चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे , मामी संजय लीला त्या हळुवार चित्रपटाची पार वाट लावून टाकील. इतका झगमगाट करील की त्याचा आत्मा पार दबला जाईल. व राहील सजवलेले एक कलेवर. देवदासची कशी वाट लावली पाहिले नाही का?

ते आहे म्हणा. आमिर खान स्वतःच करू शकेल पण रीमेक? इज्जत का फालूदा है ना... उस्के लिये?

परवाच कुठल्यातरी चॅनलवर दाखवत होते की 'कागज के फूल'चा रिमेक येतोय; गुरुदत्त म्हणुन आमीर खान आणि वहिदाच्या रोलमधे चक्क कतरिना कैफ Uhoh
माझा मनातला आयडीअल रिमेक आहे 'फेस:ऑफ'चा शाहरुख आणि आमीरला घेउन,किंवा 'क्रिमसन टाईड'चा अमिताभ आणि आमीर बरोबर.मला कुठलाही चांगला इंग्रजी सिनेमा पाहिला की याच्या 'हिंदी रिमेकचे कास्टींग' हा विचार करायला फार आवडते. Happy
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आजच्या पुणे टाइम्स ची एक खबर वाचून जोरदार झटका लागला....

जुन्या गोलमाल च्या रीमेक मधे अमोल पालेकर चा रोल तुस्शार कपूर करणार...

एखाद्या क्लासिक चा असा घोर अपमान का करतात हे लोक...?
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

भन्साळी गाइडचा नवनीत गाइड करुन टाकेल. परिंदा वगैरेचा असिस्टन्ट डायरेक्टर असताना भन्साळी साहेब काही शिकले का नाही असे वाटते. त्या राजु गाइडची झोपडी म्हणुन निळ्या धूसर रंगातला महाल दाखवेल तो.

टण्याशास्री ग्रेट. मला फार जोरात हसायला आले. नवनीत गाइड खीखीखी: तुम्ही नक्की दहावीत अ तुकडीत असणार.

वहिदा च्या जागी कतरीना? अरेरे सुन्दर मुलगी आहे म्हनोन काहिही? पण सिनेमाचे नाव एका अर्थी सार्थ होइल.

बाप रे गाइड चा रीमेक भन्साली ? Biggrin
मग रोझी निळ्या बॅक्ग्राउंड ला'कांटोसे खीच एक ये आँचल' ला लांब च्या लांब आँचल फरपटवत टांग्या मागे धावेल !

अहो जर गाइडमध्ये वहिदाच्या जागी ऐश्वर्याला घेणार असाल तर कागज के फूलमध्ये कत्रिना का नाही Happy नाहीतरी दोघीही ढिम्मच आहेत अभिनयात. कतरीना दिसायला तरी चांगली आहे ऐश्वर्यापेक्षा Proud

तुम्ही नक्की दहावीत अ तुकडीत असणार.
>> Lol
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

कतरीना दिसायला तरी चांगली आहे ऐश्वर्यापेक्षा >> टण्या हवे तेवढे मोदक Happy
दहावीत अ तुकडीत >> Proud

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

>>अहो जर गाइडमध्ये वहिदाच्या जागी ऐश्वर्याला घेणार असाल तर कागज के फूलमध्ये कत्रिना का नाही नाहीतरी दोघीही ढिम्मच आहेत अभिनयात. कतरीना दिसायला तरी चांगली आहे ऐश्वर्यापेक्षा >> टण्या तुमच्या या दोन्हीवाक्यांसह तुम्हाला २ लाख मोदक.... Happy

संलीभ च्या प्रत्येक सिनेमात हे लांब लांब पदराचे फार लाड असतात. मग त्याने भांडी पड्तात. आगी लागतात. सारी घरे एकदम भली मोठी. पड्दे केवढेतरी. आणी लोक साधे काही बोलतच नाहीत.

ऐश्वर्याला अ‍ॅक्टींग येत न्न्न्न्न्न्न्न्न्नाई. पण वय व न्रुत्यकौशल्यामुळे वाट्ले ती फिट बसेल. जरी ती सुन्दर दिस्ली तरी. कतरीना गोड परी. पर्‍या कधी काही करतात का? मग वहीदा ऐवजी कंकणा सेन? कुच जम्या नहिं

शिवाय आमिर ऐश्वर्या जोडी मुळातच विजोड आहे त्यामुळे त्यान्चे फाटले तर खरे वाटेल.

