Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55
मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.
तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्या माबोकरांना मदत करायची.
मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.
कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टीना, धन्यवाद. तसही
टीना, धन्यवाद. तसही आतासुद्धा तू कधीही येऊ शकतेस फक्त गावात फुल्ली फर्निशड फ्लॅटमध्ये राहाव लागेल आणि तुला डझनभर हात देईन मेंहदी काढण्यासाठी.
आरती गावाचं नाव सांग की
आरती गावाचं नाव सांग की तुझ्या.
कोकणात आमचं आहे कौलारू घर, चूल, मातीचं अंगण. पण आत काही ठिकाणी लाद्या आणि कोबा घातलाय. माहेरी पूर्ण शेणाने सारवायचं आहे. (gas पण आहे दोन्हीकडे आता पण चहा आणि पोळ्या करतात त्यावर बाकी चूल).
अन्जू, आप को तो पता है. मेल
अन्जू, आप को तो पता है.
मेल करते तुला.
फुल शेण म्हणजे काय? ते
फुल शेण म्हणजे काय? ते कोणत्या फुलापासून करतात?
आशुडी. एडीट करते.
आरती , तु नविन घरासाठी जो कर
आरती ,

तु नविन घरासाठी जो कर आकारशील तो त्या डझनभर हातातुनच काढून घेईल मग मी
वहिनी, मेल चेक करा.
वहिनी, मेल चेक करा. माझ्याबरोबर राहून तुमच मराठी बिघडल कि काय.
आशुडी, तू फुल शेण लिहिल्यावर मी माझा प्रतिसाद पुन्हा वाचून बघितला.
टिना
दिनेश तुमची होमस्टेची कल्पना
दिनेश तुमची होमस्टेची कल्पना मला काही आवडली नाही. अनेकांना आवडणार नाही. जर बिझनेस म्हणून चालायला हवा असेल तर हे मॉड्युल वर्क होणार नाही अजिबात.
पर्यटनाला जाणारा माणूस रोजच्या करकरीपासून चार घटका दूर म्हणून आराम करण्यासाठी जातो.
त्यावेळेला तिथे जाऊन भाज्या निवडा, चुलीशी खटपट करा, पोट्टी सांभाळा यात रस का असावा?
कुणा नातेवाईकाच्या घरी कारणपरत्वे गेलो तर हे करणे ठिके पण पर्यटनासाठी म्हणून जायचे आणि हे सगळे अ बिग नो नो.
आता होमस्टे एक संकल्पना असा
आता होमस्टे एक संकल्पना असा धागा काढायची वेळ आलेली आहे.
दिनेश, मुरुडला (हर्णैवालं)
दिनेश, मुरुडला (हर्णैवालं) संजय भावेंच्या घरी आम्ही तुम्ही लिहिलेल्यातलं बरंच केलं होतं. एका मुक्कामासाठी गेलो आणि अडीच दिवस राहिलो. तेव्हा त्यांच्या मुलांची लग्नं व्हायची होती, म्हणुन मुलांना खेळवणं तेवढं राहिलं
पण आता असं वातावरण मिळणं मुश्किल आहे. तशी अपेक्षा ठेवणंही बरोबर वाटत नाही. नीरजा म्हणते तेही एक महत्वाचं कारण आहेच, दुसरं म्हणजे असं अनोळखी लोकांना बिनदिक्कत घरात वावरू देण्याचे दिवसही नाहीत आता. कोण कसे असतात, कुणाच्या सवयी कशा असतात, दिवसागणिक नवे लोक येणार. विनाकारण धोका ओढवून घेण्यातला प्रकार. त्यामुळे कितीही होम स्टे म्हणलं तरी एक मर्यादा असावीच.
कुणी 'वेळास' बद्दल का लिहिल
कुणी 'वेळास' बद्दल का लिहिल नाही ? तिथला turtle festival फार अमेझिंग असतो असे ऐकले आहे.
नीधप, सई चांगले मुद्दे
नीधप, सई चांगले मुद्दे मांडले आहेत.
नीधप, होमस्टे एक संकल्पना हेच शिर्षक घेऊन धागा काढला तर चालेल का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24255 घे बघा वेळास. त्याचा सिझन असतो.
हो काढ की आरती. विचारतेस काय?
हो काढ की आरती. विचारतेस काय?
