अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे ती लिंक सुमुक्ता, धन्यवाद.

जंगलतोडीमुळे eco-systems नष्ट होत आहेत. अनेक species extinct होत आहेत. नुसती हिरवळ महत्वाची नाही.>> मान्य आहे. पण सध्या तरी ही बाब फक्त एका देशापुरती मर्यादित आहे पण भविष्यात ही वेळ अनेक देशांवर येऊ नये.

जंगले ही अवाढव्य कार्बन अब्सोर्बर आहेत. जंगले तोडून शेकडो वर्षांचा साठलेला कार्बन आपण एका दणक्यात वातावरणात सोडतो (सडवून - मिथेन किंवा जाळून - कार्बन डाय ऑक्साईड).
फूड एमिशन्स साठी http://ccafs.cgiar.org/bigfacts/#theme=food-emissions ही लिन्क पहा.
असो. जरा धागा भरकटला.

उत्तम धागा

इथे पण विचार हाच असतो की माबोचे सर्वर फार जागा व्यापू नये>> अतिसुंदर विचार. नाहीतर काही लोक साधा रुमाल इ. तत्सम फुटकळ वस्तु आणण्याकरीता देखील भसाभसा धागे काढतात हो.
जरा काही वाटले गुगल मधे न शोधता लगेच धावतपळत मायबोलीवर येतात.

अमित तू लिहिलेल्या दोन मुद्द्यांचा विस्तार करून

१. झाडांना पाणी घालताना नळीला स्प्रे टाईप स्प्रिंकलर लावून हाताने घालतो. अगदीच स्प्रिंकलर लावायची वेळ आली तर न विसरता तो हलवतो आणि वेळेत बंद करायचा प्रयत्न करतो. >> स्प्रिंकलर असतील तर रेन मीटर असलेले घ्यावेत, त्यामूळे पाउस पडला तर तेही धरले जाते. नाहितरभर पावसामधे सुरू असणारे स्प्रिंकलर दिसतात. तसेच झाडांना वेगळे पाणी देण्यापेक्षा, ड्रिप ईरिगेशन असलेले पाईप वापरले तर पाण्याचा वापर अधिक कमी होतो. ते रेन वॉटर बॅरेल्स ला जोडण्याचा धाडसी प्रयत्न मी केला होता पण तो नीट जमला नाही.

२. लाईट बंद करणे मी विसरतो, ते सुधारायला activity सेन्सर वाले स्वीच आणायचा विचार आहे. >> बाथ्रुमसारख्या जागी जिथे आपण मोजका वेळ घालवतो तिथे मोशन अ‍ॅ़टीविटीवाले वापरण्यापेक्षा टायमरवाले स्विच अधिक उपयोगी पडतात.

३. जिथे शक्य होईल तिथे Advanced Power Strip वापरणे ज्या घोस्ट कंसम्प्शन थांबवू शकतात.

४. वारंवार कपडे (किंवा इतर गोष्टी) घेण्यापेक्षा आहेत त्याच अधिक वेळा वापरणे.

छान आणि माहितीपूर्ण चर्चा.

इथे नमुद केलेल्या बऱ्याच गोष्टी आम्ही गेली अनेक वर्ष करतोय (कागदाची बचत, शॉपिंग कपात, पिशव्या वाचवणे, इ.)

यात अजून एक सवय जी आम्ही गेली १०-१२ वर्ष पाळतोय आणि आमच्या घरात इतरांनाही लावतोय. ती म्हणजे जाऊ तिथे कचऱ्यासाठी स्वतासोबत एक पिशवी ठेवायची.
कुठे फिरायला गेलो (पिकनिक ट्रिप वगैरे) तर तिथे कचरा पेटी असेलच असे नाही, अश्या वेळी आपला कचरा एका पिशवित गोळा करायचा आणि मग कचरा पेटी दिसली की तिथे टकायचा, नाहीतर घरी आणून त्याची विल्हेवाट लावायची. ओल्या कचर्याची सोय घरी आहेच पण प्लास्टिक वगरे वापरायचे टाळतो. शाळेनंतर वाढदिवसाची 'पार्टी' करणे बंद केले. त्या ऐवजी अजुन अजुन झाड लावण, त्यांची निगा रखणे सुरु केले.

