चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरुभाऊ, दोनदोन आयडीने का येताय तुम्ही? (छावा पण तुमचाच आहे ना?) एकाच आयडीने या, म्हणजे इतरांचा गोंधळ होत नाही.

एकापेक्षा जास्त आयडीने लोक येतात इथे, पण कुणाचा काय, तर कुणाचा काय हेतू असतो. तुमचा तसा काही दिसत नाही; म्हणून म्हटले. Proud

---
$

लव्ह आज कल...

काल असो वा आज... प्रेम हे प्रेमंच असतं... हे सांगणारा (आणखी)एक सिनेमा...
काल आणि आजच्या दोन समांतर प्रेमकहाण्या वापरून हे दाखवलंय...
इम्तियाज अली च्या या सिनेमात सगळं चांगलं आहे... पण पूर्वीच्या जब वी मेट किंवा सोचा न था सारखी भट्टी जमून नाही आली...
तरीपण सिनेमा कुठेही निरश करत नाही... दोन तासांच्या लांबीत मधेच DDLJ, DCH, हम तुम, KANK अशा रोमँटिक सिनेमांची आठवण येते... पण प्रेमकहाणी कितीही वेगळी करायची म्हटलं तरी बेसिक तर सेमच असणार ना...
सैफ अली खान चा जय आणि वीर दोन्ही लाजवाब... हम तुम नंतर पहिल्यांदाच त्याच्याकडून या दर्जाचा अभिनय बघायला मिळतोय...
ॠषी कपूर पण खूप सहज काम करून जातो...
दीपिका पदुकोणचा वावर ही उत्स्फूर्त आहे...
प्रीतम ची गाणी कुठेही उगाचच घुसडल्यासारखी वाटंत नाहीत... ट्विस्ट आणि चोर बजारी ची कोरिओग्राफी विशेष उल्लेखनीय...

सिनेमा एक्स्ट्राऑर्डिनरी वगरे आज्जीबात नाही...
पण खूप दिवसांनी एक प्रसन्न आणि चांगला सिनेमा आलाय...
एकदा बघायला काहीच हरकत नाही...
give it a try, you wont regret...

माझ्याकडून ५ पैकी ३ तारे...
_______
...हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...

मीही पाहिला कालच.. अगदीच ग्रेट नसला तरी वेळ फुकट गेला असे अजिबात वाटत नाही.. एकदा आवर्जुन पाहावा असा आहे.

नुसतीच प्रेमकहाणी आहे असे मला नाही वाटले. प्रेम आणि करीयर दोन्ही महत्वाच्या आहेत. जयला प्रेमाला महत्व द्यावे असे अजीबात वाटत नाही, त्याचे स्वप्न असते गोल्डन गेट प्रोजेक्टवर काम करण्याचे. पण त्याला त्याचा ड्रिमप्रोजेक्ट मिळुनही समाधान लाभत नाही. पण दीपिका म्हणते तसे त्याने ड्रिमप्रोजेक्ट सोडुन तिच्याशी लग्न करुन राहिला असता तरीही तेवढाच दु:खी झाला असता. एकुण सगळ्या गोष्टी आपापल्या जागी महत्वाच्या आहेत. फक्त प्रेम, फक्त करीअर असा विचार केला तर निराशाच येणार पदरी.

सैफने मस्तच काम केलंय. जुन्या आणि नव्या काळाच्या दोन्ही रोल्समध्ये तो मस्त वावरलाय. दीपिकाही मस्त वावरलीय. पण तिचे दिसणे मला नाही आवडले. तिचे लग्न होतानाच्या तिच्या आणि सैफच्या सीनमध्ये ती भयाण दिसते. शरीर अतिशय बारिक आणि त्याला विजोड असा मूळ मोठा चेहरा.

इम्तियाज अलीचे तिनही चित्रपट सुंदर आहेत. पण सोचा न था नंबर १, जब वी मेट न. २ आणि हा नं तीनवर आहे.... Sad

मग आई वडील, मुल, यांच्या सोबत सिनेमा ला जाऊ शकता?
>>> Naren3 हे कोणत्या चित्रपटाबद्दल विचारले आहे? कंबख्त इश्क का त्यानंतर लिहीलेल्या पोस्टस मधे लिहीलेल्या काही चित्रपटांबद्दल (He is just not that into you वगैरे)

खूप दिवसांनी एक प्रसन्न आणि चांगला सिनेमा आलाय >> अंक्याला अनुमोदन..
लव्ह आज कल, ठीक आहे.. एकदा पहाण्याजोगा.. नविन काहीच नाही.. तरीपण कंटाळा येत नाही पहाताना...

दीपिका-सैफ ची कामे छान. दीपिकाने निगेटिव्ह रोल्स केले पाहिजेत. त्यात ती जास्त शोभुन दिसेल.

"अलाँग केम द स्पायडर" बघितला. कथा आवडली. या लेखकाचं "वुल्फ" वाचलय. त्यातला भरमसाठ मैत्रिणी (जाईल त्या गावी कमीत कमी १) असलेला अ‍ॅलेक्स कॉस म्हणजे मॉर्गन फ्रीमन ? कल्पनेला कितीही ताणलं तरी मला तरी नाही झेपलं. पण सिनेमा मस्त आहे.

