१] व्हाईट चॉकलेट स्लॅब
२] मिल्क चॉकलेट स्लॅब
३] डार्क चॉकलेट स्लॅब
फिलींगसाठी आवडीनुसार ड्रायफ्रुटस , मध , वेफर , राईस बॉल ( बाजारात मिळतात )
चॉकलेट मोल्ड , चॉकलेट रॅपर.
लेयर चॉकलेट
१] १२५ ग्रॅम व्हाईट चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करुन मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा. (नंतर गरज पडली तर १० सेकंदाच्या अंतराने ठेवा.)
२] चांगले घोटुन साच्यांमधे अर्धा साचा भरेल असे ओता. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ). यामुळे हवेचे बबल असतील तर निघुन जातील.
३] फ्रीजरमधे साचा ठेवा. ( साधारण मिनीटा दोन मिनीटात सेट होते )
४] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.
५] घोटुन आधी व्हाईटाचॉकलेट टाकलेल्या साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).
६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.
७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा.
८] रॅपरच्या भानगडीत न पडता मटकवा
बदाम चॉकलेट
१] प्रत्येक बदामाला बत्त्याने एक ठोसा द्या. ( मिक्सरने हा इफेक्ट येत नाही )
२] मावेमधे रोस्ट करुन घ्या. थंड होउ द्या.
३] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.
४] रोस्टेड बदाम आणि वितळलेले चॉकलेट नीट मिक्स करा.
५] साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).
६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.
७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा. चॉकलेट तयार. रॅप करा किंवा तसेच ठेवा.
चॉकलेट बाउल
१] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.
२] एका स्टीलच्या वाटित मिश्रण ओता. हलकेच वाटी गोल फिरवत आतल्या बाजुला युनीफॉर्म लागेल अशा पध्दतीने वाटी फिरवत रहा. थंड झाले की फ्रीजरमधे १ तास ठेवा.
३] हलकेच टॅप करुन चॉकलेटची वाटी काढा.
चॉकलेट स्लॅब तिन प्रकारात उपलब्ध आहेत. मी मोर्डे कंपनीचे वापरते. त्यावर किंमत लिहीलेली नसते. दुकाणदार फसवनुक करतात. म्हणुन खाली साधारण किंमत दिली आहे)
१] व्हाईट चॉकलेट ५०० ग्रॅम ( १२० रुपये )
२] मिल्क चॉकलेट ५०० ग्रॅम (११० रुपये )
३] डार्क चॉकलेट ५०० ग्रॅम ( ११० रुपये )
१] चॉकलेट धुण्यासाठी गरम पाणी वापरु नका. मोल्ड वितळतो ( स्वानुभव )
२] सुरवातीला डीझाईनचे मोल्ड वापरुन चॉकलेट करताना मजा येते. नंतर ते कंटाळवाने आणि वेळखाउ काम वाटाते. म्हणुन कॅटाबरी , किटकॅटच्या आकाराचे मोल्ड आणले तर वेळ वाचतो. आणि पटापट तुकडे करुन चॉकलेट मटकवता येतात.
३] मावे नसेल तर डबल बॉयलर पध्दतीने चॉकलेट वितळुन घेता येते. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेउन त्यात चॉकलेट घातलेले छोटे भांडे अलगद वर बसेल असे ठेवावे. पाण्याच्या वाफेवर चॉकलेट वितळणे अपेक्षीत आहे.
४] सगळ्यात महत्वाचे हे सगळे करताना चॉकलेटला पाणी लागु देउ नका. नक्की कशा प्रकारे खराब होते त्याचा अनुभव नाही
५]तयार चॉकलेट फ्रीजरमधे न ठेवता फ्रीजमधे ठेवावे. (उन्हाळ्याशीवाय फ्रीज बाहेरही नीट रहातात.)
६]फिलींगची चॉकलेट करायचे असेल तर साच्याला सगळीकडुन चॉकलेटचा लेयर देउन फ्रीजरमधे १-२ मिनीट ठेवल्यावर फिलींग टाकुन वरुन मेल्टेड चॉकलेट टाकावे आणी १५ मिनीट फ्रीजरमधे ठेवावे.
