सुप्रीम कोर्टानेही याकूबची याचिका फेटाळल्याने आता त्याला फासावर चढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
त्याला फासावर चढवू नये असे मला वाटते आणी त्याची काही कारणे मी लिहित आहे. माझे लेखन काही लोकांना संतापजनक, दळभद्री, देशद्रोही, भाबडे असे वाटेल आणी त्या मतांचा मी आदर करतो. शेवटी माबो ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज असावी आणी इथे सर्वच मताचे स्वागत असावे. आपले मत काहीही असेल तरी कृपया धागा बंद पडायला कारण होतील असे प्रतिसाद टाळावेत.
१ फाशीची शिक्षा गंभीर गुन्हा निर्विवादपणे (बियाँड रीझनेबल डाउट) सिद्ध झाल्यावरच देण्यात यावी. याकूबचा सहभाग तशा अर्थाने सिद्ध झालेला नाही. त्याच्या विरुद्धचा पुरावा परिस्थितीजन्य आहे.
२ या खटल्यातील त्याच्या पेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेक लोकांना फाशी झालेली आहे आणी ती जन्मठेपेत रुपांतरीत झाली आहे. असे असताना केवळ त्याचीच फाशी कायम ठेवणे अन्यायकारक आहे.
३ भारतातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तो शरण आला आहे. आल्यावर त्याने सहकार्यच केले आहे. टायगर मेमन ने भारतावर विश्वास ठेवू नको असे त्याला सांगितले होते, असे करून एकापरीने टायगर बरोबर होता हेच आपण सिद्ध करत आहोत. शिवाय अशा शरणागतीच्या विचारात असलेल्या अन्य लोकांना एक संदेश देत आहोत.
४ अशाच गुन्ह्याखाली फाशीच्या प्रतिक्षेत असलेले बलवंत सिंग राजोना, राजीव हत्या प्रकरणातील आरोपी यांची फाशी जवळ जवळ रद्द झाली आहे. बलवंत ने आरोप कबूल केला आहेच पण फाशी द्या अशी मागणीही केली आहे. त्या त्या राज्याच्या विधानसभा त्यांच्या मागे आहेत आणी राजीव गांधी खुनातील आरोपींना तर सोडूनच द्यायची मागणी होत आहे. अशा स्थितील केवळ राजकीय ताकद नही म्हणून एखाद्याला फाशी देणे अयोग्य आहे.
५ शिक्षा देताना इतरांना जरब बसवणे, आरोपीला सुधरायची संधी देणे आणी आरोपीपासून इतर समाजाचे रक्षण करणे हे तीन मुख्य हेतू असावेत. यातला एकही हेतू या फाशीने ( किंबहुना कोणत्याच फाशीने) साध्य होत नाही.
६ केवळ आडनाव मेमन आहे म्हणून फाशी देणे योग्य आहे का ? त्याचे आडनाव इतर काही असले तर हे झाले असते का? १९४८ च्या दंग्यात सातारा जिल्ह्यात "गोडसे" आडनावाच्या एका कुटुंबातील आजोबा, मुलगा आणी नातू या तिघानाही जमावाने ठार केले होते. यात आणी त्यात काय फरक आहे?
७ हा निर्णय राजकीय आहे. या आधी अफझल ला फाशी देण्याचा निर्णय असाच राजकिय होता. तात्कालीन सरकारने भाजपाच्या हक्काची काही मते आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर अफझलला फाशी दिले होते. अर्थात त्या पक्षाला फायदा झाला नाही हा भाग वेगळा. इतक्या बलाढ्य राष्ट्राने अफझलला रात्री अचानक फाशी देणे खरेच अयोग्य होते. त्याच्या आईच्या डोळ्याला डोळा लावून "होय, तुमचा मुलगा अतिरेकी आहे आणी आम्ही त्याला फाशी देत आहोत" असे सांगायचीही हिम्मत होऊ नये ? एखाद्या माणसाने तुलना भगत सिंग च्या फाशीशी केली तर काय उत्तर आहे?