काल अश्वीनी के. नाही म्हणाली
काल अश्वीनी के. नाही म्हणाली होम स्टे चा धागा काढायला. मी कालच काढणार होतो. पण व्यवसाय म्हणून होम स्टे खूप छान कल्पना आहे. एखाद्या पर्यटक टिकाणी जर तुमचे घर असले तर घर बसल्या पैसे मिळतील.
धन्यवाद नीधप. जर तुमचे घर
धन्यवाद नीधप.
जर तुमचे घर असले तर घर बसल्या पैसे मिळतील.<<<< बी, खूप मेहनत असते. हल्ली ऑन लाईन रिव्ह्यु दिले जातात त्यामूळे खूप खबरदारी घ्यावी लागते. माझी मामे बहिण करत आहे. तो अनुभव बघत आहे. तसेच मदतीला मॅन पॉवर मिळण ही सुद्धा महत्वाची बाब आहे. बाकी तिथे लिहिते.
बी, 'कोकणात होमस्टे कुठे कुठे
बी, 'कोकणात होमस्टे कुठे कुठे आहेत आणि तिथे आलेले अनुभव' ह्या विषयासाठी मी वेगळा धागा नको असं माझं मत दिलं होतं. कारण ते ह्याच धाग्यात समाविष्ट होवू शकतं आणि तू वर हेडरमध्ये अपडेट करु शकतोस.
'होमस्टे - एक संकल्पना' हा त्यापेक्षा वेगळा विषय आहे असं मला वाटतं.
केश्वी +१ होमस्टे ही सोपी
केश्वी +१
होमस्टे ही सोपी गोष्ट नाही. घरी चार नातेवाइक येऊन राहून जातात अशी सोपी अजिबातच नाही.
ओके आलं माझ्या लक्षात सगळं
ओके आलं माझ्या लक्षात सगळं काही!!!!!!!!!!!!!!!!!
केश्वी +१ दिनेशदांच्या
केश्वी +१
दिनेशदांच्या कल्पनेतील होमस्टे हा फक्त नातेवाइक किंवा ओळखीचे लोक असतील तरच होऊ शकतो. अनोळखी टुरिस्ट लोकांसाठी वेगळी खोली आणि जेवण देणे ईतकाच होमस्टे असावा कारण त्यात बरेच धोके आहेत.
वेगळी खोली देऊन सुद्धा धोका असतोच, काही दिवसांपूर्वीच गुहागर मध्ये एका होमस्टे मध्ये रहायला आलेल्या पर्यटकांनी मालकाचा खून केला आणि त्याच्या अंगावरिल सोन्याची चेन इ. लुबाडून पळून गेले.
या गोष्टीमुळे सगळे होमस्टे मालकही आता फार जपून राहतात..
धन्यवाद सर्वांचे. इथे मला
धन्यवाद सर्वांचे.
इथे मला स्वयंसेवक मिळतील का? ही जी माहिती मिळाली आहे ती क्रमवार कुठल्या स्थळी जावे, काय पहावे अशी करुन हवी आहे. जर कुणी कोकणातलाच असेल आणि हे काम करण्यासाठी वेळ आणि उत्साह असेल तर तुम्ही हे काम अवश्य करु शकता. मनापासून धन्यवाद.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/32741
http://www.maayboli.com/node/33197
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/40068
http://www.maayboli.com/node/41244
नेहमीप्रमाणे माझ्या परिक्षेने
नेहमीप्रमाणे माझ्या परिक्षेने दगा देऊन आपला कार्यभाग साधला..
आणि अश्याप्रकारे माझी कोकण ट्रिप परत एकदा चुकली..
जाऊ दे.. बरिच माहिती मिळाली आणि मी नोंदवुन सुद्धा ठेवली .. पुढे प्लॅन करताना कामी येईलच..
बबिटेल, धाग्यांसाठी धन्यवाद!
बबिटेल,
धाग्यांसाठी धन्यवाद! जिप्सीच्य फोटोंतून कोकण अधिक सुंदर दिसते.
कोकणात भरपूर स्थळे
कोकणात भरपूर स्थळे आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे.
