अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समुचित ची सगळीच उत्पादने मस्त आणि स्वस्त आहेत.

माझ्याकडे सराई कूकर आहे. नियमित पणे वापरला जात नाहीये पण २-३ वेळा ट्रेकला बरोबर नेला असताना उपयोगी पडला होता ट्रेक मधे वागवायला जरा बोजड आहे पण सहलींकरता मस्तच आहे. अर्थात मी पुण्यातच असल्याने त्यांच्याकडून कांडीकोळसा घेणे सहज जमले होते. तो पण असा २० रु किलो वगैरे भावात मिळाला होता.
आणि १०० ग्रॅम मधे ३ मोठ्या पुडातल्या गोष्टी शिजून निघतात.

मला त्यांच्याकडे मिट्टीकूल उत्पादने देखिल घ्यायची आहेत.

पाण्यासाठी तांब्या भांडे द्यायची पद्धत अगदी छान. आमच्या घरी पाण्याची बाटली आणि ग्लास देतात. मुंबईला शक्यतो पाणी प्यावेच लागते, म्हणून न विचारता देतो.

मस्कतला हॉटेलमधे ताकासाठी पण अशीच पद्धत वापरतात. तिथल्या उन्हाळ्यात ताक पिणे चांगले वाटते.

...

काही हॉटेलमधे सढळ हाताने पदार्थ वाढायची पद्धत आहे. समृद्धीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात ( कोल्हापूर, बेळगावी वगैरे ) असे करताना मला आढळले होते. वेटरपण सुचना देतीलच असे नाही.

मी टीव्हीवर काही कार्यक्रमात, खास करून अमेरिकेतील हॉटेलात बर्गर वगैरेचा आकार अतिप्रचंड असा बघितलाय. तेवढे खाणे खरेच गरजेचे आहे का ? ते खाऊन माणसे अवाजवी लठ्ठ झालेली असतात.

न्यू यॉर्क . न्यू यॉर्क पुस्तकात, लेखिका मीना प्रभुंनी जी सॉल्ट बीफची क्वांटीटी लिहीलिय ती भयानक आहे.

कोळसाकांडी घेणे हा एक प्रॉब्लेम आहे म्हणुन मी कधीच सराई कुकरचा विचार केला नाही. अपार्टमेंटमधेही बाल्कनीत ठेवुन वापरण्याजोगा आहे म्हणे तो. रोजचा वरणभात त्यावर होऊ शकेल असे वाटते.

काही हॉटेलमधे सढळ हाताने पदार्थ वाढायची पद्धत आहे. >> ह्यावरून आठवले की पुण्यामधील टिळक रोड वरच्या दुर्वांकुरमध्ये संपूर्ण थाळी संपविल्यास २० रुपये डीस्काउंट मिळतो. मला ही संकल्पना खूप आवडली. सगळ्या रेस्टॉरंट्सनी अशी संकल्पना राबविली तर खूप कमी अन्न वाया जाईल

सोलर वॉटर हीटरचाही पर्याय मस्त आहे. इथे त्याकरता सरकार सब्सिडी देतं. मागच्या वर्षी घरी बसवला आहे. २०० लिटर सणसणीत गरम पाणी नेहेमी तयार असतं.

हल्ली एक निरीक्षण आहे की पुण्यातल्या हॉटेलांमध्ये ग्लासातले पाणी संपले तर मागितल्याशिवाय बळंच ओतत नाहीत. नाहीतर पूर्वी बिलाची वाट बघत असतानाही काठोकाठ ग्लास भरत जायचे. चांगला बदल!
परवा सुप्रीमची पावभाजी खाल्ली तर तिथे प्लेटमध्ये बटर पेपर टाकून त्यातच भाजी व पाव दिलेले. पहिल्यांदा विचित्र वाटले पण त्यामुळे डिश साफ करायला कमी पाणी व वेळ लागत असेल असे वाटले. शिवाय दरवेळी नवा पेपर त्यामुळे डिश पुन्हा पेपरने पुसत बसायची गरज नाही. असाच पेपर गाडीवर मिळणारे सँडविच, दाबेली वगैरेसाठी वापरतात. पण यामुळे वापरल्या जाणार्या बटर पेपरचे वाढते प्रमाण ही समस्या जास्त घातक असेल का पर्यावरणाला?