थोड़े अवांतर पण गेल्या वर्षी नॅशनल जेओग्राफिक मेगज़ीन ने अन्न आणि त्याच्या वर अवलंबलेली, वाढणारी मानवी भूक यावर एक लेख मालिका (द फ्युचर ऑफ़ फ़ूड http://food.nationalgeographic.com/ ) छापुन आणलेली. त्यात दोन्ही वेज आणि नॉन वेज खाणे, त्यामुळे फ़ूड प्रोडक्शन वर काय परिणाम होताहेत, जीएमओ, ओर्गेनिक आणि नॅचरल शेती, त्यात झालेले बदल आणि बरेच काही होते.

चहा/ कॉफी ढवळायला स्टरर न वापरता चमचा वापरतो. काहीही पिताना स्ट्रो न वापरता तोंडाला ग्लास लावतो. (हे स्ट्रो हलके असतात आणि उडून पाण्यात जातात आणि त्याने अनेक पाणपक्षी दरवर्षी मारतात असं वाचलेलं. )

जाता-येता दिवे बंद करणे, पाणी कमी वापरणे या सवयी मला वाटतं बहुतेक जणांना अगदी सेकंड नेचर म्हणावं इतक्या लागलेल्या आहेत.

इथे अनेकांच्या पोस्टींमध्ये आलेल्या बर्‍याच गोष्टी करते. पण तरी अनेक गोष्टी लक्षात आल्या ज्या इग्नोअरन्समुळे केल्या जात नव्हत्या किंवा कोणे एके काळी करत होते आणि आता सुटल्यात (उदा: ऑफिसमध्ये पाण्यासाठी बाटली आणून ठेवणे). पुन्हा सुरूवात केली पाहिजे.

रिसायकलिंगबद्दल इथे पण काही आयडिया आहेत http://www.maayboli.com/node/17189

जिज्ञासा, सिंडीच्या "9 April, 2015 - 10:35" पोस्ट पर्यंत आलेल्या सगळ्या पोस्ट्ची मी एक common list बनवली आहे ज्यात शक्यतोवर duplicates टाळले आहेत नि काहि मुद्दे एकत्र केले आहेत. ही बाफाच्या वर डकवता येईल का ? ह्यात पुढे addition करत राहता येउ शकते.

