बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री. केदार जोशी यांजकडून:

मृ तू पूर्ण गाण्याला न्याय दिला नाही त्यामुळे निषेध!!

मोहर झुलतोय, वादही पेटतोय
घालशील का थोड तेलं
जाउ ललीताकडं नको बाबा तिकडं
बसलाय आगंतूक माळी,
म्हातार्‍याला त्या लागलयं चळं
साठे इच्चार तळ

आलोया नेटात, पडलोया गोटात
सांग मी लिहीतो कसा?
ट ला ट अन र ला र
लिहीतोय कंपूबाज जसा
आयडी पाहुन होई जळजळ
साठे इचार तळ

Lol वाईट्ट सुटली आहेस... धम्माल !!!

मृ आणि केदार.. सही आहे एकदम.. lol.gif

मृण: दोन्ही विडंबने मस्त Lol
वेगळा बाफ उघडून टाक की ही दोन्ही तिकडे

केदार Lol
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

टण्याचा वाढदिवस आहे आज. ज्यांच्या प्रतिभेचा बहर इथे फुलला आहे त्या सगळ्यांच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सर्व प्रतिभावंतांचे हार्दिक आभार!

आर्ट्यांच्या एस एल चं गीत :

ए जनी डार्लिंग, टुमॉरो मॉर्निंग
पुपुच्या बाफवर येशील का?
वचवचा लिहून, पचपचा बोलून
बुध्दीची झलक देशील का

पुपुवर आयड्यांची लगीन घाई
तुझ्या पोश्टीकडं कुणी ढुंकायचं नाही
तिथंच लिहून कोडवर्ड टाकून
मेघालयी जायाचं सांगशील का

माबोतल्या फोटोतून प्रेम माझं दिसंल
फुकटाच्या यॉटीत जीव तुझा रमल
डेकावर बसून, गालात हसून
तंबाकुची चंची सोडशील का

मूळ प्रेरणा:
Sashal | 22 जुलै, 2009 - 18:42
LOL! मी पुर्वी हे गाणं कोणाला येतं का विचारलं होतं तेव्हा विनय नीच लिहीलं होतं पुर्ण जुन्या मायबोलीत .. हे घ्या

ए जान डार्लिंग टुमारो मॉर्निंग
एस्टीच्या थांब्यावर येशील का
एस्टीच्या थांब्यावरच गं पुढची
मला appointment देशील का

एस्टीच्या थांब्यावर लोकांची घाई
कुनी बी आपल्याला बघायचं नाही
तिथंच भेटून ढिंच्याक् ढिच्यांक
जरासं खेटून ढिंच्याक् ढिच्यांक
दुपारच्या पिक्चरला येशील का

एस्टीच्या थांब्यावर उडप्याचं हॉटेल
डोसा खाऊन जिवा बरंही वाटेल
फॅमिली रुमात ढिंच्याक् ढिच्यांक
तू माझ्या कानात ढिंच्याक् ढिच्यांक
मनातलं गुपीत सांगशील का

chinoox | 23 जुलै, 2009 - 08:10
मृण्मयी

SAJIRA | 23 जुलै, 2009 - 08:17
मातेचं घड्याळ लयच फॅशनेबल हाय.. मला हवं ते. (भक्त मागतील ते देशीलच म्हणा तु.)

मृण्मयी..

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

manish2703 | 23 जुलै, 2009 - 08:12
मृ...

slarti | 23 जुलै, 2009 - 08:15
महान !!
वचवचा लिहून, पचपचा बोलून... तिथंच लिहून कोडवर्ड टाकून मेघालयी जायाचं सांगशील का >>> अस्सल ! ह्ये टरीक सांगितल्याबद्दल लै धनेवाद !
हायला, पन आमाला नाय का त्ये 'ढिंच्याक् ढिच्यांक' ? आँ ?

