोंडातून लाळ, अस्ताव्यस्त कपडे ) पुर्वी अभिनेत्री कुठल्याही प्रसंगात ( माला सिन्हा, मीनाकुमारी वगैरे ) स्वतः सुंदर दिसू, असे पहात असत.

पण ही स्टाईल नवी असली तरी काही काळाने त्यात तोचतोच पणा यायला लागला. त्या काळातही हंगल, दीना पाठक नैसर्गिक अभिनयच करत होते.

इथे कोल्हापुरे बाईंनी आवाज न चढवता, त्याच दबलेल्या आवाजात ते संवाद म्हंटले आहेत.

( एक सामान्य प्रेक्षक म्हणून माझे हे मत आहे )

मी सिडीवर फुकरे बघितला.. मला आवडला. पुलकित सम्राट अगदी क्यूट. सर्वच जण आपापल्या भुमिकेत फिट्ट. एक्स्ट्रा कलाकार ( बसमधली बाई, लॉटरी विक्रेते, नायजेरीयन गुंड ) पण छान अभिनय करून गेलेत.

कुणाला पुलकित मधे कॉलिन फारेल चा भास झाला का ? का फक्त मलाच तसे वाटतेय ?

फँटम बघितला , आवडला . वन टाईम वॉच वाटला .
बेबी ईतका थरारक नसला तरी बर्यापैकी खिळवून ठेवतो .

सैफ आणि कटरीना - चुकीची निवड . २-३ गाणी आहेत , पण ती चित्रपट अडकवून ठेवत नाहीत .
शेवट आवडला . शेवटी ती फॅन्टसी आहे . कुठेतरी मनातून वाटतं .. काश यार सचमे ऐसा हो पाता ... Happy

रच्याकने , नवाज मिस्त्री कुठल्या कंपनीचा मेकप कीट वापरते ते बघायला पाहीजे . धूमश्च्क्रीमध्येही ना लिपस्टीक फिक्की पडत न लायनर खराब होतं.

कुणाला पुलकित मधे कॉलिन फारेल चा भास झाला का ? का फक्त मलाच तसे वाटतेय ? >> मला पन.. पण तरीही कॉलिन फारेल जास्त आवडतो मला Happy

कुणी वेलकम बॅक पाहिला का?
पहिला खुप आवडलेला त्यामुळे हा बघावसा वाटतोय पण दुसरा भाग बर्‍याचदा बंडल निघतो म्हणुन बघावा की नाही हे ठरत नाही. आणि त्यात जॉन आणि कमल हसनची मुलगी पण नाही आवडत त्यामुळे इतरांच्या रिव्ह्युवरुन अंदाज घ्यायचा आहे. तसाही वेलकम नाना पाटेकर, परेश रावल आणि अनिल कपुर या त्रिकुटानेच खाल्लेला.

कुणी पाहिला असेल आणि बघणेबल असेल तर सांगा म्हणजे उद्याचा रविवार सार्थकी लावता येईल.
मला हलकेफुलेके कॉमेडी सिनेमे आवडतात. (माझी आवड सांगते नाहीतर आम्हाला आवडलाय तो तुला कशावरुन आवडेल असा युक्तीवाद होईल.)

'वेलकम बॅक' पाहिला. त्याचे कथालेखक आणि पटकथालेखक जे कुणी असतील, त्यांना बहुतेक पेमेंट दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी अर्धवट काम केलंय. नॉनसेन्स.

'वेलकम बॅक' पाहिला. त्याचे कथालेखक आणि पटकथालेखक जे कुणी असतील, त्यांना बहुतेक पेमेंट दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी अर्धवट काम केलंय. नॉनसेन्स. >>> नशिब आमचे पैसे वाचवलेत.
आता सोमवारी तुमचे संपुर्ण परिक्षण वाचुनच कळेल नक्की काय नॉनसेन्स आहे ते.

वेलकम बॅक पाहिला. शेवट जरी गंडला असला तरी ७५% चित्रपट हसवतो. निखळ कॉमेडी. आता जर कुणी म्हणाल की इतका काही सिनेमा हसवत नाही. तर मी होते तेव्हा संपुर्ण थिएटर हाऊस्फुल्ल होतं आणि सर्वच जण हसत होते. त्यामुळे मला तरी आवडला. शेवट खरच खुप गुंडाळला आहे. अगदीच वाईट. ज्याना शक्य असेल त्यानी शेवट व्हायच्या आत बाहेर पडावे. :खीखी:

राखी +१

पण खरंसांगू का मला पहिल्या वेलकमचा शेवटही असाच उगाचह ओढुन ताणुन वाटलेला. हा शेवटही पकाऊ आहे पण तो कबरीस्तान मधला प्रसंग तर हाहापुवा आहे

कबरस्तानातला प्रसंग फारसा विनोदी नाहीये. अभिनयाने जिवन्त होतो पण.

परेश रावळ अनिलकपूरला एके ठिकाणी ऐ टेढे कंधे म्हणतो तेव्हा तर स्फोटच होतो.

डिम्पल फारच म्हातारी दिसते/ दाखवली आहे आता. एकदम सुलोचना , निरुपा रॉय क्यातेगरीतली वाटते . साठी म्हणजे काही फार नाही तिच्यासारखी;ला

"देउळ बंद " बघितला .

गश्मिर महाजनी भारीये हां . मोहन जोशी मस्तच . काही काही संवाद फारच खुसखुशित आहेत.

बाकी गोष्टींबद्दल नो कमेंट्स Happy . ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.

अमेरिकेवरून आले आहेत हे ठीक आहे पण म्हणून कोणी पूण्याच्या घरात शॉर्ट्स घालून फिरत नाही Happy . ही गोष्ट प्रकर्शाने जाणवली Happy
आणि ती मुलगी ५ वर्शाची वाटत नाही .
शेवटी उगाचच साळस्कर , करकरे यांचा उल्लेख करून लोकांच्या भावनेला हात घातलाय .

गश्मिर महाजनी भारीये हां >>>>>.
का खरच छान वाटला..
सगळ्या सिनिअर लोकांसमोर चांगला अभिनय वाटला त्याचा..

'वेलकम बॅक' पाहिला. कुठला चित्रपट लॉजिकने बघायचा आणि कुठला डोका घरी ठेउन याचे आडाखे पक्के आहेत.
त्यामुळे 'वेलकम बॅक' बरा वाटला . पहिल्याएवढा भारी नसला तरी (सर्वसामान्यांचे ) मनोरंजन करतो. बाकी समीक्षक , परीक्षक , उच्च्भ्रू रसिक यांचे माहित नाही. पण पिटामधला पब्लिक खुष होता

Pages