होममेड चॉकलेट

Submitted by वर्षा_म on 15 September, 2011 - 02:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१] व्हाईट चॉकलेट स्लॅब
२] मिल्क चॉकलेट स्लॅब
३] डार्क चॉकलेट स्लॅब

फिलींगसाठी आवडीनुसार ड्रायफ्रुटस , मध , वेफर , राईस बॉल ( बाजारात मिळतात )

चॉकलेट मोल्ड , चॉकलेट रॅपर.

01.jpg02.jpg021.jpg022.jpg

क्रमवार पाककृती: 

03.jpg04.jpg05.jpgलेयर चॉकलेट
१] १२५ ग्रॅम व्हाईट चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करुन मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा. (नंतर गरज पडली तर १० सेकंदाच्या अंतराने ठेवा.)

२] चांगले घोटुन साच्यांमधे अर्धा साचा भरेल असे ओता. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ). यामुळे हवेचे बबल असतील तर निघुन जातील.

३] फ्रीजरमधे साचा ठेवा. ( साधारण मिनीटा दोन मिनीटात सेट होते )

४] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

५] घोटुन आधी व्हाईटाचॉकलेट टाकलेल्या साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).

६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.

७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा.

८] रॅपरच्या भानगडीत न पडता मटकवा Happy

बदाम चॉकलेट

१] प्रत्येक बदामाला बत्त्याने एक ठोसा द्या. ( मिक्सरने हा इफेक्ट येत नाही )

२] मावेमधे रोस्ट करुन घ्या. थंड होउ द्या.

३] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

४] रोस्टेड बदाम आणि वितळलेले चॉकलेट नीट मिक्स करा.

५] साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).

६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.

७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा. चॉकलेट तयार. रॅप करा किंवा तसेच ठेवा.

071.jpg072.jpgचॉकलेट बाउल

१] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

२] एका स्टीलच्या वाटित मिश्रण ओता. हलकेच वाटी गोल फिरवत आतल्या बाजुला युनीफॉर्म लागेल अशा पध्दतीने वाटी फिरवत रहा. थंड झाले की फ्रीजरमधे १ तास ठेवा.

३] हलकेच टॅप करुन चॉकलेटची वाटी काढा.

08.jpg081.jpg082.jpg

वाढणी/प्रमाण: 
भरपुर
अधिक टिपा: 

चॉकलेट स्लॅब तिन प्रकारात उपलब्ध आहेत. मी मोर्डे कंपनीचे वापरते. त्यावर किंमत लिहीलेली नसते. दुकाणदार फसवनुक करतात. म्हणुन खाली साधारण किंमत दिली आहे)
१] व्हाईट चॉकलेट ५०० ग्रॅम ( १२० रुपये )
२] मिल्क चॉकलेट ५०० ग्रॅम (११० रुपये )
३] डार्क चॉकलेट ५०० ग्रॅम ( ११० रुपये )

१] चॉकलेट धुण्यासाठी गरम पाणी वापरु नका. मोल्ड वितळतो ( स्वानुभव Proud )
२] सुरवातीला डीझाईनचे मोल्ड वापरुन चॉकलेट करताना मजा येते. नंतर ते कंटाळवाने आणि वेळखाउ काम वाटाते. म्हणुन कॅटाबरी , किटकॅटच्या आकाराचे मोल्ड आणले तर वेळ वाचतो. आणि पटापट तुकडे करुन चॉकलेट मटकवता येतात.
३] मावे नसेल तर डबल बॉयलर पध्दतीने चॉकलेट वितळुन घेता येते. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेउन त्यात चॉकलेट घातलेले छोटे भांडे अलगद वर बसेल असे ठेवावे. पाण्याच्या वाफेवर चॉकलेट वितळणे अपेक्षीत आहे.
४] सगळ्यात महत्वाचे हे सगळे करताना चॉकलेटला पाणी लागु देउ नका. नक्की कशा प्रकारे खराब होते त्याचा अनुभव नाही Happy
५]तयार चॉकलेट फ्रीजरमधे न ठेवता फ्रीजमधे ठेवावे. (उन्हाळ्याशीवाय फ्रीज बाहेरही नीट रहातात.)
६]फिलींगची चॉकलेट करायचे असेल तर साच्याला सगळीकडुन चॉकलेटचा लेयर देउन फ्रीजरमधे १-२ मिनीट ठेवल्यावर फिलींग टाकुन वरुन मेल्टेड चॉकलेट टाकावे आणी १५ मिनीट फ्रीजरमधे ठेवावे.
७]काल मोर्डेचे डार्क चॉकलेट दुकानात अ‍ॅवेलेबल नव्हते. त्याने दुसर्‍या कंपनीचे दिले. त्यावर किंमत १८५ होती. मला ९५ ला दिले. ( म्हणजे लेबलवर जाउ नका. फोटोत कंपनीचे नाव स्पष्ट दिसन नाही. मी उद्या लिहीते).
८] वेगवेगळे ड्रायफ्रुटस, वेफर, राईस बॉल्स वापरुन ट्राय केले. पण माझ्या घरी सगळ्यात जास्त लेयर चॉकलेट आणि बदाम चॉकलेटच आवडले.
९]चॉकलेट मोल्ड नसेल तर आईस ट्रे वापरु शकता. नाहीतर सरळ छोट्या ताटलीत मोठे चॉकलेट करुन हाताने तुकडे करायचे Proud
१०]वाटी प्रत्येकवेळी जमेलच असे नाही. नाहीच जमली तर पुन्हा वितळायच्या भानगडीत पडु नये. तसेच खाउन संपवावी. माझी २ वेळा जमली. पण काल करताना क्रॅक घेला Sad
११] चॉकलेट स्लॅब, साचे, रॅपर कुठे मिळतात? >> पुण्यामधे मंडईजवळ नॅशनल टी डेपो आणि त्याच्या जवळपासची २-३ दुकाने. कोथरुडमधे प्रतिज्ञा हॉलच्या रोडवर पाटाणकर खाउअवालेंच्या दुकानाजवळ एक ड्रायफ्रुटचे दुकान आहे त्यांच्याकडे असतो. सहसा ड्रायफ्रुटसच्या मोठ्या दुकानात.

माहितीचा स्रोत: 
१५ मिनीटाचा बेसिक कुकीग क्लास आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा खुप छान सविस्त्र माहिती दिली आहे तुम्ही. चॉकलेट स्लॅब माहाग वाटल्या तरी माहाग नाही वाटत कारण रेडीमेड चॉकलेट कितीतरी माहाग असतात.एकच विचारते स्लॅब ५००गॅमची असते अन प्रमाण १००गॅम तर अंदाजे पाचवा भाग घ्यावा का?

Pages