चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो त्याचे ब्रूनो सोडून बहुतेक पिक्चर, टीव्ही शो पाहिलेत अचाट माणूस आहे!

सर्वात भन्नाट म्हणजे "डा अली जी शो". याचे यू ट्यूब वर क्लिप्स आहेत. ते पाहा. लोल ग्यारण्टी Happy

ज्युरॅसिक वर्ल्ड पाहिला. ठिकठाकच वाटला. एकदा बघायला हरकत नाही. बच्चे कं.ला मात्र प्रचंड आवडला. Happy

शनिवारी नागरिक पाहिला. चांगला आहे.

मराठीतले दिग्गज कलाकार भरभरून असलेला, महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट. एक दोन वेळा ट्रेलर बघितलेले. एकदम चकाचक पण राजकारणासारख्या रुक्ष विषयावर असल्यामुळे बघू कि नाही असे वाटलेले. सुदैवाने ह्या आठवड्यात आमच्या सोयीच्या वेळेला इतर काही (आमच्या) इंटरेस्टचे चित्रपट नसल्याने आणि मिलिंद सोमणला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल म्हणून बघितला. पण बरेच झाले.

राजकारणावर आधारित चित्रपटांच्या कथा कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकुणात सारख्याच असतात - समाजाच्या, राजकारणाच्या सद्य परिस्थितीबद्दल निराश करणाऱ्या!
सुरुवातीलाच मिलिंद सोमणचे दर्शन झाले Happy श्रीराम लागू एक वयस्क निवृत्त राजकारणी. त्यांच्या धडाडीच्या काळात अनेक दंगली घडवलेल्या, पण अशाच एका दंगलीत कधीतरी मुलाला गमावलेले (फ्लॅशबॅक). पण आता व्यैयक्तिक अनुभवातून पोळल्यानंतर आणि एकूणच वयोमानामुळे मवाळ झाले आहेत. विकास पाटील - मिलिंद सोमण - नव्याने राजकारणात आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव असतो आणि त्यासाठी श्रीराम लागूंची मदत मागतो.
शाम जगदाळे - सचिन खेडेकर - राजकीय पत्रकार - वर्तमानपत्रात नागरिक म्हणून सदर लिहितो. श्रीराम लागू मिलिंद सोमणला नकार देऊन शाम जगदाळेला माहिती देतात आणि डाव उधळवून लावतात.
ह्यानंतर असेच टिपिकल राजकारणाचे आणि आपल्या आजूबाजूला आपण नेहेमी अनुभवलेले / वर्तमानपत्रात वाचलेले काही प्रसंग येत राहतात. शाम जगदाळेला त्याच्या कार्यालयात समज दिली जाते. मध्यंतरापर्यंत शाम जगदाळे आणि आपणपण "कोण काय करू शकणार ह्या परिस्थितीत?" ह्या स्टेजला पोहोचतो.

मध्यंतरानंतर परत तशाच टिपिकल राजकारणाचे, चढत्या भाजणीत हिंस्त्र दर्शन होते. एका वेळेस शाम जगदाळे तुटून पडतो. निराश निराश होऊन शहरभर भटक भटक भटकतो आणि पहाटे उशिरा कधीतरी घरी येतो. बायको बरोबर बोलताना हताश होऊन रडतो. आपल्या दोन लहान मुलींसमोर... बायको समजावते, मुलींसमोर तुला धैर्य दाखवायला हवे सांगते, सावरते. इतक्यात पहाट होते. बाहेर दिवाळीचे फटाके वाजत असतात. दोघे बाल्कनीत येऊन उभे राहतात. रस्त्यापलीकडच्या वस्तीतला शाहीर त्याच्या शागीर्दाला घेऊन गाणे गात गात बाहेर पडत असतो. शब्द आठवत नाहीत पण जीवन हे असेच कठीण प्रसंगांनी भरलेले असते आणि म्हणूनच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, आपले अस्तित्व दाखवायला पाहिजे, अशा काहीश्या अर्थाचे. त्या गाण्याचे शब्द शामला एक आशेचा किरण दाखवतात. इथे चित्रपट संपतो आणि श्रेयनामावलीबरोबर शाम जगदाळे - संपादक ही पाटी लावलेले एक ऑफिस दिसते. मागोमाग वेगवेगळ्या बातम्यांची कात्रणे दिसत राहतात - काही नेहेमीची दु:खदायक, काही आशावादी...

