Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॉन्ड पट (फक्त पीअर्स
बॉन्ड पट (फक्त पीअर्स ब्रॉस्नन) आणि इथन हन्ट पट केवळ त्या दोघांसाठीच बघायचे. स्टोरी कोण बघतंय! डोळा मारा >>> +१
पण दुर्दैवाने ह्या वेळेस इथन हन्टसुद्धा तितका irresistible नाही वाटला! प्रत्यक्ष आयुष्यातल्या बायको मुलीच्या विरहाचा परिणाम झाला असावा.
एल्सा बर्याच वेळा अलेक बाल्डविनची खरी मुलगी असावी असे वाटत होते. फेशियल फीचरसमध्ये बरेच साम्य आहे.
ज्जेबात ड्री आणि आत्म्धून
ज्जेबात ड्री आणि आत्म्धून
पण दुर्दैवाने ह्या वेळेस इथन हन्टसुद्धा तितका irresistible नाही वाटला! >> कबूल!!!. वय झाल आता त्याच
.
. तो एक स्वतंत्र चर्चेचा विशय आहे
) .
पण इथन हन्ट हा इथन हन्ट आहे.
( टॉम क्रूझ बद्दल नाही बोलत आहे हां मी
तो एजन्ट ब्रेन्ड पण भारी वाटला हां मला
< तळव्यावर हनुवटी ठेवुन पापण्यान्ची फडफड करत मान तिरकी करणारी बाहुली >
टिव्हीवर Everybody's Fine हा
टिव्हीवर Everybody's Fine हा सिनेमा पाहिला. अतिशय सुरेख आहे. मला आवडला. मुख्यतः रॉबर्ट डि निरो साठी. आयुष्यभर काम करून पैसे कमवून कुटुंबासाठी झटणारा पण शिस्तप्रिय स्वभावानं आणि मुलांना वेळ देऊ न शकल्यामुळे मुलांच्या दृष्टिनं पेरीफरीवर राहणारा बाप, पत्नी गेल्यावर हळवा होऊन मुलांना भेटायला निघालेला बाप, एकेका मुलाबद्दलच्या कल्पना आणि समोर आलेलं सत्य यांचा ताळमेळ बसत नाहीये हे स्पष्ट दिसत असूनही मुलांनी त्याला सांभाळण्यासाठीच मारलेल्या थापा पचवत पण त्याच बरोबर विद्ध होत गेलेला, सत्य समोरासमोर आल्यावरही ते ग्रेसफुली स्विकारणारा बाप असे अनेक पैलू डि निरोनं इतके सहजपणे दाखवले आहेत. हतबल म्हातारा ते एक खंबिर आणि मायाळू कुटुंबप्रमुख असा प्रवास खूप छान उलगडला आहे.
आजारपणात त्याला जो भास होतो तो सीन विशेष करून फार हृद्य झालाय.
अहल्या shortfilm पाहिली..
अहल्या shortfilm पाहिली.. मस्त आहे. नक्की बघा. youtube वर आहे.
बॉन्ड पट (फक्त पीअर्स
बॉन्ड पट (फक्त पीअर्स ब्रॉस्नन) आणि इथन हन्ट पट केवळ त्या दोघांसाठीच बघायचे >>> +१. जियो, निंबुडा!
तब्बू भयानक अभिनय करते दृश्यम
तब्बू भयानक अभिनय करते दृश्यम मध्ये.
कशाला तिला घेतलय.. उगाच वेळखाउ. तिथे स्त्री पोलीस दाखवायची गरजच कळली नाहि.... मेलोड्रेमॅटीक उगीच.
नवीन शॉन द शीप मुव्ही नुकताच
नवीन शॉन द शीप मुव्ही नुकताच पाहिला . चक्क कंटाळवाणा झाला शेवटी. मला सतत शॉन कडे पाहून ३ इडियट मधला आमिर खान डोळ्या पुढे दिसत होता ,सतत ती क्रॉस बॉडी ब्याग बाळगणारा.:अओ:
तब्बु कधीच आवडली नाही. देवगण
तब्बु कधीच आवडली नाही. देवगण पण. त्यामुळे दृष्यम पहावा की नाही असा विचार करत आहे. टीव्ही जिंदाबाद.
