मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

Submitted by उडन खटोला on 25 May, 2014 - 01:41

मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??

..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत

आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??

(इतरत्र पूर्वप्रकाशित )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वणदेवि, ह्या बद्दल खरच माहित नव्हत मग मुलांची मुंज होणे हेच योग्य राहिल.पण एक प्रश्न मनात येतोय मुंज करून जानवे घालून हे समाज आपण इतर हिंदु समाजापेक्षा वेगळे आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न असतो कि ह्या मागे काहि धार्मिक कारण आहे?

अच्छा म्हणजे ब्राह्मणांवर घाउक शंका घ्यायच्या दिशेने ही चर्चा न्यायची आहे का? समाज/जाती-स्पेसिफिक चालीरीती सर्व जातींमधे आहेत. प्रत्येक जातीत "आमच्यात असे असते/नसते" चा इगो असलेले, ती अस्मिता टिकवायची इच्छा असलेले लोक आहेत.

फारएण्ड शंका वैगरे काही नाही गैरसमज नसावा. मुस्लिम समाजात जशि सर्वाचि सुन्ता होते.त्या प्रमाणे हिन्दु समाजात सर्वान्चि मुंज होत नाही याचे कारण कळत नाहि.इतर हिन्दु समाजात अनेक चालिरिति आहेत हे मान्य.परन्तु जिवनभर घालावि लागनारी जानव्या सारखि प्रथा दुर्मिळच म्हनावि लागेल.

पगारे, सॉरी जर मी अ‍ॅग्रेसिव्हली लिहीले असेल तर, पण दुर्दैवाने तुमच्या अनेक पोस्ट्स मधे ब्राह्मणांबद्दल घाउक आकस दिसतो. तुमचा हेतू प्रामाणिकपणे तसा नसेलही, पण पोस्ट्स मधून जाणवतो.

सुन्ता व मुंज हेच दोन का? हिंदूंमधे लहानपणचा विधी धरला तर बारसे वगैरे सारखे विधी सर्वांचेच होतात की. सिलेक्टिव्हली फक्त पुरूष किंवा स्त्रियांसाठी असेलेले अनेक विधी अनेक धर्मांत, अनेक जातींत आहेत. मुस्लिम स्त्रियांना आयुष्यभर बुरखे वापरायला लागतात हे ही एक उदाहरण. किंबहुना मुस्लिम, शीख, ज्यू लोकांना इतर लोकांत राहताना आपले वेगळेपण सहज दिसेल अशा प्रथा पाळाव्या लागतात. जानवे निदान 'आत' असते, आणि आता शेंड्या कोणी ठेवत नाही. यात मी कोणत्याही प्रथेचे समर्थन किंवा विरोध करत नाहीये - तुम्ही 'जीवनभर' चे उदाहरण विचारले म्हणून लिहीतोय.

बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये

हे कायतरी नवीनच ऐकले! बरं ह्यात आता "करू नका लेको मग मुंजी उपनयन" असे ही म्हणता येत नाही , ब्राह्मण समाजाचे पार तीन तेरा वाजवणार हे नवइंग्रज, पण ज़माना व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे ! करता काय!

फारेन्डा, यावर पुर्वीही इतर धाग्यांवर लिहीले आहे, व पगारेंनी ते वाचलेही आहे, पण वाचकाच्या मनात ब्राह्मणांबद्दल घाऊकरित्या शंका उत्पन्न करणारे लिखाण करण्यात पगारेंचा हात कोणी धरू शकत नाही.
असो.
हिंदू धर्मात सोळा संस्कारांना महत्व आहे, बारसे/नामकरण वगैरे बरोबरच मुंज हा देखिल विधी सर्व जातीत आहे. ब्राह्मण सोडून अन्य जातींनी तो करणे (अनेक कारणांनी) टाळले असे दिसते. व ब्राह्मणांतही त्या विधी/संस्काराची विल्हेवाट लावण्याकडेच कल दिसतो. मी स्वतः मोठ्या गुरुजींबरोबर सध्याच्या तथाकथित "अनुसुचित्/राखिव" वगैरे जातीतील व्यक्तिची मुंज लावली आहे. व हे शास्त्रोक्तच आहे.
वरील सोळा संस्कारांपैकी एकही संस्कार न झालेली प्रत्येक व्यक्ति हिंदू धर्माप्रमाणे "शूद्र" मानली जाते, व त्यात तत्कालिन ब्रिटीश राज्यकर्तेही आलेच, सध्याचे कोण कोण "राज्यकर्ते येतील" ते ज्याचे त्याने तपासुन घ्यावे... Proud

