मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??
..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी
आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत
आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??
(इतरत्र पूर्वप्रकाशित )
☺मला कोरियोग्राफी म्हटलं की
☺मला कोरियोग्राफी म्हटलं की फक्त ए आर रहमान ची चालीत शब्द ठसाठस कोम्बलेली सुंदर गाणी आणि प्रभुदेवा करतो त्या सैल लोम्बती पॅंट घालून केलेल्या हाडं नसलेल्या हालचालीच डोळ्यासमोर येतात ☺☺
मराठी लग्ने सीरीअस असतात हे
मराठी लग्ने सीरीअस असतात हे बरोबर. परवाच घरच्या एका लग्नात एक पार्टी फौजी असल्यान व
त्यांचे मेहमान पण फौजी असल्याने एक रंगीत संगीत पार्टी. नवरा मुलगा जोशी पुणेरी व इंग्लंडात काम करणा रा म्हणजे किती स्टिफ अपर लिप टाइप असेल. पण फौजींचे भांगडे वगिअरे सुरू झाले आणि मस्त नाचला तो. सर्व इन्हिबिशन्स गायब.
आनंदाचे क्षण असतात हे नाचली मुले माणसे तर काय बिघडते? जहांसे हम नाचना सुरू करते हैं परंपरा वहांसे शुरू हो जाती है. बजने दे धडक धडक. मलहारी.
सकाळी सकाळी मस्त मनोरन्जन
सकाळी सकाळी मस्त मनोरन्जन झाले हा पुर्ण धागा वाचुन...
ऐकावे ते नवलच. ह्यात घरोघरी
ऐकावे ते नवलच. ह्यात घरोघरी भिक्षा मागावी हे प्राईम इंपोर्टंट
छान
छान
Pages