* फर्नेस आणि AC चा thermostat प्रोग्रॅम करून आपण ज्यावेळी घरी असू तेंव्हाच ते चालू होतील ते बघतो.
* गरम पाण्याचा हिटरचं तापमान अगदी कमी (लोअर साईड) ठेवतो.
* इनक्यांडेसंट दिवे वापरण्या विवाजी CFL/ लेड वापरतो.
* प्रींट करताना जिथे जिथे शक्य आहे तिथे डबल साईड प्रींट करणे
* घरात लिहायला, यादी करायला, निरोप लिहायला वगैरे आणि कामाच्या ठिकाणी रफ वर्क करता 'पाठकोरे' कागद वापरणे.
* junk paper mail recycle bin मधेच टाकते. घरात येणारे सगळे कागद - काचा- प्लास्टिक वेगळं करून रिसायकल करतो. गारबेज कमीतकमी टाकण्याकडे कल ठेवणे
* जाऊ तिथे कचऱ्यासाठी स्वतासोबत एक पिशवी ठेवायची.
* भांडी घासताना, दात घासताना वगैरे पाण्याचा नळ तसाच वाहता न ठेवणे.
* जुन्या शर्टांचा, टीशर्टचा वापर ओटा , फर्निचर, कार , सायकली पुसायला करणे. कार, सायकलीच्या बाबतीत २-३ वेळा घुवून अनेकदा टाकून द्यावे लागतात, पण शक्य तितका पेपर टॉवेलचा वापर कमी.
* * अति shopping (कपड़े, चपला, cosmetics) करत नाही! गरज नसताना शॉपिंग करत नाही. कमीत कमी आवश्यक तितक्याच गोष्टी विकत घेणे. घरात प्रत्येक वस्तू नवी-कोरीच आली पाहिजे, असं न करता काही प्रकारच्या वस्तू उत्तम स्थितीत कोणी विकत असेल तर ती आणतो. (किजीजी वापरतो, नको त्यावास्तु डोनेट करतो, गुडविलला चक्कर मारतो)
* डिशवाशर आणि वाशिंग मशीन पूर्ण भरल्याशिवाय वापरत नाही. ड्रायर मध्ये कपडे अर्धवट वाळवून बाहेर कपडे वाळत घालते.
* माझ्याजवळ माझी एक पाण्याची बाटली कायम असते. मी त्यात रिफील करून पाणी पिते, प्रवासात देखील शक्यतो. जेणेकरून पाण्याच्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर कमी
* ग्रोसरीला पिशव्या घेऊन जाणे. गरज असेल त्याप्रमाणे ग्रोसरी करणे ( पालेभाज्या, सॅलड, फळे लगेच संपली नाहीत तर खराब होतात). दूधाचा कॅन संपल्यावर तसाच टाकून न देता, विसळून ( rinse करून) त्यातले पाणी झाडांना घालणे (भारी वाढतात मनी प्लांट वगैरे) माझ्याकडे कडधान्य साठवायला जूस च्या काचेच्या बाटल्या आहेत. इंडियन ग्रो मधून आणलेल्या दहयाच्या डब्यांचा वापरही मी ग्रोसरी साथवायला करते
* शाळेत मुलांना सोडताना किंवा आणताना गाड़ी एक ब्लाक अलीकडे लावते.
* कार ट्रंक व कार साफ ठेवते - दर २५ किलोला १% इंधन अधिक लागते सांगतात. पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणे. शक्य असेल तर कार पूल करणे
* स्टायरोफोमचा वापर टाळते ("टू गो" बॉक्स विशेषतः!). कॅन्ड फूड टाळते.
* सिंगल सर्विंग गोष्टी विशेषतः प्लास्टिकच्या कंटेरनमधून विकत घेतल्या जाणार्^या जमेल तेवढं टाळते.
* रेस्टरूममधे हात धुतल्यावर कमीत कमी पेपर टॉवेल वापरते.
* पार्टीत प्रत्येकाच्या ग्लास वर मार्कर ने नाव लिहिलं होतं. म्हणजे disposable cup असला तरी एकच ग्लास पूर्णवेळ वापरला जाईल. pot luck च्या वेळी किंवा इतर वेळी सुद्धा plastic cutlery शक्यतोवर वापरत नाही. त्या ऐवजी येणारी मंडळी स्वतः ताटे-वाट्या-भांडी घेऊन येतात. दोन-तीन कुटुंब असतील तर घरचीच ताटं वापरणे.
* मुलांच्या वाढदिवस्/कुठल्याही पार्ट्यांसाठी डॉलर शॉप किंवा तत्सम दुकानातल्या प्लास्टिकच्या छोट्या छोट्या वस्तु भेट म्हणून न देणे. माझ्याकडून रिटर्न गिफ्ट्स वगैरे द्यायची वेळ असेल तर बरेचदा मी ग्रोसरी बॅग दिली आहे
* ऑफिसमध्ये चहा/कॉफीसाठी स्वतःचा कप वापरणं आणि पाण्यासाठी स्वतःचा ग्लास. कुणाला ऑफिसमध्ये गिफ्ट द्यायचं असेल तर हेच कॉफी कप वगैरे सजेस्ट करते .
* कामवाल्या बाईला मोठ्ठा वाहता नळ सोडून भांडी घासायची नाहीत असे शिकवले आहे. तसेच बाल्कनीत बादल्याच्या बादल्या पाणी ओतून धुण्यापेक्षा ओल्या फडक्याने पुसून घ्यायला सांगते. मी स्वतःही भांडी घासताना पाण्याची धार शक्य तितकी कमी ठेवते.
* अन्न वाया जाऊ नये ह्यासाठी खूप जागरुक राहते.
* लिफ्टचा वापर जागरुकपणे करते. उतरताना लिफ्ट कधीच वापरत नाही
* बिलं, रिसीट्स शक्य तेवढ्या ऑनलाईन असतील असं पाहते
* चहा/ कॉफी ढवळायला स्टरर न वापरता चमचा वापरतो. काहीही पिताना स्ट्रो न वापरता तोंडाला ग्लास लावतो.
* कामासाठी air travel बऱ्यापैकी होतो. दर वर्षी tax deadline ला सर्व एमिशन्स ऑफसेट करतो.
* Buy local, eat local
* झाडांना पाणी घालताना नळीला स्प्रे टाईप स्प्रिंकलर लावून हाताने घालतो. अगदीच स्प्रिंकलर लावायची वेळ आली तर न विसरता तो हलवतो आणि वेळेत बंद करायचा प्रयत्न करतो. स्प्रिंकलर असतील तर रेन मीटर असलेले घ्यावेत, त्यामूळे पाउस पडला तर तेही धरले जाते. नाहितरभर पावसामधे सुरू असणारे स्प्रिंकलर दिसतात. तसेच झाडांना वेगळे पाणी देण्यापेक्षा, ड्रिप ईरिगेशन असलेले पाईप वापरले तर पाण्याचा वापर अधिक कमी होतो.
* * बागेत (backyard) लॉन नाही. फक्त नेटीव झाडेच लावली आहेत. त्यामुळे त्याना पाणी घालावे लागत नाही. थोड्या भाज्या लावल्या आहेत. त्याना स्वयंपाकघरातले वापरलेले पाणी घालतो. लॉन मधे गवत हवे असल्यास शक्यतोवर native grass species वापरणे. They are not only drought tolerant but also resistant to common insects. This will reduce usage of water or any insecticides etc.
* घरात एका खोलीतून दुसरीकडे जाता-येताना दिवे, पंखे वगैरे त्या त्या वेळी बंद करणे. लाईट बंद करणे मी विसरतो, ते सुधारायला activity सेन्सर वाले स्वीच आणायचा विचार आहे. >> बाथ्रुमसारख्या जागी जिथे आपण मोजका वेळ घालवतो तिथे मोशन अ‍ॅ़टीविटीवाले वापरण्यापेक्षा टायमरवाले स्विच अधिक उपयोगी पडतात.
* जिथे शक्य होईल तिथे Advanced Power Strip वापरणे ज्या घोस्ट कंसम्प्शन थांबवू शकतात.
* आणखी एक आपण जे काही रिसायकलिंग/गो ग्रीन गोष्टी करतो ते आपल्या मुलांना आवर्जून सांगा, मोठ्यांपेक्षा ती लवकर शिकतात. ज्यांना अजीबात अवेअरनेस नसतो त्यांना रिसायकलिंगसाठी सांगणे. जिथे जिथे फीडबॅक देता येईल तिथे तिथे तो देणे.

