मला कोकण बघायचेचं!!!!

Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55

मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.

तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्‍या माबोकरांना मदत करायची.

मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.

कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ नंदिनी....बरेच समुद्र याला प्रचंड अनुमोदन...
श्रीवर्धन चा आम्ही ज्या रिसॉर्ट वर होतो तिथुन दिसणारा समुद्र अतिशय घाण होता...कौटुंबीक मजा सोडली तर समुद्राने निराश केले. तोच दिवेआगर चा समुद्र मस्त होता. लहान मुलांन सारखा..खेळायला कायम तय्यार असा. हरिहरेश्वर ला घाबरवणार समुद्र तर तारकर्ली चा...देवबाग रिसॉर्ट च्या मागचा धीर घंभीर, दिसणारा पण कधी काय करेल याचा नेम नसणारा, आणि खुद्ध तारकर्ली चा टिन ऐजर सारखा.. कधी चंचल कधी शांत.. गुहागर चा घरचाच वाटला..
खुद्द कोकणी लोकांना किती तरी समुद्र रुपे माहीत असतील.

@सई...किती सजीव वर्णन केलय तुम्ही! आवडले.

.बरेच समुद्र याला प्रचंड अनुमोदन...>> चला म्हणजे माझा प्रश्न समुद्र किती असतात हा चुकीचा नव्ह्ता. ह्यासाठी बोलीभाषेचे महत्त्व कळावे लागते.

आमच्या घरी कोकणात आम्ही अंगणात जो लांबच्या लांब कट्टा आहे त्यावर सगळीकडे ठराविक अंतरावर पणत्या ठेवतो. आजु़बाजुला असलेल्या नैसर्गिक अंधारा मुळे शांत पणे तेवणार्‍या त्या पणत्या मनाला ही तेवढीच शांतता देतात. एवढ्या एका दृश्या साठी दरवर्षी दिवाळी साठी कोकणात जावेसे वाटते.

दिनेशदा, नाही दिवाळी किंवा गणपतीत कोकणात मी जाणार नाही. मी नाताळाच्या वेळेस जाणार आहे. आता पावसाळ्याचा बेत रद्द केला आहे इथले अभिप्राय वाचून. मागे आम्ही फक्त एका दिवसात रायगड किल्ला बघून आलो होतो.

जिथे आपण होम स्टे घेतो तिथे काय काय सेवासुविधा मिळतात?

ते प्रत्येक ठिकाणी वेगळे असते. बुक करायच्या आधी नक्की सगळे विचारून घ्यावे अगदी आंघोळीला गरम पाणी, सकाळचा चहा पासून सगळे.
काही ठिकाणी बेसिक रहायला स्वस्त असले तरी या सगळ्या गोष्टींना अ‍ॅडिशनल पैसे असू शकतात. काही ठिकाणी सगळे इन्क्लुडेड असते.

परदेशातल्या होमस्टेसारखा अर्थ इथे घेऊ नये.
लोकांच्या घरातल्याच एक दोन रूम जर ते होमस्टे ला देत असतील तर व्यवस्था अगदी बेसिक असू शकते. अ‍ॅटॅच टॉयलेट नसते.
घराच्या आवारातच भाड्याने देण्यासाठी खोल्या केलेल्या आहेत अश्या प्रकारचे होमस्टे असेल तर ते बरे कारण त्या खोल्या जनरली एम टी डी सी च्या निवास न्याहरी च्या संकेतांप्रमाणे बांधलेल्या असतात त्यामुळे व्यवस्थित असते परिस्थिती.

<<लोकांच्या घरातल्याच एक दोन रूम जर ते होमस्टे ला देत असतील तर व्यवस्था अगदी बेसिक असू शकते. अ‍ॅटॅच टॉयलेट नसते.
घराच्या आवारातच भाड्याने देण्यासाठी खोल्या केलेल्या आहेत अश्या प्रकारचे होमस्टे असेल तर ते बरे कारण त्या खोल्या जनरली एम टी डी सी च्या निवास न्याहरी च्या संकेतांप्रमाणे बांधलेल्या असतात त्यामुळे व्यवस्थित असते परिस्थिती.>> +१११

कल्चर आंगनच्या रश्मी सावंत सिंधूदुर्गात होम स्टे उपलब्ध करून देतात. अनुभव मासिकासाठी यांची मी मुलाखत घेतली होती. सप्टेंबर २०१४च्या अंकात ही मुलाखत वाचायला मिळेल.

