मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

Submitted by उडन खटोला on 25 May, 2014 - 01:41

मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??

..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत

आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??

(इतरत्र पूर्वप्रकाशित )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आपलं वाटायचं इतकी सगळी मुलं गुरुगृही जाऊन राहणार तर हायजीनचा विचार करून गोटे ठेवत असतील.>>> मलाही तेच वाटतं. पुर्ण मुंडन केलं तर ते शोकदर्शक असतं म्हणून तसं काही नाहिये हे दर्शवण्यासाठी शेंडी राखत असतील.

बोटभर शेंडी आच्छादन करते म्हणुन तिचे कौतुक .

आणि अंगभर आच्छादन करणारा बुरखा मात्र वाइइट !

लिंब्या , असेच ना?

शेंडीचा आणखी एक उपयोग होता. विद्यार्थ्याला पाठांतराला भिंतीजवळ बसवत. शेंडीला दोरी बांधुन ती खुंटीला अडकवत. पाठ करताना जर झोप लागुन मान कलंडली तर दोरीचा हिसडा बसून झोपउडत असे. म्हणे !

श्यामची आई ह्या पुस्तकात वडील श्यामला डोक्यावरच्या वाढवलेल्या केसांवरून रागवतात. त्यानंतर त्याच्या आईचे आणि श्याममधील संवाद ह्या शेंडी प्रकरणात आठवला. नक्कीच वाचा.... "मोह सोडणे म्हणजेच धर्म" अशी चर्चा आठवत आहे.

मग तिरुपती ला मुंडन करतात ते शोक प्रगट करायला असते का?>>>> नाही ते केसांचे दान असते. पण केस का दान करतात ते माहित नाही मला.

>>> शेंडीला दोरी बांधुन ती खुंटीला अडकवत
त्यासाठी शेंडीच कशाला हवी? केस बांधता येतात की. केस वाढवायला लावून वेण्या अडकवायच्या खुंटीला! Happy

बाकी शेंड्या संस्कृतीचा भाग कधी झाल्या? रामायण महाभारतातल्या कुठल्याच आचार्यांनी शेंड्या ठेवल्याचं निदान रामानंद सागर / चोप्रांनी दाखवलेलं नाही. Proud

राम-लक्ष्मणांनी वनवासाला जाताना वडाचा चीक लावून ऋषीमुनींप्रमाणे जटा बांधल्याचा उल्लेख आहे - ऋषीमुनींप्रमाणे गोटे केल्याचा नाही.

वणदेवींचे आक्षेप सगळे जानवे, कपडे इ. वरवरच्या प्रतिकांच्या बाबतीत दिसतात. मूळ संस्काराबद्दल अन त्याच्या अर्थाचे काय ?

राम आणि लक्ष्मण क्षत्रिय होते.

रच्याकने, "नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही" ही आर्य चाणक्यांची प्रतिज्ञा आठवली.

maitreyee, मी क्षत्रिय आहे.आमच्या कडे मुंज करत नाहित त्या मुळे मूळ संस्काराबद्दल अन त्याच्या अर्था बद्दल

जास्त माहित नाही पण हो ब्राम्हाणांना आम्ही बुध्दीमान मानतो व त्यांच्या कडुन बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करतो.

वर मी जे काही लिहलय ते ब्राम्हणा कडुनच ऐकलेल आहे.

>> राम आणि लक्ष्मण क्षत्रिय होते

पण ऋषीमुनी क्षत्रिय नव्हते ना?

चाणक्यांचा दाखला धरायचा तर अगदीच अलीकडची बाब आहे शेंडी ही!

मुंबईत शेंडि राखणे अत्यंत धोकादायक आहे.लोकलमध्ये चढण्यासाठी इतकी झोंबाझोंबी होते की कुणी शेंडीवाला लोकलमध्ये चढत असेल तर लोक ट्रेनमध्ये घुसण्यासाठी त्याची शेंडी धरून चढायलाही कमी नाहि करायचे.

वाल्मिकी, विश्वामित्र हे तपाचरणाने ऋषी झाले. पण तपाचरण संपल्यावर नारदांनी त्यांची मुंज करून 'यापुढे शेंडी ठेवत चला' असा आदेश वगैरे दिल्याची कथा मी वाचलेली तरी नाही.

लबाड कोल्हया,

>> बोटभर शेंडी आच्छादन करते म्हणुन तिचे कौतुक .

कुठल्या ग्रंथात लिहिलंय रे, की शेंडी आच्छादन करण्यासाठी वापरावी म्हणून? बोडखं झाकायला कपडा मिळत नव्हता काय ब्राह्मणांना? त्या वाळवंटी जमातींमध्ये असेल कपड्यांचा दुष्काळ. भारतभू सुजलाम सुफलाम होती.

त्यातूनही तुला हौस असेल तर हातभर दाढीचं कौतुक करत बस की. कोणी अडवलंय तुला!

आ.न.,
-गा.पै.

पुर्वी (१९११ च्या आधी, चिंग आणि मिंग डायनिस्टी मध्ये) चायनीज scholars & warriors लोक पण शेंडि ठेवत असत. शेंडि खुप मोठी आणि लांब असायची.

स्वाती_आंबोळे,

>> शेंडीचा काय सिग्निफिकन्स आहे खरंच?

मी ऐकलंय त्यानुसार सहस्रार चक्राचे झाकण म्हणून शेंडीचा राखायची असते. चूकभूल देणेघेणे.

आ.न.,
-गा.पै.

नैतं काय! चक्र ताळूच्या जागी आणि शेंडी मागे टेंक्शावर...झाकणाचं हँडल असल्यासारखी.

काहीतरी वेगळा कन्सेप्ट असेल शेंडीचा.

तुम्ही फोर व्हीलर चालवली पाहिली नाही का?
आत सारथ्याचे चाक असते.
प्रत्येक गाडीचे , सायकलचे चाक हे सुद्धा चक्र असते.
पाहिले नाही का?

तुम्ही फोर व्हीलर चालवली पाहिली नाही का?
आत सारथ्याचे चाक असते.
प्रत्येक गाडीचे , सायकलचे चाक हे सुद्धा चक्र असते.
पाहिले नाही का?>>

.नाही हो साती तै.:(

Pages