>>>> आणि आता शेंड्या कोणी ठेवत नाही. <<<< थोडासा असहमत.
महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी/निर्भीड निधर्मी आचरट लोक सोडले, तर बाकि देशात आजही शेंडी ठेवली जाते. खास करुन युपीभय्ये बिहारी बघा, अगदी साऊथकडील लोकही बघा, एखाद दोन इंच जास्त लांबीची अंगठाभर जाडीची तरी का होईना शेंडी ठेवतातच.
शेंडी ठेवण्यास लाजणे वा शेंडी ठेवणे हे कमसर/मागासपणाचे लक्षण ठरवणे ही एतद्देशीय महाराष्ट्रीय तथाकथित ज्येष्ठ समाजवादी विचारवंत वगैरे असलेल्या सुधारकांची खुळे आहेत.

लिंबू - शेण्ड्या "कोणी" ठेवत नाही म्हणजे ज्यांना ठेवायच्या नाहीत ते ठेवत नाहीत, आणि त्याबद्दल त्यांना कोणी काही म्हणत नाही. अर्थात आता "तू सोडल्यास" असे म्हणायला हवे Proud

महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी/निर्भीड निधर्मी आचरट लोक सोडले, तर बाकि देशात आजही शेंडी ठेवली जाते. खास करुन युपीभय्ये बिहारी बघा, अगदी साऊथकडील लोकही बघा, एखाद दोन इंच जास्त लांबीची अंगठाभर जाडीची तरी का होईना शेंडी ठेवतातच.
शेंडी ठेवण्यास लाजणे वा शेंडी ठेवणे हे कमसर/मागासपणाचे लक्षण ठरवणे ही एतद्देशीय महाराष्ट्रीय तथाकथित ज्येष्ठ समाजवादी विचारवंत वगैरे असलेल्या सुधारकांची खुळे आहेत. >>> मला हे कळत नाही, की तू ज्यांच्या विचारांशी सहमत नाहीस त्यांना अकारण का हिणवत आहेस? हिंदू धर्मात प्रथांमधे कायमच बदल झाले आहेत. ते सहजपणे होतात, त्याचे स्वातंत्र्य लोकांना आहे. तेच चांगले आहे.

>>>> हिंदू धर्मात प्रथांमधे कायमच बदल झाले आहेत. ते सहजपणे होतात, त्याचे स्वातंत्र्य लोकांना आहे. तेच चांगले आहे <<<<
चांगले बदल स्विकारणे हे नक्कीच चांगले आहे व ते केवळ हिंदू धर्माचेच लक्षण आहे.
मात्र "इतरेजन" हेटाळणी करतात, त्यामुळे लाज वाटते वा अंधविश्वासाप्रमाणे सुधारणा म्हणत इतरेजनांचे अंधानुकरण करीत ज्या प्रथा आम्ही सोडून दिल्यात ते चूकीचे आहे. उदाहरणार्थ डोके झाकणे, इंग्रजी राजवटीच्या प्रभावामुळे पाश्चात्य पोषाखाचे अंधानुकरण करताना आम्ही बोडक्या डोक्याने फिरू लागलो, ते शहरी फ्लॅटमधे ठीक असेल, पण निसर्गात फिरायचे, तर डोक्यावर कानावर आवरण्/आच्छादन हवेच, व तेच आम्ही काढुन टाकले. असो. अशी असंख्य उदाहरणे देता येतील, मूळ धाग्याच्या विषयबाह्य असल्याने इथे नको.
अर्थात डोके झाकण्याचेच उदाहरण घ्यायचे तर "कायद्याने " दुचाकी चालविताना हेल्मेटने डोके झाकावे व ते देखिल व्यक्तिच्या स्वहिताकरताच असे सांगितले आहे तर ते देखिल पाळायला नाकारले जाते व तिथे हेल्मेट उत्पादकांचा धंदा व फायदा लोकांना आठवतो, तिथे ते धर्माने सांगितलेले पाळतील असा गैरविश्वास मी ठेवत नाही.
बाकी स्वातंत्र्याचे म्हणशील, तर मी काय बापडा कुणावर सक्तिबिक्ति करीत नाही हो शेंडी ठेवायची ! तेव्हडा माझा अधिकार नाही व गरजही वाटत नाही. तुझ्यावर किंवा पगारेंवर केलीये का कुणी सक्ति शेंडी ठेवायची? Wink