चित्रण एकदम रिच आहे. संकलन काटेकोर. आणि अभिनय तर एकदम बढीया आहे. सचिन खेडेकरने एकदम समरसून भूमिका केलीय. श्रीराम लागू अवर्णनीय! मिलिंद सोमण, दिलीप प्रभावळकर, विजू खोटे त्यांच्या त्यांच्या भूमिकेत वठून गेलेत. दिलीप प्रभावळकरांना तसा फार स्कोप नाहीय त्यामुळे विशेष नाविन्य नाही. शाहीर संभाजी भगत त्यांचे गाणे आणि दिसणे दोन्हीने शोभून दिसले. त्यांना आणि गाण्याला चित्रपटात एकदम अचूक वापरले आहे.

मध्यंतराला जेव्हा सहजच तोंडी "कोण काय करू शकणार ह्या परिस्थितीत?" आले तेव्हा काही आशा नव्हती. पण शेवट आवडला. सृष्टाने दुष्टावर मात केली असे टिपिकल दाखवले असते तर चित्रपट एकदम सामान्य पातळीवर आला असता. आणि पूर्णपणे वास्तववादी दाखवून नैराश्यपूर्ण परिस्थितीत संपला असता तरी रुखरुख वाटली असती.

नक्कीच बघावा असा चित्रपट!

मला त्याचाच वाटला. मुळात आवाज दुसर्या कुणाचा असेल असा विचारच माझ्या मनात आला नाही. Happy

तसे तो चांगला मराठी बोलू शकतो. हे पहा.
https://www.youtube.com/watch?v=3YvZx33TNHw

टीना हल्ली बरंच सुधारलंय मराठी त्याचे. काही इंटरव्युज बघितले टीव्हीवर, हल्ली नागरिक निमित्याने. चांगलं बोलतो असं वाटलं.

मिलिम्न् सोमणला काय झालेय मराठी बोलायला? काल मराठी च्यानेलवर आला होता. तुमच्या आमच्या सारखाच शुद्ध मराठी बोलत होता. मधु सप्रे तर चक्क मराठी मध्यमा च्या शाळेत शिकली आहे. Wink

रॉहु, मिलिंद सोमण पूर्वी नाही एवढं चांगलं मराठी बोलायचा. बरंच इंग्लिश आणि मध्ये मराठी असं असायचं मुलाखतीत. पण आता खूप व्यवस्थित बोलतो.

>>>> मिलिंद सोमण पूर्वी नाही एवढं चांगलं मराठी बोलायचा. बरंच इंग्लिश आणि मध्ये मराठी असं असायचं मुलाखतीत. >>>> चित्रपटात लिहिलेले संवाद बोलायला हरकत नसावी. तसं पाहिल्यास आपलं मराठी (म्हणजे माझेतरी) कुठे इतके शुद्ध आहे. माझी तर हिंदी, इंग्लिश, मराठी अशी भेल असते!

टीना,
तुला Sacha Baron Cohen .. चा The Dictator मुव्ही कुठे मिळाला?

कधि पसून शोधते आहे मी.

शिरीन

चित्रपटात लिहिलेले संवाद बोलायला हरकत नसावी. त
>>

छे छे तो जरा हवा येऊ द्या कार्यक्रमात नागरिकच्या प्रमोशनसाठी आला होता. तिथे कुठले लिखित संवाद?
त्याच्या मॉडेलिंगचे किस्से सांगितले. डोइवरचे केस, दाढी मिशा पांढर्‍या झाल्या आहेत पण मूळ बॉडी स्विमिंग नॅशनल चॅम्पियन ची असल्याने अजूनही हँडसम दिसतोच. ह्या माणसावर जळतोच आपण. काय फिटनेस आहे. दुसरा तो ग्रेगरी प्याक. तिसरा तो लगानमधला इंग्लिश व्हिलन रसेल की काय तो. एक्दम छ्डीसारखा शिडशिडीत....