>>ड्रायिंग रॅक वापरणे जास्तीत जास्त कपडे वाळवायला. स्वेटर, फ्लिसचे कपडे आरामात बाहेर मस्त वाळतात.
आमचं ह**ट HOA कपडे बाहेर वाळवू देत नाही.
>>मृण्मयी घरातच ड्राईंग रॅक ठेवतो, बाहेर नाही.
http://www.ikea.com/us/en/catalog/categories/departments/laundry/20597/ हिअशी

शिवाय दरवेळी नवा पेपर त्यामुळे डिश पुन्हा पेपरने पुसत बसायची गरज नाही. >>>>> दरवेळी नवा पेपर वापरणे हे पर्यावरणस्नेही कसं ? म्हणजे एकतर पाणी नासा किंवा कागद. ह्यातलं काय चांगलं हे कसं ठरवायचं ?

अमेरिकेतील हॉटेलात बर्गर वगैरेचा आकार अतिप्रचंड असा बघितलाय. तेवढे खाणे खरेच गरजेचे आहे का ? >>>> हो, इथे बर्‍याच रेस्टॉरंटात पोर्शन्स प्रचंड असतात. आम्ही तरी अश्या ठिकाणी गेलो तर डीश शेअर करतो. अर्थात असं करणंही सगळ्यांना पटत नाही. डीश शेअरींग करणं म्हणजे कसा कंजुसपणा आहे वगैरे कमेंट्स इथे मायबोलीवरच मागे आलेल्या आहेत. पण अन्न वाया घालवण्यापेक्षा किंवा उगीच अतिखाण्यापेक्षा शेअर करणं बरं.

प्रीति, असे ड्राईंग रॅक स्वतःच घर आणि सनरूम वगैरे असेल तरच उपयोगी असतील ना? अपार्टमेंटमध्ये तेव्हडे इफेक्टीव्ह असतात का?

आम्ही तर बेडरुम मध्ये रॅक ठेवले आहेत. हिवाळ्यात संध्याकाळी कपडे धुतो. रात्री नॅचरल ह्युमिडिटी मिळते आणि हुय्मिडिफायर लावावा लागत नाही.

इथे नेमकं अपेक्षित आहे ? मथळ्याचा आणि (को) बॉडीचा आणि प्रतिसादांचा काय संबंध आहे हे कळालेलं नाही.

तेच ना पराग, तोच प्रश्न पडलाय मलाही. यावरचं समजुतीचं उत्तर (वाईट आहे तरीही,) म्हणजे पाणीटंचाई होऊ शकते, अनुभवली आहे. कागदटंचाई अजून तरी पाहिली नाही,हे कागद रिसायकल्ड आणि रिसायकलेबल असतात (बहुधा) म्हrणून पाणी जास्त मोलाचं.
शेअरिंग करण्यात काय वाईट असतं हे ही समजलेलं नाही. त्या दोघांना चालत असेल तर बाकीच्यांना काय अडचण आहे? इथेही याना, कोबे मध्ये शेअरिंग चालत नाही म्हणून आजवर गेलो नाही. एवढी क्वांटिटी खाणं अशक्य आहे आणि क्वांटिटी कमी मागून फुकट पैसे देणं अतर्क्य.

बरेच छान काय काय वाचायला मिळाले.

शीर्षक 'पर्यावरणप्रेमी जीवनशैलीने जगणे' असे असावे असे वाटले.

