मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??
..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी
आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत
आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??
(इतरत्र पूर्वप्रकाशित )
ओह उलटा होता काय? थॅन्क्यू
ओह उलटा होता काय? थॅन्क्यू थॅन्क्यू!
लबाड कोल्हया, >> पैलवाना ,
लबाड कोल्हया,
>> पैलवाना , शेंडी ही आच्छादनासाठी होती असे लिबूने लिहिले आहे.
त्यात कौतुक कुठे दिसलं रे तुला?
आ.न.,
-गा.पै.
केश्विनी, >> पण सहस्रार चक्र
केश्विनी,
>> पण सहस्रार चक्र तर ताळूच्या जागी असते. तिथे शेंडी नसते.
तुम्ही तोंडातली टाळू म्हणताय का? तिथे सहस्रार चक्र नसतं. ते डोक्याच्या टाळूच्या आत असतं. डोक्यावर बारीक छिद्र असतं. माझ्या मते ते उघडं पडू नये म्हणून शेंडी असते.
आ.न.,
-गा.पै.
डोक्यावर तिथे छिद्र नसते.
डोक्यावर तिथे छिद्र नसते.
त्या छिद्रातून पावसाचे पाणी
त्या छिद्रातून पावसाचे पाणी आत जाऊन मेंदू गंजतो का?
>>> >> पैलवाना , शेंडी ही
>>> >> पैलवाना , शेंडी ही आच्छादनासाठी होती असे लिबूने लिहिले आहे. <<<<
)
मी कुठे लिहीले आहे? लिन्क द्या. (उग्गाचच माझ्या नावावर काहीही खपवतात...
>>> त्या छिद्रातून पावसाचे पाणी आत जाऊन मेंदू गंजतो का? <<<
ते माहित नाही, पण हिंदुस्थानात तरी लहान बाळाची ताळू भरतात तेलाने, अन ते तेल जिरतेही आत.
आता आत जिरल्यावर ते तेल काय करते ठाऊक नाही. कदाचित लहानपणीच ताळूमार्फत मेंदूला तेलपाणी केल्याने नंतर पावसाचे पाणी आत गेले तरी मेंदू गंजत नसेल.... काय की , कुणास ठाऊक?
बायदिवे, हातासरशी घरि विचारून सांगुन टाका बरे की कुणाकुणाच्या ताळवा लहानपणि तेलाने भरलेल्या आहेत? म्हणजे त्यावरुन समजेल की नंतर पावसाच्या पाण्याने कुणाकुणाचा मेंदू गंजला आहे अन कुणाचा शाबुत आहे
>>>> तुम्ही तोंडातली टाळू
>>>> तुम्ही तोंडातली टाळू म्हणताय का? तिथे सहस्रार चक्र नसतं. ते डोक्याच्या टाळूच्या आत असतं. <<<<
गामा, तोंडातील वरची बाजू ती टाळू / आटळा, अन डोक्यावरील मागच्या भागातील ती ताळू. ट आणि त चा फरक आहे. चु.भु.द्या.घ्या
शेंडीबद्दल ज्ञानप्रबोधिनीच्या
शेंडीबद्दल ज्ञानप्रबोधिनीच्या गुरुजींनी शेंडी ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असत त्यामुळे वेगवेगळ्या ज्ञानशाखेचे विद्यार्थी ओळखता येत असे सांगितले होते.
मी डोक्यावरचीच ताळू म्हणतेय.
मी डोक्यावरचीच ताळू म्हणतेय. लहान बाळाची ताळू जपतात तीच ताळू. ती लहानपणी नाजुक असते. तिला ब्रह्मरंध्र असेही म्हणतात. लिंबू, ताळू डोक्याच्या मागील भागात कुठे असते?
ती तर वर असते. आपल्या शरिराचा सर्वोच्च बिंदू.

या धाग्यावर बाकी काहीही चालले
या धाग्यावर बाकी काहीही चालले असले तरी ते वगळता बरीच उपयुक्त माहिती मिळते आहे.
गंभिरपणे मुद्दे मांडून ज्ञानात भर घालणार्या आयडींना मनापासुन धन्यवाद.
>>>> लिंबू, ताळू डोक्याच्या
>>>> लिंबू, ताळू डोक्याच्या मागील भागात कुठे असते? ती तर वर असते. <<<<
) नमुद केला.
)
अश्विनी, कित्ती ते समजावुन सांगाव लागावं... मॅप काढून दाखवू का?
