"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन सीझन सुरु झाल्यावर पुन्हा इथे गर्दी होईल असे वाटत होते. मीच सुरु करतो. पाच एपिसोड पाहिले नेटवर. किती झालेत प्रत्यक्षात?
एमिलिया क्लार्कचा अभिनय आवडतोच, या सीझनमध्येही छानच! ब्रॉन (जेरॉम फ्लीन : टिरिअनचा 'माणूस') पण खूप आवडतो. त्याचे वन लायनर भारी असतात. पुस्तकात आहेत तशीच्या तशी उतरलेली कॅरॅक्टर्स म्हणजे सर्सी, टिरिअन, ब्रॉन, बेलिश आणि जॉन स्नो. डनेरीस (उच्चार चु.भू. दे. घे.), आर्या आणि 'हाऊंड' मात्र पुस्तकाहून मालिकेत सरस वठले आहेत असे वै.म.

मी पुस्तक वाचतोय. एकेक पुस्तक ८-९०० पानांचे आहे. तीन झालेत. ऑस्सम इज दाय नेम!

पाचवा सिझन सुरू झाला. पण मी नाही पाहणार. पुस्तक पूर्ण करतो आधी.

पाचवा सिझन पण मस्त चाललाय..... पहिले ४ भाग पाहून झाले, पुढच्यासाठी धीर धरवत नाही अशी अवस्था Lol
पुस्तकं मी पण अशीच एकदा चालू केल्यावर नॉनस्टॉप वाचली. मस्तच लिहिली आहेत.

रार , पाचव्या सिजन मधले फक्त पहिले २ भागच पाहता आले (जे मिळाले त्याची॑ क्वालिटी फारच खराब आहे) पूढचे कोठे मिळतिल?.. .. टोरन्ट धागा मिळेल काय?

पुस्तके अजून वाचली नाहीत. वाचायला घेतलं ते बाजूला पडलंय. पण सिरीयल अत्यंत भक्तीभावाने बघत आहे.

चारुदत्त , सॉरी उशीर झाला उत्तर द्यायला..आत्ता पाहिला धागा.
तुम्ही अमेरिकेत असाल तर http://www.couchtuner.eu/tv-lists/ इथे तुम्हाला नवीन सिझन पहायला मिळेल.
भारतात किंवा इतर देशात ही लिंक चालते का नाही माहित नाही.

मराठीमधली स्टारकास्ट कमालीची विनोदी आहे... अशक्य हसतीये मी Lol

...

गेल्या एक-सव्वा महिन्यात झपाटल्यासारखे सगळे ४४ एपिसोड्स पाहिले, जबरी प्रकार आहे!
प्रत्येक पात्र अत्यंत व्यामिश्र, प्रत्येकाची एक ग्रे शेड आणि तशीच हळवी बाजू देखील. कोणते एक पात्र आवडते ठरवणेच अवघड आहे.
आणि अभिनय तर एकापेक्षा एक लाजवाब, प्रत्येक एपिसोडमध्ये कोणी ना कोणी अफलातून काम करुन गेला आहे. तरीही ट्रायलच्या वेळेचा टिरीयनचा जन्मभर साचलेला विखार बाहेर येतो तो प्रसंग सर्वोत्तम वाटला.

आगाऊ सिरीयलपेक्षा पुस्तके वाच, त्यात अधिक डीटेल्स आहेत. रैनाला वाचायला भाग पाडले ह्यावरून काय ते समज Wink

पाचवे पुस्तक नुकतेच वाचून संपवलंय. आधीचे सीझन पाहिले होते म्हणून आता पुढच्या सीझनची वाट पाहत आहेच. पण त्यादरम्यान १० फेब पासून स्टार वर्ल्ड वर सीझन वन पासून दाखवणार आहेत. सोम ते शुक्र दहा वाजता.

ज्यांनी आधी कधीही पाहिलेले नाहीत त्यांनी अवश्य बघा. अशक्य सीरीज आहे. ज्यांनी आधीचे सीझन पाहिलेत त्या़ंना रीपीट करायचा सांगायचे काही आवश्यकताच नाही Wink

जॉन स्नोला जिवंत करा ब्वा
पाहिजे तर एकता कपूरचा रायटर उधार घेऊन जा काही एपिसोडसाठी

सिरीज नि पुस्तके आता वेगवेगळ्या मार्गाला लागलेले आहेत त्यामूळे दोन्हीही फॉलो करायला हरकत नसावी.

जॉन स्नोला जिवंत करा ब्वा
पाहिजे तर एकता कपूरचा रायटर उधार घेऊन जा काही एपिसोडसाठी हाहाहाहः

जॉन स्नो मेला असे का गृहित धरत आहात तुम्ही लोकं?

पुस्तकात अजून तो "सिन" झालेला नाही. पण पुस्तकात जे एक पात्र " किस ऑफ डेथ" देऊन मेलेल्याला परत जिंवत करत असते. त्याच्याकडे ज्या पॉवर्स आहेत, त्याच मेलिसान्ड्रेकडे आहेत. आणि जॉनला जेंव्हा ते लोकं मारतात तेंव्हा मेलिसान्ड्रे नुकतीच (अचानक ! ) परत आलेली दाखवली आहे. थोडक्यात ती परत त्याला जिंवत करते.