***
प्रश्न पडला, उत्तर मिळाले
उत्तर मिळता ढळला तोल,
प्रश्नाच्या अस्तित्वाचे हेच मोल

kuldeep1312 | 23 जुलै, 2009 - 08:16
मृ... _/\_

*********************

My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.

raina | 23 जुलै, 2009 - 08:17
मृ-
मेघालयात कोण गेलं ? कधी ? पेसमेकर !!

runi | 23 जुलै, 2009 - 08:18
हायला मृ आज सकाळी सकाळीच जोरदार सुरुवात

cinderella | 23 जुलै, 2009 - 08:22 नवीन
रैना, मेघालयात स्लार्टी की कुणी चहा प्यायला गेलं होतं.

मृ,

shraddhak | 23 जुलै, 2009 - 08:25 नवीन
मृ,

रैने, स्लार्ट्याच्या जनीचे 'कार्यालयातून मेघालय' गाठायचे ठरलेले आहे. (आमच्या विश्वसनीय बातमीदारांकडून!)

माझा फोटू लय झ्याक. चिलीमपण. भगवा डिरेस नाय का जमला? फुलमाळाबी न्हाईत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...
तकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...

raina | 23 जुलै, 2009 - 08:27 नवीन
स्लार्ट्या मेघालयी गेल्ता ? त्या यॉटनी ?
सिंडी/ श्र थॅन्क्यु,थॅन्क्यु.

psg | 23 जुलै, 2009 - 08:28 नवीन
मृण बहरात हलवा, किंवा एसएलच्या विपूत तरी..

हाय पुपुद्वाड्ज, माते पेशल नमस्कार!
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

slarti | 23 जुलै, 2009 - 08:56 नवीन
'कार्यालयातून मेघालय' >>> भारी ! सि.माता, तुमी बेशिकली निर्गुन्निराकार असल्याने ज्येवढे सगुन गावले त्येवढ्यांनी मूर्ती साकार क्येली. फुडच्या टायमाला भर्पाई करुन टाकू
आमी पर्ची मोडात आसल्यानं ह्ये घ्या कविइत्री मृ ह्येंचा पर्ची -

त्ये घसरून पडल्या नसून त्येंना कविता सुचत हैत म्हून तशा बसल्या हैत. पर्तिभावंतांचं आसंच आसतं. आता परवा आमचा बबन्या आंगणात घसरून पडला तर त्येला कविता झाली - आला आला मान्सून, चिंब भिजले अंगण, घसरले माजे पाय आन् सुजले की हो ***
मंग त्या खरबुड्याला त्याच्या मायनं लय बडिवलं. पर्तिभावंतांना लै तरास असतो !
(ता. क. ह्ये बी बगून ठिवा - http://www.umlaufsculpture.org/usgmaippwebq/usgmprocess2.htm)

***
प्रश्न पडला, उत्तर मिळाले
उत्तर मिळता ढळला तोल,
प्रश्नाच्या अस्तित्वाचे हेच मोल

chinoox | 23 जुलै, 2009 - 08:57 नवीन
<<आला आला मान्सून, चिंब भिजले अंगण, घसरले माजे पाय आन् सुजले की हो **<<>>

manish2703 | 23 जुलै, 2009 - 09:01 नवीन
स्लार्टी... तुमची पर्तिभा लैच जोरात आहे...

SAJIRA | 23 जुलै, 2009 - 09:02 नवीन
सुजले की हो **>>

मृबाई, तुमचा फोटू शेव करून ठिवा. असाच उपेगात यील बगा कंदीमंदी. त्ये नसलं, तर त्येच्याकडे बगून कविता तरी जलमतील. आमाला तेवडंच चंची सोडायला कारन!

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

gajanandesai | 23 जुलै, 2009 - 09:03 नवीन

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

raina | 23 जुलै, 2009 - 09:05 नवीन
मृ झगा घालते ? ऐ.ते.न च.
मंग त्या खरबुड्याला त्याच्या मायनं लय बडिवलं. पर्तिभावंतांना लै तरास असतो >>> बडवलं तेच बरं. जनकल्याण साध्य झालं.
कविता लै भारी की हो.