रावण सुध्दा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याच्या वर्तनाने कुणी ब्राह्मणत्वाला किंवा त्यातील संस्कारांना त्याजले नाही. एक - दोन महाभाग असे निघतील ज्यांना संस्काराचा अर्थ / महत्व समजणार नाही.

जेव्हा गायत्री उपासनेचा खरा अनुभव सर्व समाजातील लोकांना येईल तेव्हा त्यांना समजेल. गायत्री उपासना कोणत्याही समाजाला वर्ज सांगीतलेली नाही.

ब्राह्मणांना पुर्वीच्या काळी वेद मुखोद्गत करुन दुसर्‍या पिढीला पोचवावे लागत म्हणुन असलेले व्रतबंधाचे महत्व आताही तितकेच महत्वाचे आहे.

व्रताने बांधणे म्हणजे व्रतबंध. हे व्रत ज्ञानसंपादनाचे आहे. हे आजही करावे लागते. जो विद्यार्थी ज्ञानसंपादन करत नाही त्याला कोणत्याही समाजात मानाचे स्थान नसते. गायत्री मंत्र बुध्दी संवर्धानासाठी आणि व्रतपालनाच्या दृढ निश्चयाला बळकटी देतो.

वनदेवी,

स्त्रियांना आजही पौरोहित्याचे अधिकार आहेत. गार्गी/ मैत्रयी या स्त्रीया विदुषी होत्या हा त्याला असलेला पुरावा आहे. खास करुन ब्राह्मण समाजाने त्या पौरहित्य करणार्‍या स्त्रीयांना पंचायत बसवुन दंड लावल्याचे ऐकीवात नाही. हे ब्राह्मण समाजाने मान्य केले आहे. इतर समाजाने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.

अवांतर : मुंजी मध्ये मुलांच्या गळ्यात जानवे घातले जाते त्या वरुन कळते की तो ब्राम्हण आहे.>> माझ्या माहेरी मुलांची मुंज केली जाते, जानवे घातले जाते, आम्ही ब्राम्हण नाही!!

सोनार : हल्लीची दैवेज्ञ ब्राह्मण यांच्यातही मुंज व जानवे असते.

ड्रीमगर्ल, बरोबर.
जिथे जिथे बारा बलुत्यावर (उपजिविकेच्या व्यवसायावर) आधारीत जाती आहेत व त्या त्या व्यवसायातील कौशल्ये बापाकडून परंपरागतरित्या मुलाला शिकवली जात होती/जातात, व जिथे जिथे बापालाच प्रथम गुरू मानायची पद्धत आहे, तिथे तिथे मुंजीचा संस्कार केला जाऊ शकतोच, केला जात होता, व अजुनही कुठे कुठे करतात.
>>> व्रताने बांधणे म्हणजे व्रतबंध. हे व्रत ज्ञानसंपादनाचे आहे. हे आजही करावे लागते. <<<<
हे बरोबर. पण व्रत म्हणले की नियम आले, नियम म्हणले की मनावर ताबा मिळविणे आले, मनावर ताबा मिळविणे म्हणजे "व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला" असेही वाटणे आले. ज्यांना असे वाटते ते असल्या कसल्याच व्रतनियमवैकल्ल्याना जुमानित नाहीत, फार फार तर कारण अंधश्रद्धा/निधर्मीवाद्/सामाजिक अन्याव(?) असले काही देतात. पण कोणतेच "व्रत" न पाळण्यामागे अनिर्बद्ध जीवन जगण्याची प्रखर इच्छा हेच असते. असो.

