Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55
मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.
तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्या माबोकरांना मदत करायची.
मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.
कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली या शहरापासून ७ किमीवर हरकुळ या गावी माझ्या वडिलांनी होम स्टे ची व्यवस्था केली आहे. कणकवली हे तालुक्याचे ठिकाण आणि कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे बर्याच जणांना सोयीचे पडते. आमच्या इथे राहून तुला दर दिवशी एक अशी भ्रमंती करता येईल.
उत्तरेला गणपतीपुळे, रत्नागिरी, पावस, विजयदुर्ग, कुणकेश्वर (देवगड), तर दक्षिणेला मालवण, तारकर्ली, कुडाळ, सावंतवाडी, रेड्डी, आंबोली आणि वेंगुर्ले पाहता येईल. रेल्वे ने कणकवली ला आलास तर तिथून पुढे गाडी (कार) ची व्यवस्था करता येईल.
अरुणजी मला तुमचा पत्ता आणि
अरुणजी मला तुमचा पत्ता आणि फोन नंबर कळवा. किंवा ह्वे तर इथेच लिहा. बरे पडेल चारचौघांना.
ओक्के रे बी. त्यांना आलेले
ओक्के रे बी. त्यांना आलेले अनुभव पण लिहीत जा त्या त्या बीबीवर. उदा. अष्टविनायक करताना जिथे चढायचे होते तिथे काय केले? इत्यादी.
हे सांगायचे कारण म्हणजे बर्याचदा तू प्रश्न विचारुन गायब होतोस. तुला प्रामाणीकपणे उत्तर देणार्यांना त्यामुळे कळतच नाही त्यांनी दिलेल्या माहीतीचा उपयोग झाला की नाही ते.
केपी +१००
केपी +१००
केपी, इथे माबोवर अशी प्रथा
केपी, इथे माबोवर अशी प्रथा नाही आहे. लोक माहिती विचारतात आणि आभार मानतात. त्या माहितीचा कसा उपयोग झाला हे सांगणारे अजून मी तरी इथे कुणी पाहिले नाही. आणि मी माझा जर गेलो असतो तिथे तर एकवेळ परत येऊन इथे लिहिले असते पण घरच्या लोकांना अशी माहिती विचारणे म्हणजे अवघड आहे.
बी: विपु मध्ये नंबर पाठवलाय.
बी: विपु मध्ये नंबर पाठवलाय.
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>>
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>> इंद्रा, एडिट कर राग >> माझ पण तसच झालेल.. विचार केला यार मी तर ते रत्नागिरीत पाहिलं होत आता सिंदुदुर्गात कस्काय गेल .. हाहा>>>>
पुळ्याला गेलो असताना..रत्नागिरि त हि डोकावलो.. मोठ्या उत्साहाने हे थिबा बघायला गेलो..तर ते बन्द च होते..रीनिवेशन साठी....वैतागलो होते...सिन्धुदुर्गात असे काही झाले नव्ह्ते..
पण इन्द्रा यान्च्या पोस्ट मुळे नेमके कुठे वैतागलो होतो हे आठवेना.
प्रथा आपण पाडायच्या असतात बी.
प्रथा आपण पाडायच्या असतात बी. जसे तु धागा काढताना त्या माहीतीचा इतरांना उपयोग होईल असा विचार करतोस तसेच काहीसे. उदा. मला माझ्या वयस्कर आईला जर अष्टविनायकाला न्यायचे असेल तर तुझी माहीती उपयोगी पडली असती. असो.
हो लिहिन मी माहिती नक्की.
हो लिहिन मी माहिती नक्की. तुला तर माहितीच आहे की मी इथे अधुनमधुनच येतो. पण मी लिहिन. मी करेन ती प्रथा सुरु. धन्यवाद केपी.
मोठ्या उत्साहाने हे थिबा
मोठ्या उत्साहाने हे थिबा बघायला गेलो..तर ते बन्द च होते..रीनिवेशन साठी....वैतागलो होते.<<< नक्की काय बघायला गेला होतात? थिबा पॉइंट, थिबा पॅलेस की अजून काही? थिबा पॉइण्ट मध्यंतरी बरीच दिवस रीनोव्हेशनसाठी बंद होता. पूर्वी एकदम रिकामटेकडा पॉइंट होता. जास्त कुणी फिरकायचं नाही. कॉलेजमधल्या पोरापोरींचा आवडता स्पॉट. मला हल्ली थिबा पॉइंंटकडे गेलं की "जाने कहां गये वो दिन" असं गाणं म्हणत रडावंसं वाटतं. आता तिथे बाग वगिरे करून पूर्ण वाट लागली आहे. बरेच पर्यटक येतात. सगळा गजबजाट कचरा आणि गोंधळ. शांतता अजिबात राहिली नाही. त्यामुळे आम्ही कॉलेजग्रूप गटग करायला बर्याचदा सुरेशा पॉइंटला जातो. तो कुठं आहे ते सांगणार नाही. अन्यथा तिथे पण पर्यटक गर्दी करतील
वर कोळिसरेची लिंक दिलीआहे, तिथे कुणाला राहाण्याची व्यवस्था हवी असल्यास मला संपर्क करू शकता. तिथले पुजारी चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांच्याकडे जेवणा-रहाण्याची उत्तम सोय होउ शकते.