८ जर्मन बेकरी केसमधेही केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून हिमायत बेग याला फाशीची शिक्षा झालेली आहे. दुसरा आरोपी कातील याची तर येरवडा जेलमध्येच हत्या झाली आहे. देश-नागरीक, पती-पत्नी, कम्पनी-कामगार अशी नाती परस्पर सहाकार्यावर आधारित असतात. एकाने दुसर्यावर कितीही अन्याय केला तरी दुसर्याने मात्र निरपेक्ष प्रेमच करावे अशी अपेक्षा करू नये. मालेगाव स्फोटात संबम्ध नसताना दहा वर्षे तुरुंगात राहिलेल्या लोकांनी देशावर प्रेम करावे असे कोणत्या तोंडाने सांगणार ?
लंकेत हिन्दु आहेत? बरं
लंकेत हिन्दु आहेत? बरं बरं...
रावण ब्राह्मण होता
रावण ब्राह्मण होता
दंगल आणि थंड डोक्याने
दंगल आणि थंड डोक्याने कारस्थान आखून केलेली अतिरेकी कारवाई ह्यात तत्त्वतः फरक आहे. अगदी कायदेशीर दृष्टीने पाहिले तरी दंगली सामील होणार्यांना होणारी शिक्षा ही कमी असते. कुठलेही सबळ कारण नसताना थंडपणे कारस्थान करणे हा जास्त गंभीर गुन्हा समजला जातो. आणि अशा कृत्यांना मिळणारी शिक्षा ही जास्त तीव्र आहे. निदान कायदा तरी दहशतवाद म्हणजे दहशतवाद त्यात फरक नाही असे समजत नाही. सुदैव आपले!
परकीय राष्ट्राची मदत मिळते तेव्हा हेही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. १. अतिरेक्यांना खास प्रशिक्षण केंद्रे उघडून तिथे सर्व प्रकारे तयार केले जाते. मग त्यात हत्यारे चालवणे, बाँंब फोडणे, नि:शस्त्र प्रतिकार करणे वगैरे. त्या शत्रुदेशाचे लष्कर ह्याकरता मदत करते.
२. मुस्लिम अतिरेकाचे वैशिष्ट्य म्हणजे आखाती देशातील अतीश्रीमंत धर्मपिसाट अरब अशा "सत्कृत्याकरता" अफाट पैसे देतात. अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध जिहाद पुकारला त्याकरता जी मदत आली तिचा ओघ काही प्रमाणात आजही चालू आहे. आणि तो कश्मिरमधे व बाकी भारतात वळवण्याचे धंदे पाकिस्तान इमानेइतबारे करत आहे. हिंदू दहशतवादाला असे भक्कम पाठबळ मिळत असल्याचे पुरावे आजवर तरी मिळालेले नाहीत. त्यामुळे सगळे दहशतवाद सारखेच असे बिनडोक युक्तिवाद किती पोकळ आहेत हे लक्षात येते.
एखादा स्फोट विध्वंसक असतो पण मुंबईसारखे शहर अनेक दिवस वेठीस धरून तिथे अतिरेकी कारवाई करणे. अगदी लष्कराला पाचारण करून, हातघाईची लढाई करून अतिरेक्यांचा नि:पात करावा लागणे ह्यातून भारताच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला करून, त्यांच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्या देशाचे कितीतरी प्रचंड नुकसान होते. निव्वळ धन, मालमत्तेचे नुकसानच नव्हे तर हा देश सुरक्षित नाही, इथे गुंतवणुक करणे इष्ट नाही अशा संदेशामुळे त्या देशाचा विकास निदान काही काळ तरी मंदावतोच आणि हे नुकसानही मोठे आहे.
शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून वस्तुस्थितीचा सामनाच करणार नाही आणि आम्हाला जे पढवले आहे तेच आम्ही खरे मानणारे असे मानणारे आडमुठे, नादान लोक सोडले तर बाकीच्यांकरता दहशतवादाच्या विविध रुपात वेगवेगळी तीव्रता आहे हे सूर्यप्रकाशाइतके उघड आहे.
नेहमीप्रमाणेच मुद्दे भरकटवत
नेहमीप्रमाणेच मुद्दे भरकटवत काही लोक याकूबचं समर्थन करताहेत या वळणावर (द्वेषभक्तांच्या कृपेने) चर्चा नेण्यात आलेली आहे. फिफिभोचौ.
शेंडेनक्षत्र, अचूक आणि चाबूक
शेंडेनक्षत्र,
अचूक आणि चाबूक
२. मुस्लिम अतिरेकाचे
२. मुस्लिम अतिरेकाचे वैशिष्ट्य म्हणजे आखाती देशातील
अतीश्रीमंत धर्मपिसाट अरब अशा "सत्कृत्याकरता" अफाट पैसे
देतात.>>>>>>>>आय ऑब्जेक्ट, मुस्लिम दहशतवाद असा कोनताच प्रकार अस्तित्वात नाही,दहशतवादाला धर्म नसतो.
