चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे कुणी Harry Potter चे पंखे नाहीत का
>>

मैं हूं ना...

शनिवारी पाहीन...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

मो, अंकुर, मी ही plan करतीये harry potter 6 बघायचा. पण मला ते picture एवढे नाही आवडले. पुस्तकांच्या ५०% सुद्धा movies मधे नाहीये. Harry potter 5 तर फारच pathetic होता.

आस्मानी...
शंभर मोदक...
४था भाग मला सर्वाधिक आवडलेला सिनेमा (जरी त्यात क्विडिच वर्ल्डकप गुंडाळला होता तरीही....)
आणि ५वा आजिबात न आवडलेला...

सि.प्रा.सातारा रोड ला फक्त हिंदीत आहे Sad
सि.प्रा.कोथरूड किंवा ई वर्ग ला जायला लागणार...

_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

काल Freaky Friday पाहिला. मस्त आहे. लाईट कॉमेडी आहे. एका आई आणि मुलीचं अजिबात पटत नाही. दोघी एकमेकींचे प्रॉब्लेम्स समजून घेऊ शकत नाहीत. एक दिवस एका चिनी स्त्रीने दिलेल्या कुकीज खाल्ल्यामुळे त्यांचे आत्मे स्वाईप होतात. मग त्यांना एकमेकींची आयुष्य समजतात.
मुलीच्या role मधे लिंडसे लोहान आहे. आईचं काम कुणी केलंय ते नाही माहित. पण एकंदर मूव्ही धमाल आहे.

शेवटी पाहीला कंब्खत इश्क, नैतीक जबाबदारी म्हणून नाही. मैत्रीणीला कंपनी म्हणून नी फुकट. १.५ तासात बाहेर आलो. पुढचे बघणे म्हणजे डोकेदुखी होती.
त्या करीनाला पाहून वाटले, अरेरे तिला खायला घाला आधी,कधी चक्कर येवून पडेल भुकेने ह्याचा नेम नाही. हॉरीबल दिसते.
त्या शॉटकट मध्ये उगीच सेक्सी रोल करायच्या नादात अमृता राव ने इतके हॉरीबल कपडे घातलेत पण सूट म्हणून अजिबात होत नाहीत. उपासमारीचा बळी एकदम... Happy ती आपली चुडीदार मधेच बरी.

मला यावेळी भारतभेटीत, "सांगत्ये ऐका" या मराठी सिनेमाची सीडी मिळाली. हा मराठीतला सुपरहिट सिनेमा. तसा मल्टीस्टारर पण.
सुलोचना, हंसा वाडकर, जयश्री गडकर, रत्नमाला, चंद्रकांत, सुर्यकांत, दादा साळवी, लिला गांधी, वसंत शिंदे असे दादा कलाकार. कथा तशी मसालेदार. म्हणजे गावचा पाटील, दरोडेखोर, बैलाची शर्यत, फ़डावरची आणि बैठकीची लावणी, सूड, थोडाफ़ार विनोद असा सगळा मसाला ठासून भरलेला. पण कथेला शेवटी एक जबरदस्त वळण. ( हेच वळण पुढे, जिद्द, नावाच्या सिनेमात दिसले. त्यात डॉ. लागू, जयश्री गडकर, उषा चव्हाण, संजय जोग वगैरे कलाकार होते )

यातली सर्वच गाणी श्रवणीय आहेत. लवकर यावे सिद्धगणेशा, अरे अरे नंदाच्या पोरा, काल राती बाई मजसी, झाली पहाट, दिलवरा दिल माझे ओळखा, सांगा या वेडीला, केले तुका अन झाले माका, धौम्य ऋषी सांगतसे सर्वच गाणी उत्तम. बुगडी माझी सांडली गं, पण यातलीच. आशा आणि मधुबाला चावला यानी सर्वच गाणी छान गायली आहेत.
सर्व कलाकारंचा अभिनय अगदी नैसर्गिक. अत्यंत कृत्रिम अभिनयाचे व्ही शांतारामांचे चित्रपट आणि अनंत माने यांचे मसालेदार असले तरीही नैसर्गिक अभिनयाने नटलेले चित्रपट, एकाचवेळी प्रदर्शित होत होते. या चित्रपटातल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष वेधून घेतात. अगदी फ़ेटा बांधण्यापासून, चहा ओतण्यापर्यंत सगळेच कसे नेमके.