रच्याकने- न बदडणा-या, गोड गोड हसणा-या प्रेमस्वरूप आया ख-या असत्यात काय ?

runi | 23 जुलै, 2009 - 09:16 नवीन
स्लार्ट्या

Mrinmayee | 23 जुलै, 2009 - 09:27 नवीन
आर्ट्याचं पोरगं लई गुनाचं बापा! कुठुनशान फोटु आनून डकवून र्‍हायलं! असं पडून कविता नाही व्हत. ती आमची वरच्या मजल्यावरच्या इच्चक पोट्ट्यांसाठी 'येऊ का वर अनं भडकवु का थुतरीत' पोज व्हय!

shraddhak | 23 जुलै, 2009 - 09:31 नवीन
स्लार्टी, तुम्ही *** टाकून प्रतिभेला दडपून टाकू नका. कुणीही अ‍ॅडमिनांच्या विपुमध्ये तक्रार टाकाया जाणार न्हाईत.
रैने, जनकल्याणाचं कुणाला काय हिकडं? जनीकल्याण (भारताच्या खाल्ल्या अंगाला लगिनाला कल्याण म्हंतेत.) झालं (तेही स्लार्ट्याशीच!) तर बरं न्हाई का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...
तकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...

slarti | 23 जुलै, 2009 - 09:36 नवीन
आमी पघिटलं कि हितले नामदार लोक लै झ्याक आल्बुम काढतात. तवा आमी ठरिवलं हाय कि आपुन भी आल्बुम काडायचा. येकदम आलीन्वन ! आमच्याकडं हितल्या म्येम्ब्रांची पर्ची हैत (त्यातूनच दिसभरात हितं टाकली). त्या पर्ची आन् परत्येक पर्चीच्या खाली कविइत्री मृ ह्येंचे कौव्य. संगीत कोन द्येनार त्ये आजुन ठरायचं हाय, पन त्ये बघू. म्हन्जी पर्ची, कौव्य आन् गानी असा आलीन्वन आन् आन्लीवन आल्बुम झाला का नाय ! आल्बुमचं नाव 'येऊ का वर अनं भडकवु का थुतरीत'.
(ह्या आल्बमीत त्ये झक्कींनाबी कायतरी काम द्यू. त्ये जिथं, आखी मैबोली थतं. लै पब्लिशिटी. शिवाय, सर्व्य करून त्ये परत म्हन्तात, बगा, म्या तर काय क्येलं नाय बुवा ! म्हन्जी त्येन्ला मोबदला देयाची भान्गडच नाय.)

***
प्रश्न पडला, उत्तर मिळाले
उत्तर मिळता ढळला तोल,
प्रश्नाच्या अस्तित्वाचे हेच मोल

meenu | 29 जुलै, 2009 - 12:36
असो एकंदरीत काये.. की आठवणी, गुलजार, अलवार, उन्माद, प्रेम, ओढ, विरह, श्वास, आभास, जवळीक.. इत्यादी इत्यादी.. अशा रोज रोज वापरुन वापरुन गुळगुळीत बुळबुळीत झालेल्या सगळ्या शब्दांना उचलून सुक्या कचर्‍याच्या पेटीत फेकून द्यावसं वाट्टय.. हो हो अगदी ओलावा ह्या शब्दाला सुद्धा..
एका कविच्या दोन कविता वाचल्या की यात साम्य शोधा असा खेळ खेळावासा वाटतंय.. दोन्ही कवितातले सारखे शब्द बाहेर काढले की फक्त क्रियापदं आणि टिंबं उरतील.

tanyabedekar | 29 जुलै, 2009 - 12:40
दोन्ही कवितातले सारखे शब्द बाहेर काढले की फक्त क्रियापदं आणि टिंबं उरतील. >>>
दिठी, विराणी, संपृक्त, मोद, नाद, कुंतल, संध्या, छाया तेच तेच तेच तेच! आजकाल ग्रेसच्या कविता लोकांच्या सृजनाचे मूळ दिसतय (अजून थोडे दिवस हेच मूळ पकडून ठेवले ह्या कवींनी तर मूळव्याध होइल. लिंब्या कंसल्टिंग कंपनीला मग चांगले दिवस येतील. लिंब्या, तू बघच रे ह्या कवि लोकांच्या कुंडल्या, काय साम्य सापडतं का ते!)