* http://www.maayboli.com/node/17189

वत्सला, थंडीच्या दिवसात नळाला / शावर्ला गरम पाणी येइपर्यंत वाया जाणार्‍या पाण्याबद्द्ल :
रिसर्क्युलेटिंग पंप मिळतो जो वॉटर हिटरला जोडता येतो. त्यामुळे इंस्टंटली गरम पाणे मिलतं आणि पाण्याची बचत होते.

माझ्यासाठी आचरणात आणायला कठिण मुद्दा अन्नाची नासाडी कमी करायचा. मी उगाच जास्ती ग्रोसरी आणते आणि त्या भाज्या वापरल्या न गेल्याने फेकते. दरवेळी खूप वाइट वाटते पण प्रयत्न चालू आहेत.

असामी, बरं झालं यादी एकत्र केलीस ते.
इथे पटेल ब्रदर्समध्ये प्लॅस्टीकच्या पिशव्या की खोकी असा पर्याय असतो. आम्ही खोके घ्यायला सुरूवात केली. पण मग घरात खूप खोके साठले. मग आम्ही ती परत घेऊन जायला लागलो आणि काही जास्तीची तिकडे ठेऊन दिले. तर त्यांनी तसं करू नका सांगितलं! म्हणे आधीच इथे खूप जास्त खोके साठतात म्हणून आम्ही ते पिशव्यांच्या ऐवजी देतो. तर तुम्ही परत काय आणता.! आता कापडी पिशव्या न्यायला सुरूवात करणार आहोत.