दंगल सुद्धा थंड डोक्याने
दंगल सुद्धा थंड डोक्याने केलेलं कारस्थान आहे.
खोटे फोटोशॉप्ड फोटो फिरवताना संबंधितांना कळत नसतं का ते ? पूर्वी व्हर्बल मीडीया होता, तो काय कामं करायचा ते फेसबुक मुळं उघड झालं.
शेडीची पोस्ट हास्यास्पद आहे
शेडीची पोस्ट हास्यास्पद आहे याची शेंडी त्याला त्याची याला
<<शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड
<<शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून वस्तुस्थितीचा सामनाच करणार नाही ... >>
----- छान चर्चा सुरु आहे...
दहशतवादी घटनात धर्म शोधणे... मरणार्यान्चा तसेच मारणार्याचा... त्यानन्तर भुमिका काय घ्यायची हे ठरवायचे... असो.
हिन्दू लोकान्च्या जिवाची खुप काळजी, चिन्ता आहे असे दाखवणारे माझे मायबोलीकर आयडी-मित्रान्साठी- व्यापम मरणारे सर्व हिन्दू आहेत, असुमलच्या चाळ्याला बळी पडलेल्या महिला हिन्दू आहेत, असुमल च्या विरोधान साक्षीदारान्ची हत्या झालेले सर्व हिन्दू आहेत... त्या हिन्दू लोका बद्दल लिहीताना तुमची धारदार लेखणी गुळगुळीत का होते ?
विषयान्तरा बद्दल क्षमस्व... पण टोकाचा दुटप्पीपणा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.
बुळबुळीत म्हणा
बुळबुळीत म्हणा
३० एप्रिलच्या फाशीच्या
३० एप्रिलच्या फाशीच्या विषयावरून पोस्टी टाकणे बंद करा.
व्यापम वरून लक्ष विचलित झाले. मागे पडलापर तो विषय. ज्यांना मेगाबायटी प्र टंकायचेत त्यांना मोकळे सोडा..
लबाड कोल्हया, >> आणि ते
लबाड कोल्हया,
>> आणि ते ख्रिस्ती धर्मप्रसारक गुन्हा काय करत होते ?
>> गरीब लोकाना खिस्ती बनवण्याचा ! ख्रिस्चन धर्मगुरुवर राग काढण्याऐवजी त्या लबाड हिंदू गुन्हेगारानी त्या
>> गरीब लोकाना मदत करायला हवी होती .
गरीबांना मदत करणाऱ्या लक्ष्मणानंद सरस्वती यांची निर्घृण हत्या झाली तेव्हा कुठे गेला होता तुझा दयाभाव?
मिशनऱ्यांची मोहनदास गांधींनीही देवाचे विक्रेते म्हणून हेटाळणी केली आहे. शिवाय हा ग्रेह्याम स्टेन्स व्हिसा संपल्यावर बेकायदेशीरपणे भारतात रहात होता. वेळच्या वेळी कटायला काय झालं होतं? काय मोठे उपकार करायला मागे राहिला होता?
आ.न.,
-गा.पै.
गामा उघड खोटे बोलत आहे
गामा उघड खोटे बोलत आहे
मग आता व्हिसा संपलेल्यांना
मग आता व्हिसा संपलेल्यांना जाळून मारायचा अधिकार 'धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी' लोकांना मिळावा म्हणता?
छान छान!
क्ल्यू क्लक्स क्लॅनच म्हणा हे द्वेषभक्तांचे!
मयुरहरी, >> आसुमलला शिक्षा
मयुरहरी,
>> आसुमलला शिक्षा द्या ज्या पध्दतीने साक्षीदारांची हत्या होते त्यावरून तो गुन्हेगारच आहे स्पष्ट होते
आजिबात नाही. उलटही असू शकतं. आसारामबापूंवर कुभांड रचलेलं असून साक्षीत उघडं पडू नये म्हणून साक्षीदाराला ठार मारलेलं असू शकतं. ठार मारल्या गेलेल्या महेंद्र चावलाला यापूर्वी खोटी साक्ष दिली म्हणून न्यायालयाकडून शिक्षा झालेली आहे.
