मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीनू, मी बिझी आहे गं सध्या Happy
काढेन तेंव्हा नक्की टाकेन
पण साईज मोठे असलेले प्रचि मला माबोवर टाकता येत नाहीत अजुनही Sad

आज मी सुद्धा परत एकदा आई आणि मयुरी (मावशीची मुलगी) च्या हातावर मेहेंद्या काढल्या :

हि आई च्या हातावरची :

mumma's.jpg

आणि हि मयु च्या हातावरची :

mayu's_0.jpg

मस्त आहेत दोन्ही डिझाइन्स. या धाग्यावर नवी पोस्ट आलेली दिसली की येणं भागच असतं. सुंदर आहेत सगळ्यांनीच काढलेले डिझाइन्स.

व्व प लोमा.... अप्रतिम...
टिना खुप म्हणजे खुपच सुंदर... ढापते आहे. Happy

भावजयीच्या पहिल्या पाडव्यानिमित्त्य तिला काढून दिलेली मेहेंदी...

धन्यवाद सिंडरेला Happy .

सायली .. ढाप बिंदास ..

मुग्धमानसी खुप छान काढलीय तुम्ही मेहेंदी..
सुटसुटीत .. चेक्स खुप आवडलेत मला..

वा वा... सगळ्याच..फ़ारच छान!

टीना...गोल गोल नक्शी आणि मयु च्या हातवरील सुटसुटीत विशेष आवडली!

वाह!

टिने ती मयूच्या हातावरली सोप्पी आणि गोड आहे.
परत हात भर नसल्याने ऑफिसच्या गेटअपवर पण शोभेल.
ती मी पण ढापतेय Happy

आजची .. खरं तर आत्ताची Wink
खुप लवकर काढून संपते म्हणून काढायला आवडली .. परत काही अंशी (अर्धी म्हणू शकतो) जालावरुन साभार Happy

today's.jpg

टीना, वरची मेहेंदी खरंच अप्रतिम आहे. प्रचंड आवडली. याच पानावर आईच्या हातावरची मेहेंदीपण खूप सुंदर काढली आहे. जबरी कलाकार आहात.

टीना.. सगळीच डिझाइन्स मस्त आहेत. तुझ्या रांगोळ्या आणि मेहेंदी डिझाइन्स दोन्ही खुप आवडतात. दर वेळी प्रतिक्रिया दिली जात नाही, पण मी फॅन आहे तुझ्या डिझाइन्सची. मला तुझ्या सगळ्या डिझाइन्समध्ये सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ते म्हणजे लिन्यर/सिमेट्रिक डिझाइन नसुनही असलेला बॅलन्स, "स्पेस"चा सुंदर वापर आणि कॉन्फिडन्ट, बोल्ड रेषा.
बर्‍याच दिवसापासून लिहायचं होतं, आज मुहुर्त लागला. Happy

मृण्मयी , charcha , plooma धन्यवाद.. नताशा thanx for such a priceless compliment पण अगदी मनापासून सांगते ; मी समाधानी नै आहे काढलेल्या डिझाईन्स ( मेहेंदी , रांगोळ्या ) बद्दल.. अस वाटत राहत नेहमी कि अजून कैतरी छान करता आल असत.. असो.. धन्यवाद परत एकदा .

सारीका .. मी_कल्याणी हा आयडी नै आला माबो वर माझ्या बघण्यात Sad

प्लूमा, दुसर्‍या आणि तिसर्‍या फोटोंतली मेंदी डिझाइन्स खूप आवडली. सुंदर काढलीत.

पहिल्या फोटोत बारकासा हात मेंदीबरोबर फारच गोजिरवाणा दिसतो आहे. Happy

पहिल्या फोटोत बारकासा हात मेंदीबरोबर फारच गोजिरवाणा दिसतो आहे. Happy >> मी आत्ता नोटीस केला.. कुणाचं कार्टून आहे plooma ?

थँक्स टीना ,मृण्मयी.
तो बारकासा गोजीरवाणा हात माझ्या लेकीचा आहे उगाच मजा म्हणुन टाकलाय फोटो ☺

Pages