मी उगाच जास्ती ग्रोसरी आणते आणि त्या भाज्या वापरल्या न गेल्याने फेकते. दरवेळी खूप वाइट वाटते पण प्रयत्न चालू आहेत. >>>> हे भाज्यावगैरे आपण रोज किंवा १/२ दिवसांआड आणत नाही. त्यामुळे असं होत असावं.

पार्टीमध्ये डिस्पोजेबल ग्लासवर नाव घालण्याबाबत एक किस्सा झाला. आम्ही इथे नेहमीच मार्करने नाव घालतो. मध्यंतरी भारतात असताना एका पार्टीत हा विषय निघाला. तेव्हा नाव घालण्याबाबत सांगितलं तर सगळे जण काहितरी विनोद सांगितल्यासारखे मोठ्याने हसले! आणि पुढे कोकणस्थीपणावरून वगैरे विनोद केले गेले.. :|

काहीही पिताना स्ट्रो न वापरता तोंडाला ग्लास लावतो. >>>> मी हे करायचो. पण जिथे डिस्पोजेबल ग्लास नसतात, अश्या ठिकाणी असं करू नये असं इथल्या एका गोर्‍या कलिगने सांगितलं.

जाता-येता दिवे बंद करणे, पाणी कमी वापरणे या सवयी मला वाटतं बहुतेक जणांना अगदी सेकंड नेचर म्हणावं इतक्या लागलेल्या आहेत. >>>>> अनुमोदन.

आमच्याकडे रीसायकल चा कचरा नॉर्मल कचर्‍याच्या पिशवित दिसला तर ट्रॅश वाले कचरा नेत नाही, वरुन लेबल लावुन जातात का नाहि नेला ते, घर घेतल तेव्हा ह्या नियमामुळे कटाक्षाने या गोष्टी पालन करतो.

रियुजबेल वॉटर बॉटल शक्य तितक्या वेळा वापरतो, भान्डे घासताना सिन्क मधे नळ चालु ठेवत नाही, अगदीच चालु ठेवावा लागणार असेल तर बारिक चालु ठेवते.

लागत नाहि तिथे दिवे चालु न ठेवण्याबद्दल घरी सगळेच जागरुक आहोत.
डिशवॉशर ला आपण हाताने घासतो त्यापेक्षा बरेच कमी पाणी लागते,त्त्यामूले डिशवॉशर जर नॉर्मल साय्कल वर लावले तर कमी पाण्यात भान्डी स्वच्छ निघतात.डिशच्वोशर पुर्ण भरलेले असताना लावते.

भाज्या नासाडी: मी सुध्दा ३ वर्षापूर्वी करत होते. वाईट वाटायचे पण काही मार्ग सापडला नव्हता. बदल का घडला - टॉमेटो फ्रिज मध्ये ठेवू नये असे चांगल्या सोर्स मध्ये कुठेतरी वाचले. बाहेर ठेवायला लागले. टॉमेटो सडतील, घरात मेस होईल ह्या भीतीने कधी कसे वापरायचे ते करता करता एकूणच मेन्यू प्लॅनिंगची सवय लागून गेली. शेयर करायला कुठलाही तक्ता नाही. पण ज्या काही स्वस्त भाज्या (फ्रोझन, कॅन्ड नाही) जवळच्या स्टोअर मध्ये असतात त्या नेमक्या वापरायची सवय टॉमेटो संपवा संपवा रे मुळे लागली. आता हल्ली परत टॉमेटो फ्रिज मध्ये जात आहेत आणि अजून तरी भाजी वेस्टेज करत नाहीये.

असामी, यादी एकत्र केल्याबद्दल धन्यवाद.
बर्‍याच गोष्टी आधीच करतोय, पण अजून काही आयडियाज मिळाल्या.

इकडे प्रिंट करण्यावरुन पण जाम चिडचिड होते. ऑफीसमधे आहे फुकटात म्हणून वाट्टेल ती अन वाट्टेल तेवढी पाने, कलर मधे, ग्राफीक्स/चित्र असलेली वगैरे, दणादण प्रिंट करतात लोकं. कधीकधी तर गरज नसताना प्रिंट करुन प्रिंटरमधून उचलायचे सुद्धा विसरतात, अन प्रिंट केलेली पाने तशीच पडून रहातात. सगळी सिंगल सायडेड, अर्थात!

