मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??
..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी
आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत
आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??
(इतरत्र पूर्वप्रकाशित )
पगारे, त्यांना शेंडीचा अधिकार
पगारे,
त्यांना शेंडीचा अधिकार नाहिये. ब्राह्मण नाहीत ते.
फक्त बडबड तशी करत असतात.
म्हणजे नुसती दिवाळखोरी चालू
म्हणजे नुसती दिवाळखोरी चालू आहे.
दीड मायबोलीकर, काहितरी फेकु
दीड मायबोलीकर, काहितरी फेकु नका....
छे छे! आम्ही काय फेकू
छे छे! आम्ही काय फेकू लोकांपैकी वाटलो की काय तुम्हांस?
सचिन पगारे, >> शेंडी
सचिन पगारे,
>> शेंडी राखल्याने क्रोधाला आवर घालता येतो असे म्हणतात.गामा करा सुरवात वाढवा शेंडी...
तुम्ही शेंडी न राखतादेखील क्रोधाचा संयम केला आहे. यावरून तुमच्या विधानाच्या सत्यतेबद्दल शंका येते. मात्र सूचनेबद्दल धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
गामा ते विधान मि एका
गामा ते विधान मि एका लिंकमध्ये वाचले होते.ही ति लिंक....
http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/का-ठेवतात-डोक्यावर-शेंडी-115072200019_1.html
आणि माझे मत विचाराल तर रागावणे,संयम हे मेंदुशी निगडित आहे.शेंडीचा त्याच्याशी काहिही संबंध नाही.शेडी म्हणजे निरूपयोगी केसांचा एक झुपका.
सचिन पगारे, तुमचं जे मत
सचिन पगारे,
तुमचं जे मत नाहीये तो सल्ला मला कशाला देताय?
आ.न.,
-गा.पै.
तुम्हाला दिलेलि
तुम्हाला दिलेलि चमत्क्रुतीजन्य लिंक तुम्हाला आवडेल असे वाटले गामा.जाउ द्या नका वाढवु शेंडी.
फक्त एकादशीला किंवा गणपती
फक्त एकादशीला किंवा गणपती /सत्यनारायण पूजेच्या वेळेला गोमूत्र पिवून जानवे घाला , मग काही दोष नाही , ब्राह्मण्य अबाधित राहते ">>.
गोमुत्र पिन्या सोबत थोडे प्रसाद म्हणुन शेण प्राशन केले तर डबल शुध्दी होईल नाही का?
सचिन पगारे, हे स्थळ तुम्हाला
सचिन पगारे,
हे स्थळ तुम्हाला आवडेल असे वाटते : http://www.freechildrenstories.com/
आ.न.,
-गा.पै.
वणदेवी, >> गोमुत्र पिन्या
वणदेवी,
>> गोमुत्र पिन्या सोबत थोडे प्रसाद म्हणुन शेण प्राशन केले तर डबल शुध्दी होईल नाही का?
शेणच खायचं असेल तर धर्माच्या नावाखाली कशाला खाताय?
आ.न.,
-गा.पै.
नुकतेच एक महामहिम कथित
नुकतेच एक महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य व्यक्तिशी भेट झाली . त्यान्च्याशी बोलताना ब्राह्मण आयटी किंवा सॉफ्टवेअर इन्जिनियर्स व इतर परदेशी जाणार्या मन्डळींच्या धर्मबाह्य वर्तनाचा विषय निघाला . म्हणजे असे की अशी बाहेर जाणारी मन्डळी ब्राह्मण्याचे नियम सर्रास पायदळी तुडवतात. उदा. मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ( वन-नाइट स्टॅन्ड इ.इ.इ.) तर अशा मन्डळीनी केलेल्या पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे?
यावर त्या "महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य "नी दिलेले उत्तर ऐल्कून मी उडालोच! ते म्हणाले की "आयटी इन्जिनियर्स परदेशात जावुन भारताचे भले (?) करत असलेने आम्ही त्याना नियमातून सूट दिली आहे. गळ्यातील जानवे काढून ठेवावे व मग सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ,परस्त्रीगमन इ.इ.इ.) जे करायचे ते करा . फक्त एकादशीला किंवा गणपती /सत्यनारायण पूजेच्या वेळेला गोमूत्र पिवून जानवे घाला , मग काही दोष नाही , ब्राह्मण्य अबाधित राहते ">>>>>>>>>>>>>>>
गोमुत्र पिन्या सोबत थोडे प्रसाद म्हणुन शेण प्राशन केले तर डबल शुध्दी होईल नाही का?>>>
गा. पै, तुम्ही स्वता: वर घेवु नका.
हे असे करुन गोमुत्र पिण्याची जेंव्हा वेळ येईल तेंव्हा शेण पण नक्किच खाईन ड्बल शुध्दी साठी.
पण कुठल्याश्या सणाच्या दिवशी
पण कुठल्याश्या सणाच्या दिवशी काही लोक शेण पण खातात असं वाचलं होतं.
खखोदेजा.
>>>> पण कुठल्याश्या सणाच्या
>>>> पण कुठल्याश्या सणाच्या दिवशी काही लोक शेण पण खातात असं वाचलं होतं. <<<<
सणाच्या दिवसाचे माहित नाही, पण उदकशांतिचे वेळेस, तसेच नागपंचमीचे आगेमागे श्रावणी करताना (जानवे बदलण्याच्या विधी) पंचगव्य प्राशन केले जाते ज्यात गोमुत्र, गोमय, तुप, दुध व दही असते.