"सिकंदर" - काश्मीरमधील दहशतवादी वातावरण आणि शाळकरी मुलांवर होऊ शकणारा परिणाम अशा प्रकारच्या कथेवरचा सिनेमा. सगळ्यात पहिलं यातलं काश्मीरचं चित्रीकरण (कुठे घेतलंय माहित नाही) प्रचंड आवडलं. १४ वर्षांच्या काका-काकुकडे वाढणार्^या सिकंदरला त्याच्या शाळेला जायच्या रस्त्यावर एक बंदुक सापडते. त्याला शाळेत फुटबॉल खेळताना त्रास देणार्‍या मुलांना दहशत बसावी म्हणून कामाला येईल या उद्देशान तो ती उचलतो. त्याची मैत्रीण नसरीन त्याने या सगळ्यापासून दूर राहावं म्हणून त्याला सांगुन पाहते. या बंदुकीच्या निमित्ताने सिकंदर एका दहशतवाद्याच्या संपर्कात येतो आणि नकळत एका प्लानमध्ये ओढला जातो. यातली वध करणारी प्रत्येक गोळी आपल्याला धक्का देऊन जाते. शेवट थोडा ड्रामाटिक आहे पण बहुतेक अशा कथांना असे शेवट करणं हा एक ट्रेंड आहे बहुतेक प्रेक्षकांवर जास्त इंपॅक्ट व्हावा यासाठीचं तंत्र असावं. माधवनचा आर्मी ऑफीसर आणि संजय सुरीचा राजकारणी आवडला. हे जर अशा प्रकारे काश्मीरमध्ये होत असेल तर हा चित्रपट आपल्याला अंतर्मुख करतो आणि डिप्रेसिंग देखील. दोन्ही पार्टीचे दोष सैन्य आणि दहशतवादी दाखवले आहेत. सरळ सरळ कुणाची बाजू घेतली नाही आहे हे चांगलं आहे. शंकर-एहसान-लॉयचं संगीत चांगलं आहे. "गुलों में" गाणं रेंगाळतं. आणि या चित्रपटात जी नदी दाखवली आहे तिचं अस्तित्व या सिनेमासाठी पूरक वाटतं.

नेटफ्लिक्सवर मागच्या आठवड्यापर्यंत होता आता आहे का माहित नाही. पण अशा पार्श्वभूमीचे चित्रपट आवडत असल्यास एकदा पाहायला हवा.

ओह.. नाही अ‍ॅक्च्युअली मी ऐकलय कि त्याला मराठी जमत नाही .. तो जरी मराठी असला तरी अब्रॉड राहुन तिथे शिकुन आणि प्लस बॉली इंडस्ट्री मधे असल्यान त्याच्यावर एवढे मराठी संस्कार नाही झालेत.. खखोदेजा.. बट आय तो लाईक हिम.. कॅप्टन व्योम पासुनच.. .

शिरीन , omg तु अजुनही शोधतेयस म्हणाजे काय ?
मला माझ्या दादाने दिला.. पण तु तो टोरंट थ्रु डाउनलोड करु शकतेस ना.. आरामात मिळेल तुला त्यावर..
किंवा ऑनलाईन विकत सुद्धा घेऊ शकतेस.. मस्ट वॉच आहे शिरीन .. सच मे.. निव्वळ निखळ मनोरंजन ..
Sacha Baron Cohen rocks in that movie..

..

..

टीना, मैभी fan हु मिलिंद सोमणकी. खरं त्याचा जन्म abroadला झालाय. तू बघ आता त्याच्या मुलाखती मराठीतून, फार प्रगती आहे. मस्त बोलतो आता.

चला हवा येउद्या मधेही छान बोलला आणि लास्ट वीक बऱ्याच मराठी न्यूज channelवर नागरिक निमित्याने मुलाखती होत्या. चांगलं बोलला मराठी.

