मला कोकण बघायचेचं!!!!

Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55

मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.

तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्‍या माबोकरांना मदत करायची.

मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.

कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्याहून जाणार असाल तर दिवे-आगार पासून सुरु करुन श्रीवर्धन -- हरिहरेश्व्र्र-- गुहागर -- गणतीपती पुळे-- असं कोस्टल कोकण करता येईल. त्या खाड्या मधून सध्या चारचाकी टाकून जंगल बोटीतून पलीकडे जाता येते.

जर खालील प्रमाणे प्लॅन करायचा असेल तर वेळा, मार्ग, पहाण्याची ठिकाणे, मुक्कामाचे पर्याय, इ. सुचवाल का ?

बाणकोट - वेळास - केळशी - आंजर्ले - हर्णै - कर्दे - लाडघर - तामसतिर्थ

वाहन स्वतःचे नेणार आहोत. मुक्काम शक्यतो ३ रात्रींचा जमेल ( जाऊन येऊन ३ रात्री ४ दिवस)

पुढल्या आठवड्यात दापोलीला चाललेय. मुरुड बीच, लाडघर तामसतीर्थ, केशवराज मंदिर, कड्यावरचा गणपती, परशुराम मंदिर एव्हढी लिस्ट जमली आहे. पन्हाळेकाजी लेण्यांना जायचा रस्ता चांगला नाही असं वाचलं म्हणून आणि कनकदुर्गाला जायला अधिकृत बोट नाही म्हणून दोन्ही ठिकाणं लिस्टमधून काढली.

तिथे पोचल्यावर दोन दिवस राहून परत निघणार आहोत (३ रात्री ४ दिवस). काही प्रश्न आहेतः

१. ह्या दोन दिवसांत एव्हढं पाहून होईल का? काय क्रमाने ठिकाणं पहावीत?
२. आणखी काय पहाता येईल ?
३. खादाडीच्या काही विशेष जागा आहेत का? मी नॉन-व्हेजिटेरियन आहे.
४. खरेदीकरिता काही विशेष जागा?

कोणाला काही माहित असेल तर प्लीज सांगा.

रच्याकने, कोकणाबद्दल स्पेशल धागा पाहून मस्त वाटलं. आता हा वापरून फिरता येईल. ह्या धाग्यावर ज्यांनी पोस्ट केलंय त्या सर्वांना धन्यवाद!

केशवराज मंदिर शक्यतो सकाळी कर. सकाळी खूप प्रसन्न वाटत> त्या परीसरात.

कड्यावरचा गणपती दुपारी करून संध्याकाळी सूर्यास्ताला हर्णे बीचच्या वर डोंगरावर येशील असे बघ. अफलातून स्पॉट आहे सूर्यास्ताकरता (मला नाईलाजाने दिवसा बघावा लागला)

दोन दिवसात ही ठिकाणं आरामात होतील.

हे माझे काही फोटो.

ओक्के माधव Happy धन्यवाद! अरे, तिथल्या खादाडीबद्दल पण काही सांग की. माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे अगदी. Proud

१. ह्या दोन दिवसांत एव्हढं पाहून होईल का? काय क्रमाने ठिकाणं पहावीत?
२. आणखी काय पहाता येईल ?>> स्वप्ना, माझा पहिल्या पानावरचा दापोली बद्दलचा प्रतिसाद पहा.

कोकणाचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे गेल्या पंधरा वर्षांत. चित्रात दाखवतात तशी घरं फारच थोड्या ठिकाणी उरली आहेत.

कोकणात जाउन आल्यावर इथे लिहेन लिहेन म्हणत होते पण वेळच झाला नाही. आपण इथे यायला उशीर केलाय तेव्हा अगदी पूर्वीच्या लेखांत किंवा सिनेमात असायचं तसं कोकण दिसणार नाही हे ठाऊक होतं तरी थोडा अपेक्षाभंग झालाच. लाडघर आणि हर्णे बीच पाहिले. हर्णेचं माश्यांचं auction पहायचं होतं पण रस्ता थोडा inaccessible वाटल्याने सोडून दिलं. केशवराज मंदिर मिळेमिळेतोही संध्याकाळी बरा च उशीर झाला. शिवाय बरोबरीच्या मंडळींना तेव्हढा इंटरेस्ट नसल्याने तेही बघता आलं नाही. काही गोष्टी नशीबात नसतात हेच खरं. तसंही म्हणे देवाच्या मनात नसेल तर देवळात जाता येत नाही. पुढल्या वर्षी जमलं तर परत जाईन म्हणते. ह्या वेळी भोज्जा तरी केला.