आ.न.,
-गा.पै.
कोडणानी व बजरंगी यांच्यावर
कोडणानी व बजरंगी यांच्यावर लवकर कारवाई करावी
बलात्कारी थेरडा आहे आहे आहे
बलात्कारी थेरडा आहे आहे आहे तुझ्या सर्टीफिकेटची गरज नाही
पुंगळी कर
>>दहशतवादी घटनात धर्म
>>दहशतवादी घटनात धर्म शोधणे... मरणार्यान्चा तसेच मारणार्याचा... त्यानन्तर भुमिका काय घ्यायची हे ठरवायचे...<<
हा हा. उदयशेट, धाग्याचा #६ जरा परत एकदा डोळ्याखालुन घाला, कदाचीत आश्चर्यचकित व्हाल.
मला वाटतंय धागा बंद करायची वेळ झालेली आहे. बहोत कंफ्युजन हो रहा है...
<<मला वाटतंय धागा बंद करायची
<<मला वाटतंय धागा बंद करायची वेळ झालेली आहे. बहोत कंफ्युजन हो रहा है... डोळा मारा>>
------ राजाचा सन्देश (अध्यादेश) पोहोचला...
माझी शेवटची पोस्ट...
मयुरहरी, >> बलात्कारी थेरडा
मयुरहरी,
>> बलात्कारी थेरडा आहे आहे आहे तुझ्या सर्टीफिकेटची गरज नाही
>> पुंगळी कर
कसे छानपैकी उतरलात वैयक्तिक पातळीवर. अशीच घोडदौड चालू ठेवा.
आ.न.,
-गा.पै.
वैयक्तिक? बलात्कारीला
वैयक्तिक?
बलात्कारीला सर्टीफिकेट तु वाटत फिरतोयस मी नाही
म्हणून गरज नाही म्हणालो
ग्रहम स्टेन्स बळ्जबरीने
ग्रहम स्टेन्स बळ्जबरीने धर्मांतर करवायचा म्हणे !
त्याना जाळून ठार करायची घटना झाल्यानंतर त्याच्या पत्नीला लेप्रसी रुग्नांच्या कार्यासाठी पद्मश्री मिळाली.
मिशनरी संस्था लेप्रसी , टीबी , एड्स यासाठी कार्य करतात .
बजरंद दल , सनातनवाले यानीही अशी सेवा करुन मग त्या लोकाना हिंदु धर्म शिकवावा.
रावण ब्राह्मण होता >>> रावण
रावण ब्राह्मण होता
>>> रावण श्रीलंकेत होऊन गेला याबाबत श्री लंकेतली दहा माणसे तरी सांगतील काय? तिथल्या लोकाना रामायनाच्या दंतकथा भारतीय लिटरेचर वाचल्यावर कळते...
राबीणव्हूड, ह्यो तुमच्यासाटी
राबीणव्हूड,
ह्यो तुमच्यासाटी :
http://www.ramayanatours.com/
http://www.makemytrip.com/holidays-international/ramayana-tours-sri-lank...
आ.न.,
-गा.पै.
लबाड कोल्हया, >> बजरंद दल ,
लबाड कोल्हया,
>> बजरंद दल , सनातनवाले यानीही अशी सेवा करुन मग त्या लोकाना हिंदु धर्म शिकवावा.
सेवाभावी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती (वय वर्षे ८४) यांचा खून करण्यात आला आहे. हिंदूंना सेवा करायलाही बंदी आहे. आणि कोणतरी स्टेन्स उठतो आणि बेकायदेशीरपणे भारतात राहून लोकांना बाटवतो. तो मेला तर इतका मातम नकोय.
सरकारी पद्मश्र्यांना कोण विचारतो.
आ.न.,
-गा.पै.
वरील चर्चा व रेडीफच्या
वरील चर्चा व रेडीफच्या दिलेल्या लिंक व एकुणच चाललेला उहापोह परत एकदा काँग्रेस भाजपा हिंदु मुस्लिम वगैरे कडे वळला आहे. मला वरच्या रेडीफच्या लिंका बघुन रेडीफचाच एक खूप जुना लेख आठवला. http://www.rediff.com/news/2000/jul/27column.htm
एक लक्ष्मणानंद मेला म्हणुन
एक लक्ष्मणानंद मेला म्हणुन तुम्ही रुग्णसेवा बंद करणार का ?