७]काल मोर्डेचे डार्क चॉकलेट दुकानात अॅवेलेबल नव्हते. त्याने दुसर्या कंपनीचे दिले. त्यावर किंमत १८५ होती. मला ९५ ला दिले. ( म्हणजे लेबलवर जाउ नका. फोटोत कंपनीचे नाव स्पष्ट दिसन नाही. मी उद्या लिहीते).
८] वेगवेगळे ड्रायफ्रुटस, वेफर, राईस बॉल्स वापरुन ट्राय केले. पण माझ्या घरी सगळ्यात जास्त लेयर चॉकलेट आणि बदाम चॉकलेटच आवडले.
९]चॉकलेट मोल्ड नसेल तर आईस ट्रे वापरु शकता. नाहीतर सरळ छोट्या ताटलीत मोठे चॉकलेट करुन हाताने तुकडे करायचे
१०]वाटी प्रत्येकवेळी जमेलच असे नाही. नाहीच जमली तर पुन्हा वितळायच्या भानगडीत पडु नये. तसेच खाउन संपवावी. माझी २ वेळा जमली. पण काल करताना क्रॅक घेला
११] चॉकलेट स्लॅब, साचे, रॅपर कुठे मिळतात? >> पुण्यामधे मंडईजवळ नॅशनल टी डेपो आणि त्याच्या जवळपासची २-३ दुकाने. कोथरुडमधे प्रतिज्ञा हॉलच्या रोडवर पाटाणकर खाउअवालेंच्या दुकानाजवळ एक ड्रायफ्रुटचे दुकान आहे त्यांच्याकडे असतो. सहसा ड्रायफ्रुटसच्या मोठ्या दुकानात.
फ्रिजमध्ये ठेवले नाहीत तरी
फ्रिजमध्ये ठेवले नाहीत तरी चालते. मागे मी लेकीच्या शाळेत करुन दिलेली तेव्हा बराच वेळ बाहेर होती तरी वितळली नाहीत.
साधना, तुझा तो 'अरीफ' सापडला
साधना, तुझा तो 'अरीफ' सापडला गं आम्हाला क्रॉफर्ड मार्केटात
गेल्यावेळी गरगर फिरले होते, पण मिळाला नव्हता. आणि एकाही दुकानदाराने दुकान सांगण्याचं सौजन्यही दाखवलं नव्हतं. पण काल जो तो 'अरीफ'चा जप करत होता
चॉकलेट्स शक्यतो फ्रिजमधे
चॉकलेट्स शक्यतो फ्रिजमधे देखिल ठेऊ नयेत असं चॉकलेट जाणकार/बनवणरे सांगतात. पण आपल्याकडच्या गर्मीमधे लवकर मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे खुप जास्त प्रमाणात आणली असतिल तर फ्रिजमधे ठेवलीतर चालतिल. अन्यथा नीट रॅप करुन अंधर्या जागी, कपाटात ठेवावीत. आपल्याकडे पूर्वी लोखंडी कपाट असायची (गोदरेज) त्यात तळाला छान थंड असतं. माझी आई अशी ठेवायची युएस, लंडन हुन मामा ने पाठवलेली चॉकलेट्स.
चॉकलेट मोल्ड्स नसतिल तर थोडे थोडे मेल्टेड चॉकलेट ओट्यावर ओतुन आपल्याला हव्या त्या थिकनेस चा लेयर करायचा. यासाठी पॅलेट नाईफ वापरायची. लेयर अर्धवट कडक असेल तेव्हा कुकी कटर, छोटी वाटी यांनी शेप्स कापायचे. किंवा सरळ हाताने छोटे लाडु, लम्बगोलाकार शेप्स देऊन ड्रिंकिंग चॉकलेट /कोको/ नट्सचा चुरा,/ डेसिकेटेड कोकोनट/ चॉकलेटचा चुरा यात घोळवायचे - चॉकलेट ट्रफल्स तयार
यात वळताना मधे आपल्या आवडीप्रमाणे रोस्टेड नट्स, बेदाणे, किसमिस काहिही घालता येते 
मला पण करायचेत असले चॉकलेट्स
मला पण करायचेत असले चॉकलेट्स दिवाळीसाठी. भ्याअ...