मांझी सिनेमा रिलीज झाला का?
मांझी सिनेमा रिलीज झाला का? त्या सिनेमाची प्रीव्ह्यु कॉपी लीक झाल्याची बातमी आहे.
संदूक पाहिला नुकताच. गंडलेला
संदूक पाहिला नुकताच.
गंडलेला सिनेमा आहे.
क्रांतिकारी माधवराव पुचाट आहेत. नुसते टोळके जमवून गुप्त संदेशांची देवाण घेवाण आणि अमके करू आणि तमे करू ह्याचे प्लॅनिंग करतात फक्त.
माधवराव म्हणजे नक्की कोण ह्याचा ही अंदाज मध्यावरच येतो. रहस्य उगीचच ताणले आहे.
डबल सीट पाहिला . मटामधल
डबल सीट पाहिला . मटामधल परीक्षण वाचून गेलो होतो . हाती काही फारस लागल नाही. एक दोन ठिकाणच्या अनावश्यक बोल्ड दृश्यांपेक्षा पटकथेवर मेहनत घेतली असती तर बर झाल असत. मुंबईसारख्या शहरात नवीन घर घेण् हा खरेतर संवेदनशील विषय आहे. तो विषय नीट व्यवस्थित फुलवुन मांडता आला असता. पण पदरात पड़ते ती सरधोपट मांडणी . इंटरवल नंतरचा भाग तर अक्षरश उरकला आहे. काय होणार आहे याचा अंदाज आधीच येतो आणि तसेच होते. निदान मांडणी तरी नीट हवी होती.
कलाकारांनी ठीक ठाक अभिनय केलाय. वंदना गुप्तेच काम आवडल. विशेष रोल नसुनहि छान काम केलेय. आरती वडबाग़ळकर छोट्याश्या भूमिकेत छाप पाड़ते. मुक्ता बर्वेच काम ठीक वाटल. मला स्वतला ती गोंधळलेली वाटली.
एकुणात टी व्ही वर आला तर बघा .
मूळ मल्याळम द्रिष्यम पाहीला
मूळ मल्याळम द्रिष्यम पाहीला या विकांताला .सुरवातीच्या कुन्द वातावरणाने चित्रपटाची पकड घेतली .
.
पुढे पुढे पहाताना जाणवलं की हिन्दी चित्रपट सीन टू सीन कॉपी आहे . अगदी बरेचसे डायलॉगही
नवर्याच चालू झालं - सेमच आहे , सेमच आहे - काय वेगळं आहे .
मीही तोच विचार करत होते , पण हा काहीतरी वेगळा होता . जरा उजवा वाटत होता .
कथा तीच होती , हिन्दी पाहिला होता तरीही या चित्रपटाने जास्त खिळवून ठेवलं.
शेवटी शेवटी जेन्व्हा जॉर्जकुट्टी(विजय) त्या सहदेवाचा (गायतोन्डे) मार खातो तेन्व्हा मी पटकन म्हटलं
. इथे तो मोहन्लाल खरच बिचारा कुटुम्बवत्सल माणूस वाटतो , अजय देवगण मार खाताना सिंघम वाटतो"
" आता कळलं , नक्की काय वेगळ आहे ते
.
चित्रपट संपला तेन्व्हा विचार केला नक्की काय आवडलं .
पहिलं म्हणजे वातावरण - कुन्द , हिरवगार. जॉर्जकुट्टीच घर , त्याच एरवी सायकल वरून फिरणं. ते छोटसं हॉटेल.
गीता प्रभाकरन - दिसायला फार स्मार्ट वाटली . मीरा देशमूख सारखी विझलेली नाही .
पण काही शॉटमध्ये खूपच कच्ची वाटली - तीची संवादफेक आवडली नाही .
