युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे prepared pinto beansचा कॅन आहे. तो संपवायचाय. त्याचं काय करता येईल?

सायुरी, ते बीन्स मॅश करून टोमॅतो प्युरी, कांदे, आले घालून आमटी कर. फुलक्यांबरोबर छान लागते. कमी वाटले तर त्यात prepared छोले मॅश करून घालु शकतेस. तुपाची फोडणी दिली तर छानच.
Interest असेल तर चीज वगेरे घालून पोळ्यांचा wrap करू शकतेस.

अरेच्चा मी इथे धन्यवादचा प्रतिसाद लिहिला होता..गायब झाला? असो
मला अशीच फोडणीवाली रेसिपी पाहिजे होती. थँक्स चिन्नू Happy

चला तुला आवडल्या तर. अगदी झटपट होतात की नाही? तेल तापवायला नको की तेलाची भांडी घासायला नकोत. जय मायक्रो बाबा! Happy

अनुभवी मित्र-मैत्रीणीनो युक्ती सुचवाल का?
मझ्याकडे चण्याच्या डाळीचे पीठ उरलय बरच्.जरा जुन पण झालय्,मला त्यात किडे व्हायला नकोयत्...काय करु?फ्रीझ मधे ठेवता येइल का ते?कस ठेवायच्?डब्यात की झिप लाक मधे चलेल?
का भाजून ठेउ जरा....

किट्टु, उकडुन स्वीट-कॉर्न सूप कर. नाहीतर दाणे उकडायचे, गरम असताना त्यावर बटर, चवीला मीठ आणि ताजी मिरेपुड/चाटमसाला घालायचा आणि हादडायचे... Happy

किट्टु,
कोर्न पकोडे /कोर्न टिक्कि कर मस्त होतात.
डाळीच पीठ भजुन ठेउ की तसच ठेवायच फ्रीज मधे???

ईडलीचे पीठ बनवण्यासाठी डाळ/ईडली रवा वाटताना अर्धीवाटी भात घातल्यास पिठ चांगलं फुगतं. भाताला दुसरा ऑप्शन मूठ्भर पोहे घालू शकता.

कधी कधी समजा हवा थंड असल्यानेवा इतर काही कारणाने पिठ सकाळी किंवा इडली बनवायच्या वेळेपर्यंत फुगले नाही तर ऐन वेळी एक चमचा तेल एक चमचा पाणी आणि चिमुट्भर खायचा सोडा वाटीत मिक्स करून पिठात घातला तरी इडली एक्दम हलकी होते.. मस्त फुगते. मी स्वतः सोडा वापरणे टाळते.. पण ऐन वेळी माहित असलेलं बरं.

(पिएस्जी तुझ्यासाठी ही अजुन एक रेसिपी.) Happy

ज्या लोकांना तांदुळ जास्त खायचा नसतो. त्यांच्या साठी रवा ईडली बेस्ट ऑप्शन आहे.
एक वाटी उडदाची डाळ दोन चार तास पाण्यात भिजवून घ्यायची.

तिन वाटी रवा बंद झाकणाच्या डब्यात पाणी न घालता कुकर ला आपण वरण भातासाठी कुकर लावतो तेव्हा किंवा तसा कुकर करुन घ्यायचा.

उडीद डाळ वाटून घेउन त्यात कुकरमधला रवा थंड झाल्यावर धूउन घेउन मिक्स करायचा.
मिठ घालून मिश्रण रात्रभर किंवा सहा सात तास ठेवायचे.

मस्त स्पॉन्जी जाळीदार हलकी ईडली होते.