वेळ नाहीये, परवा सकाळीच निघायचंय गावाला जायला. सामान कुठे मिळेल हेपण माहित नाही.
अरेरे अल्पना! थोडक्यासाठी
अरेरे अल्पना! थोडक्यासाठी उशीर झाला.
झकास..
झकास..
आज जरा जवळच्या मॉलमध्ये
आज जरा जवळच्या मॉलमध्ये जातेय. मिळालेच तिथे तर आणेन आणि मग कसंही वेळ काढून करेन. (मला जायच्या आधी बरंच काय काय करायचंय.. घरातलं चीझ संपवण्यासाठी पास्ता, कंडेंस्ड मिल्क संपवायला मलई बर्फी, आता त्यात अजून ही एक भर..)
वॉव वर्षा मस्तच. आणि हो
वॉव वर्षा मस्तच.
आणि हो "आदळा"ची मजा "टॅप करा"त नाही. आणि "बत्त्याने ठोसा द्या" ची मजा "मिक्सर"मधे नाही! काय म्हणते?
आत्ता ग्रोसरीसाठी गेले होते,
आत्ता ग्रोसरीसाठी गेले होते, तिथे तर नाही मिळाल्या स्लॅब्ज्स. मग अगदीच रहावलं नाही म्हणून येता येता बाजारातल्या केकच्या दुकानात विचारलं तर तिथे फक्त डार्क चॉकलेटची स्लॅब होती ५०० ग्रॅ. वाली. किंमत १०० रु. कंपनीचं नाव नाही लक्षात. पण दुसर्या स्लॅब्ज नाहियेत म्हणे.
आता गावाहून आल्यावरंच करेन.
मस्त! माझ्याकडे आईस ट्रे आहेत
मस्त! माझ्याकडे आईस ट्रे आहेत सिलिकॉन चे, त्यामध्ये होइल का? या साच्यातून चॉक्लेट काढताना नीट निघेल नं?
चॉकलेटस लई भारी आणि
चॉकलेटस लई भारी आणि त्याहीपेक्षा सगळी चर्चा....स्लर्प...
अजून दुसर्या छोट्या आकाराची
अजून दुसर्या छोट्या आकाराची ६ झाली होती ती गट्टम करण्यात आली. मी सेल्बोर्नचे १ किलोचे सेमी स्विट घेतले. त्यातल्या एकाच स्लॅबची करुन पाहिली. वरील आकाराची ६ आणि छोटी ६ झाली. आत राईस क्रिस्पी भुरभुरवलं आहे.
मस्त गं केश्वे!
मस्त गं केश्वे!
अक्के मस्तच ग सेल्बोर्नचे मी
अक्के मस्तच ग
सेल्बोर्नचे मी टेस्ट केले नाही अजुन. कशी आहे चव आणि रेट काय आहे?
सेल्बोर्न हे इंपोर्टेड आहे.
सेल्बोर्न हे इंपोर्टेड आहे. त्यात डार्क, मिल्क, व्हाईट आणि सेमी स्विट असे प्रकार येतात. हे १ किलोच्याच पॅकमध्ये येतं. रुपये २२५/- किलो. मोर्डे वगैरे अर्धाकिलोला ९०-१२० अशी रेंज आहे.
केश्वे, १ किलोत किती
केश्वे, १ किलोत किती स्लॅब(तुकडे) होत्या? (म्हणजे तू एका स्लॅबची चॉकलेटं केलीस, म्हणाजे किती ग्रॅम स्लॅबची चॉकलेटं केलीस हे मला हवं आहे. )
५ होत्या. घरी गेल्यावर
५ होत्या. घरी गेल्यावर कन्फर्म करते. मी घाईघाईत काढून केलंय. हे वरचं फोटोतलं चॉकलेट खूप जाड आणि मोठं आहे. काल किंग्ज सर्कलला अजून केली ती आपण क्रॉमाहून आणलेल्यातल्या २ स्लॅब्जमध्ये सिंगलवाली जवळ जवळ ४० झाली.