प्रेत शोधताना खोदकाम चालू असताना ती नवर्याचा खान्द्यावर डोक ठेउन रडत असते , तेन्व्हा मध्येच निर्धाराने अश्रू मागे सारण्याचा प्रयत्न करते तो शॉट आवडला.
आणि सगळ्यात महत्वाच - जॉर्जकुट्टी -
मोहनलाल ला पाहिल्यानंतर अजय देवगणची निवड चुकल्यासारखी वाटली .
अजयचे डोळे आणि व्यक्तिमत्व त्या रोल ला मारक ठरतात . ( मारक म्ह्टलय - कारण मी मूळ चित्रपट पाहिला , नाहितर फक्त हिन्दी मध्ये तो चालून जातो )
जॉर्जकुट्टी खरच कमी शिकलेला , छोट्याशा शहरात रहाणारा , कुटुम्बवत्सल बाप वाटतो .आणि नंतर तितकाच धूर्त . तो हे सगळ करत असताना बापाची तडफड दिसते .
शेवटी जेन्व्हा गीता आणि तिचा नवरा त्याला भेटायला येतात तेन्व्हा मला अजय देवगण च आठवत नाही पण मोहनलालचे डोळे शेवटी पाणावलेले दिसतात .
( या सीनमध्ये गीता अतिशय अवघडलेली दिसते , त्यामानाने तब्बूने बरा निभावलाय सीन आणि अर्थातच इथेही तिचा नवरा अख्खा सीन खाउन जातो ) .
कमल हसनचा पापनाशम पण घेतला आहे. आता तो बघायचा आहे.
स्वस्ति सुंदर लिहिलंस चित्रपट
स्वस्ति सुंदर लिहिलंस चित्रपट परिक्षण. मूळ सिनेमे पाहण्याची ईच्छा झाली वाचून.
थँक्यु द्क्शुताई . मिळाला तर
थँक्यु द्क्शुताई .
मिळाला तर नक्की बघ , जर हिन्दी आवडला असेल तर हा कंटाळवाणा होणार नाही
भाषेच्या बाबतित म्हणाल तर ओ की ठो कळत नाही ( काही काही शब्द कळतात पण ) पण हिन्दी बघितल्यामुळे संदर्भ लावता येतो . पण चित्रिकरण खूप सुन्दर आहे.
हिन्दी गोव्याच्या पार्श्वभूमीवर बनवला आहे पण त्यातली सौंदर्य स्थळं घेतली नाहीत . आणखी नयनरम्य बनवता आला असता .
मला अजय देवगण च आठवत नाही पण मोहनलालचे डोळे शेवटी पाणावलेले दिसतात .>>>>
परत बघितले , अजय देवगणचे डोळे दारू पिउन झिन्गल्यासारखे बारीक दिसतात .
स्वस्ति मस्त पोस्ट. अजय देवगण
स्वस्ति मस्त पोस्ट.
अजय देवगण आवडतो पण मोहनलाल त्याच्यापेक्षा जास्त आवडतो. दोन्ही बघायला हवेत. कमल हसन पण आवडतो. तोपण बघायला हवा.
डबल सीट.. एक दोन ठिकाणच्या
डबल सीट..
एक दोन ठिकाणच्या अनावश्यक बोल्ड दृश्यांपेक्षा पटकथेवर मेहनत घेतली असती तर बर झाल असत..+१
दक्षिणा | 17 August, 2015 -
दक्षिणा | 17 August, 2015 - 14:01 नवीन
स्वस्ति सुंदर लिहिलंस चित्रपट परिक्षण. मूळ सिनेमे पाहण्याची ईच्छा झाली वाचून.
>> +१००००००
मी आता शोधुन पाहिन. जर कुठे ऑनलाईन पाहता येणे शक्य असेल, तर लिंक द्यावी प्लीज !
'मांझी' पाहिला. नवाझुद्दिन
'मांझी' पाहिला.
नवाझुद्दिन केवळ जबरदस्त ! ____/\____
चित्रपट फाईव्ह स्टार. अ मस्ट वॉच!
मांझी खूप आवडला. मस्त सिनेमा.
