शृंगार ३

Submitted by अनाहुत on 24 August, 2015 - 13:13

उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो . मी स्वतःकडे पाहिल , मी पोटात लाथ बसु नये म्हणून माणूस ज्या पोझीशनमधे असतो त्या पोझीशनमधे होतो . ती लाथ मारणार होती , छे उगाचच काहीही . तिने नुसता असा काही अविर्भाव केला कि कृतीची गरजच नाही पडली . आणि मी घाबरलो , छे ती नुसती प्रतीक्षिप्त क्रिया होती . जाऊदे दमते बिचारी काम करून . आज झोपूदे उद्यापासुन येईल ना ती .

बाहेर पडलो तर रस्त्यावर दोन - तीन कुत्री आणि मीच होतो . जिममधे पोहोचलो तिथ एक कुत्रा , आपल ट्रेनर वाटच पहात होता . तिथ गेल्यावर मात्र माझ्याकडून मनातल्या मनात का होईना त्याला कुत्रा संबोधन माझ्यावरच उलटल होत , तिथ मलाच कुत्र्यासारख पळाव लागत होत . छे याच्यासारखा दुसरा उद्योग नाही दुसरा . लोकांनी मेहनत करायची , घाम गाळायचा आणि पैसे याला द्यायचे , हे आपल चांगल आहे .

शेवटी ते सगळ उरकुन घरी आलो . घरात आता बरीच धावपळ सुरू झाली होती त्यात सामील झालो आणि सगळ आटोपून ऑफिसमध्ये पोहोचलो .

दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो . आणि स्वतःच आवरल . बायकोपाशी गेलो आणि तिला उठवणार तेवढयात कालची आठवण आली . मग सुरक्षित अंतर ठेवूनच तिला उठवण्याचा प्रयत्न केला , पण काही उपयोग झाला नाही . थोडा पुढे जाऊन प्रयत्न केला तर कालच्याच अनुभवाचा पुनःप्रत्यय आला . मग गेलो एकटाच जिमला . अस आता रोजचच झाल होत . ती काही जिमला येईल अस वाटत नव्हत . तरीही माझ्यातील फरक बघुन ती नक्की येईल याची खात्री होती मला . मी मात्र माझे प्रयत्न सुरू ठेवले .

महिना झाला असाच दिनक्रम सुरू होता . आता जरा चांगल वाटू लागल होत . फिटनेस चांगला वाटत होता . शरीर कस हलक-हलक वाटत होत . उत्साह वाढला होता . सगळ सभोवतालच जगच सुंदर झाल होत .

ऑफिसमध्ये वातावरण तसच होत पण त्याच आजकाल काही विशेष वाटत नव्हत . काहीही झाल तरी विशेष अस वाईट वाटत नव्हत . एक आनंद पसरून राहिला होता आयुष्यात आणि चेहऱ्यावरही . पण थोडीफार कंट्रोल आला होता स्वतःवर . बॉससमोर जाताना सुतकी चेहरा करून जायला विसरत नव्हतो . त्यामुळे ऑफिस सुसह्य झाल होत . शेवटी नुसती वर्क इफिशियंसी असून पुरत नाही तर ज्या लोकांमध्ये काम करायच आहे त्यांच्याशी डील करायलाही यायला हव .

लोकलमधे चढण्यापूर्वी युद्धासारखी तयारी करत होतो आधीही हे करायचो पण कधीकधी गाफिल राहायचो तो गाफिलपणा सोडला होता आणि त्यानंतरही जर थोडाफार त्रास झालाच तर त्यासाठी शारीरिक आणि मानसिक कणखरपणा आला होता .

घरी होता तेवढा वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न होता . नो मोबाईल , नो टिव्ही ओन्ली बिबी , या स्ट्रँटर्जीनुसार काम सुरू होत . तिने जिमला यायला अजूनही सुरूवात केली नव्हती . पण मला खात्री होती ती लवकरच यायला लागेल .

इथे वर्क इफिशियंसी वाढविणे सुरू होत . स्वतःला स्वतःमधे थोडी इंप्रूवमेंट वाटत होती पण असली मजा अभी दूर है . आणि संवाद तसा फार नाही पण थोडाफार सुधारला होता .

हं आली आपली ऑफिस बिल्डिंग .
ओह who is she ? she is so beautiful .
वा काय सौंदर्य आहे ! ओह married आहे . क्या बात है ! खरच इंडियन लूक मधेच मुली / स्रिया जास्त सुंदर दिसतात . ओके चला जाऊया आली लिफ्ट . ती सुद्धा आली लिफ्टमधे . माझ्या शेजारीच उभी होती . काय मस्त परफ्युम होता तिचा . यार फार छान वाटला हा परफ्युम . आपणपण घेऊया एक मस्त परफ्युम मंजूसाठी , आवडेल तिला . आज संध्याकाळी घरी जाताना घेऊनच जाऊया , आवडेल तिला .

चला पाहूया काय म्हणतय आपल ऑफिस ? नेहमीप्रमाणे थंड . No its cool . अरे या इथही . मघाशी दिसलेली सुंदरी माझ्या समोरच उभी होती अगदी काही क्षणच . सहजच लक्ष तिच्या कटीवर गेल . कटी म्हणतात कि कटीप्रदेश . छे कटीप्रदेश म्हणजे काहीतरी डोंगराळ द-यांचा प्रदेश , जंगल प्रदेश सारख वाटत . आणि हे म्हणजे...
चिकनी या शब्दाचा अर्थ गुळगुळीत , सुंदर आणि ज्यामुळे कोणीही घसरेल असा होतो ना . त्यामुळे हाच शब्द त्या कटीला चपखल बसेल . बाकी सोनाली कुलकर्णीलाही या बाबतीत ती कुठल्या कुठे सोडून देईल . माझा विचार सुरू होता तेवढयात ती सुंदरी बॉसच्या केबिनमधे शिरली . नंतर समजल ती बॉसची बॉस होती . बॉसच पण घरातली . काय पण नशीब असत एखाद्याच ? पण इतकी सुंदर वाइफ असेल तो माणूस इतका कसा रखरखीत . इतका राग , इतका वैताग कसा असू शकतो . अशी सुंदर बायको असलेला माणूस कायमस्वरूपी चेहऱ्यावर हसू घेऊन फिरायला हवा . असो ज्याच त्याच आयुष्य त्यात काय प्रॉब्लेम आहेत त्याच त्याला माहित . असो आज घरी जाताना मस्त परफ्युम घेऊन जाऊ . शेवटी आपली बायकोच जगात सर्वात सुंदर वाटते ....
.... क्रमशः
भाग १ http://www.maayboli.com/node/55229
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339
भाग १२ http://www.maayboli.com/node/58350

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिना झाला असाच दिनक्रम सुरू होता . आता जरा चांगल वाटू लागल होत . फिटनेस चांगला वाटत होता . शरीर कस हलक-हलक वाटत होत . उत्साह वाढला होता . सगळ सभोवतालच जगच सुंदर झाल होत . >> लगताये तू ईस मोडसे सचमुच गुजरेला है.

लई भारी..
लिखते रेहना...छोडना नही....लिखते रेहना...छोडना नही....

हा भाग आवडला.

<<घरात आता बरीच धावपळ सुरू झाली होती त्यात सामील झालो आणि सगळ आटोपून ऑफिसमध्ये पोहोचलो .>>
हे वाक्यं छान आहे.