सोनार : हल्लीची दैवेज्ञ ब्राह्मण यांच्यातही मुंज व जानवे असते.>>थोडक्यात सोनार ही ब्राम्हण समानच समजावेत

किंवा ते पुर्वीचे ब्राम्हणच असावेत.

धागाकर्त्याने जी उदाहरणे दिली आहेत ती त्या त्या घरातल्या लोकांची वैयक्तिक वैचारिक दिवाळखोरी दर्शवतात, किंबहुना confusion दर्शवतात, त्यांना मुंज ह्या संस्काराचे महत्व समजून धार्मिक दृष्टया कंप्लाय न करावे वाटता ते एक दारू पार्टी किंवा वरातीत गाणी लावुन नाचण्या लायक वाटले म्हणुन तो संस्कार वाईट कसा??

वणदेवि, ह्या बद्दल खरच माहित नव्हत मग मुलांची मुंज होणे हेच योग्य राहिल.पण एक प्रश्न मनात येतोय मुंज करून जानवे घालून हे समाज आपण इतर हिंदु समाजापेक्षा वेगळे आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न असतो कि ह्या मागे काहि धार्मिक कारण आहे?>>>

माफ करा पगारे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही.

मी आमच्या पुजार्‍याला हा प्रश्न विचारला पण त्यांच्या कडे कुठलेच स्पष्ट उत्तर नव्हते. बहुतेक काही धार्मीक कारण नसावे.

थोडक्यात सोनार ही ब्राम्हण समानच समजावेत किंवा ते पुर्वीचे ब्राम्हणच असावेत.>> म्हणजे मग ज्यांच्यात मुंज होते व जानवे घातले जाते ते सगळे ब्राम्हण समानच समजावेत किंवा ते पुर्वीचे ब्राम्हणच असावेत. असंच ना?

ए लबाड कोल्हया,

>> शेंडी ठेवल्याने ते आच्छादन म्हणुन कार्य करुन रक्षण करते का ?

तुला चर्चा मुस्लिम बायकांच्या बुरख्यावर न्यायची आहे. आम्हाला माहितीये!

आ.न.,
-गा.पै.

थोडक्यात सोनार ही ब्राम्हण समानच समजावेत किंवा ते पुर्वीचे ब्राम्हणच असावेत.>> म्हणजे मग ज्यांच्यात मुंज होते व जानवे घातले जाते ते सगळे ब्राम्हण समानच समजावेत किंवा ते पुर्वीचे ब्राम्हणच असावेत. असंच ना?>>>

ड्रीमगर्ल, माझ्या पुरते 'हो'.

Brahman, Sonar kinva ajun kuthali jaat eksamaan manavi, te tya jatit Munj keli jate mhanun he conclusion thode chukte aahe. Jati sarv samaan ch aahet. Koni ucchh/ nich nahi. angikarlelya "profession" nusar jati banlya aahet. aani "Munj" karne mhanje jya jatit vyakti janmala aali aahe, tya jativhe vihit vyavsay karm shikavnyachi suruwat. tasech, Vaidik Dharma nusar jati che bandhan kathor navhate. vyavasay dekhil aaplya aawadi nusar sweekarta yet hota/ badalata yet hota, ase "Legal History" ya vishayat college madhe shiklya che aathawatey.

मात्र विचित्र दिसते हे नक्की.>>> त्या काळात ते विचित्र दिसत नसे. पुरुषांनी केस वाढवलेले विचित्र दिसे.

शेंडीचा काय सिग्निफिकन्स आहे खरंच?
मला आपलं वाटायचं इतकी सगळी मुलं गुरुगृही जाऊन राहणार तर हायजीनचा विचार करून गोटे ठेवत असतील.
नंतर सवयीने तेच बरं वाटत असेल. Proud

बाकी सायकल चालवणं वगैरे बसतं का हिंदू धर्मात? बूट घालणं? अनवाणी चालत सगळीकडे जायची पद्धत किती चांगली होती!

Pages