>>>> अन डोक्यावरील मागच्या भागातील ती ताळू. <<<<
"डोक्यावरील" या शब्दाने डोक्याचा वरील अर्थात सर्वोच्च पृष्ठभाग नमुद केला
त्याला जोडून "मागच्या" या शब्दाने, डोक्यावरील पठाराचा मागचा भाग (सहसा जिथे टप्पलीत मारली जाते तो
अजुन स्पष्टता हवी तर सांगतो की सहसा पुरुषांना चाळीशीच्या आसपास डोक्यामागे चंद्रासारखे टक्कल पडू लागते, अगदी बरोब्बर त्याच्या लगतचा वरचा भाग
अजुनही वर्णनात मी डोक्यावरुन "खाली " उतरलो नाहीये (वा खाली डोक्यावर पडलोही नाहीये
limbutimbu, >> बायदिवे,
limbutimbu,
>> बायदिवे, हातासरशी घरि विचारून सांगुन टाका बरे की कुणाकुणाच्या ताळवा लहानपणि तेलाने भरलेल्या आहेत?
>> म्हणजे त्यावरुन समजेल की नंतर पावसाच्या पाण्याने कुणाकुणाचा मेंदू गंजला आहे अन कुणाचा शाबुत आहे
हाहाहा, याला म्हणतात सभ्य शब्दांत आईबाप काढणे!
शेंडीविषयी चांभारचौकश्या करणाऱ्यांना ब्रह्मरंध्र पसंत नसेल तर आपापल्या शरीरावरील दुसरं एखादं छिद्र (उदा. : नाकपुडी) शोधून त्यासभोवती केस खुशाल वाढवावेत. जमल्यास प्रदर्शनही भरवावे. उगीच ब्राह्मणांच्या शेंडीविषयी चांभारचौकश्या करू नयेत. बरोबरे किनै?
आ.न.,
-गा.पै.
केश्विनी, आलं लक्षात तुम्हाला
केश्विनी,
आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचंय ते!
याआधी आलं नाही तो माबुदोस. शेंडी ही पाठकण्याचा विस्तार मानली गेली आहे. जरी ती ब्रह्मरंध्राच्या नेमकी वरती नसली तरी. तसंही पाहता शेंडीचा घेरा ब्रह्मरंध्र झाकतोच (बरोबर ना limbutimbu?).
आ.न.,
-गा.पै.
शेंडी लावणे सुरू आहे
शेंडी लावणे सुरू आहे
अमेरिकेत यातले काहीच होत नाही
अमेरिकेत यातले काहीच होत नाही का ?
अर्थातच होते की.
फक्त एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर नाही. वैयक्तिक रीत्या लाच घेताना बघितले नाही,
पण असे कायदे करायचे की त्यायोगे आपल्या भाच्या पुतण्यांच्या धंद्यांचे भले व्हावे. त्यांना सरकारी नोकर्या देऊन जनतेच्या पैशावर चैन करायची
कायदा करणे म्हणजे लाच देऊनच होतात. जबरदस्त मोठी लाच दिली की कायदा करणारे तुम्ही म्हणतील तसा कायदा करतील. पैसे नसतील, वैयक्तिक फायदे नसतील ज्यात ते कायदे कशाला करायचे?
दुसरे असे की बर्याच बाबतीत अनिर्बंधपणा फक्त थोड्या नि वैयक्तिक प्रमाणावर आहे, सामाजिक नाही. कचरा टाकायचा नाही, रस्त्यावर सकाळी चड्डी सोडून उकीडवे बसायचे नाही असे बरेच निर्बंध फार मोठ्या प्रमाणावर पाळले जातात.
ब्रह्मरंध्र हे जी स्पॉट
ब्रह्मरंध्र हे जी स्पॉट सारखेच काल्पनिक प्रकरण आहे.
पैलवान शेंडीचा विषय सुरु
पैलवान
शेंडीचा विषय सुरु झाल्यावर भाषा इतकी खालच्या स्तरावर का गेली?
रस्त्यावर सकाळी चड्डी सोडून
रस्त्यावर सकाळी चड्डी सोडून उकीडवे बसायचे
<<
जख्खींना रस्त्यावर उकिडवे बसण्याचे इतके आकर्षण का आहे? प्रत्येक प्रतिसादात एकदा तरी हे वर्णन असतेच.
फार्रच नॉस्टाल्जिआ दिसतोय तसं बसण्याचा.
तर मग काय ठरलं शेवटी?
तर मग काय ठरलं शेवटी?