मी गेल्या ७-८ वर्षात जितकी एकूण पाने प्रिंट केली असतील तितकी काहीजण एका आठवड्यात करतात इथे.

माझा एक छोटा मुद्दा: मी अशी पाठकोरी अन वाया गेलेली पाने शक्य तिथे वापरतो. उदा. एक्सपेन्स रिपोर्ट पाठवताना रिसीट्स पानावर टेपने चिकटवून सबमिट कराव्या लागतात त्यासाठी अशी वाया गेलेली कागदं वापरतो.

वॉव! फार मस्त मस्त सूचना येत आहेत!
असामी, ग्रेट जॉब! धन्यवाद! मी संध्याकळी/रात्री धाग्याचे हेडर बदलून सगळ्या सूचना तिथे घालेन!
अजून काही कल्पना डोक्यात येत आहेत त्याही लिहीन Happy

मंदार एक्सपेन्स रिपोर्टवरून एक आठवलं तुमच्या इथे कुठलं सॉफ्टवेअर वापरता त्यांचं फोनवर अ‍ॅप असेल तर सरळ रिसिट्सचे फोटो फोनवरून काढून अ‍ॅटॅच करायचे. नो कागद एक्सपेन्स रिपोर्ट सबमीट करता येतो.
कॉन्करमध्ये ही सुविधा आहे फॉर इ.जी.
मेसीज वगैरे दुकानात इमेल रिसिट्स इन्सेड ऑफ प्रिंट हा पण एक खारीचा वाटा आहे कागद कमी वापरण्यासाठी. (त्यात आमच्यासारखे रिसिट्स हरवणारे लोकं वेगळाच फायदा पण शोधतात हा वेगळा भाग ;))

पाठकोरी पाने मी धाकट्याला काहीबाही चित्र काढून पाहायची असतात त्यासाठी वापरून मग त्याचे आणखी पेपर प्रोजेक्ट्स असतील तर वापरून मग रिसायकल. आमच्या प्रीस्कुलमध्ये टॉयलेट रोल्सचे रिकामे रोल्स वापरून कुठलं तरी गार्डन प्रोजेक्ट करताहेत यंदा त्यासाठी डोनेशन्स मागवलीत. त्याबद्द्ल इंटरेस्टिंग माहिती मिळाली तर कळवेन.

छान .. Happy

मी काही बाबतीत इको फ्रेण्डली आहे आणि काही बाबतींत अजिबात नाही .. ज्या बाबतींत नाही त्याची जाणीव आहे आणि फ्रेण्डली व्हायचा प्रयत्न बेबी स्टेप्स् मध्ये चालू आहे ..

पराग, तुम्ही राहता तिथे आसपास रीसायकल चे बीन्स् नाहीत का? खोके/बॉक्सेस् तिथे टाकता येतील ..

काही गोष्टी मात्र कशा अंमलात आणायच्या ते कळत नाही .. जसं की घरी खूप पाहुणे असले तर डिस्पोजेबल शक्यतो न वापरणे .. (वापरलेच तर त्यावर नावं लिहून ठेवण्याचा पर्याय आला आहे) पण वापरायचं नाही ठरवलं तर मग प्लेट्स , कप्स् , चम्चे इत्यादी धुवायला पाणी लागेल .. तेव्हा कुठला पर्याय योग्य हे ठरवणं मुश्कील (नीट कळलं असेल तर गॅस कंझम्शन,प्रायसेस्प, गाड्यांची फ्युएल एफिशिएन्सी बद्दल असामी अशाच धर्तीवर त्या दुसर्‍या बीबीवर लिहीत आहे ना?)

कॅलिफोर्नियामध्ये, बे एरियात आणि सिटीत असलात तर सगळ्यात जास्त अवेअरनेस आहेच इको फ्रेण्डलीनेस बद्दल ..

सशल माझा थंब रूल असा आहे की टोटल ३ ते ४ फॅमिलीज जेवायला असतील तर काचेच्या प्लेट्स/बोल्स/ग्लासेस वापरते. ३५-४० लोकं असतेल तर डिस्पोजेबल पण त्या स्टायरोफोमवाल्या किंवा फॅन्सी प्लॅस्टिकवाल्या अजिबात नको कारण त्या डिकंपोज होत नाहीत की व्हायला शेकडो वर्षे की काय लागतात.