पर्‍या कधी काही करतात का >> पर्‍या काही करत नाही हो.. पण त्यांच्यामुळे लोक बरेच काही करायला प्रवृत्त होतात त्याचे काय ? Proud

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

मग त्यान्च्या परिणीता होतात का?

संलीभ च्या प्रत्येक सिनेमात हे लांब लांब पदराचे फार लाड असतात. मग त्याने भांडी पड्तात. आगी लागतात. सारी घरे एकदम भली मोठी. पड्दे केवढेतरी. आणी लोक साधे काही बोलतच नाहीत.

>>> एकदम सही. मामी तुम्ही पूर्ण विश्लेषण करा त्याच्या एक दोन चित्रपटांचे, वाचायला आवडेल.

पब्लीक एनिमीज पाहिला काल. जॉनी डेप माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक.
अंडरवल्डला ग्लोरीफाय सगळेच लोक करतात पण ह्या पिक्चरमधून नेमक काय सांगायचे आहे हे शेवटपर्यंत कळत नाही.
अमेरिकन गॅंगस्टर मध्ये निदान डॅन्झलचे पूर्ण जिवन उभे राहिले आहे, इथे तसे नाही. फेडरल ब्युरो का स्थापण झाला? हे कारण दाखवन्यासाठी केलेला पिक्चर वाटतो.

ठिक आहे. २ १/२ तारे.

काही नवीन सुचना..
(आणि यातील एकाही निर्मितीच्या आसपास संजय लीला भन्सालीला फिरकु द्यायचे नाही Happy

फेस ऑफ- आमिर खान्/शाहरुख खान (दोघेही सारख्याच उंचीचे म्हणजे बुटके आहेत.. Happy )
फॉरेस्ट गंप - आमिर खान
द रॉक - अमिताभ, शाहरुख खान
लीगली ब्लाँड - करीना कपुर (किंवा नवा चेहरा..)
बिग- आमिर खान

लीगली ब्लाँड मधे किडनॅपची हिरॉइन चांगली वाटेल. तिला पण अ‍ॅक्टिंग करायचे कष्ट पडणार नाहीत.

अगदी.

होम वर्क देऊन मुम्बैस जात आहे.

गल्लीतील गाइडः राम गोपाल वरमा. तुशार कपूर, अंतरा माळी, अनील कपूर.
गाइड नं वन : डेवीड धवन हुमा खान, गोविन्दा, कादर खान.

'द रॉक' चा कयामत नावाचा एक महान हिंदी रिमेक येउन गेला आहे.

मनस्मी बिग खरच अप्रतिम सिनेमा आहे. एक तर कथा एकदम हटके आहे आणि टॉम हँक्सनी काय सही काम केलय. त्याचा कास्ट अवे बघितल्यावर सुन्न व्हायला होतं.
एंजल्स आणि डेमन्स शक्यतो बघुच नका. पुस्तक वाचलं असल्यास मुळ्ळीच बघु नका. माझी खुप निराशा झाली. आता विंची कोड बघणारच नाही. त्यापेक्षा पुस्तक परत वाचेन.
(कॉलेजात आमच्या ग्रुपमधे सिनेमा वाईट्ट असला की "कुणी फुकट दाखवला तरी बघु नको" असं सांगायचो. त्यात हा येतो.)

माझ्या ड्रीम रिमेकमध्ये दोन सिनेमे मला पट्कन आठवतात.
१)'शंकराभरणम' या तेलुगु चित्रपटाचा रिमेक ची घोषणाही झाली होती. सोमय्यांजुलु आणि मंजू भार्गवी यांच्यासाठी पर्यायही त्यांच्या पेक्षाही जबरी होते. दिलीप कुमार आणि रेखा! पण काय माशी शिंकली अन ते झाले नाही त्याऐवजी गिरीश कर्नाड आणि जयाप्रदाला घेऊन तो सूर संगम नावाने निघाला. तो चांगला होता पण मूळ चित्रपटाची सर नव्हती.
२)'फेडोरा' चा रिमेक रेखाला घेऊन निघणार होता. फेडोराची कथा ज्याना माहीत आहे त्याना हिन्दीत रेखाशिवाय दुसरे नावच सुचू शकणार नाही एवढी ती भूमिका फिट्ट होती. पण मूळ फेडोरा , त्याचे रिलीज अन त्याचे हक्क याचा प्रचंड लोच्या झाला. आणि बर्‍याच देशात फेडोरा रिलिजच झाला नाही. पुण्यात अलकाला मी तो पाहिला होता. आठवडाभरच होता. सध्या माझ्याकडे जी प्रत आहे ती इंग्रजी नाही अन फ्रेंच की स्पॅनिश की इटालियन आहे तेच कळत नाही.