माझी दोन स्टिलचे टोप(with handle फक्त बाहेरच्य टोपाला) घासताना एकात एक अडकलेत. दोन दिवस सारखे प्रयत्न करतेय घरी आले की.
हॉट्/कोल्ड युक्ती पण वापरून झाली. म्हणजे बाहेरचा टोप हॉट पाण्यात डुबवून तर आत मध्ये बर्फ वगैरे.
तेल घालून झाले पण जराही फट नाही. आतले भांड फिरतच नाहीय. ओवन मध्ये पण ठेवून झाले आत मध्ये बर्फाचे पाणी.
कोणाला माहितीय कसे वेगळे करु आतले भांडे?
कडा हि नसल्याने इतकी खटपट केली की हातच दुखायला लागला. Sad

दोन भांड्याच्या मधे जी जागा राहिली त्यात निर्वात पोकळी झाल्याने असे झालेय. निघणे कठीण आहे. ती भांडी एकत्र वापरायला हवीत आता. यात पदार्थ खाली लागणार नाही.

मनुस्विनि, माझे तसे झाले होते एकदा. मी काय केले एक चाकू घेतला जो तुटला तरी चालण्यासारखा होता आणि भांडी पाण्याच्या बारीक धारेखाली धरुन हलकेच त्या चाकुचे टोक त्या २ भांड्यामधे किंचीत घुसवायचा प्रयत्न केला. अगदी हळुच करायचे नाहीतर आपल्याच बोटात घुसु शकतो चाकु. त्याने व्हॅक्युम फुटला णि त्यात फटीत पाणी शिरले. मग जरा जरा ती भांडी हलायला लागली आणि हळुहळु हलवत आतले भांडे बाहेर निघाले.

अग काल रात्री हाच प्रकार करायचा प्रयत्न केला. पाणी मात्र गेले आत व उलटे केल्यावर बाहेर आले. पण भांडे काही हलायचे नाव घेत नाहीये. आता फेकायचा विचार चालू आहे. एक चहाचे फेव भांडे व जेवणाचा टोप असे अडकले. .. पुन्हा एकदा करून पाहीन मग देइन फेकुन. Happy
थॅंक्स.

पक्कडीने आतले भांडे वाकवता आले तर बघ. कमीत कमी आतले वाकडे भांडे आणि बाहेरचे सरळ असे हाती लागेल. माझा एक स्टे.स्टी. ग्लास सिंकमधे अडकला होता. तेव्हा असेच पकडीने ग्लास वाकवुन बाहेर काढला होता.

माझ्याकडून चहाचे पातेले जळाले आहे खूप. तळाला काळा थर लागलाय तो निघतच नाहीये. काही करता येइल का ? मी BKF, EasyOff, Hard Scrubber वापरुन बघितले आहे. थोडाफार फायदा झाला पण थर पूर्ण गेला नाही.

सिंडे, पातेल्यात पाणी व खायचा सोडा घालून थोडं उकळ व लगेच घासून घे. माझं पण एकदा असं झालं होतं. पुर्ण चकचकीत नाही झालं पण वापरण्याजोगं झालं. कढया खूप छान निघतात स्वच्छ.

मनु, आतलं भांडं गोल फिरतंय का बघ ना ! ज्या अँगलमुळे ते आत गेलं, तोच अँगल मिळाला तर निघेलही Happy

सिन्ड्रेला, भांडे वाकणार नाही कारण स्टील मजबूत आहे. तेवढी शक्ती पण नाहीये. Happy
सीमा, करून पहाते. धन्यवाद दोघींना.

ओह हो तुझ्याकडून नाहीच वाकणार. मला सिंक वापरता येत नसल्याने ग्लास काढायला मी प्लंबर बोलावला होता त्याने ग्लास वाकवून दिला होता Wink

सिंड्रेला, चहाच्या भांड्यात मीठ घालून पसरव आणि गॅसवर भांड गरम कर, आणि चांगल तापल की, नळाखाली धरुन घास. नक्की फरक पडेल.

नमस्कार मंडळी, तशी मी जुनी मायबोली सदस्य पण पूर्वी फक्त रोमातच. नुकतिच या ग्रुपची सदस्य झाले.

आज स्वंयपाकघर आवरायला घेतल तेंव्हा लक्षात आले की घरात खूप मनुका (black raisins) शिल्लक आहेत. त्यांचे काय करता येइल? रोज थोडे खाऊन संपविण्याचा प्रयत्न केला पण गोड दोघांनाही आवडत नसल्यामुळे संपत नाहीएत.

Pages