मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे ते नाहिये - हे वेगळं आहे

ते मराठी होतं..

ह्यात असं आहे - "दिल नही देना था देना पडा"

त्यात आहे " आजकाल आवडत नाही लाडू पेढा"

हो मी पण ऐकलय बटाटा वडा , बहुतेक लक्षा ( ल़़क्ष्मीकांत बेर्डे) वर चित्रीत झालेय (त्या अनिल कपूर आणि माधूरीच्या गाण्याचेच विडंबन केलेले आहे) , गाण्याची सुरवात दुस-या गाण्याच्या विडंबनाने केली असेल म्हणून गुगलवर सापडत नाही.

"हम उस देस के वासी है, जिस देस में गंगा बहती है"... हे लहानपणी "हमुस देस के वासी है" असे ऐकू यायचे. गंगेच्या आसपास कुठेतरी "हमुस" नावाचा प्रदेश असावा अशी बराच काळ समजूत झाली होती Biggrin Biggrin :

'मै प्रेम की दीवानी हूं'मध्ये हृतिक पहिल्यांदा करीनाच्या घरी येतो तेव्हा हिमानी शिवपुरी तिला जबरदस्तीने पंजाबी ड्रेस घालायला लावते आणि गाणं गायला लावते. करीनाने उगीचच एक दात पण काळा केलेला असतो. तर ते जे गाणं आहे-
'भटके पंछी भूल न जाना, ये जग तेरा नही ठिकाना..' त्यात मला

भूल से तू यहां पे आया
तेरे लिये ये भेस बनाया
(बरोबर ओळ - तेरे लिये ये देस पराया)

ऐकू यायचं आणि त्या पंजाबी ड्रेस, काळा दात प्रकारामुळे बरोबर वाटायचं.

नवीन जानेमन ( प्रीति झिंटा आणि मंडळी) मधलं एक गाणं -

हमको मालूम है इश्क नासूर है दिलसे हो जाती है गलतिया

ते actually इश्क मासूम है असं आहे .. नासूर म्हणजे CANKER (छाला) Happy

मै प्रेम की दीवानी हूं - थियेटर वर घुसाघुसी करून पाहिलेला सिनेमा....
म्हणजे सगळे मिळून ५ प्रेक्षक होते त्या show ला. आणि तरी एका जोडप्याने माझ्या पुढे घुसून २ तिकीटे घेतली आणि मी त्यानंतर तीन.. Proud

मै प्रेम की दीवानी हूं माझा ऑल टाईम फेव टीपी मूव्ही आहे फिदीफिदी वेळ जात नसला की आणि खूप हसायचं असेल की लगेच लावते<<+१. ब्लॅकनं टीकीट काढून पाहिला. फुल्टू पैसावसून पिक्चर!!!!!

नंतर कधीतरी एक हीरो चरसी असलयच्या अफवा आल्या तेव्हा हा पिक्चर पुरावा म्हणून शाबित करण्यात आला.

कोयला नावाचा टुकार पिक्चर आहे त्यात शाहरुख मुका वगेरे असतो त्यातलं गाणं पाहिलं काल टिव्हीवर

घूंघटे मे चंदा है फिर भी है फैला चारो ओर उजाला
जोश न खो दे कही होश मे देखने वाला

:))))))))))))))

तू बेदाणा >>> Rofl

माझा मुलगा लहान असताना ते 'कोयला'तलं गाणं 'जोशीनी खोच्किनी वाला' असं म्हणायचा Biggrin

मेरी भैसको डंडा ( किंवा अंडा) क्यू मारा
वो खेतमे चारा चरती थी
तेरे बापको वो क्या करती थी.. आआआआआ...

हे गाणं आहे का खरंच,,?

पगला कहींका चित्रपटामधलं मन्ना डे यांनी गायलेलं तुफान विनोदी गाणं आहे. एक गायक असलेला माणून वेड्यांच्य।हॉस्पिटलामध्ये आलाय आणि तिथं तो धुडगुस घालतोय अशी सिच्युएशन आहे. पूर्ण सिनेमा पाहिला तर लक्षात येईल.

पण शम्मी आणि मन्नाडे ने जे काय केलंय ते अफलातून आहे.

https://www.youtube.com/watch?v=gP4jHdxko4g

चिटीया कलाइयां वे रे.... मेरी चिटीया कलाइयां वे...!
याचा अर्थ काय आहे? माझे हात मुन्गी सारखे आहेत असं काही आहे का?
जाणकारांनी प्रकाश टाकावा...

ते चिटिया कलाइया माझि लेक चक्क "मेरी चिकन कनाइया रे" असं म्हणते. चिकनची प्रचंड फॅन असल्याने तिला तिथे दुसरा काही शब्द असेल असं अज्जिबात पटतच नाहिये! बाकिचं शोप्पिन्ग करादे, पिक्चर दिखादे वैगरे मुळे तिला ते शोप्पिन्ग, मूवि आणि 'के एफ सी' असंच वाटतं

ते चिटिया कलाइया माझि लेक चक्क "मेरी चिकन कनाइया रे" असं म्हणते. चिकनची प्रचंड फॅन असल्याने तिला तिथे दुसरा काही शब्द असेल असं अज्जिबात पटतच नाहिये! बाकिचं शोप्पिन्ग करादे, पिक्चर दिखादे वैगरे मुळे तिला ते शोप्पिन्ग, मूवि आणि 'के एफ सी' असंच वाटतं>>>>
तिला सांगा ते "मेरी चिकन खिलाइया रे" असं आहे म्हणुन Wink

Pages