यातली नृत्ये पण खास आहेत. अरे अरे नंदाच्या पोरा मधे, पडद्यावर हंसाबाई असल्या तरी, काहि अवघड गिरक्या, नृत्य दिगदर्शिका लिला गांधीने घेतल्या आहेत. (त्यासाठी खास लॉंग शॉट्स घेतले आहेत ) जयश्री गडकरचा हा बहुदा पहिला सिनेमा. तिचेहि नाच छानच आहेत.

लोकाना वाटते तसा हा सिनेमा, हंसा वाडकर यांच्या याच नावाच्या वादग्रस्त आत्मचरित्रावर आधारीत नाही. हे पुस्तक मग आले. या पुस्तकावर स्मिता पाटीलचा, भुमिका हा सिनेमा आधारीत होता.

लहानपणी कोल्हापूरला हे सिनेमे आईबरोबर त्या आलिशान थिएटरांमधे बघितले होते. त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. याच बरोबर, केला इशारा जाता जाता ची पण सिडी मिळाली. त्या काळी गाजलेले चित्रपट, एक गाव बारा भानगडी, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, पवनाकाठचा धोंडी, डोंगरची मैना, मुक्काम पोष्ट ढेबेवाडी, टिळा लावते मी रक्ताचा, हर्‍या नार्‍या जिंदाबाद, चोरीचा मामला, मला तुमची म्हणा, अशी हि सातार्‍याची तर्‍हा, गणानं घुगरू हरवलं, सख्यासजणा. मल्हारी मार्तंड असे अनेक सिनेमे सिडीवर उपलब्ध व्हायला हवेत.

'गणानं घुंगरू हरीवलं' रीदम हाउसमध्ये २ महिन्यांपूर्वी बघीतली होती.

हे पार्ल्यात टाकलं होतं , इथे पण टाकतेय. लवकर मदत हवीय.

सुप्र पार्ले
राज कुमारचा 'जानी' डायलॉग असलेला व्हिडिओ यू ट्युब वर कोणाला माहित आहे का? किंवा इतर कुठे. ऑफिस मधे दाखवायचाय .लवकर सांगा प्लीज.

संपादन slarti | 17 जुलै, 2009 - 08:08
हे घे -
http://www.youtube.com/watch?v=0dxT4wxis7Q

***
जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी

slarti | 17 जुलै, 2009 - 08:22
आणि हाही घे गंमत म्हणून - http://www.youtube.com/watch?v=Fjwb1W5roi8
वक्तमधले हे दोन एकत्रच ऐकायचे येतात

***
जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी

shonoo | 17 जुलै, 2009 - 08:47
हा पाहिला मी . पण यात ' जानी' असं नाही ना म्हणत तो. दात चावत, बद्धकोष्ठ झाल्यासारखा चेहरा करुन ' जा..नी' म्हणतो ते हवंय.
मग ' जानी रिश्तेसे तो हम तुम्हारे बाप लगते हैं' हा ड्वायलॉक कोणाचा ?

संपादन cinderella | 17 जुलै, 2009 - 08:49
'रिश्तेसे तो हम तुम्हारे बाप लगते हैं....नाम है शेहेनशहा' हा अमिताभ बच्चनचा शेहेनशहा मधला "डायलॉग" आहे.

psg | 17 जुलै, 2009 - 08:52
शोनू, 'तिरंगा' नावाच्या सिनेमात आहेच बरेच 'जानी'.. आणि वक्तमध्ये आहे ना- जिनके घर शीशेके होते है, वो पत्थर नही फेका करते जानी.. नाहीये?

---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

shonoo | 17 जुलै, 2009 - 08:54
वक्त मधला डायलॉग दिलाय स्लार्टीने - त्यात तो चिनायसेठ म्हणतो. जानी नाही

slarti | 17 जुलै, 2009 - 08:57
ओके गाटिट ! सिंडी बरोबर आहे. तो बाप बच्चन आणि जानी हा राजकुमार. पण वक्तातल्या त्या दोन्ही संवादांत 'जानी' नाहीये हे खरं तिरंग्यातले संवाद बघितलेस का ?