१. जॉन मरणं कठिण आहे कारण तो देखील "टार्गारियन" असू शकतो. ( लायेना स्टार्क (नेडची बहिण) आणि रेघार टार्गारियनचा मुलगा) आणि नेड फक्त कव्हरअप म्हणून त्याचा पिता असू शकतो. जर तो टार्गारियन असेल तर मग तीन पैकी एका ड्रॅगनला शेवटच्या युद्धात तो हाकेल.

२. जॉन मरणं कठिण आहे कारण मेलिसान्ड्रे जिंवत करेल आणि त्यालाच फक्त त्या "ग्लास" चे रहस्य कळाले आहे. ( आठवा त्याचे शेवटचे युद्ध, ज्यात त्याच्या तलवारीने व्हॉईट वॉकर्स मेले. ) त्यामुळे तो युद्धात (वॉल वरून ) असणार.

३. जॉन वॉलशी बांधील आहे. वॉल फक्त मेल्यावर सोडता येते. जॉन स्नो ऑलमोस्ट मेला आहे. त्यामुळे आता ( परत जिंवत झाल्यावर) तो वॉलशी बांधील नसणार आणि मेन लॅन्ड मध्ये युद्ध करायला तो डनेरिस सोबत जाऊ शकतो.

४. तो वॉर्ग आहे. त्यामुळे तो "घोस्ट" मध्ये परावर्तीत होऊ शकतो.

एकंदरीत काय जॉन स्नो मरणे कठिण आहे.

पुस्तक आणि सिरियल ह्यांचा संबंध चौथ्याभागानंतर ऑलमोस्ट संपला आहे. आता दोन्ही वेगवेगळे चालू आहेत. जे पुस्तकात आहे ते सिरियल मध्ये नाही. आणि सिरियल मध्ये जे दाखवत आहेत, त्याचा पुस्तकाशी काहीही संबंध नाही.

सहाव्या सीझनचे काही फोटोज् नुकतेच एच बी ओ ने रिलीज केलेत.

कोणी कोणी बघितलेत?

कमाल मजा येणारे असा अंदाज आहे, बघुयात!

माझ्या वॉलवर शेअर केले होते मी फोटो.
त्यातली एकावर भारी कमेंट होती. आर्या स्टार्कच्या फोटोवर कुणीतरी शी इज नोवन लिहिलं होतं त्यावर कुणीतरी "इट्स मी" अशी कमेंट टाकली होती!!!

गेले दोन दिवस सीझन १ पाहतेय.

तो वॉर्ग आहे. त्यामुळे तो "घोस्ट" मध्ये परावर्तीत होऊ शकतो..>>> हे जास्त शक्य आहे.

मी बघायला घेतली पण त्यातली न्युडीटी वगैरे बघुन जीवावर आलं आणि पुढं पुढं करत पहिला सिझन बघुन सोडून दिलं..

आता परत म्हटलं मन लावुन बघुया.
परत पहिल्या सिझन पासुन सुरुवात केलीये..दुसरा संपवण्यावर आहे..
टिरीअन सॉल्लीड्ड आहे हं.. मेको आवडा.. पीटर डींकलेज के तो भाग खुल गये.. हि डिड अ ग्रेट जॉब..
डेनेरिस सुद्धा ठिके..
पहिल्या सिझन मधे शेवटी Sean Bean ला मारुन टाकल्यावर अस्सा राग आलेला मला... तो असल्यामुळे परत मन लावुन बघितली आणि त्यालाच कापुन टाकला..श्या.. असो बघतेय..
पुस्तक सुद्धा वाचायची आहे..

जॉन स्नोला जिवंत करा ब्वा
पाहिजे तर एकता कपूरचा रायटर उधार घेऊन जा काही एपिसोडसाठी >> अमेय Lol
त्याच्यावर सिझन संपवल्यामूळे खुपच हुरहुर लागुन राहिलीए Sad .. तरी मी आत्ता ५वा सिझन संपवला.. ज्यांनि वर्षभरापूर्वी संपवला त्यांची हुरहुर तर सोडुनच द्या Proud

केदार..जियो.. कारणे भारी आहे..

तो वॉर्ग आहे. त्यामुळे तो "घोस्ट" मध्ये परावर्तीत होऊ शकतो. >> तो वॉर्ग आहे हे ठळक कुठ दाखवलयं ? माईंड गेम खेळताना नै न दाखवला ब्रॅन सारखा.. घोस्ट त्याचा पेट असल्यामूळे तो त्याच ऐकतो ना..

बाकी केटलिन आणि रॉब मरतो तेव्हा पन बेकार वाटल मला Sad
हे लोक सगळे मेन कॅरेक्टर मारुन टाकतात बा.. तरी बर टिरियन आहे अजुन..

जोराह ला जेव्हा तो स्टोनमॅन स्पर्श करतो तेव्हा त्याची तेवढीच त्वचा खराब होते,.. मला वाटल होत कि तो वाढत जाणारा रोग आहे.. आणि स्टॅनिस च्या मुलीच्या चेहर्‍याला सुद्धा तेच झाल होतं हे नव्यानच कळलं..

बाकी ६व्या सिझन चा आणि मार्टिन च्या बुक्स चा काही संबध नसेल अस वाचलं.. यात तो नवे एपिसोड्स लिहिणार सुद्धा नाही म्हणे..

Pages