होममेड चॉकलेट

Submitted by वर्षा_म on 15 September, 2011 - 02:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१] व्हाईट चॉकलेट स्लॅब
२] मिल्क चॉकलेट स्लॅब
३] डार्क चॉकलेट स्लॅब

फिलींगसाठी आवडीनुसार ड्रायफ्रुटस , मध , वेफर , राईस बॉल ( बाजारात मिळतात )

चॉकलेट मोल्ड , चॉकलेट रॅपर.

01.jpg02.jpg021.jpg022.jpg

क्रमवार पाककृती: 

03.jpg04.jpg05.jpgलेयर चॉकलेट
१] १२५ ग्रॅम व्हाईट चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करुन मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा. (नंतर गरज पडली तर १० सेकंदाच्या अंतराने ठेवा.)

२] चांगले घोटुन साच्यांमधे अर्धा साचा भरेल असे ओता. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ). यामुळे हवेचे बबल असतील तर निघुन जातील.

३] फ्रीजरमधे साचा ठेवा. ( साधारण मिनीटा दोन मिनीटात सेट होते )

४] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

५] घोटुन आधी व्हाईटाचॉकलेट टाकलेल्या साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).

६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.

७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा.

८] रॅपरच्या भानगडीत न पडता मटकवा Happy

बदाम चॉकलेट

१] प्रत्येक बदामाला बत्त्याने एक ठोसा द्या. ( मिक्सरने हा इफेक्ट येत नाही )

२] मावेमधे रोस्ट करुन घ्या. थंड होउ द्या.

३] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

४] रोस्टेड बदाम आणि वितळलेले चॉकलेट नीट मिक्स करा.

५] साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).

६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.

७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा. चॉकलेट तयार. रॅप करा किंवा तसेच ठेवा.

071.jpg072.jpgचॉकलेट बाउल

१] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

२] एका स्टीलच्या वाटित मिश्रण ओता. हलकेच वाटी गोल फिरवत आतल्या बाजुला युनीफॉर्म लागेल अशा पध्दतीने वाटी फिरवत रहा. थंड झाले की फ्रीजरमधे १ तास ठेवा.

३] हलकेच टॅप करुन चॉकलेटची वाटी काढा.

08.jpg081.jpg082.jpg

वाढणी/प्रमाण: 
भरपुर
अधिक टिपा: 

चॉकलेट स्लॅब तिन प्रकारात उपलब्ध आहेत. मी मोर्डे कंपनीचे वापरते. त्यावर किंमत लिहीलेली नसते. दुकाणदार फसवनुक करतात. म्हणुन खाली साधारण किंमत दिली आहे)
१] व्हाईट चॉकलेट ५०० ग्रॅम ( १२० रुपये )
२] मिल्क चॉकलेट ५०० ग्रॅम (११० रुपये )
३] डार्क चॉकलेट ५०० ग्रॅम ( ११० रुपये )