मी लिहु का सुरेशा पॉईंट
मी लिहु का सुरेशा पॉईंट बद्दल?
तुला तर माहितीच आहे की मी इथे
तुला तर माहितीच आहे की मी इथे अधुनमधुनच येतो>>
हे नविनच आहे माझ्यासाठी.
@ नन्दिनी जी- थिबा
@ नन्दिनी जी-
म्हणुन जास्त वैताग 
थिबा पॅलेसच...भर दुपारी उन्हात गेलो होतो रस्ता विचारत विचारत...तिथे गेट मधे शिपाई होता..ज्याने पॅलेस बंद आहे हे नाहीच सांगितले. गाडी पार्क करुन (जे करायला तसा बराच वेळ गेला.. कारण इतरांनी केलेले बेशिस्त पार्किंग :() गेट ते पॅलेस निम्म्या वाटे पर्यंत गेल्या वर मग परत येणार्या लोकांनी सांगीतले ...फ़जिती झाली
थिबा पॉइण्ट मध्यंतरी बरीच
थिबा पॉइण्ट मध्यंतरी बरीच दिवस रीनोव्हेशनसाठी बंद होता. पूर्वी एकदम रिकामटेकडा पॉइंट होता. जास्त कुणी फिरकायचं नाही. कॉलेजमधल्या पोरापोरींचा आवडता स्पॉट. मला हल्ली थिबा पॉइंंटकडे गेलं की "जाने कहां गये वो दिन" असं गाणं म्हणत रडावंसं वाटतं. >> +१
मी लिहु का सुरेशा पॉईंट बद्दल? >> कि मी लिहू?
आमचा आवडता पाॅईंट आहे तो.
भ्रमा, निधी. चूप!!! थिबा
भ्रमा, निधी. चूप!!!
थिबा पॅलेसमध्ये डिप्लोमा केलेले कुणी माबोकर नाहीत का?
सिंधुदुर्ग, रायगड ही
सिंधुदुर्ग, रायगड ही जिल्ह्यांची नावे केली असली तरी माझ्या जिभेवर ती चढत नाहीत ! त्यातून आणखी सिंधुदुर्ग नगरी ( ओरोस ) पण प्रचलित झालेय.
आणि इंद्राने शोधून काढलेले
आणि इंद्राने शोधून काढलेले आंबोलीतून उतरल्यावर येणारे, मोती तलाव, थिबा पॅलेस असलेले सिंधुदुर्ग शहर.
आमचे घर मेढ्यात होते, आणि
आमचे घर मेढ्यात होते, आणि त्यावेळी मालवणात किल्ल्याचा उल्लेख किल्ला असाच व्हायचा. सिंधुदुर्ग हे नाव पण तितके प्रसारात नव्हते. किल्यात आमचे नातेवाईकही रहात होते.
बोटीचा प्रवास मात्र सुरु झाला पाहीजे असे वाटतेय. सध्या सगळी बंदरे गाळाने भरलीत, ती सुरु करायची तर भरपूर गुंतवणूक करावी लागेल. मी स्वतः बोटीने प्रवास केला आहे. बोट मालवण बंदरात लांब ऊभी रहायची तरी मेढ्यात भोंगा ऐकू यायचा. मग ती बघायला आम्ही धावत जात असू. ती मेढ्यातून नीट दिसायची नाही, मग राजकोटात चढायचे.
आता नवे चर्च आहे तिथे एक पडके चर्च होते. कुणी जातही नसत तिथे.
दिवे आगर
दिवे आगर
वर उल्लेख आलाय कि नाहि याची
वर उल्लेख आलाय कि नाहि याची कल्पना नाहि. राजापुरला दर ३ वर्षांनी गंगा येते, जमल्यास जा. राजापुर जवळच धुतपापेश्वर (लोकल - धोपेश्वर) आहे. अत्यंत रमणीय जागा - बाराहि महिने भेट देण्याजोगी...
.
.
छान धागा. बरीच माहिती मिळाली.
छान धागा.
बरीच माहिती मिळाली.
कुठल्या सिज़नला येणार आहात ते
कुठल्या सिज़नला येणार आहात ते निश्चित करा... त्यानुसार काय पाहता येईल ते ठरवता येईल.सीजनल खुप काही असत.
रोजच्या टूरिस्ट स्पोटसोबत इथले सण.. चालिरीति..जत्रेताला दशावतार... चतुर्थी....लिस्ट संपणार नाही.... कधीही या.
पावसाळा अविस्मरणीय... दिवाळी आधीचे दहा पंधरा चांगला सीज़न...उन कमी, हिरवा निसर्ग, स्वच्छ आकाश...
