मला कोकण बघायचेचं!!!!

Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55

मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.

तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्‍या माबोकरांना मदत करायची.

मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.

कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रायगड: गर्दी असेल
९फेब्रु रविवारी पौर्णिमा,
१९ फे शिवजयंती
-------
हरिहरेश्वर/ शंकराची ठिकाणे
२१ फे शिवरात्र
या तारखा टाळा.

Pages