ग्रॅहम मेले तरी मिशनरी लोक रुग्णसेवा करतच आहेत.
.... ख्रिस्चन एन जी ओ ने दान दिलेल्या टेबल खुर्चीत बसून एच आय व्ही एड्स रुग्णाना औषध लिहिणारा ... डॉ. लबाडकोल्हा.
भारतात राहून लोकांना बाटवतो.
भारतात राहून लोकांना बाटवतो. >> लोकाना बाटवतो (होता) म्हणजे नक्की काय करायचा?? बाटवण्याची प्रक्रीया काय असते?? ज्याला बाटवले जाते त्याला संमोहीत वगैरे केले जाते कां?? कुतुहल म्हणुन विचारत आहे, गैरसमज नसावा.
<<तथाकथित हिंदू अतिरेकी असे
<<तथाकथित हिंदू अतिरेकी असे कुठल्या शत्रुराष्ट्राशी हातमिळवणी करत नाहीत. निदान आजवर तरी तसे उघडकीस आलेले नाही.>>
फक्त हाफिझ सईदला कडक भाषेत तंबी देण्यासाठी विशिष्ट पत्रकार भारतसरकारलाही न कळवता लपत-छपत पाकिस्तानात थेट त्याच्या अड्ड्यापर्यंत पोहोचतात. ते पत्रकार हिंदू अतिरेकी म्हणून ओळखल्या जाणार्या विशिष्ट संस्थेशीसुद्धा संलग्न असतात हा एक निव्वळ योगायोग बर्का!
या धाग्याचा लसावि काढला तर
या धाग्याचा लसावि काढला तर दंगलीत मेले तर विशेष काही नाही असा दृष्टीकोन बळावत जाणे चिंताजनक आहे. उठसूठ त्या २९७ जणांचा दाखला देणा-या किती जणांनी अशांच्या कुटुंबियांना मदत केली ? त्यात कुठल्याही धर्माचे कुणी नव्हते. त्या दृष्टीने त्यांना मारणा-या गुन्हेगाराला शिक्षा होणे गरजेचे होते. पण खरे गुन्हेगार आपण अमेरिकेप्रमाणे पकडून आणू शकत नाही म्हणून समाधान करून घेतले का असा प्रश्न निर्माण केलेल्या गोंधळातून पडतो. त्याला सॉफ्ट स्टेट राहीलेलं नाही वगैरे कमालीचे हास्यास्पद युक्तीवाद वाचून रडावं का असं वाटतं, कारण त्याच दिवशी या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा खून केलेल्या आरोपींना सोडून दिलेलं आहे. नेमका कोणता सिग्नल कुणाला गेला हे कळतच नाही. ज्याला शिक्षा दिली तो कुणी महात्मा नाही हे सरळच आहे, पण शिक्षेवरून कुणी काय साधलं हे क्लिअर आहे.
२००२ च्या दंगलींनंतर पक्षांतर्गत बंडाळी मोडून मोदी गुजरातमधे बहुमताने निवडून आले. त्यानंतर पाच वर्षे दाखवण्ञासारखा विकास नव्हता. पुढच्या इलेक्शन च्या आधी आजतक ने २००२ च्या दंगलींचं तथाकथित खळबळजनक स्टिंग ऑपरेशन केलं आणि देशभर एकच चर्चा सुरू झाली. पुन्हा जखमांवरच्या खपल्या काढल्या गेल्या. एकही मनुष्य न मरता पुन्हा २००२ चं वातावरणनिर्माण झालं आणि त्यातून पुन्हा एकदा ध्रुवीकरण होऊन मोदी पूर्वीपेक्षा जास्त जोरात निवडून आले.
या वेळी नॅशनल मीडीयावर डिबेट्स होत्या एव्हढाच काय तो फरक. प्रत्येक बाबीला दोन बाजू असतातच त्याप्रमाणे कुणाला काय मेसेज जायचे ते गेले, करणारे आपापल्या बाजूचं समर्थन करत राहणार, त्यात तिळाएव्हढाही फरक पडणार नाही.
या गोंधळात न्याय झाला का म्हणून खरोखर दक्ष असणारे मानवतावादी, उदारमतवादी आरोपीच्या पिंज-यात उभे केले गेले हे जागतिक स्तरावर देशाची इमेज कुठे नेणारे आहे याचा विचार कुणी केला तरी बास.
Pages