अरे खरच! वुल्फ मधे तरी असच आहे. त्यामुळे मुख्य कथा मागे पडुन बरीच पानं या मैत्रिणींवर नाहक वाया गेलीत.

अश्विनी भावे चा "कदाचित" सिनेमा मी सीडीवर बघितला. या चित्रपटाबद्द्ल कदाचित पूर्वी इथे लिहिलेले असेलही. दिग्दर्शक आहे चंद्रकांत कुलकर्णी. कलाकार अश्विनी भावे, सचिन खेडेकर, सदाशिव अमरापूरकर, चेतन दळवी वगैरे.
अगदी वेगळी कथा. मराठीत सहसा न दिसणारा विषय, आणि हातखंडा दर्जेदार अभिनय.
एका न्युरोसर्जनच्या आयुष्यात आलेले एक वादळ, असा विषय आहे. चित्रपटात गाणी नाहीत.
संग्रही ठेवावा असा सिनेमा आहे हा !!
दिग्दर्शनात अगदी मामुली चुका राहिल्यात, ( उदा. १९७८ च्या प्रसंगातील काहीच तसे वाटत नाही, कोल्हापूरच्या पार्वती थिएटरचा परिसर दाखवलाय तसा नाही, गाडी चालवताना सीट बेल्ट्स लावलेले नाही. घराचे फाटक कायम उघडेच दाखवलेय, पण या मामुली चुका आहेत. ) पण एकंदर सिनेमा छान. मला तर तो इतर भाषिकाना अभिमानाने दाखवण्याजोगा वाटला.

कदचित मला आवडला होता चित्रपट दिनेशदा Happy आश्विनी भावे आणि सदशिव अमरापूरकर चे काम चांगले झालेय.

कदाचीत चांगला होता. पण शेवटी सदाशीव अमरापूरकरांचा 'मी तिला वाचवू शकलो असतो पण नाही वाचवले' ही कबूली नाही पटली. नायीकेच्या चूकांचे समर्थन करण्यासाठी म्हणून घुसडल्यासारखे वाटले.

लव्ह आज कलः
सगळ्यांनी लिहिलय त्या प्रमाणे नेहेमीच्याच यश राज फिल्स्म च्या अनेक स्टोरीज ची खिचडी , कथा-पटकथा या बाबतीत अगदीच निराशा करणारा !
इम्तियाझ आलीचा टच कमी आणि चोप्रा बॅनर चा चित्रपट जास्त वाटतो..
पण सैफ मुळे खूप सुसह्य होतो चित्रपट Happy
सैफ चे दोन्ही रोल्स झक्कास एकदम, सरदाराच्या गेट अप मधे ही आणि सैफ चा खास हातखंडा असलेल्य' कुठलेही बंधन नको असलेल्या दिलफेक आशिक 'जय' च्या रोल मधेही.. सैssssssफ rocks as always ! Wink
दीपिका मात्र सैफ पुढे अ‍ॅक्टिंग मधे अगदीच मार खाते, दिसते पण अतिशय नि:स्तेज, खप्पड, अ‍ॅनिमिक !
लग्नाच्या साडी मधे तर इतकी वाइट दिसलीये .. (अर्थात करीनाला नाही घेतल हे काय कमी आहे)!
तरुण असतानाची प्रीती झिंटा छान वाटली असती या रोल मधे , कारण राहुन राहुन 'सलाम नमस्ते' ची आठवण येत होती 'लव्ह आज कल' बघताना किम्वा प्रियांका चोप्रा ही बरी वाटली असती !
ऋषि कपुर पण सहीच.. त्याच्या एका वाक्याला प्रचंड अनुमोदन " पुत्तर मै अपनी जमानेमे खतरनाक किसम का हँडसम हुआ करता था" ! So true :).
त्या हरलीन कौर चा रोल केलेली पोरगी ब्राझिलिअन मॉडेल आहे , त्यामुळे अख्या चित्रपटात फक्त एकच डॉयलॉग दिलाय तिला , बाकी वेळ शर्मिली मुलगी म्हणून खपवून दिलय... !

प्रीतम चक्रवर्ती ची २-३ गाणी आवडली 'चोर बझारी दो नैनोकी', 'तन डोले मेरा मन डोले' ची नागिन ट्युन वापरून केलेल रॅप ' ट्विस्ट' आणि शेवटी येणारं पंजाबी पॉप आवडल :).
थोडक्यात सैफ चे फॅन असाल तर नक्की पहा, नाही तर काही फार खास नाही !

सैफ अली खान चा जय आणि वीर दोन्ही लाजवाब... हम तुम नंतर पहिल्यांदाच त्याच्याकडून या दर्जाचा अभिनय बघायला मिळतोय...

