मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

Submitted by उडन खटोला on 25 May, 2014 - 01:41

मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??

..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत

आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??

(इतरत्र पूर्वप्रकाशित )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायकांना नाही तसल्या उर्जेबिर्जेची आवश्यकता. त्या स्वयंपूर्ण असतात.
नटुले, हसू नकोस, लिंबर्षी शाप देतील, पाप लागेल.

बायकाना शेंडी नसते... मग देव त्याना उर्जा कुठुन देतो?>>
बायकांसारख्या क्षुद्र प्राण्याला गामांचा देव कशाला उर्जा देणार? नवर्‍याला आपली पापं देऊन त्याबदल्यात त्यांच्या नवर्‍याला मिळालेली अर्धी उर्जा घेत असतील त्या. बार्टर यु नो.

लिंबर्षी Lol घाबरले की मी.

>>>वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत<<< बरं मग?

उद्या म्हणाल ब्राह्मणेतरांनी शिक्षण घ्यायला कशी काय सुरुवात केली!

बायकोला अर्धी उर्जा मिळते .

मग दोन बायका असल्या तर त्याना अर्धी अर्धी उर्जा जाऊन नवरा उर्जाशून्य होतो का ?

नवर्‍याला आपली पापं देऊन त्याबदल्यात त्यांच्या नवर्‍याला मिळालेली अर्धी उर्जा घेत असतील त्या >>> Lol हे बेष्ट आहे!!

देवांशी कनेक्शन असतं ना शेंडीचं? शेंडीसे कुछ छुप नही सकता.

>> एका बायकोतच लोक उर्जाशुन्य होतात, दोनचं काय विचारता?
Lol

पण शेंडीला कसे कळते की अमुक एक बाइ ही बायको आहे म्हणून. >> अ‍ॅवटार बघा त्यात जेम्स कॅमेरूननं ससंदर्भ स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांच्यात शेपटी आणि मनुस्।यात शेंडी.

स्वाती, तुझा शेंडीबद्दल चा प्रश्न इंटरेस्टिंग आहे (उर्जेबद्दलचा नव्हे Happy ). पूर्वी ऋषीमुनी भरघोस दाढ्या ई ठेवत (पुलंनी खाडिलकरांच्या नाटकातला "नुसतीच दाढी, आणि आत ऋषी नाहीच" केलेला उल्लेख आठवला). मग एकदम हे दुसरे टोक कधी पासून सुरू झाले. केस कापायच्या उपकरणांचा शोध लागल्यावर सगळे एकदम having a field day मोड मधे गेले का?

Happy

किती जुन्या धाग्याला चांगले दिवस अचानक आलेत.
या धाग्याने नेमके कोणते 'पैंतरे' (म्हणजे काय कुणास ठाऊक?) वापरले?

चाणक्याने मारली होती ना? 'पण' म्हणून? अर्धवट लक्षात आहे.

शेंडी ओढणे याचाही काहीतरी संदर्भ आहे जुन्या काळी. 'तुंबाडचे खोत' मधे तो चिमापा कोणाची तरी ओढतो आणि तो उलट खुश होतो की त्यामुळे काहीतरी चांगले होणार म्हणून. आणि तसे होते ही त्यात बहुधा.

पण व्रत म्हणले की नियम आले, नियम म्हणले की मनावर ताबा मिळविणे आले, मनावर ताबा मिळविणे म्हणजे "व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला" असेही वाटणे आले. ज्यांना असे वाटते ते असल्या कसल्याच व्रतनियमवैकल्ल्याना जुमानित नाहीत, फार फार तर कारण अंधश्रद्धा/निधर्मीवाद्/सामाजिक अन्याव(?) असले काही देतात. पण कोणतेच "व्रत" न पाळण्यामागे अनिर्बद्ध जीवन जगण्याची प्रखर इच्छा हेच असते. असो.

सर्वस्वी अनुमोदन. धर्माच्या बाबतीत असो, खाण्यापिण्याच्या बाबतीत असो वा इतर कुठल्याच सामाजिक नियमांबद्दल असो किंवा देशाचा कायदा, काहीहि असो. अत्यंत अनिर्बंध पणे वागायचे हेच खरे.

भारत म्हणजे तर काय धम्माल. ति****मा**ला! वाट्टेल तिथे कचरा फेकणे, थुंकणे, चड्डी सोडून भर रस्त्यावर बसणे, कुठलाहि वाहतुकीचा नियम पाळायचा नाही नुसती लाच द्यायची. आता निवडून आलेले लोक भर विधानसभेत रस्त्यावरच्या गुंडांसारखी मारामारी करतात! कायदा म्हणजे तर विनोदच! खुश्शाल दारू पिऊन गाडी चालवून लोकांना मारायचे नि राजरोसपणे समाजात मिरवायचे!! त्यांचेहि कौतुक!
कुत्र्या मांजरांसारखे अनिर्बंध! दिसली बाई की कर बलात्कार!!! धर्म, कायदा, समाज कशाचाहि निर्बंध म्हणून नाही.

जनावरांपेक्षा हीन वर्तन करणारे लोक, जनावरांना शिकवता तरी येते, यांना तेव्हढीहि शिस्त नाही. इथल्या अनेक निरनिराळ्या विषयांवरील चर्चा वाचल्या की कळते की यांना फक्त वैयक्तिक टिंगल टवाळी करण्यापेक्षा जास्त अक्कल किंवा शिस्त नाही! कुठे फुकट हिंदू धर्म, ब्राह्मण्य या बद्दल बोलता भारतात! फार गहन आहे ते!!

झक्की यांच्या पोस्टला सर्वस्वी अनुमोदन .
<<जनावरांपेक्षा हीन वर्तन करणारे लोक, जनावरांना शिकवता तरी येते, यांना तेव्हढीहि शिस्त नाही.>>>>>>हे वाचुन
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास 'यातिल वर्णन आठवले.

भारत म्हणजे तर काय धम्माल. ति****मा**ला! वाट्टेल तिथे कचरा फेकणे, थुंकणे, चड्डी सोडून भर रस्त्यावर बसणे, कुठलाहि वाहतुकीचा नियम पाळायचा नाही नुसती लाच द्यायची. आता निवडून आलेले लोक भर विधानसभेत रस्त्यावरच्या गुंडांसारखी मारामारी करतात! कायदा म्हणजे तर विनोदच! खुश्शाल दारू पिऊन गाडी चालवून लोकांना मारायचे नि राजरोसपणे समाजात मिरवायचे!! त्यांचेहि कौतुक!
कुत्र्या मांजरांसारखे अनिर्बंध! दिसली बाई की कर बलात्कार!!! धर्म, कायदा, समाज कशाचाहि निर्बंध म्हणून नाही

..........


अमेरिकेत यातले काहीच होत नाही का ?

अमेरिकेत यातले काहीच होत नाही का ?

अमेरिकेत बाई दिसली की पाया पडतात!

अमेरिकेतील सारखा धर्म, कायदा, समाज भारतात आला तर खरेच कित्ती छान होईल .

Pages