खादाडीच्या बाबतीत बरीच निराशा झाली. पायरी तर कुठे मिळाला नाहीच. पण हापूस आंबाही खराब झालेला घाईघाईत लोकांच्या गळ्यात मारायची वृत्ती दिसली.झालाच शिमगा तर मुंबै-पुण्याला झाल्यावर होईल. कोणी टूरिस्ट इथे थॉडाच भांडायला येणार आहे असा हिशेब होता. ना करवंद मिळाली, ना जांभळं, ना फणसाचे गरे ना आठळ्या. नंतर साधनाकडून कळलं की तिथे ह्या गोष्टी घराघरात. त्यांचं आपल्याला अप्रूप. तिथे ह्या विकत नाहीत. आईकडे काम करणारी बाई मागच्या आठवड्यात कोकणातून जाऊन आली. तर सांगत होती की बाई, तिथे फणस जमिनीवर पडून फुटून जातात, गरे गुरं खाऊन जातात पण ह्या गोष्टी बाजारात विकत नाही मिळत. ती जिथे रहायला होती त्यांच्या घरचा नारळ आणला होता तर नुसतं गोड पाणी आणि खोबरं. इथे आम्ही २५ रुपये टिचवून आणतो पण पाण्याला चव नाही. तोही कुठे विकायला दिसला नाही. तरी नशीब आंबापोळी, फणसपोळी अजून मिळतेय. काही दिवसांनी तेही मिळायचं बंद होईल अशी भीती वाटयेय. फणसपोळी मात्र लहानपणी मुंबईत खाल्ली होती तशी chewy नव्हती. बर्फीसारखी होती.एका घरात काही पदार्थ मिळतील असा बोर्ड होता. त्यात उडीद बर्फी हा उल्लेख वाचून चौकशी केली. तर संपली होती म्हणे. Sad

पण एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना मध्ये गर्द झाडी लागायची. छोट्या पक्ष्यांच्या किलबिलीचा आवाज यायचा. स्वच्छ समुद्रकिनारे खुणावायचे. मुंबैला येऊ नये असं वाटत होतं. पुढल्या वर्षी नीट प्लानिंग करून जाणार. आणि मेच्या शेवटाला किंवा जूनच्या सुरुवातीला जाणार. प्रोजेक्ट कोकण दर्शन!

कोकण आपलाच आसा ना? मगे जाऊकच होया Proud

रत्नागिरी सोडून पुढे सिंधुदुर्गात जाऊन पहा. जिप्सी ची प्रवासवर्णनं आहेत, अर्थातच सचित्र.

आंबे खावेत तर रायवळच असं बऱ्याचदा कोकणी लोकांकडून ऐकलेलं. पण योग काही येत नव्हता. तो गेले पाचसहा वर्षं गड भटकंतीतून येत आहे. मे महिन्यात ट्रेकवाले फिरकतच नाहीत. गडावर नाही, खालीच. रायवळचे आंबे दरवर्षी नेमाने येतातच, सावलीत बसायचं, वारा आला की दोन चार पडतात ते खायचे. गोड आणि रसदार. थोडे पिशवीत भरायचे, चालू पडायचं.

रत्नागिरी वरून पुतळ्याला जाताना आरे वारे बीच वरून जा. अफलातून रस्ता!!>>> हे पुतळा कुठे आहे? का गणपतीपुळ्याला किंवा पुळ्याला लिहायचं आहे तुम्हाला?

हरीहरेश्वर रायगड जिल्ह्यात आणि मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात येतं. या दोन ठिकाणांमधील अंतराची कल्पना आहे का तुम्हाला?

नाही ,

म्हणूनच विचारल आहे . दोन्हीही ठिकाण नवीन आहेत माझ्यासाठी Happy

रायवळचे आंबे दरवर्षी नेमाने येतातच, सावलीत बसायचं, वारा आला की दोन चार पडतात ते खायचे. गोड आणि रसदार. थोडे पिशवीत भरायचे, चालू पडायचं.

Submitted by Srd on 29 June, 2019 -
>> खायचे नाहीत. चोखायचे. रायवळ आंबा चोखून खाण्याची मजा काही औरच.
कोकणात पावसाळ्यात मासे खायला मिळतात का? की पावसाळा संपल्यानंतरच मिळतात.

दोन्हीही ठिकाण नवीन आहेत माझ्यासाठी >>> दोघांपैकी एक ठिकाण ठरवा. म्हणजे आजूबाजूला असणारी ठिकाणे मायबोलीकर सुचवतील.

हरी हरेश्वर = समुद्र = पावसाळ्यात वर्ज्य
मार्लेश्वर = धबधबा = पावसाळयात स्वागत

फेब्रुवारी मध्ये आम्हा १२ जणांच्या फॅमिली ग्रुपचा कोकणात (रत्नागिरी) ४ दिवस जायचा प्लॅन आहे.
४ दिवसात ठाणे ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते ठाणे परतीचा प्रवास सुद्धा समाविष्ट आहे.

तर या ४ दिवसतात काय काय पाहावे आणि कुठे राहावे ?

यात चवथ्या दिवशी पार्टीच्या वाटेवर रायगड किल्ला बघायचे डोक्यात आहे.

जाणकारांनी कृपया माहिती द्यावी आणि काही हॉटेल्स वा राहण्याच्या सोयी असतील तर सुचवावे.

Pages