बी, माझ्या मैत्रिणीच्या मालकीच्याही मालवणात रूम्स आहेत. भाड्याने देतात. ए.सी, नॉन ए.सी. दोन्ही आहेत.

बी, नाताळच्या दरम्यान गोव्याच्या बाजूला अजिबात जाऊ नकोस. नुसता दंगा असतो. आणि हॉटेल बुकिंगही मिळत नाही. ( बहुतेक हॉटेल्स परदेशी पर्यटकांनी बूक केलेली असतात. )

कोकणात, उघड्यावरच्या न्हाणीघरात अंघोळ करायला मजा यायची. बंब पेटलेला असायचा. त्या बंबातले जळणही खास कोकणी वासाचे. ( नारळाची सोडते, अंब्याचा पाला, काजूच्या काड्या वगैरे ) एक चौकोनी दगड बसायला आणि एक दगड बादली ठेवायला. नावापुरता आडोसा. आणि त्या पाण्यावर वाढवलेली अळू, कर्दळी.. पुढे केळी मधे ते पाणी नेलेलं. साबणसुद्धा बेसिक. फार वासाचा वगैरे नाही. मालवणला अश्याच अंघोळी केल्या. नाहीतर मग विहीरीच्या बाजूला उभे राहून काकांनी डोक्यावर बदाबदा घागरी ओतलेल्या. त्या आधी समुद्रात "पेवायला" जाऊन आलेलो ! दिवसातल्या कुठल्याही प्रहरी पण भरती बघून "वेळेवर" जायचे. मेढ्यातला समुद्र त्या काळी स्वच्छ होता ( आता नाही ) आणि खोलही नव्हता. राजकोटाचा आडोसा असल्याने मोठ्या लाटा नसत.

तोडून आणलेली "काजी" ची बोंडे, कुस्करून समुद्राच्या पाण्यात टाकत असू. तशी ती खाल्ली कि अजिबात खवखवत नसत. त्याच किनार्‍यावर मूळे ( शिपले ) आणि कालवा , घुला पण भरपूर मिळत. काकी बरोबर वेळ बघून ते गोळा करायला जात असे. मी पण असेच सोबत.

कोकणात, उघड्यावरच्या न्हाणीघरात अंघोळ करायला मजा यायची. बंब पेटलेला असायचा. त्या बंबातले जळणही खास कोकणी वासाचे. ( नारळाची सोडते, अंब्याचा पाला, काजूच्या काड्या वगैरे ) एक चौकोनी दगड बसायला आणि एक दगड बादली ठेवायला. नावापुरता आडोसा. आणि त्या पाण्यावर वाढवलेली अळू, कर्दळी.. पुढे केळी मधे ते पाणी नेलेलं. साबणसुद्धा बेसिक. फार वासाचा वगैरे नाही. मालवणला अश्याच अंघोळी केल्या. नाहीतर मग विहीरीच्या बाजूला उभे राहून काकांनी डोक्यावर बदाबदा घागरी ओतलेल्या. त्या आधी समुद्रात "पेवायला" जाऊन आलेलो ! दिवसातल्या कुठल्याही प्रहरी पण भरती बघून "वेळेवर" जायचे. मेढ्यातला समुद्र त्या काळी स्वच्छ होता ( आता नाही ) आणि खोलही नव्हता. राजकोटाचा आडोसा असल्याने मोठ्या लाटा नसत.>>>

बापरे हे असे स्नान करायला नक्की कुठे मिळेल. हे मी असे लहानपणी अकोल्याला केले आहे आणि आता तर बाथरुम आणि रेस्टरुम एकत्रच असतात जिथेतिथे.

खूप छान माहिती मिळत आहे.

एक विचारु का? होम स्टे साठी आणि संबंधित अनुभव ह्याकरिता एक वेगळा धागा काढू का? कारण इथे आता खूप अभिप्राय एकत्र व्हायला लागले आहे.