'भौगोलिक नैसर्गीक सुबत्ता' अ‍ॅज टू 'त्या भौगोलिक प्रदेशातील लोकसंख्या', हा रेशिओ एका आदर्श पातळीच्या आसपास मेन्टेन होऊ शकला तर पर्यावरण-र्‍हासाचा ताण कमी होईल असे वाटते. 'थेंबे थेंबे तळे साचे' ह्या उक्तीनुसार बहुतेकजण आपापला सहभाग देत असतात, देत आहेत, असे प्रतिसाद वाचल्यावर सहज जाणवेलच. 'माझं काय जातंय' ही वृत्ती जिथे बोकाळलेली आहे तिथे राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणे हे एक आव्हान आहे.

अवांतर - मध्यंतरी पेपरमध्ये आकडेवारी आली होती. विकसित देश भारताकडून काही विशिष्ट पिके, मांस आयात करतात. असे करण्यामागे स्वतःच्या देशातील पाणी वाचावे हा उद्देश असतो असे लिहिलेले होते. त्या कमोडिटिज तिकडे निर्यात करणे ही भारतासारख्या देशांची (आर्थिक कारणांसाठी) विवशता असू शकेल. ते ओव्हरनाईट थांबवता येणार नाही.

पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याची सर्वाधिक झळ जगातील कोणत्या भागाला पोचत आहे ह्याबाबत काही अधिक समजू शकेल का?

माझे 2_paise.jpg

फूड व्हॅन/कार्टवर कागद वापरलेला जास्त इकोफ्रेंडली की पाणी? हा बेसिकमधे गंडलेला प्रश्न आहे.

इथे खाद्यपदार्थाची स्वच्छता जास्त महत्वाची आहे. पाणी/कागदाची बचत करून अस्वच्छ प्लेटमधे खाणे मिळाले तर तब्येत बिघडेल. ती सर्वात जास्त महत्वाची. बाकीच्या इकोसिस्टिमसोबत आपणही निरोगी जगणे आवश्यक आहे.

त्यामुळे, रस्त्यावर उभ्या गाडीत, किंवा हॉटेलातही प्लेट्स धुण्यासाठी वाहते पाणी, मोरी इ. सोय चांगल्या दर्जाची असेल का? बहुतेकदा त्या प्लेट्स एकाद्या बादलीभर पाण्यात रिपिटेडली हरहर गंगे भागिरथी करत डुबक्या मारून समोर येत असतात. त्यामुळे त्यावर अंथरलेला कागद हा नक्कीच जास्त 'इगोफ्रेंडली' म्हणावा लागेल.

हा हा इब्लिस, ते तर अध्याहृतच आहे की. ज्याला स्वार्थ नीट समजतो तोच परमार्थ नीट करू शकतो असे आमचे नेमाडे गुरूजी म्हणतातच. आंघोळ न करणे हा पाणीबचतीचा मोठा मार्ग असला तरी रोज कुणी तो अवलंबत नाही. या दोन पैशांमुळे वरची सगळी चर्चा एकदमच चाराणे झाली. Proud

पाणी/कागदाची बचत करून अस्वच्छ प्लेटमधे खाणे मिळाले तर तब्येत बिघडेल. >>>> प्लेट अस्वच्छ असते / असावी असं म्हणणं नाहीच आहे. ती स्वच्छ करण्याच्या उपायांबद्दल चालू आहे.
असो. मुद्द्याचे दोन पैसे टाका. भलताच कीस नको. Happy

प्रश्न प्लेटवर कागद हवा की नको हा होता.

"सुप्रीमची पावभाजी" भारतातली असावी असा अंदाज आहे.

ती अमेरिकेतली असेल तर कदाचीत प्लेट स्टरिलाईज करून येत असेल. मग तो कागद रिडण्डंट आहे.
तरीही,

पोट नीट ठेवणे ही पहिली प्रायॉरिटी हवीच.

तुमची तशी प्रायॉरिटी नसेल, तर मला अन माझ्या व्यवसायबंधूंना आपल्याबद्दल प्रचण्ड आत्मियता वाटेल Wink

>>>अध्यारूत<<<?