सेम गोष्ट डिस्पोजेबल डायपर्सची. थोरलीच्या वेळेस मी अजिबातच अवेअर नव्हते ह्याबाबत पण धाकलीला पहिले ६ महिने क्लॉथ डायपर्स वापरले. पण नंतर अतीव कंटाळा आणी थकवा यांमुळे परत डिस्पोजेबल वर गाडी आली Uhoh

माझ्या ऑफिसात अलिकडेच एक सर्व्हे घेतला होता हाउ ग्रीन आर यू .
त्यातून मी आतापर्यंत करत नसलेल्या काही गोष्टी कळल्या

१. फोन, आयपॅडचे चार्जर वापरात नसताना सॉकेटमधून काढून ठेवणे
२. रेन वॉटर हार्वेस्टिंग
३. कंपोस्टिंग फूड वेस्ट

पैकी १ ताबडतोब चालू केलेय. २ अन ३ वर विचार चालू आहे कसे काय करावे याबद्दल

जे अ‍ॅण्ड के च्या उंच आणि दुर्गम भागात वेस्ट डिस्पोझल सिस्टीम साठी सीपीसीबी नॉर्म्स शोधत होतो, तेव्हां लक्षात आलं की या भागासाठी नॉर्म्सच नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधून पाहीला पण लेखी काही मिळेना. मग जगातील सर्वात कडक नॉर्म्स शोधताना ते कॅलिफोर्निया मधे असल्याचं आढळलं. आम्ही तेच फॉलो केले. हिमालयातली हवा, पाणी दूषित व्हावं असं मनापासून वाटत नव्हतं. अमेरिकन्स आणि युरोपियन्सचं मनापासून कौतुक. अर्थात हा अवेअरनेसत्यांच्या कडे एका रात्रीत आलेला नाही तसंच एकंदरच अवेअरनेस ची कारणं अनेक आहेत.

आमचं पब्लीक का नाय फारेनला जातंय आणि तिकडचं वर्णन करून थकतंय तवा कवा कवा मुक्तपीठात लिहितंय नायतर ब्लॉगवर, फेसबुकवर मोकळं व्हतंय.. लैच जाग्रुति !

फोन, आयपॅडचे चार्जर वापरात नसताना सॉकेटमधून काढून ठेवणे >>>> ह्याने काय होतं नक्की ? म्हणजे काढलं नाही तर.. ?

ग्राउंडलाही टच होणार नाही ना? Happy

पण थोडं कन्झम्शन होतंच असेल .. म्हणूनच कदाचित बर्‍याच उपकरणांच्या मॅन्युअल मध्ये वापरायचं असेल तेव्हाच प्लग-इन करा असं सांगितलेलं असतं .. किंवा भारताताही प्लग्ज् ना ऑन/ऑफ स्विचेस् असतात?

बॅटरीचा पण काहीतरी झोल असायचा पूर्वी - ओव्हर्चार्ज आणि मग बॅटरी बदलावी लागते. आता नवीन बॅटरीज मुळे हे ओव्हर्चार्ज होत नाही म्हणे पण अजून ती सवय आहे - लिमिटेड वेळासाठी चार्ज करणे.

(नक्की शास्त्रीय माहिती नाही. कुणी ज्ञानदीप लावले तर बरच पडेल!)

काहीही पिताना स्ट्रो न वापरता तोंडाला ग्लास लावतो. (हे स्ट्रो हलके असतात आणि उडून पाण्यात जातात आणि त्याने अनेक पाणपक्षी दरवर्षी मारतात असं वाचलेलं. ) >>> मागे एकदा कोणीतरी सान्गीतल ..बरेचदा restaurants मधे ग्लास नीट धुतले जात नाहीत सो its like touching somebody else's lips तेव्हा पासून मी नेहेमी straw वापरते....

रार चा # ३ माझ्यासाठी नविन आहे. आता दुधाचा can विसळून झाडात टाकीन.