पर्यटन विभागाच्या वेबसाईट वर स्पॉट माहिती मिळेल. mtdc चे न्याहरी निवास इकॉनोमी आहेत...
शक्य तो स्थानिक चालक सोइचा पडतो..
आणि तरीही काही अडचण जानवाली तर मी सिंधुदुर्ग कणकवलीत आहेच...
www.sindhurgtourism.gov.in इथ
www.sindhurgtourism.gov.in
इथे बरीच माहिती मिळेल..
सीजनवरून आठवले, को़कणातला एक
सीजनवरून आठवले, को़कणातला एक मोठा सण किंवा सर्वात मोठा सण म्हणजे गणपती. माझे जाणे झालेच तर या सीजनमध्येच होते. कोकणातले गणपती, आरास, आरत्या, भजने, विसर्जन हे वेगळ्या धाग्याचा विषय आहे पण तेव्हा निसर्ग, वातावरण, अॅटमोसफेअर अनुक्रमे हिरवेकंच, ओलेचिंब, आणि सळसळत्या उत्साहाचे असते. आणि हे फोटो अल्बम बघतानाही जाणवते. पण अर्थातच या सीजनला पब्लिक ट्रान्सपोर्टला तुफान गर्दी.
धन्यवाद. सणासुदीला घरीच देव
धन्यवाद.
सणासुदीला घरीच देव बसलेले असतात. घरचे देव सोडून कुठे जाता येत नाही. मला तर कोलकत्त्याला जाऊन दुर्गापुजा बघायची आहे आईसोबत पण घरी घट असतात नऊ दिवस.
'समुद्र किती' या प्रश्नाला
'समुद्र किती' या प्रश्नाला इतर भागातले लोक हसतील पण मुळात रत्नागिरीचे लोक नाही हसणार.
आम्ही तर रत्नागिरीतच दोन समुद्र आहे असे म्हणतो. एक पांढरा आणि एक काळा. वर सोनू. यांनी लिहिलंय तसं भगवतीच्या डोंगरावरून दिसतात दुशीकडे दोन समुद्र.
भाट्याचा समुद्र, गावखडीचा, काळबादेवीचा असे अनेक समुद्र आहेत. आणि हो हे समुद्र आणि समुद्रकिनारे वेगवेगळे हं.
म्हणजे रत्नागिरीचा माणूस सहज बोलता बोलता म्हणेल ' गणपतीपुळ्याच्या किनार्यावर खूप गर्दी असली तरी पुळ्य्॑अचा समुद्र जरा डेंजर आहे. त्यापेक्षा भाट्यात जा, किनाराही कमी गर्दीचा आणि समुद्रही शांत!'
असो. आजकाल पुस्तकी बोलायच्या अट्टहासामुळे रत्नागिरीतले लोकही रत्नागिरीभर 'एकच अरबी समुद्र आहे' असे समजत आणि लिहित असावेत.
अरे पण ते 'किती समुद्र' हे
अरे पण ते 'किती समुद्र' हे इतके ठो ठो बोंब मारण्याएवढे जगबुडीचे आहे का?
चांगली माहिती कलेक्ट होतेय ना.
'समुद्र किती' या प्रश्नाला
'समुद्र किती' या प्रश्नाला इतर भागातले लोक हसतील पण मुळात रत्नागिरीचे लोक नाही हसणार.<< +१. मुळात तो प्रश्न फार काही चुकलेला नाहीये. अरबी समुद्र एकच असला तरी एरियाप्रमाणे समुद्र खरंच बदलतो. शिवाय खाड्या वेगळ्याच!!
कुणाला खोटं वाटत असेल तर पावसला जाताना भाट्याचा पूल लागला की समुद्र किनार्याने चालायला सुरूवात करा. सुरूबन संपता संपता झरी विनायकाचे मंदिर आहे. तिथून पुढं चालत रहा. जो काय त्या समुद्राचा नजारा बदलतो ते इथं शब्दांत सांगून उपयोगाचं नाही. भरतीच्या वेळेला तर भन्नाटच वाटतं. तोच सलग समुद्राचा किनारा.. पण तरी दोन्ही समुद्र वेगवेगळे.
'समुद्र किती' या प्रश्नाला
'समुद्र किती' या प्रश्नाला इतर भागातले लोक हसतील पण मुळात रत्नागिरीचे लोक नाही हसणार.<< +१
आम्ही मुंबईकरही दादरचा समुद्र, माहिमचा समुद्र, जुहूचा समुद्र, वरळीचा समुद्र असंच म्हणतो.
'नरीमन पॉईंटचा समुद्र' नावाचं पुस्तकही आहे - लेखक ह.मो. मराठे. पुस्तकी भाषा समजणार्यांसाठी खास माहिती
बाकी हा बीचा धागा आहे म्हणून इतके दिवस लिहित नव्हते (हो! उगाच कारण नसताना विपूत इंग्रजीतून दरडावणी यायची.) पण या धाग्यावर कोकणाविषयीची माहिती छान जमा झाली आहे.
Pages