१] चॉकलेट धुण्यासाठी गरम पाणी वापरु नका. मोल्ड वितळतो ( स्वानुभव Proud )
२] सुरवातीला डीझाईनचे मोल्ड वापरुन चॉकलेट करताना मजा येते. नंतर ते कंटाळवाने आणि वेळखाउ काम वाटाते. म्हणुन कॅटाबरी , किटकॅटच्या आकाराचे मोल्ड आणले तर वेळ वाचतो. आणि पटापट तुकडे करुन चॉकलेट मटकवता येतात.
३] मावे नसेल तर डबल बॉयलर पध्दतीने चॉकलेट वितळुन घेता येते. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेउन त्यात चॉकलेट घातलेले छोटे भांडे अलगद वर बसेल असे ठेवावे. पाण्याच्या वाफेवर चॉकलेट वितळणे अपेक्षीत आहे.
४] सगळ्यात महत्वाचे हे सगळे करताना चॉकलेटला पाणी लागु देउ नका. नक्की कशा प्रकारे खराब होते त्याचा अनुभव नाही Happy
५]तयार चॉकलेट फ्रीजरमधे न ठेवता फ्रीजमधे ठेवावे. (उन्हाळ्याशीवाय फ्रीज बाहेरही नीट रहातात.)
६]फिलींगची चॉकलेट करायचे असेल तर साच्याला सगळीकडुन चॉकलेटचा लेयर देउन फ्रीजरमधे १-२ मिनीट ठेवल्यावर फिलींग टाकुन वरुन मेल्टेड चॉकलेट टाकावे आणी १५ मिनीट फ्रीजरमधे ठेवावे.
७]काल मोर्डेचे डार्क चॉकलेट दुकानात अ‍ॅवेलेबल नव्हते. त्याने दुसर्‍या कंपनीचे दिले. त्यावर किंमत १८५ होती. मला ९५ ला दिले. ( म्हणजे लेबलवर जाउ नका. फोटोत कंपनीचे नाव स्पष्ट दिसन नाही. मी उद्या लिहीते).
८] वेगवेगळे ड्रायफ्रुटस, वेफर, राईस बॉल्स वापरुन ट्राय केले. पण माझ्या घरी सगळ्यात जास्त लेयर चॉकलेट आणि बदाम चॉकलेटच आवडले.
९]चॉकलेट मोल्ड नसेल तर आईस ट्रे वापरु शकता. नाहीतर सरळ छोट्या ताटलीत मोठे चॉकलेट करुन हाताने तुकडे करायचे Proud
१०]वाटी प्रत्येकवेळी जमेलच असे नाही. नाहीच जमली तर पुन्हा वितळायच्या भानगडीत पडु नये. तसेच खाउन संपवावी. माझी २ वेळा जमली. पण काल करताना क्रॅक घेला Sad
११] चॉकलेट स्लॅब, साचे, रॅपर कुठे मिळतात? >> पुण्यामधे मंडईजवळ नॅशनल टी डेपो आणि त्याच्या जवळपासची २-३ दुकाने. कोथरुडमधे प्रतिज्ञा हॉलच्या रोडवर पाटाणकर खाउअवालेंच्या दुकानाजवळ एक ड्रायफ्रुटचे दुकान आहे त्यांच्याकडे असतो. सहसा ड्रायफ्रुटसच्या मोठ्या दुकानात.

माहितीचा स्रोत: 
१५ मिनीटाचा बेसिक कुकीग क्लास आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
आता एक सान्गा अजुन की
>>> १] व्हाईट चॉकलेट स्लॅब
>>> २] मिल्क चॉकलेट स्लॅब
>>> ३] डार्क चॉकलेट स्लॅब
या स्लॅब कशा बनवायच्या?
माझ्याकडे मैदा/साखर/कोको पावडर्/तुप उपलब्ध आहे! काय करु म्हणजे या स्लॅब बनतील?

लिंबू, मैदा नसतो हो घालायचा. मिल्कपावडर, कोकोपावडर हे मिक्स करुन साखरेच्या गोळीबंद पाकात लोणी घालून त्यात घालायचे असते. आई करायची पुर्वी पण आता ती सांगू शकत नाही आणि मीही कधी केलं नाही.

ओक्के वर्षा/अश्विनी Happy मैदा नाही तर नाही, पण कॉर्नफ्लॉवर नक्कीच घालुन प्रयोग करणार!
{मग मीच करुन बघतो - लिम्बी घरात नसताना Proud )

इकडे मूडीने घरी करायच्या चॉकलेटच्या वड्यांच्या कृती लिहिल्या आहेत. त्यात मिल्क पावडर/ मैदा इत्यादी साहित्य वापरून केलेल्या वड्यादेखिल आहेत.