हे माझे चॉकलेट्स! धन्स वर्षा!
हे माझे चॉकलेट्स! धन्स वर्षा!
पुण्यातः ललीत (कुमठेकर रोड वर
पुण्यातः
ललीत (कुमठेकर रोड वर स्टॉक मार्केट च्या समोर) मध्ये मोर्डे चे ११० (डार्क), ११५(मिल्क), १३०(व्हाईट) ला आहेत.. मोल्ड २२ ला एक आहे.. selbourne चे नाहीत
शहा (camp ला शिवाजी मार्केट च्या समोर) मध्ये मोर्डे चे सेम भावात आहेत.. मोल्ड मात्र २५ ला आहेत..selbourneचे १६० ला आहे डार्क चॉकलेट..
आता मी अभिमानाने सांगू शकतो की मला स्वयंपाकातल्या २ गोष्टी येतात (१ आधीपासूनच शिकली होति)... पहिली म्हणजे चहा आणी दुसरे म्हणजे चॉकलेटस..
हा माझा प्रयोग. डार्क आणि
हा माझा प्रयोग. डार्क आणि व्हाइट चॉकलेटचा एकमेकात गुंफलेला पॅटर्न यायला काय करता येइल?
मस्तच माधव! डार्क चॉकलेट आधी
मस्तच माधव!
डार्क चॉकलेट आधी साच्यात घालायचे आणि लगेच वरतुन व्हाईट चॉक घालायचे (किंवा व्हाईस्-व्हर्सा
). दोन्ही चॉकलेट्स पातळ असतानाच टुथ पीक किंवा स्क्युअरने हे मिश्रण थोडे गोलगोल ढवळायचे (स्क्विगल पॅटर्न) - तुम्हाला हवा तसा इफेक्ट येइल 
बादवे, तुमची चॉकलेट्स एकदम पांढर्या-तपकिरी गायीच्या कातड्यासारखी दिसतायत
मस्तच इफेक्टसाठी लाजो +१
मस्तच
इफेक्टसाठी लाजो +१
तुमची चॉकलेट्स एकदम
तुमची चॉकलेट्स एकदम पांढर्या-तपकिरी गायीच्या कातड्यासारखी दिसतायत >> चला कसला तरी इफेक्ट आला म्हणायचा
मस्त दिसतायत लाजो, तुझी
मस्त दिसतायत
लाजो, तुझी आयडिया करुन बघणार आता.
हम्मा इफेक्ट
वा सह्ही!! माधव कसले तोंपासु
वा सह्ही!! माधव कसले तोंपासु आणि मस्त दिसतायत चॉकलेटस
सगळ्यांची चॉकलेटस भारी आहेत.
हम्मा इफेक्ट>>>
हम्मा इफेक्ट>>>
वर्षा, धन्यवाद. तुमच्यामुळे
वर्षा, धन्यवाद. तुमच्यामुळे छान चॉकलेट बनवता आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये डार्क
पिंपरी-चिंचवडमध्ये डार्क चॉकलेट स्लॅब कुठे मिळू शकेल?
चेतन, मी पिंपरी मार्केट मधून
चेतन, मी पिंपरी मार्केट मधून घेतले. प्रकाशच्या लेनमध्ये १ मोठे ड्रायफ्रूटचे दुकान आहे. तिथे मला स्लॅब आणि मोल्ड मिळाले . wrappers नव्हते त्यांच्याकडे. बहुतेक सगळ्या मोठ्या ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये मिळते हे साहित्य
धन्यवाद. मी पिंपरी बाजारात
धन्यवाद. मी पिंपरी बाजारात कसारामलच्या दुकानात चौकशी केली परंतु तिथे मिळाले नाही. अजून कुठले ड्रायफ्रुटचे दुकान आहे त्याचे नाव कळवू शकाल काय?
Pages