माबो नेहेमी छान्-छान ideas मिळतात. Happy

१) मी गेले ६- वर्ष स्टेशनरी विकत घेणं पूर्णतः थांबवलं आहे. इथे पेन, पेन्सिलींची १२-१५ चे पॅक्स मिळतात, आणि ते वर्षानुवर्ष टिकतात. मला स्वतःला स्टेशनरीची हौस/आवड होती, पण जाणीवपूर्वक प्रयत्न करून तो मोह पूर्णतः सोडलेला आहे.
२) टुथपेस्ट च्या बाबतीत आमच्या घरात होणारे जोक्स - लाटण्याचा उपयोग टूथपेस्ट लाटायलाच जास्त होतो, स्वयंपाकघरापेक्षा ! Lol
३) कोल्ड क्रीम वगैरेचे कंटेनर्स मी चक्क कापते, त्यातील कोल्ड क्रीम ची लेव्हल डीस्पेंन्सर्च्या खाली गेली की. टोटल कोल्डक्रीमच्या ५-७% क्रीम तळाच्या डीस्पेन्स न होऊ शकणार्‍या भागात असतं (क्लासीक फार्मा/ कॉसमेटीक्स इंडस्ट्री गिमिक फॉर व्हॉल्यूम अ‍ॅडजस्टमेंटस). ते कोल्ड क्रीम ट्रान्फर करायला छोट्या डब्या ठेवल्या आहेत. ते संपल्याशिवाय नवीन कंटेनर ओपन करायचाच नाही. आता न सांगता घरच्यांनाही आपोआप सवय लागली आहे.
(** ब्लॉग लिहिला कधी तर - ट्रॅव्हल साईझ पॅकस आणि इकॉनॉमी . सोशल कंडीशन्स हा विषय डोक्यात आहे लिहिण्यासाठी)
( घरातला जोक - घरातल्यांचे प्रॉडक्टस जेव्हा वापरून संपतात, तिथे माझी वापराला सुरुवात होते Lol )
4) खास करुन अमेरीकेत घरं मोठी असतात, आणि माणसं कमी. अश्यावेळी 'माणसांची जागा फर्निचरनी भरायला मला आवडत नाही'. जर गरज नसेल तर एखादी खोली पूर्णतः रिकामी राहिली तरी चालेल. उगाच खोली आहे म्हणून बेड, ड्रेसिंग टेबल, बुककेस ठेवून भरायच्या मी विरोधात आहे.
५) कदाचित मेडीटेशन, विपश्यना वगैरेचा परिणाम असावा, पण फार कमी गोष्टींची गरज असते रोजच्या आयुष्यात. ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण एंजॉय करा अशी हळूहळू विचारसरणी होत गेली आहे. शिवाय एकूणच 'गरजांचा, सामानाचा पसारा' कमी केल्याने, आवरण्याचा वेळ वाचतो, एनर्जी वाचते आवराआवरीतली आणि त्या वेळात खूप इतर अ‍ॅक्टीव्हीटीज करता येतात. हे थोडसं ऑरगनायझेनशी पण निगडीत आहे. गोष्टी कमी असल्या की नीट ठेवल्या जातात, मग अचानक हव्या असल्या की नेमक्या जागी सापडतात, आणि आपोआपच लगेच दुकानात जाऊन ती गोष्ट घरात असतानाही रीपीट आणली जात नाही.

अच्छा. कसं काय पण? म्हणजे सर्कीट कम्प्लिट होत नाही ना? >>> पराग चार्जर्स मध्ये छोटासा स्टेपडाऊन ट्रान्सफॉरमर असतो त्याचे स्वतःचे काही लॉसेस असतात ,जास्त नाही पण थोडेसे जे थोडी पॉवर कन्स्युम करतात.
सगळे खुप मस्त लिहित आहेत , बरचं काही शिकता येईल इथुन.
रार मस्त लिहितेयस , तुझ्याकडे बचतीची शिकवणी लावली पाहीजे.

रार, #४ आणि ५ बद्दल +१

#३ - कापायची आयडिया भारी आहे. मी आपली येड्यासारखी संपत आलेला कंटेनर ट्रान्स्फर डबी च्या वर उलटा लावते. वॉटर कूलरच्या मोठ्या बाटल्यांसारखा Proud मग कधीतरी सावकाश तो रिकामा होतो. नेक्स्ट टाईम तुझी आयडिया करून पाहीन.

Pages