वर्षे, किती तो टीपी. विकतची चॉकलेट्स आणुन ती तोडुन वितळवुन परत का गं त्याची चॉकलेट्स करायची? ड्रायफ्रुट्स घालुन विकत पण मिळतात की गं. Light 1 Happy

मस्तच गं ! यम्मी दिसताहेत. मी काही करुन बघणार नाही, पण बघायला खुप आवडली. पुढच्या वेळेस केलीस कि मी लगेच तुला भेटायला येइन. Wink

किती तो टीपी. >> माउ टीपी नाही ग. उद्या नो-करी गेली तर आतासारख्या पाट्या टाकण्याएवजी पाटीभर चॉकलेट करुन विकेल. माझ्या रोजच्या पोळी-करी ची व्यवस्था होइल Proud
ये की आपण चॉकलेट गटग करु Happy

माऊ, अगं वर्षाच्या टिपीचं काय घेऊन बसल्येस. आता रहावत नाही म्हणून सांगत्ये, माझ्या इतक्या वयस्कर साबा माझ्या मागे कित्येक दिवस लागल्यात की मावस नणंदेबरोबर क्रॉफर्ड मार्केटात जा आणि चॉकलेटच्या स्लॅब्ज आण आणि मला चॉकलेट्स करुन दे. मी आपली सारखी डेअरी मिल्क आणून फ्रीजमध्ये त्यांच्यासाठी स्टॉक करुन ठेवत रहाते. निजशैशवास जपणे हेच असते कीकॉय?

आत्ता मी आणि केश्विने क्रॉफर्ड मार्केटातून चॉकलेट बार घेतले आहेत. Swish choco slab असं नाव आहे. 90 रुपयाला 500gm चा बार मिळाला. मोर्डेचा 105 रुपयाला होता, ठाण्यात 125 रुपयांना आहे.
चॉकलेट मोल्ड मिळाले नाहीत Sad
केश्वि बहुतेक तो बार असाच मटकवायच्या विचारात आहे Uhoh Proud
मी काहीतरी वर दिलेल्यापैकी प्रयत्न करेन. यशस्वी झाला तर फोटो टाकेन.

मी कालच १२० चोकोलेट्स केली दिवाळी भेट द्यायला, crispies, butterscotch, strawberry and almonds
चोकोलेट्स मधे घालयला oil-based essence वापरा, १/२ tsp for 200 gms melted chocolate

मंजुडी चॉकलेट मोल्ड नसले तरी आईस ट्रे वापरु शकतेस. आणि डिझाईनचे आईस ट्रेही मिळतात. आणि तेही नसले तर सरळ स्टीलची प्लेट Happy

दीपा butterscotch, strawberry सिरप वापरलेस का? डिटेलमधे लिहीना. आणी फोटो टाकच Happy

वर्षे, कित्ती कित्ती धन्यवाद देऊ गं तुला ! मी काल मंजूला आईसट्रेचंच बोलले. काल ते चॉकलेट घरी नेल्यावर घरी "आनंदी आनंद गडे" डान्स सादर व्हायचा बाकी राहिला Happy साबांना विचारलं की ह्याचं काही दुसरं बनवू का वर्षाने सांगितल्याप्रमाणे? तर नक्को म्हणाल्या आणि फ्रिजमध्ये बार जपून ठेवला गेलाय. आज दुपारी त्याच्या वड्या कापून डब्यात साठवल्या जाणार आहेत म्हणे. तुम्ही मैत्रिणी अश्याच मधून मधून क्रॉमाला जा असा सल्ला देण्यात आलाय.

वर्षा, तुझी चॉकलेट्स जांभळी व डार्क गुलाबी कशी दिसतायत?
मंजू, मी आता वरच्या पद्धतीने चॉकलेट्स करणार आहे दिवाळीनंतर Happy मज्जा !

अक्के तु ( रोस्टेड ) बदाम चॉकलेट तरी करच. म्हणजे मला अजुन धन्यवाद मिळतील Proud

फ्रीजमधे बार ठेवला म्हणतेस, पण त्याला पाणी आजीबात लागु देउ नकोस.

