मला कोकण बघायचेचं!!!!

Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55

मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.

तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्‍या माबोकरांना मदत करायची.

मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.

कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> ६. केळशी - बीच, महालक्ष्मी मंदीर, त्सुनामी मुळे तयार झालेली वाळूची टेकडी, शिवाजी महाराजांचे गुरू बाबा याकूत यांच दर्गा (खालचे पूर्ण गाव आणि समुद्राचा सुंदर व्ह्यू दिसतो.) <<<<
आत्मधून, आजवर शिवाजी महाराजांचे गुरू बाबा याकूत हे कधी ऐकले नव्हते. यास काही ऐतिहासिक आधार आहे का?

नंदीनी, तू खूप छान लिहितेस. प्रवासवर्णन करायची क्षमता आहे तुझ्यात.

बाकी माहिती छान गोळा होत आहे. टिपापावर मी एक मजकुर लिहिला आहे किती समुद्रबद्दल. तिथे एकदा डोकावून येणे.

आमच्याघरी गावी गौरी बसतात तर खरकटे टाकायला एक खोल खड्डा खणावा लागतो. घरातील अगदी केरसुद्धा ह्या खड्ड्यातच टाकावा लागतो. ह्याला विदर्भात समुद्र म्हणतात. माझी आई माझ्या वडीलांना म्हणायची तुम्ही समुद्र खणला का? तेंव्हा मला ते वाक्य फार गमतीदार वाटायचे. आपण घरातले निर्माल्य नदीत वा समुद्रात विलिन करतो. म्हणून इथे खड्ड्ड्याला समुद्र म्हणतात.

चक्रम, मी खरे तर तिथे काही लिहित नाही पण माझ्यावद्दल जर कुणी बोलत असेल तर ते मला सतत तिथे डोकावायला मजबुर करत राहते.

पालघर जिल्हा सुद्धा कोकणातच. वसई,अर्नाळा,उसरणी,केळवे,माहिम,वडराई, तारापुर, चिंचणी, वाढवण, बोर्डी, डहाणू असा बराच परिसर पर्य्टनासाठी मस्त .
डहाणु पर्यंत लोकल असल्याने बाकी कोकणापेक्षा सोइचा.

हो बाकी कोकणापेक्षा सोईचा आहे. घोलवड वगैरे भागांमधे मस्त छोटी छोटी रिसॉर्टस आहेत चिकूच्या बागांमधे.

असा वेगळा जिल्हा याबद्दल मला पण शंका आली होती लले पण पाटील त्याच भागातले आहेत त्यामुळे त्यांना माहित असणार जास्त.

पालघर जिल्हा सुद्धा कोकणातच >>> अ ओ, आता काय करायचं>>>>>> हो ठाणे आणि पालघर हे दोन्ही जिल्हे कोकण किनारपट्टीचेच भाग आहेत.

ही घ्या विकीलिंक.

https://en.wikipedia.org/wiki/Konkan_division

पालघर जिल्हा नव्यानेच बनवलाय.
मागे इथे कविता १९७८ यांनी त्याविषयी लिहिलं होतं बहुतेक.

लिम्बुदा, असा उल्लेख चौथी पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला आठवतो आहे. केळशी गावातील हायस्कूल मधे गावाचा इतिहास म्हणून एक फलक लावला आहे त्यातसुद्धा हीच माहिती दिली आहे. माझे वैयक्तिक मत आहे की सर्व जाती धर्मातील एकेक संत महाराजांनी गुरु म्हणून जोडले असावे ज्यामुळे समाजात एकी राहिल आणि सगळी कडची खबर मिळेल. जुन्या काळी केळशी हे एक महत्वाचे बंदर होते आणि तिथुन शत्रू आक्रमण करू शकतो, त्याची माहिती मिळावी हेही कारण असावे.

आणि तो दर्गा महाराजांनी स्वखर्चाने बांधून दिला व त्यांच्या पायाचा ठसा दर्ग्यावर होता (दुरूस्ती पूर्वी)अशी समजूत गावात आहे. तिथला उरुस देखील हिन्दू मुस्लिम मिळून साजरा करतात..

खुपच उपयुक्त माहिती गोळा झालीये इथे.

बी, वरती कुणीतरी उल्लेख केलाय ते प्र के घाणेकरांचं 'कोकणातले पर्यटन' पुस्तक रेफर कर. घाणेकरसरांनी खुप बारीक सारीक तपशीलांसकट माहिती दिलेली आहे त्यात. तुला ८ दिवसांचे वेगवेगळ्या टप्प्यांचे रूटनुसार कार्यक्रम ठरवता येतील. त्यातले काही पत्ते आणि बरेचसे फोन नंबर्स आता बदलले असतील तरीही फारसा त्रास होणार नाही.

हे पुस्तक सोबतीला घेऊन जवळपास ७ वर्षे सलग कोकणभ्रमंती केली. रायगड ते उत्तर गोवा. दरवर्षी दिवाळीत ८ दिवस दुचाकीवरून आणि अधेमधे जमेल तेव्हा ३-४ दिवस फिरायचो. सरांनी दिलेल्या स्थानिक घरांमधेच आम्ही रहायचो, त्यांनी दिलेल्या नकाशांनुसार कुठपासून कुठपर्यंत असे टप्पे ठरवायचो. काही नंबर्स तेव्हाच बदललेले होते ते पुण्यात आल्यावर सरांना अपडेटही केले होते. काही ठिकाणी अडचणी आल्या तेव्हा थेट सरांनीच मार्गदर्शन केलं होतं. बरीच वर्षे झाली आता त्या भ्रमंतीला. दिनेश, भ्रमर, परदेसाई, या सगळ्यांनी खुप मदत केली होती तेव्हा आम्हाला. रूट ठरवताना सागरी महामार्गाने खाली जायचे आणि राष्ट्रीय महामार्गाने वर यायचे आणि उलट. किंवा समुद्र ते सह्याद्री असं झिग झॅग करत प्रत्येक तालुका बघायचा. एके दिवशी फारतर ५० ते १०० किमी प्रवास. हे असं प्लॅनिंग तूही करू शकशील. त्यामुळे दगदग पळपळ होत नाही, एखाद्या ठिकाणी रहावंसं वाटलं तर निवांतपणे थांबता येतं. अंदाजे १९९९ ते २००७ इतकी वर्षे फिरले. तरीही पूर्ण कोकण फिरले असं म्हणायला धजावणार नाही.