बहुधा पंचगव्य प्राशन करण्याच्या "भितीमुळेच" जानवे घालणे सोडले असावे लोकांनी.... काय म्हणता?
आम्ही मात्र लहानपणी नाशकात सर्रास वाटीतुन घेऊन गोमुत्र प्राशन करायचो.
अन ज्याने असे भरपुर गोमुत्र प्राशन केलय, त्याला हल्लीच्या त्या पेप्स्या/कोक्स वगैरे सॉफ्ट ड्रिन्क्स/वेगवेगळ्या दारवा, वगैरेचे काही वाटत नाही. किंबहुना, ती सॉफ्ट ड्रिन्क्स/दारवाही गोमुत्राच्या चविची लागण्यास सुरुवात होते...
गोमुत्र प्राशन करुन "किक्क" बसते का असा धागाही वरच्यापैकी कुणी उघडायला हरकत नाही.... कायेना, नुस्ता धागा उघडू नका, प्रयोगही करुन पहा. झालाच यशस्वी, तर स्वस्तात मस्त काम होईल ना जनसामान्यांचे!
अन विषारी दारूबिरु पिऊन बळीही जायला नकोत. तेव्हा लगेच कामाला लागा कसे.
गोमुत्र पिणे परवडाचे कोणाला
गोमुत्र पिणे परवडाचे कोणाला ? 200 रुप्प्ये एका लिटर ला........
साति सणाचे माहित नाहि.परन्तु
साति सणाचे माहित नाहि.परन्तु परदेश गमन करुन आलेल्या व्यक्ति शुध्दिसाठि शेण खातात असे कुठेतरि वाचल्याचे आठवते.
गामा लिन्क आवडलि.परन्तु
गामा लिन्क आवडलि.परन्तु आपल्या देशातहि विपुल असे बालसाहित्य आहे गम्मत म्हणजे लोक ते खरेहि समजतात.
होय होय लिंबुकाका! तेच
होय होय लिंबुकाका!
तेच ते.
मला एका मित्राने आम्ही मांडी कापून त्यात बेडूक भरतो आणि शेण दूधातूपात मिक्स करून खातो असं फार फार लहानपणी सांगितल्याचं आठवतंय. पण जळ्ळं कुठल्या सणाला की समारंभाला ते आठवत नाही.
कुठे गेला होतात चिरंजीव शेण
कुठे गेला होतात चिरंजीव शेण खायला?
अहो तीर्थरूप! श्रावणी होती. म्हणून खाल्लं.
स्मायली स्मायली स्मायली.
<<
व्हॉट्सॅप पर डाल.
पंचगव्य प्राशनात गोमुत्र,
पंचगव्य प्राशनात गोमुत्र, गोमय, गोतुप, गोदुध व गोदही सगळे चालते तसे मधुपर्क ही चालायचे पुर्वी.
मधुपर्क? हे काय असते?
मधुपर्क? हे काय असते?
सचिन पगारे,ऋग्वेद वाचा
सचिन पगारे,ऋग्वेद वाचा प्रश्नाचे उत्तर मिळेल.
हल्ली मुंजीत 'संगीत' असतं का?
हल्ली मुंजीत 'संगीत' असतं का? आमच्या ओळखीतले एकजण आमंत्रण द्यायला आले होते. मुंजीत संगीत ठेवणार आहेत त्यावर मुंजा मुलगा आणि त्याचा धाकटा भाऊ यांचा डान्सही बसवणार आहेत असं सांगितलं. हल्ली काही अशी प्रथा सुरू झाली आहे का?
आणि कशावर नाचणार हे बटू बंधू?
अरे हो, मल्हारी डान्स असेल नक्की! मुंजीमुळे शेंडी आहेच अनायसे तर घ्या नाचून बजने दे धडक धडक...
<<हल्ली मुंजीत 'संगीत' असतं
<<हल्ली मुंजीत 'संगीत' असतं का? >>
------ पैसा किती आहे आणि हौस यावर अवल्म्बुन आहे.
कष्टाने कमावलेला पैसा असेल तर माणुस खर्च करताना विचार करतो....
मुंज्या मुलाचे बूट पळवायचीही
मुंज्या मुलाचे बूट पळवायचीही पद्धत येइल.
त्या मुंजा मुलाच्या लग्नाच्या
त्या मुंजा मुलाच्या लग्नाच्या वेळी ' सोडमुंज सत्य की थोतांड ' असा धागा येऊ दे.
खरं तर ज्याला ज्यात आनंद
खरं तर ज्याला ज्यात आनंद मिळतो ते करुदेत.
आपले मराठी लग्न आणि बाकी संस्कार खूप सिरीयस आणि फक्त देव देव आहेत असं मला बरेचदा वाटतं.(वै.म.)
आता यंदाच मावसनणंदेच्या लग्नात तिच्या मैत्रिणींनी नीट नाच बसवून ३-४ गाण्यांवर नाच केले होते. बरंच रिफ्रेशिंग वाटलं होतं.
मी_अनु, माझ्या भावाच्या
मी_अनु, माझ्या भावाच्या लग्नात आम्ही पण असंच ठरवलंय. मी आणि माझा भाचा, घागरा घागरा तेरा घागरा वर डॅन्स करणार आहोत. आणि बाकी लोकांनी पण इतर गाणी निवडलीत. मज्जा.
काय अनु, 'नाच बसवले' म्हटलं
काय अनु,

'नाच बसवले' म्हटलं की अगदी 'शाळेच्या ग्याद्रिंग' सारखं वाटतं!
डान्स बसवले तरी म्हण नाहीतर कोरिओग्राफी केली होती असं तरी म्हण!
Pages