तुझी चॉकलेट्स जांभळी व डार्क गुलाबी कशी दिसतायत? >> तो डार्क चॉकलेट बारचा रंग म्हणतेस का? जांभळा नाहीये तो काळपट आहे.
आणी दुसरा कॅटबरी सारखा आहे गुलाबी नाही.

सांगितलंय त्यांना तसं. आज त्या त्याच्या वड्या करुन डब्यात फ्रिजरमध्ये ठेवणार आहेत. त्यांना पटवलंय रोस्टेड बदाम चॉकलेट करेन ते ही खाऊन बघा म्हणून.

अक्के, चॉकलेट फ्रिझर मधे ठेऊ नकोस. बाहेर काढले की त्याला पाणी सुटेल आणि त्याची चव पण बिघडते.

फ्रिज मधे ठेवायचे असल्यास सेल्फ सिलींग बॅग्ज मधे आधी फॉइल मधे रॅप करुन थोड्या थोड्या तुकड्यांच्या बॅचेस बनव. एका वेळेस काढली की तेव्हढी बॅच संपवायची.

अगदीच राहवेना म्हणून आज सकाळी दोन्ही बारमधला किटकॅट फिंगर साईझचा तुकडा कापून वितळवून चॉकलेटं केली. मस्त जमली. आता टेक्निक कळलं. प्रयोग करून बघायला हरकत नाही. आता दिवाळीत सगळ्यांना फराळाच्या ऐवजी चॉकलेटंच देणार झिपलॉकच्या पिशव्यांमधून.

अल्पना, तोच सिलिकॉन ट्रे वापरला. पण तो एकच ट्रे आहे माझ्याकडे आणि त्यात नऊच खाचे आहेत. एव्ढेसे दोन तुकडे घेतले तरी वर्षा म्हणाली तशी भरपूर (म्हणजे नऊ खाचे + सहा वड्या) चॉकलेटं झाली.

लाजो/ वर्षा, ते बार फ्रिजमधे पण ठेवायचे नाहीत का? मी काल फ्रिजमधेच ठेवले होते.

केश्वे, ते मिल्क चॉकलेट तू खाऊन पाहिलंस का? मी खाल्लं ते मला भयंकर गोड गोड गोड लागलं. त्यात डार्क चॉकलेट मिसळून मस्त लागतंय.

ते मिल्क चॉकलेट तू खाऊन पाहिलंस का? मी खाल्लं ते मला भयंकर गोड गोड गोड लागलं. त्यात डार्क चॉकलेट मिसळून मस्त लागतंय.
>>>> हो मला पण डार्क चॉकलेट घ्यायला हवं होतं असं वाटलं. मी तसं साबांना म्हटलंही. पण त्यांना आहे तेच आवडलं. मग मी गप्प बसले. आत्ता हे त्यांना आहे तसं खाउदेत. नंतरच्या वेळी डार्क मिसळून करणार आहे हे नक्की. ती टेस्टही त्यांना नक्की आवडेल. खाऊन बघितल्याशिवाय त्यांना कळणार नाही.

मी खाल्लं ते मला भयंकर गोड गोड गोड लागलं. >> त्याचे लेयर चॉकलेट प्रकार आवडला आमच्याकडे.

फराळाच्या ऐवजी चॉकलेटंच देणार झिपलॉकच्या पिशव्यांमधून >> छान आयडीया. पण पिश्व्यांपेक्षा दुसरे काहीतरी ट्राय कर. छोट्या अ‍ॅटरॅकटीव पॅकिंग बॅग पण मिळतात आजकाल.

ते बार फ्रिजमधे पण ठेवायचे नाहीत का? >> पुण्यासारख्या ठिकाणी फ्रिजबाहेरही छान रहातात. मुंबईतले माहित नाही. पण फ्रीजमधे ( फ्रीजरमधे नाही ) व्यवस्तीत व्रॅपकरुन ठेवले तर नो प्रॉबलेम.

Pages