मांझी खूप आवडला. मस्त सिनेमा.
स्वस्ति जर कुठे ऑनलाईन पाहता
स्वस्ति जर कुठे ऑनलाईन पाहता येणे शक्य असेल, तर लिंक प्लीज !
त्या रोलमध्ये आणि एकंदरीतच
त्या रोलमध्ये आणि एकंदरीतच मोहनलाल केवळ महान आहे!
जर कुठे ऑनलाईन पाहता येणे
जर कुठे ऑनलाईन पाहता येणे शक्य असेल, तर लिंक द्यावी प्लीज ! >>>>
नाही . ऑनलाईन कुठे मिळेल माहित नाही .
नवर्याने त्याच्या मित्राकडून आणला होता , डाउनलोड केलेला .
Eternal Sunshine of the
Eternal Sunshine of the Spotless Mind बघतेय..
अजुन पूर्ण बघीतला नाही..
नविन आवडत पुस्तक आणि आवडत्या कलाकाराचा न पाहिलेला चित्रपट या दोन्ही बाबत माझी एकच भावना असते कि हे कधी संपु नये..
जिम कॅरी..या माणसाला जेव्हा जेव्हा पाहते त्या हरएक वेळी तेवढ्याच तीव्रतेने त्याच्या प्रेमात पडते..काय कलाकार आहे,,चुम्मेश्वरी..केट विन्स्लेट पन छानच आहे पण हा असताना इतर कुणाकड लक्षच जात नै ..
बघते आता चित्रपट..आज संपवेल पुर्ण अस वाटत नाही .. छानच आहे चित्रपट यात वाद नाही ..
मूळ दृश्यम सिनेमा
मूळ दृश्यम सिनेमा http://einthusan.com/movies/watch.php?malayalammoviesonline=Drishyam&lan...
Eternal Sunshine of the
Eternal Sunshine of the Spotless Mind संपवला..

नाही नाही म्हणता म्हणता राहावलच नै अजिब्बात..
मस्त मुव्ही.. सर्वच कलाकारांनी छान अभिनय केलाय..लिड हिरो हिरवीणीबद्दल काय बोलायच्च काम नाही..
मार्क रफालो का तर मला अंडररेटेड हिरो वाटतो..त्याला अजुनही न्याय्य देणारा मुव्ही निघाला नाही अस वाटत मला.. असो..
जिम ला या रुपात पाहिलं नै मी..यात मस्त दाखवला आहे..संयत एकदम..अपार्ट फ्रॉम व्हाट हिज फेमस फॉर
मस्तच आहे..
अरे हो आणखीन एक.. Eternal
अरे हो आणखीन एक..
Eternal Sunshine चित्रपटाच्या सुरुवातीला जिम आणि केट सोबत तिच्या अपार्ट्मेंट मधे गप्पा करत असतात तेव्हा बॅकग्राऊंड ला हिंदी गाणे जुनेवाले वाजत असतात..वादा ना तोड .. तु वादा ना तोड..
असलं भारी वाटत होत बघताना..वॉव..
विन्ग्रजी चित्रपट तसे बघत
विन्ग्रजी चित्रपट तसे बघत नाही , पण कोणी सुचवल तर बघते .
आता हा बघेन म्हणते .
Enough Said हा सिनेमा
Enough Said हा सिनेमा टिव्हीवर पाहिला.
मस्त, खुसखुशीत आणि तरीही रोमँटिक असा सिनेमा आहे. खूप काही मोठी स्टोरी नाहीये. बघायला मिळाला तर जरूर बघा.
वॉच लिस्ट मधे टाकुन ठेवतेय
वॉच लिस्ट मधे टाकुन ठेवतेय
काही दिवसापूर्वी नवरा Focus
काही दिवसापूर्वी नवरा Focus बघत होता . मी अधून मधून पाहिला .
त्या चोरींच्या सीन्स साठी तरी जरूर बघा .
केवळ महान आहेत - हातचलाखी आणि क्ल्रुप्त्या .
Pages