दीमा, >> शेंडीचा विषय सुरु
दीमा,
>> शेंडीचा विषय सुरु झाल्यावर भाषा इतकी खालच्या स्तरावर का गेली?
ज्यांना शेंडीवरून फक्त टिंगलटवाळी करायची आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची होती म्हणून.
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
ब्रह्मरंध्र हे
ब्रह्मरंध्र हे निसर्गा(देवाने) ने सगळ्या माणवाला दिले असेल तर शेंडी उगवायचा अधिकार काही समुहापुरताच मर्यादित कसा ?का?
>> बायदिवे, हातासरशी घरि विचारून सांगुन टाका बरे की कुणाकुणाच्या ताळवा लहानपणि तेलाने भरलेल्या आहेत?>>>>तळवा तेलाने भरण्याची प्रथा भारतातच आहे .इतर देशात का नाहित? US,UK मधले लोकं पण तेलाने टाळू भरतात का? त्यांना ब्रह्मरंध्र नसतात का?
वणदेवी, >> ब्रह्मरंध्र हे
वणदेवी,
>> ब्रह्मरंध्र हे निसर्गा(देवाने) ने सगळ्या माणवाला दिले असेल तर शेंडी उगवायचा अधिकार काही
>> समुहापुरताच मर्यादित कसा ?का?
तुम्ही पण खुशाल वाढवा की शेंडी. कोणी अडवलंय?
आ.न.,
-गा.पै.
या धाग्यावर बाकी काहीही चालले
या धाग्यावर बाकी काहीही चालले असले तरी ते वगळता बरीच उपयुक्त माहिती मिळते आहे.
गंभिरपणे मुद्दे मांडून ज्ञानात भर घालणार्या आयडींना मनापासुन धन्यवाद.
१००% सहमत . धन्यवाद
या धाग्याशी तसा सम्बन्धित
या धाग्याशी तसा सम्बन्धित नसला तरी थोडासा अवान्तर आणि थोडसा धाग्यालाच चिकटलेला एक मुद्दा मान्डतो-
नुकतेच एक महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य व्यक्तिशी भेट झाली . त्यान्च्याशी बोलताना ब्राह्मण आयटी किंवा सॉफ्टवेअर इन्जिनियर्स व इतर परदेशी जाणार्या मन्डळींच्या धर्मबाह्य वर्तनाचा विषय निघाला . म्हणजे असे की अशी बाहेर जाणारी मन्डळी ब्राह्मण्याचे नियम सर्रास पायदळी तुडवतात. उदा. मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ( वन-नाइट स्टॅन्ड इ.इ.इ.) तर अशा मन्डळीनी केलेल्या पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे?
यावर त्या "महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य "नी दिलेले उत्तर ऐल्कून मी उडालोच! ते म्हणाले की "आयटी इन्जिनियर्स परदेशात जावुन भारताचे भले (?) करत असलेने आम्ही त्याना नियमातून सूट दिली आहे. गळ्यातील जानवे काढून ठेवावे व मग सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ,परस्त्रीगमन इ.इ.इ.) जे करायचे ते करा . फक्त एकादशीला किंवा गणपती /सत्यनारायण पूजेच्या वेळेला गोमूत्र पिवून जानवे घाला , मग काही दोष नाही , ब्राह्मण्य अबाधित राहते "
च्यायला , हे मला इतकी वर्षे माहित नव्हते . धर्मात अशीदेखील सोय आहे तर ! आम्ही फुकट गेली ५० वर्षे ब्राह्मण्य धर्माचे पालन करीत राहिलो !
हिंदू धर्म इतका सुधारला ? मला माहितच नव्हते बुवा !
* कॄपया कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही , पण उपरोल्लेखित प्रसन्ग १००% खरा आहे !
लोणकढी
लोणकढी
.....
.....
>> शेंडीचा विषय सुरु झाल्यावर
>> शेंडीचा विषय सुरु झाल्यावर भाषा इतकी खालच्या स्तरावर का गेली?
'मला माहीत नाही' हे उत्तर देणं सोपं नसावं.
तुम्ही पण खुशाल वाढवा की
तुम्ही पण खुशाल वाढवा की शेंडी. कोणी अडवलंय?>>>
खुप चांगल्या प्र्कारे समजुन घेतल्यबद्द्ल धन्यवाद.
शेंडी ठेवायची हौस नाही व देवी असल्यामुळे शक्य ही नाही.
शेंडी राखल्याने क्रोधाला आवर
शेंडी राखल्याने क्रोधाला आवर घालता येतो असे म्हणतात.गामा करा सुरवात वाढवा शेंडी...
Pages