हे जरा अधिकच अवांतर आहे ह्याची जाणीव आहे, पण हा शब्द असा लिहिला जातो का? मला फार टेन्शन यायचे हा शब्द लिहिताना! मला काहीतरी अध्याहृत वगैरे लिहावेसे वाटायचे. Proud

सॉरी, चर्चा सुरू राहो. Happy

दुरूस्त केले आहे धन्यवाद.
सुप्रीम पुण्यात आहे. पुन्हा एकदा, निरोगी असणं, स्वच्छता पाहणं हे बेसिक आहे जे गृहीतक मानून चर्चा चालू आहे. इथल्या पोस्टवरून कोणत्याही व्यवसाय बंधूंनी इतरांची प्रायॉरिटी काय असेल याचे दिव्य अंदाज जाहीर वर्तवू नयेत.

लोकांच्या पोस्टीला कीस म्हटलं की तसे अंदाज येतात. धन्यवाद.

शिवाय, ती पोस्ट पराग यांचेसाठी होती. ते प्लेटीवरले कागद, हे विपुत लिहिलेले नसल्याने, तुम्हा दोघांतले खासगी संभाषण असेल, अशी कल्पना नव्हती, म्हणून मधे बोललो होतो. तस्मात, तुमच्या 'व्यवसायबंधूंनी प्रायॉरिटी' इ. सल्ल्याचा योग्य तो 'आदर' करण्यात आलेला आहे, असे जाहीर करतो.

पुन्हा एकदा, धन्यवाद.

शिवाय दरवेळी नवा पेपर त्यामुळे डिश पुन्हा पेपरने पुसत बसायची गरज नाही.<< चेन्नईमध्ये बटर पेपर ऐवजी केळीचे पान वापरतात. अगदी रोडसाईड टपरीपासून ते एकदम पॉश हॉटेल्समध्ये देखील प्लेटमध्ये केळीचे पान ठेवलेले असते. लग्नाच्या वगैरे जेवणावळी केळीच्याच पानावर असतात. घरी जेवायला पाचपेक्षा जास्त माणसं असतील तर बहुतेकदा केळीच्या पानांत वाढतात बफे असेल तरी प्लेटमध्ये गोल कापलेले केळीचे पान ठेवलेलेच असते. मला ही पद्धत फार आवडते.

बर्‍याच छान आईडीयाज मिळाल्या पर्यावरण आणि पैसे दोन्ही वाचवण्यासाठी. जवळ जवळ ७०% गो ष्टी केल्या जातात. % अजुन वाढवेन.
मी हायब्रीड गाडी वापरते Happy