ओह.. नाही अ‍ॅक्च्युअली मी ऐकलय कि त्याला मराठी जमत नाही .. तो जरी मराठी असला तरी अब्रॉड राहुन तिथे शिकुन आणि प्लस बॉली इंडस्ट्री मधे असल्यान त्याच्यावर एवढे मराठी संस्कार नाही झालेत.. खखोदेजा.. बट आय तो लाईक हिम.. कॅप्टन व्योम पासुनच.. >> या असल्या मराठीपेक्षा मिलिंद सोमणचं मराठी आधीपासून नक्कीच चांगलं आहे.

त्याला प्रत्यक्षात बघायच आहे एकदा अन्जू मला ..
तो सद्ध्या Ironman Competition साठी तयारी करतोय ना .. मज्जा .

रॉबीनहूड >> +१ खरच.. . फिट अ‍ॅण्ड फाईन .. हॉली चे खुप सारे अ‍ॅक्टर आहेत असे.. माझी तर लिस्टच संपत नाही करायला गेली तर Proud

नंदिनी >> Lol .. चिल्लर पार्टी मधला डॉयलॉग आहे तो .. तो नक्की कुठ जन्मला आणि शिकला माहिती नव्हत म्हणून परदेश लिहिण्याऐवजी अब्रॉड लिहिलं . प्लस च्या ऐवजी अधिक शब्द रुचला नाही मला .. Happy

टीना,
netflix वरूऩ काढून टाक्लाय म्हणून शोधते आहे
तूनळी वर पण होता पण अता नाहिये.

नागरीक बघितला काल. अजिबात म्हणजे अजिबातच आवडला नाही. स्टार कास्ट बघूनच गेलो होतो पण पदरात निराशाच पडली. दिग्दर्शन अजिबातच आवडले नाही आणि जर इतरांना जर ते उत्तम वैगरे वाटत असेल (पेपरातला रिव्ह्यु) तर मला दिग्दर्शन वैगरे काहीच कळत नाही.
सचीन खेडेकर अजिबात धडाडीचा पत्रकार वैगरे वाटत नाही, थोडक्यात तो पत्रकारच वाटत नाहे. त्याची बॉडी लॅन्ग्वेज अजिबात आवडली नाही. श्रिराम लागूं जेव्हा जेव्हा स्क्रीन वर आले तेव्हा त्यांना अजिबात च बघवले नाही.
क्लोझ अप्स अन्गावर येत होते. सगळ्यांचे किडलेले दात स्पष्ट दिसत होते ..एकदम यक्क वाटले.
आताच्या काळातील सिं हासन असा रीव्यु वाचून गेलो होतो, पण सिंहासन बाप मूव्ही आहे. त्याच्या बरोबर तुलना न केलेलीच बरी. इव्हन सरकार नामा पण छान होता.
मिलिन्द सोमण चा वावर खूप कॉन्फिडन्ट वाटला. तो पत्रकाराच्या भुमिकेत हवा होता. बरेचदा केके मेनन चा भास होतो त्याला पहाताना.
यापुढे सचिन खेडेकर चा एकही मूव्ही पहायचा नाही हे ठरवूनच बाहेर पडलो.

मराठीच वाक्ये, मराठी वाक्यरचना वेगळ्या तालाने, लयीने म्हणणे हे अश्या बाकी सगळे शब्द इंग्रजी आणि जेमतेम क्रियापद मराठी अश्या प्रकारच्या मराठी बोलण्यापेक्षा बरे.

उदा. मी खूप बेटर फिल केलं. शी! काय आहे हे? मला बरं वाटतंय म्हणता येत नाही का सरळ?

Happy दुस-यावर टीका करताना नकळत आपणही तेच टीकास्पद वर्तन करत नाही आहोत ना इतकी काळजी घेतली जावी ही अपेक्षा असेल तर त्याला शिकवणी म्हणायचे का?

साधना.. सोड या आयडिला नेहमीच प्रॉब्लेम असतो माझ्याबद्दल.>>>>> रीअली??? हु आर यु? हे कसं काय वाटलं तुम्हाला? तुमच्याबद्दल प्रोब्लेम होण्यासाठी मी तुम्हाला ओळखत नाही आणि मला तशी गरजही वाटत नाही. दुसर्‍याला आपल्यबद्दल काही प्रोब्लेम आहे असं सतत वाटतय का ते तपासुन बघा.

Pages