***
जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी

naynishv | 17 जुलै, 2009 - 09:09 नवीन
तिरंगा मध्येच त्यानी "जानी" जास्त वेळा म्हंटलय. काय योगायोग, कालच बाबांना आवडतो म्हणुन राजकुमार चा बुलंदी घेऊन आलो. त्यात पण भन्नाट डायलॉग आहेत. "लक्षमी सरस्वती को कभी खरीद नही सकती", "आय न्नेवर एक्सप्लेन", " हमको मिटा सके....." वगैरे.

shonoo | 17 जुलै, 2009 - 09:15 नवीन
एक दोन पाहिले पण त्यात पण 'जानी' नाहीये...
फारेंड, डीजे, अँकी कुठे आहात ?

मागे "कंबक्त इश़क" पहिला. नशिब थेअटर मधे आणि बायको सोबत!!
परंतु घरच्यांसोबत बघण्यासरखा नाही. स्टोरी चा पत्ता नाही, मुलींनो बघु नका. आणि घरच्यांसोबत तर नकोच नको. आपल्या लहान पोरांना सांभाळा, नको ते प्रश्ण विचारतील हं!!!

राजकुमारचा तो डिटेक्टिव्ह च्या भुमिकेत असलेला एक पिक्चर मला आठवतोय्..त्यात मोलकरणिच्या भुमिकेत रिमा लागु आहे. नाव काहि केल्या आठवत नाहिये.त्यात हिरोईनचा ( पुनम धिल्लन?)खुन करुन वरुन फेकलेल असत आत्म्हत्या आहे अस भासवण्यासाठि..बाकि काहि आठवत नाहिये..बघा कुणाला आठवतोय का?

प्राजक्ता,
पुलिस पब्लीक ?

राज कुमार चा बुलन्दी म्हणुन एक सिनेमा होता.. त्यात 'हमको मिटा सके जमाने मे दम नही'.. हा डाय्लोग आहे..बहुतेक त्यात जानी म्हंटले आहे.

येस! बहुतेक तोच असावा! शोनु बघ त्याचि व्हि.लिंक मिळतेय का? त्यात राजकुमार लिड भुमिकेत होता.

मरते दम तक मध्ये आहे का हा डॉयलॉग ?
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

बुलन्दी चांगला चित्रपट होता. त्यात डॅनी डेंजोग्पाने(होहो म्हणजेच आपला डॅनी ) राजकुमारला चांगली अभिनयाची लढत दिली आहे.

बाय द वे डॅनी ने गायलेले हिन्दी चित्रपट गीत आठवते का? Proud

शोनू, शोधतो.

रॉबिन, ते "तू चली जा" असे काहीतरी शब्द असलेले अंधुक आठवते. तेच का?

सुनो सुनो कसमसे, लागु तेरे कदम्से, ना उलझ रे हमसे.. तु चली जा.. डेनी आणि आशा

-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे

कंबख्त इष्क बद्दल हा अत्यंत फडतुस, स्टुपिड, मेडिकल प्रोफेशन ची वाट लावणारा बिनडोक चित्रपट आहे !
बाकी काही लिहिण्या सारख नाही पण एक आवर्जून लिहिते Proud

त्या करीनाचा साइझ झीरो, बारीक असल्याची चर्चा होतेय खरी पण ते सगळं थोडे फार कपडे अंगावर असे पर्यंत ठिक आहे !
पण swimsuit मधे अजिबात flawless athletic figure दिसत नाही ..उगीच नाही ते क्लोज अप्स घेतल्यावर body fats अगदी ठळक दिसतात .. swim suit models सारखी अजिबाsssत दिसत नाही, अगदीच lousy दिसते!
या उलट फॅशन मधल्या मुग्धा गोडसे ला पहा, त्याला म्हणतात 'Perfect swimsuit model material' !

Happy हो हो!! त्या प्रोमोज मधे स्विम सूट मधल्या करीनाचा गवगवा केला तेव्हाच ते नोटिस केले होते!! अज्जिबात चांगली दिसत नाही करीना त्यात! फिगर विचित्र, आउट ऑफ प्रपोर्शन दिसते ! Uhoh

हो हो, हे गाने डॅनीचे आहे खरे. मला दुसरेच म्हणजे डॅनीचे पहिले गाणे लता मंगेशकरांबरोबर आहे ते म्हनजे ' मेरा नाम आओ ..' 'ते गुलिस्तां हमारा मधलं.....

खुप वर्षांपूर्वी " येह है आशा " असा एक कार्यक्रम दूरदर्शनवर झाला होता. त्यात डॅनी व आशाने एक नेपाळी गाणे गायले होते. बाशिन गन बारा, असे काहितरी शब्द होते. मग याच चालीवर, लता किशोरचे एक गाणे आले

त्याचे शब्द काहिसे असे होते

घर से निकले वो संग संग मेरे
बैठ गये थोडीही दूर चलके
तूम क्या जानो, मै तुमसे
मिलने आया हु किनती दूर चलके

सिनेमा आठवत नाही.