<<<
अँक्या,
ओमकारा विसरलास का ???????????
परिणीता आणि रेस ??
डी सी एच, एक हसीना थी, सलाम नमस्ते, परिणीता, हमतुम, ओमकारा, रेस, लव्ह आज कल... सैफ ऑलवेज रॉक्स Happy

मला वाटते सैफने मारलेली सगळ्यात उंच उडी म्हणजे ओमकाराच. तो त्याचा लाईफ टाईम रोल आहे आत्तापर्यन्त तरी.... बाकी काय सस्टेनेबल नाही.

डीजे...
डीसीएच हम तुम च्या आधी होता...
आणि तू म्हणतेयस तसं ओमकारा, स.न. आणि बाकीचे वाईट नव्हतेच... पण हम तुम वॉज हम तुम... आणि मला तरी लव्ह आज कल सैफ चा सेकंड बेस्ट वाटतो...
अर्थात हे माझं मत... Wink

अँक्या,
अरे मला म्हणायचं होत कि ' ओमकारा, परिणीता आणि रेस' :).
बाकीची लिस्ट ओव्हऑल सैफ च्या आवडत्या सिनेमांची .
रॉबिन
ओमकारा: नो डाउट बेस्ट ऑफ सैफ !

'लव्ह आज कल' बघताना किम्वा प्रियांका चोप्रा ही बरी वाटली असती >> हवे तेवढे मोदक.. कॅटरिना पण चालली असती.. नमस्ते लंडन सारखा फिल आला असता.

हरलीन कौर चा रोल केलेली पोरगी ब्राझिलिअन मॉडेल >> ओह्ह.. वाटत नाही पण.. अजुन यायला हव्यात अशा ब्राझिलियन मॉडेल्स Proud

अजुन यायला हव्यात अशा ब्राझिलियन मॉडेल्स
>>
कशाला उगाच...
अभिनय कशाशी खातात हे न कळणार्‍या मेणाच्या बाहुल्या खूप जास्ती आहेत आपल्याकडे...

अजुन यायला हव्यात अशा ब्राझिलियन मॉडेल्स
<<< मुळात 'हरलीन कौर' करण्या साठी कशाला हवी ब्राझिलियन मॉडेल कोणास ठाउक Proud
अशी 'थेट पंजाबी' मुलगी पंजाब मधल्याच गावरान इलाक्यातून आणायची ना !

'थेट पंजाबी' मुलगी पंजाब मधल्याच गावरान इलाक्यातून आणायची ना
>>
मोदक....

मुळात मला काही ती एक्स्ट्रा-ऑर्डिनरी वगैरे वाटली नाही... उलट एक्स्ट्रीमली ऑर्डिनरी वाटली {त्या दिल्ली ६ मधल्या लग्न न झालेल्या आत्याच्या कॅटॅगरीतली.... किंवा ग्रेसी सिंग / प्रिया गिल कॅटॅगरी...}

रंग दे ब्संती, सलामेइश्क मधे गोर्‍या मॉडेल होत्याच.
एक साऊथ आफ्रिकन मॉडेल पूजा भट्टच्या रोग मधे होती. श्रीलंकन मॉडेल अल्लाद्दिन मधे येतेय.

हिंदी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर जातो हे काय कमी आहे?? Proud

मुळात मला काही ती एक्स्ट्रा-ऑर्डिनरी वगैरे वाटली नाही... उलट एक्स्ट्रीमली ऑर्डिनरी वाटली {त्या दिल्ली ६ मधल्या लग्न न झालेल्या आत्याच्या कॅटॅगरीतली.... किंवा ग्रेसी सिंग / प्रिया गिल कॅटॅगरी...}
<<< हाहाहा..बरोब्बर.. दिल्ली ६ ची आत्याबाई कॅटॅगरी ... Rofl

मला तर ती (हरलीन कौर) एक्स्ट्रीमली ऑर्डिनरी पण नाही , हिरॉइन च्या मैत्रीणीं च्या गृप मधे कॅमेराच्या नजरेआड असलेली ' एक्स्ट्रॉ' वाटली Biggrin

त्या आत्याची आठवण नका हो काढू ,तिची कॅटॅगरीच वेगळी!! याच बाफवर त्या आत्यासाठी किती आटापीटा झाला होता Proud

आत्याची आठवण नका हो काढू >> हे हे.. आगाउ Proud
त्यासाठी मी दिल्ली ६ बघणार होतो.. कैच्याकै

त्यासाठी मी दिल्ली ६ बघणार होतो..>> अरे मी त्यासाठी तर दिल्ली ६ बघीतला!! बघीतल्यानंतर आपणच एक काला बंदर आहोत असे वाटले पण ते जाउद्या Wink

'दिल्ली ६'चा शेवट बदलून (म्हणजे काय करून कोण जाणे) कोणत्यातरी फिल्म फेस्टीव्हलला पाठवलाय राक्येश मेहराने..

ग्रेसी सिंगचं अधःपतन पाहून मात्र वाईट वाटलं.. लगान, मुन्नाभाई नंतर बी ग्रेड सिनेमेच का केले तिने? मध्यंतरी ती आणि सिद्धार्थ कोईरालाचा सिनेमा येऊन गेला माहित्ये??????? Uhoh सिनेमे नाही मिळाले चांगले तर करायचे नाहीत.. हे काय बळंच कैच्याकै! Sad

Pages