ह्याच विषयावर पण थोडं वेगळं ऑबझरवेशन / कन्सर्न शेयर करावसं वाटतंय -
आपली जनरेशन ( खास करून भारतीय लोकांची) कितीही नाही म्हणलं तरी भारतासारख्या 'जास्त लोकसंख्या, कमी रीसोअर्सेस, इनफ्रास्ट्रक्चर फारसे नसणे' ह्या वातावरणात/ सवयीतून वाढलेली आहे. आज आपण जगभरात कुठेही असलो, कितीही प्रगत/ सुबत्ता असलेल्या परिस्थीतीत असलो तरी परिस्थीतीची दुसरी बाजू आपल्यापैकी बहुतेकांनी बघितलेली आहे, अनेकांनी अनुभवली देखील आहे.
पण आपली पुढच्या पीढी (खास करुन अमेरीकेतील) एका अर्थी 'तोंडात सोन्याचा चमचा धरूनच जन्माला आली आहे'. त्यांनी ना कधी दुसरी परिस्थीती पाहिली आहे/अनुभवली आहे. त्यामुळे ' गरजा कमी का ठेवायच्या? रीसोअर्सेस का वाचवायचे?' ह्याबद्द्ल त्यांनी काही पाहिलं नाही, अनुभवलं नाही.
इथल्या शाळांमधे ह्या विषयावर खूप बोललं जातं, प्रोजेक्टस असतात, अवेअर्नेस वाढवण्यासाठी ह्याविषयी खूप सांगीतलं जातं, पण ते केवळ एक प्रोजेक्ट म्हणूनच राहतं , की मुलं प्रत्यक्ष आचरणातही आणातात? ह्याबद्दल मला कधी कधी संभ्रम वाटतो.
नुकतीच घडलेली गोष्ट - माझ्या मैत्रीणीचा १० वर्षाचा लहान मुलगा मला चित्र काढून दाखवत होता. फार इंटरेंस्टींग चित्र होतं ते- 'कापलेलं झाड रडतं आहे, त्याला डोळे काढून त्यात अश्रू आहेत असं'.... मग तो मला 'ग्लोबल वॉर्मींग, झाडं कशी कापली नाही पाहिजेत ' वगैरे सांगत होता. गंमत म्हणजे हे करताना - त्याच्या मनासारखं चित्र येईपर्यंत तो दरवेळी 'प्रींटरपाशी जाऊन नवीन कोरा कागद घेऊन येत होता... त्यावर लहानसं चिमुकलं चित्र काढलं, जमलं नाही - परत गेला - नवीन कागद - परत कोपर्‍यात एक चिमुकलं चित्र - परत जमलं नाही - परत कागद ' ... असं करत करत त्यानं ' झाडं रडताहेत त्यांना कापल्यामुळे ' हे चित्र काढताना ८-१० कोरे कागद वापरले आणि टाकून दिले... !
मी सॉलीड विचारात पडलीये त्या घटनेनंतर ..... कारण कितीही नाही म्हणलं तरी आपल्या निम्म्या गोवर्‍या स्मशानात गेल्यात आता (इलेट्रीक भट्टीमधे म्हणायला पाहिजे खरं तर !), पण रीसोअर्सेस जपण्याची गरज ह्या पुढच्या जनरेशला जास्त आहे, आणी त्याबद्दल त्यांना कितपत गांभीर्यानं जाणीव करुन दिली जाते? ह्याबद्दल मला शंका आहे .

पेपरऐवजी केळीचे पान वापरल्याने काय होतेय.. केळीच्या पानांचा तुटवडाच होणार ना कधीतरी?

रार खरय तुझं म्हणणं. पेपर वापराबद्दल आम्ही नेहमीच बोलत असतो म्हणजे मुलाशी, की पेपर झाडापासून बनतो, उगाच गरज नसताना पेपर वाया घालऊ नको, तो कधीच न विचारता प्रिंटर पेपर वापरत नाही, शाळेतून जे असंख्य पेपर घरी येतात, बहुतेक सगळे पाठकोरे असतात, त्यातले नको असलेले आम्ही दोघे मिळुन वेगळे काढतो जे तो वापरत असतो, वीजेच्या वपरबद्दल पण सतत सांगून सांगून नको तिथले दिवे, पंखे तो बंद करतो पण सारखी आठवण करावी लागते, पेशन्स चं काम आहे Happy

पण फरक पडतोय, मला वाटतं मुलं आपलं बघून थोडं तरी शिकतात. पण मुळात टंचाई माहीतच नाही या मुलांना, गरीबी पाहिलीच नाहिये या मुलांनी

आत्ता सुद्धा इथे दुष्काळ वगेरे चालू आहे पण या मुलांना नळाला पाणी न येणं वगेरे माहीतच नाही.

>>>फर्नेस आणि AC चा thermostat प्रोग्रॅम करून आपण ज्यावेळी घरी असू तेंव्हाच ते चालू होतील ते बघतो.<<<<

हा उपाय म्हणून कसा काय लागू होतो? थंडीच्या दिवसात हिटर बंद करून केल्याने पाईप फुटल्याची अनेक उदाहरणं पाहिलीत.
नको तिथे उगाच कंजूषी करून उलट खर्चात पाडणारे आणि हानी करणारे लोकं व उपाय पाहिलेत.

केळीचे पान पर्यावरणस्नेही?

जावु दे... कैच्याकै आहे.

केळीचा मौसम ओसरल्यावर केळीची पान तोडुन टाकतात, तेच वापरले तर ते पर्यावरणस्नेहीच होईल ना ? प्लस केळीच लाईफसायकल पण झाडांच्या लाईफसायकलच्या मानाने फास्ट असतं.

Pages