कंबख्त इश्क हा तेलुगु चित्रपट 'ब्रम्हचारी' वर आधारीत दिसतो. ब्रह्मचारीमध्ये कमल हसन आणि सिमरन आहेत. हा mass comedy movie आहे. मूळ चित्रपट तमिळ आहे पण नाव माहीत नाही. ज्यांना साउथ चित्रपट/कॉमेडी पचवायची सवय असेल त्यांनी ओरिजिनल नक्की पहावा. TP आहे.

आत्ताच (आधी चौकशी न करता) The Hangover (का ?) बघितला. बॅचलर पार्टीसाठी वेगसला गेलेले चार मित्र, त्यातल्या एकाचे अपहरण आणि शोध असे कथानक आहे. अनेक उचापती करुन शेवटी ते त्यातल्या एकाच्या लग्नाला पोचतात की नाही ते सांगायला हवे का ? बहुतेक सर्व चित्रपटभर आचरट विनोद आहेत. भाषा एकदम "सुमधूर" Wink एकही संवाद "फ"कारांती शब्दाशिवाय पूर्ण होत नाही. अगदी मोजक्या १-२ प्रसंगात अफलातून विनोदी आहे. ब्रॅडलि कूपरचे कॅरेक्टर लग्न झालेले आणि एक मुल असलेले बघुन कसेसेच झाले Wink

*** TBS वर दाखवतीलच थोड्या दिवसांत. तेव्हा दुसरे काही बघण्यासारखे नसल्यास आणि मुलं आजूबाजूला नसल्यास बघा.

मला कथावस्तू चान्गली असणारे चित्रपट आवडतात. आता मुलाना या impressionable वयात काय दाखविणार? कं . इश्क/ शॉर्टकट? त्यापेक्षा ती HSM series बरी वाटते. सुरक्षित करमणूक. मुले अभ्यास करून नीट शिकतात, मजा करतात. नाचतात. गाणी म्हणतात. त्यान्चे issues नीट handle केलेले आहेत.

"कंबक्त इश़क" का चालला माहितीये?
चित्रपट पाहिल्या नंतर थेअटर बाहेर आलो तेंव्हा एक मुलगी बाहेर येवुन दुसरी ला म्हणाली " मी होस्टेल मध्ये सगळ्यांना सांगेल कि, हा चित्रपट पाहु नका, अगदिच पांचट आहे."
याला म्हणतात "अँटी पब्लिसिटी". म्हणुन लोक जास्तच पाहतात.
आणि थेअटर मध्ये तरुणांचीच संख्या जास्त जाणवते.
आणि बहुतेकंना फिगरशी घेणे देणे नसते. आणि मला सांगा जर करिनाची फिगर चांगली असती तर तुमची प्रतिक्रिया काय असती?
मी या अगोदर संपुण॑ चित्रपटा बद्द्लच लिहले. स्टोरी, दिग्द॑शन आणि वैचरिक पातळी अगदिच गलिच्छ आहे.
तुम्हा काय वाटते???? बरोबर आहेना?

"कंबक्त इश़क" लै बोगस हाय.
खर सांगयच तर तुमच बरोबर आहे.

He is just not that into you

जरूर पाहा. "Total chick-flick" म्हणतात त्या प्रकारचा पण सगळ्यांना बघण्यासारखा आहे. मस्त कॉमेडी. बरीच गँग आहे आणि सगळ्यांची कामे मस्त झाली आहेत.

आईचं काम कुणी केलंय ते नाही माहित. >>> अस्मानी, ती जेमी ली कर्टिस. तिचा 'A fish called Wanda' हा ही मस्त आहे. अर्नॉल्ड बरोबरचा 'True Lies' हा ही आहे, पण मला फारसा आठवत नाही.

लिंडसे लोहन तर खूप छान दिसली यात. आता भकास दिसते.

मग आई वडील, मुल, यांच्या सोबत सिनेमा ला जाऊ शकता?
मुंलाना त्याचा अर्थ सांगु शकाल? ती का जाते लॉज मध्ये? कमी कपड्या मध्ये ती छान दिसते असे आई वडिलांना सांगाल?
जरा विचार करा!!!

Pages