Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे ते नाहिये - हे वेगळं
हे ते नाहिये - हे वेगळं आहे
ते मराठी होतं..
ह्यात असं आहे - "दिल नही देना था देना पडा"
त्यात आहे " आजकाल आवडत नाही लाडू पेढा"
हो मी पण ऐकलय बटाटा वडा ,
हो मी पण ऐकलय बटाटा वडा , बहुतेक लक्षा ( ल़़क्ष्मीकांत बेर्डे) वर चित्रीत झालेय (त्या अनिल कपूर आणि माधूरीच्या गाण्याचेच विडंबन केलेले आहे) , गाण्याची सुरवात दुस-या गाण्याच्या विडंबनाने केली असेल म्हणून गुगलवर सापडत नाही.
रजा मंग कर ली
रजा मंग कर ली
म्हटलं 'रजा' हा शब्द हिन्दी /
म्हटलं 'रजा' हा शब्द हिन्दी / उर्दू मधे पण असेल...
"हम उस देस के वासी है, जिस
"हम उस देस के वासी है, जिस देस में गंगा बहती है"... हे लहानपणी "हमुस देस के वासी है" असे ऐकू यायचे. गंगेच्या आसपास कुठेतरी "हमुस" नावाचा प्रदेश असावा अशी बराच काळ समजूत झाली होती :
'मै प्रेम की दीवानी हूं'मध्ये
'मै प्रेम की दीवानी हूं'मध्ये हृतिक पहिल्यांदा करीनाच्या घरी येतो तेव्हा हिमानी शिवपुरी तिला जबरदस्तीने पंजाबी ड्रेस घालायला लावते आणि गाणं गायला लावते. करीनाने उगीचच एक दात पण काळा केलेला असतो. तर ते जे गाणं आहे-
'भटके पंछी भूल न जाना, ये जग तेरा नही ठिकाना..' त्यात मला
भूल से तू यहां पे आया
तेरे लिये ये भेस बनाया
(बरोबर ओळ - तेरे लिये ये देस पराया)
ऐकू यायचं आणि त्या पंजाबी ड्रेस, काळा दात प्रकारामुळे बरोबर वाटायचं.
तेरे लिये ये भैंस बनाया
तेरे लिये ये भैंस बनाया ..... असे असेल ते....
तुम्ही धन्य आहात - "मै प्रेम
तुम्ही धन्य आहात - "मै प्रेम की दीवानी हूं" सहन करु शकलात -
नवीन जानेमन ( प्रीति झिंटा
नवीन जानेमन ( प्रीति झिंटा आणि मंडळी) मधलं एक गाणं -
हमको मालूम है इश्क नासूर है दिलसे हो जाती है गलतिया
ते actually इश्क मासूम है असं आहे .. नासूर म्हणजे CANKER (छाला)
मै प्रेम की दीवानी हूं माझा
मै प्रेम की दीवानी हूं माझा ऑल टाईम फेव टीपी मूव्ही आहे वेळ जात नसला की आणि खूप हसायचं असेल की लगेच लावते
मै प्रेम की दीवानी हूं -
मै प्रेम की दीवानी हूं - थियेटर वर घुसाघुसी करून पाहिलेला सिनेमा....
म्हणजे सगळे मिळून ५ प्रेक्षक होते त्या show ला. आणि तरी एका जोडप्याने माझ्या पुढे घुसून २ तिकीटे घेतली आणि मी त्यानंतर तीन..
मै प्रेम की दीवानी हूं माझा
मै प्रेम की दीवानी हूं माझा ऑल टाईम फेव टीपी मूव्ही आहे फिदीफिदी वेळ जात नसला की आणि खूप हसायचं असेल की लगेच लावते<<+१. ब्लॅकनं टीकीट काढून पाहिला. फुल्टू पैसावसून पिक्चर!!!!!
नंतर कधीतरी एक हीरो चरसी असलयच्या अफवा आल्या तेव्हा हा पिक्चर पुरावा म्हणून शाबित करण्यात आला.
बेबी डॉल ना सोने दी अस मी
बेबी डॉल ना सोने दी अस मी सुरवातीला ऐकलेल गाणं.
जोश न खो दे कही होश मे देखने
जोश न खो दे कही होश मे देखने वाला !!!
( हे फक्त अदलाबदल करून म्हटल्याने किती meaning change होतंय!!