कोकण म्हटलं की सगळे सहसा समुद्रकिना-यांचा विचार करतात. पण सह्याद्रीच्या कुशीतलं कोकणही अतिशय विलोभनीय आहे. पोलादपूर, चिपळूण, देवरूख-संगमेश्वर, वैभववाडी, माणगांव (सिंधुदूर्ग) वगैरे परिसर.

दिवाळीचा मोसम कोकणात फिरायला बेस्ट. गर्द तिमिरात उजळून निघणारी पणत्यांची आंगणं आणि पायवाटा बघत पायी फिरणं निव्वळ सुख असतं. उन्हाचा चटका आणि उकाडा दोन्ही नसलेलं, किंचीत शिरशिरी आणणारं सुखद वातावरण असतं.

एवढी माहिती गोळा केलीयेस, तिचा पूर्ण वापर करून मस्त भटकून ये आणि आल्यावर अनुभवलेलं सगळं आमच्याशी शेअर कर.

सई, खूपच छान लिहिलस. तुझा तो एक लेख आठवला खूप जुना ज्यात तू कोकणाबद्दल लिहिले होते. तू तेंव्हा पावसाळ्यात गेली होतीस. तो लेख असेल जुन्या माबोवर. नवीन माबोवर आणता आला तर पहा किंवा इथे लिंक पेर.

प्र के घाणेकरांचं 'कोकणातले पर्यटन' हे पुस्तक मिळवण्याचा प्रयन्त करीन.

कोकण म्हटलं की सगळे सहसा समुद्रकिना-यांचा विचार करतात. पण सह्याद्रीच्या कुशीतलं कोकणही अतिशय विलोभनीय आहे. >> हो मला हे दोन्ही बघायचे आहे. सागरकिनारे आणि घाट.

बी, तूला आणि आईंना माश्याचा वास कितपत सहन करता येतो ? काही काही किनार्‍यावर ( उदा. मालवणमधल्या राजकोट भागात ) मासे वाळत घातलेले असतात त्याचा वास येत असतो. ( मला तरी तो असह्य होतो. )

तसेच गणपती दरम्यान जाणार आहेस का ? खुप गर्दी असेल. बहुतेक कोकणी केवळ गणपतीपुरते घरी जातात. त्या दरम्यान रस्त्यावर पण तूफान ट्राफिक असते. तिकिटे मिळणेही मुष्कील असते.

सई मस्त लिहिलंस.

थोडे अवांतर लिहिते. आत्ताच्या पालघर जिल्ह्याला उत्तर कोकण असं संबोधले जाते. फार जुन्या लेखात उल्लेख आढळतो की भृगुकच्छ (भरूच, गुजराथ) ते गोवा प्रांत हे कोकण मानलं जायचं (अपरांत). नर्मदा नदीचा खालचा भाग.

बी तुम्हाला कोकण प्रवासासाठी शुभेच्छा. एन्जॉय.

हे वाचून आत्ताच प्र के घाणेकरांचं 'कोकणातले पर्यटन पुस्तक ऑर्डर केलंय मॅजेस्टीक कडून Happy

अन्जू,

>> आत्ताच्या पालघर जिल्ह्याला उत्तर कोकण असं संबोधले जाते.

बरोबर आहे. उत्तरकोकणास लाटप्रदेश अशीही एक संज्ञा होती.

आ.न.,
-गा.पै.

Happy Happy
येस नंदिनी, मलाही हा बीबी वाचून पुन्हा चालू पडावंसं वाटतंय Happy

अ‍ॅक्चुली कोकणप्रेमी लोकांनी मिळून जायला पाहिजे एकदा! लाँग टूर करायची. ओपन जीप किंवा जिप्सी वगैरे घेऊन. जाम मजा येईल..

दिवाळीचा मोसम कोकणात फिरायला बेस्ट. गर्द तिमिरात उजळून निघणारी पणत्यांची आंगणं आणि पायवाटा बघत पायी फिरणं निव्वळ सुख असतं >> पहिल्या वाक्याला अनुमोदन. हवा मस्त असते. पाण्याचे हाल नसतात, ( मे महिन्यात विशेषतः अखेरीस होतात). आणि मासेखाऊंसाठी पर्वणीच असते.

बाकी हल्ली वीज आल्यापासुन आणि चायनीज माळांचा वगैरे सुकाळ झाल्यापासुन गर्द तिमिर वगैरे राहिलेला नाही. ते दिवस आता आठवणीतच अनुभवायचे. Sad असो.

भ्रमा, एवढा निळा चेहरा कशासाठी? शहरात आपल्याला चोवीस तास वीज हवी मग कोकणात खेड्यांत का नको?

मंजूडी, त्यासाठी निळा चेहरा नाही केला मी. वीज तर हवीच नाहीतर त्या भागाचा विकास नाही होणार हे मलाही कळंतय. निळा चेहरा 'चायनीज माळांचा सुकाळ' यासाठी. मला नीट मांडता नाही येत आहे. असोच.

Pages