खूप उपयुक्त माहिती गोळा होती आहे.. Happy

बी, एक विनंती आहे.. सर्व प्रतिसादांपैकी उपयुक्त माहिती असलेले प्रतिसाद मूळ धाग्याच्या मजकूरात टाकता येतील का? असे केल्यास उपयुक्त माहिती चे छान संकलन होईल..

बी, एक विनंती आहे.. सर्व प्रतिसादांपैकी उपयुक्त माहिती असलेले प्रतिसाद मूळ धाग्याच्या मजकूरात टाकता येतील का? असे केल्यास उपयुक्त माहिती चे छान संकलन होईल..>> +१००

मी कधी होम स्टे अनुभवला नाही, पण माझ्या कल्पनेतला होम स्टे अगदी वेगळा असेल. पाहुण्यासारखे बाहेर बसून ताट वाढून कधी मिळतेय याची वाट बघत बसण्यापेक्षा, चुलीसमोर बसून रांधणार्‍या मामीसोबत गप्पा मारायला मिळाव्यात. भाजी वगैरे नीट करण्यात हातभार लावावा. अगदी जेवायला बसताना विहिरीवरून कळशी भरून आणावी. पहाटे उठून सडा सारवणात हातभार लावावा, चाफा खुडून त्याची रांगोळी घालावी, कुठल्याही दिवशी उकडीचे मोदक मिळावेत अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा, गे वयनी, आज रसघावणे करशील... असा हट्ट करावा.

घरातल्या मूलांसोबत उंडारावे, त्यांचा अभ्यास घ्यावा. ...

हो अगदी असा पाहुणा मिळायला भाग्य लागत आणि कुणाकडे पाहुणे म्हणून गेले असताना इतकी स्वायत्ता मिळायलाही भाग्यच लागत.

कुठल्याही दिवशी उकडीचे मोदक.......+१
मे महिन्यात दिवेआगरच्या समुद्रावर, पाणीपुरी विकतात तसे मोदक विकताना बघून चिडचिड झाली होती आमची! ( आमचं घर दिवेआगरजवळच आहे)

वावे, अगदी मनातलं.

होम स्टे साठी आलेला पर्यटक हा घरचा पाहुणा म्हणून राहिला तर किती छान ! आपले अंथरुण आपणच घालावे, सकाळी उठल्यावर नीट आवरुन ठेवावे.. अशा साध्या साध्या गोष्टी असतात. तसे केले तर कोकणी माणसाचा खरा आपलेपणा लाभेल. नाहीतर आहेच पैश्याचा रुक्ष व्यवहार.

मी कधी होम स्टे अनुभवला नाही, पण माझ्या कल्पनेतला होम स्टे अगदी वेगळा असेल. पाहुण्यासारखे बाहेर बसून ताट वाढून कधी मिळतेय याची वाट बघत बसण्यापेक्षा, चुलीसमोर बसून रांधणार्‍या मामीसोबत गप्पा मारायला मिळाव्यात. भाजी वगैरे नीट करण्यात हातभार लावावा. अगदी जेवायला बसताना विहिरीवरून कळशी भरून आणावी. पहाटे उठून सडा सारवणात हातभार लावावा, चाफा खुडून त्याची रांगोळी घालावी, कुठल्याही दिवशी उकडीचे मोदक मिळावेत अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा, गे वयनी, आज रसघावणे करशील... असा हट्ट करावा.

घरातल्या मूलांसोबत उंडारावे, त्यांचा अभ्यास घ्यावा. ...>>> दिनेशदा हे भारीये. आवडलं Happy

दिनेशदा, अस होम स्टे / रीसॉर्ट काढायच माझ स्वप्न आहे. मी मागे कट्ट्यावर लिहिल होत. कौलारू घर, चूल आणि शेणाने सारवलेली जमिन... आमच्या एका प्लॉटवर हे बांधायच आहे त्या प्लॉटच्या बाजूला व्हाळ आहे. त्यामूळे पावसाळ्यात मासे, खेकडे पकडायची मजा अनुभवता येईल. नो टी. व्ही. नो स्मोकिंग आणि नो ड्रिंक्स. तुमच्या आशिर्वादाने लवकरच पूर्ण होऊ दे. मग माबोकरांसाठि स्पेशल डिस्काऊंट देईन. Happy

Pages