लीगली ब्लाँड मधे किडनॅपची हिरॉइन चांगली वाटेल. तिला पण अ‍ॅक्टिंग करायचे कष्ट पडणार नाहीत.
--------------------------------------------------------------------------------
संपुर्णपणे असहमत..
रीस विदरस्पुन ने यात अतिशय सुंदर अभिनय केला आहे..एखादी बथ्थड अभिनेत्री या रोल मधे नाही टिकु शकणार..

एंजल्स आणि डेमन्स शक्यतो बघुच नका. पुस्तक वाचलं असल्यास मुळ्ळीच बघु नका. माझी खुप निराशा झाली. आता विंची कोड बघणारच नाही. त्यापेक्षा पुस्तक परत वाचेन.
>> srk ला मोदक

लीगली ब्लाँड मधे करीना चालेल. तिथे हिरॉइनला स्टाइल, अ‍ॅटिट्यूड आणि अ‍ॅक्टिंग(dumbness) तिन्हीही हवे (though I hate kareena)

मी पुस्तक वाचलेले नाही (म्हणुनच की काय :)) मला स्वतःला एंजल्स आणि डेमन्स खूप आवडला. सही थ्रिलर होता. टॉम हॅक्सचे काम नेहमीप्रमाणेच उत्तम होते.

एंजल्स आणि डिमन्स आणि द विंची ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये इतक्या गोष्टी घडतात आणि एवढे रेफरन्सेस आहेत की ते सगळे २-३ तासांच्या सिनेमात सामवणे अवघडच होते.
दोन्हीही पुस्तके छानच असल्याने पुस्तक वाचलेल्या लोकांच्या सिनेमाकडून जरा जास्त्/वेगळ्या अपेक्षा होत्या. कदाचित त्यामुळेच पुस्तक न वाचता सिनेमा पाहिल्यावर जास्त चांगल वाटला असेल. (पाटी कोरी ठेऊन गेल्यामुळे)

मो ला अनु मो दन करीना च्या बाबतीत. ती उगीच्च माना वेळावून बोलू लागली की मला कसेतरीच होते. ( थोडे जेलस?) ती आणी ऐश्वर्या राय आगाउ आणी शिष्ट आहेत काही कारण नसताना. त्या मानाने कतरिना चा स्वभाव गोड आहे. माझी परी ती! ( आता असे म्हणणे लीगल आहे ना!) लीगली ब्लाँड मधला हीरो पण स्वीट आहे.

गाइड चा south remake: असिन, सिद्धार्थ, वेन्कटेश. होमवर्क केले नाही कोणी? जान्दो. मजे करो

मन्स्मी१८, खरंच रीस विदरस्पूननं मस्त काम केलंय legaly blonde मधे.
मो, style attitued acting च्या जोडीला इनोसन्स सुद्धा पाहिजे ह्या भूमिकेला माझ्या मते. पण तरीही करीनाच त्यातल्यात्यात ok.

अरे माधुरी ला घेऊन कुठला रिमेक नाही का? मनस्मींचे रिमेक आवडले. Happy द रॉक आधीच झालाय म्हणा. पण हिंदीवाले बहुतेकवेळा वाटच लावतात रिमेक ची.. 'माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग' मला खुप आवडतो पण हिंदीत त्या यश चोप्राच्या मुलाला घेऊन बनवला गेला आणि १५मि. पण बघवला नाही त्याला. Sad नशीब (माझ्या लाडक्या) जुलिया रॉबर्ट्स ने पाहिला नाही तो सिनेमा. 'प्रिटी वूमन' पण आला असेलच हिंदीत.

Pages