- गणपतीपुळे, गणेशगुळे, पावस, भगवती किल्ला आणि टिळक, सावरकर यांच्या आठवणी जपणारी ठिकाणे, रत्नागिरी येथील मत्स्यालय,रत्नदूर्ग किल्ला,पुर्णगड किल्ला,पतितपावन मंदिर,स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक,प्राचीन कोकण दालन,
केशवसुत स्मारक,प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,जयगड बंदर
जयगड किल्ला,कऱ्हाटेश्वर मंदिर,दीपस्तंभ-जयगड,मालगुंड -कवी केशवसुतांचे हे गाव. कवी केशवसुतांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले आहे
श्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे,थिबा पॅलेस (रत्नागिरी), मार्लेश्वर आणि संभाजी महाराजांचे स्मारक कसबा गाव (संगमेश्वर),कर्णेश्वर हेमाडपंती मंदिर,(संगमेश्वर) धुतपापेश्वर मंदिर (राजापूर),, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, गंगा अवतरणारे ठिकाण (राजापूर), आडिवर्याची महाकाली,पुरातन चंडिकादेवी मंदिर (दापोली),कड्यावरचा गणपती (दापोली),गारंबीचा बापू’ ने अजरामर केलेले आसुद.(दापोली) येथील केशवराज मंदिर ,गुहागरमधील हेदवीचे गणेश मंदिर व बामणघळ. मुंबई-गोवा महामार्गावर डेरवणची शिवसृष्टी, चिपळूण येथील परशुराम मंदिर.
समुद्रकिनारे
- गणपतीपुळे, आरे-वारे सनसेट स्पॉट, गावखडीचा शांत किनारा, रत्नागिरीतील भाट्ये व मांडवी किनारा, दापोली तालुक्यातील आंजर्ले, कर्दे, दाभोळ आणि मुरुड किनारा, गुहागरमधील वेळणेश्वर गुहागर, गणपतीपुळे आणि दापोली कर्दे व आजर्ले येथील किनारे हे डॉल्फिनसाठी प्रसिद्ध आहेत. सकाळच्या सत्रात हे डॉल्फिन किनारी भागात अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येतात. समुद्रात जाऊन डॉल्फिन पाहण्याची व्यवस्था.
गणपतीपुळे, मुरूड-हर्णे येथे सुमारे 80 कोकणी हटस्. शासनाच्या न्याहारी निवास योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रत्येकी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी घरा-घरात पर्यटकांना राहण्याच्या सुविध आहे
स्वत:चे वाहन वापरा,दाभोळ-गुहागर,जयगड फेरी बोटने जा गाडी आत टाकता येते वेळ वाचतो.कोकणी पदार्थ चाखा,पावसाळ्यात जाणे टाळा.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नीधप, मी माझी कल्पना मांडली.
नीधप, मी माझी कल्पना मांडली. असे होम स्टे मी अनुभवले पण ही आहेत. आणि आजही नातेवाईक नसलेल्या अनेकांकडे मी असा राहू शकेन, याची खात्री आहेच.
प्रत्येकाच्या रिलॅक्सेशनच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. कुणाला भाजी निवडत घरच्यांशी गप्पा मारायला आवडेल तर कुणाला बंद रूममधे बसून वाय फाय / ब्रॉड बँड नेट कनेक्शनवर सर्फिंग करायला आवडेल. नाही का ?
एका नांदत्या घरात / परीसरात आपण राहतोय. आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे. त्यातल्या गमतीजमती सांगणारी मुलं माणसं आहेत. अनेक करवंदांच्या जाळ्यांपैकी मनुका करवंद कुठली हे सिक्रेट सांगणारं कुणीतरी आहे.. त्यात आनंद शोधायला मला नक्कीच आवडेल, नव्हे त्यातच मला आनंद वाटेल.
होम स्टे देणारे हॉटेल्स इतकी गुंतवणूक करू शकतील का ? थोड्या गुंतवणूकीत काही वरकड उत्पन्न मिळाले आणि पर्यटकांनाही कमी पैशात राहता आले तर दोन्ही बाजूंची सोय होईल असे वाटतेय.
थिबा पॅलेसमधे डिप्लोमा
थिबा पॅलेसमधे डिप्लोमा कोर्सेस चालतात का ?
तो दुसरा धागा, घाट वाला, या धाग्याचं विडंबन आहे हे आता लक्षात आलं. तरीच मला शंका आली होती की पाईपलाईनमधून कसे काय लोक नगरमधून विदर्भात जातील ?
साप्ताहीक सकाळचा कोकण
साप्ताहीक सकाळचा कोकण विशेषांक
http://emagazine.sakalsaptahik.com/SakalSaptahik/20Sep2015/Enlarge/page4...
http://www.sindhudurgparyatan
http://www.sindhudurgparyatan.com/sindhudurgmap.html
Pages