प्रज्ञासा , हे असं नेमकं
प्रज्ञासा , हे असं नेमकं कोणतं गाणं ऐकू आलं ते कळालं तर मज्जा येईल
घूंघटे मे चंदा है फिर भी है
घूंघटे मे चंदा है फिर भी है फैला चारो ओर उजाला -
https://www.youtube.com/watch?v=NDExJMwTlEU
कोयला नावाचा टुकार पिक्चर आहे
कोयला नावाचा टुकार पिक्चर आहे त्यात शाहरुख मुका वगेरे असतो त्यातलं गाणं पाहिलं काल टिव्हीवर
घूंघटे मे चंदा है फिर भी है फैला चारो ओर उजाला
जोश न खो दे कही होश मे देखने वाला
:))))))))))))))
प्यारके जादूसे तो था अब तक
प्यारके जादूसे तो था अब तक अंजाना
तू अलबेला तू बेदाणा
तू बेदाणा >>
तू बेदाणा >>
तू बेदाणा >>> माझा मुलगा
तू बेदाणा >>>
माझा मुलगा लहान असताना ते 'कोयला'तलं गाणं 'जोशीनी खोच्किनी वाला' असं म्हणायचा
तू बेदाणा >> ''जोशीनी
तू बेदाणा >>
''जोशीनी खोच्किनी वाला' >>
जोशीनी खोच्किनी वाला >>>
जोशीनी खोच्किनी वाला >>> हसून ठार झाले!
मेरी भैसको डंडा ( किंवा अंडा)
मेरी भैसको डंडा ( किंवा अंडा) क्यू मारा
वो खेतमे चारा चरती थी
तेरे बापको वो क्या करती थी.. आआआआआ...
हे गाणं आहे का खरंच,,?
हो शम्मी कपूरचे आहे!!
हो शम्मी कपूरचे आहे!!
पगला कहींका चित्रपटामधलं
पगला कहींका चित्रपटामधलं मन्ना डे यांनी गायलेलं तुफान विनोदी गाणं आहे. एक गायक असलेला माणून वेड्यांच्य।हॉस्पिटलामध्ये आलाय आणि तिथं तो धुडगुस घालतोय अशी सिच्युएशन आहे. पूर्ण सिनेमा पाहिला तर लक्षात येईल.
पण शम्मी आणि मन्नाडे ने जे काय केलंय ते अफलातून आहे.
https://www.youtube.com/watch?v=gP4jHdxko4g
चिटीया कलाइयां वे रे.... मेरी
चिटीया कलाइयां वे रे.... मेरी चिटीया कलाइयां वे...!
याचा अर्थ काय आहे? माझे हात मुन्गी सारखे आहेत असं काही आहे का?
जाणकारांनी प्रकाश टाकावा...
गोरी चिट्टी मधली चिट्टीया आहे
गोरी चिट्टी मधली चिट्टीया आहे ते.
म्हणजे गोरी कलैय्या
ते चिटिया कलाइया माझि लेक
ते चिटिया कलाइया माझि लेक चक्क "मेरी चिकन कनाइया रे" असं म्हणते. चिकनची प्रचंड फॅन असल्याने तिला तिथे दुसरा काही शब्द असेल असं अज्जिबात पटतच नाहिये! बाकिचं शोप्पिन्ग करादे, पिक्चर दिखादे वैगरे मुळे तिला ते शोप्पिन्ग, मूवि आणि 'के एफ सी' असंच वाटतं
जोशीनी खोच्किनी वाला >>>
जोशीनी खोच्किनी वाला >>>
शोप्पिन्ग, मूवि आणि 'के एफ सी' >>>>>>>>
ते चिटिया कलाइया माझि लेक
ते चिटिया कलाइया माझि लेक चक्क "मेरी चिकन कनाइया रे" असं म्हणते. चिकनची प्रचंड फॅन असल्याने तिला तिथे दुसरा काही शब्द असेल असं अज्जिबात पटतच नाहिये! बाकिचं शोप्पिन्ग करादे, पिक्चर दिखादे वैगरे मुळे तिला ते शोप्पिन्ग, मूवि आणि 'के एफ सी' असंच वाटतं>>>>
तिला सांगा ते "मेरी चिकन खिलाइया रे" असं आहे म्हणुन
Pages