limbutimbu | 29 जुलै, 2009 - 13:33
टण्या, तू मला पुन्हा पुन्हा उसकवुन "कवितान्च्या" वाटेला घालवायचा वृथा प्रयत्न करु नकोस!
"कविता करणे किन्वा त्यात वा गाण्याबजावण्यात रमणे म्हणजे पुढल्या आयुष्यात उपाशी मरायचे लक्षण होय", अस आमच्या तीर्थरुपान्नी आम्हाला केव्हाच बजावुन ठेवलेल आहे! त्यामुळे त्यान्ची आज्ञा शिरसावन्द्य मानून मी कवितान्च्या वाटेलाही जात नाही तर कवीतले साम्य काय बघणार कप्पाळ?
असो

tanyabedekar | 29 जुलै, 2009 - 13:53
अरे पण त्यातून तुझी कोअर काँपिटन्सी असलेल्या विषयातसुद्धा तुला कंसल्टींगची संधी मिळते आहे ना! ती का नाकारतोस? झालेच तर तुझ्या विपुमध्ये ही खालची पाटी अडकवून टाकः
'इथे कविंची कुंडली तपासून (काँप्युटरवर) त्यांच्या सृजनाच्या, प्रेमाच्या, प्रेमभंगांच्या, जाणीवेच्या, नेणीवेच्या इत्यादी विषयांतील तक्रारींवर उपाय (आमच्याकडे विविध प्रकारचे खडे-रत्ने तसेच विविध प्रकारच्या पूजा-शांती करणारे भटजी उपलब्ध आहेत) व सल्ला देण्यात येइल. तसेच काव्यनिर्मितीच्या रोग अतिशय बळावल्याने, अतिकविसार वा सृजनमूळव्याध झाली असल्यास त्यावर हमखास व जालीम औषध (आयुर्वेदीक) मिळेल.'

limbutimbu | 29 जुलै, 2009 - 13:47
पण टण्या तू विषय काढलाच आहेस तर कुन्डली वरुन नाही पण हस्ताक्षरातील साम्यस्थळे सान्गतो
ऐक लक्ष देऊन
ज्यान्च्या अक्षरात अक्षराच्या आकारापेक्षा दीड्पट ते दुप्पटीहून जास्त उन्चीच्या वेलाण्ट्या मात्रा उकार आढळतील, फर्रेदार फराटे आढळतील त्या त्या व्यक्ती स्वप्नरन्जन करीत कविता रचण्याच्या लायकीच्या आहेत असे खुशाल समज!
अशा व्यक्ती कविता करत नसतील समजा, तरी साधी भाजी आणायला गेले तरी मनातल्या मनात दहावीस किलोच्या तर्‍हतर्‍हेच्या महागड्या, निवडून साफ केलेल्या भाज्या आणायचे मान्डे रचत जातिल, वेळेस भरपुर मिळाली म्हणून पोतभर काकडी/मिरची असले काहीही घेऊन येतिल! ओला मटार फार महाग वाटला तर म्याफकोचे वाटाणे घेऊन येतिल, पण त्या दिवशी खिशातल्या उरल्यासुरल्या पैशाचा बट्ट्याबोळ करुन पालक्-मटर पनिरच हादडतील!
अतिशय उच्च विचारसरणी......... म्हणजे हायसोसायटीकडे झुकणारी, अशी ही मध्यमवर्गिय मण्डळी इतरे जनांस सदैव तुच्छ लेखत असतात!
यान्च्या बाता (खर तर थापा) मोठ्या ऐकण्यासारख्या अस्तात! ही तीच मण्डळी, ज्यान्ना कधी दहा वीसच्या आतिल आकडे मोजताच येत नाहीत! यान्ना कधी किलो दोन किलो पावशेर आतशेर असले हिशेब करताच येत नाहीत! सोने ग्र्याममधे तोळ्याच्या हिशेबानेच का मिळते म्हणून दु:ख्खीकष्टी होणारी ती हीच मण्डळी!
अशा मण्डळीन्ना जेव्हा कृतिमधे करण्यासारखे शिल्लक रहात नाही, वा अशापैकी ज्यान्चा स्वतःच्या शब्दसम्पत्तीवर अढळ विश्वास अस्तो, फक्त शब्दानेच माणसात सन्वाद साधतो असे मानणार्‍या या व्यक्ती मग एखाद्या दिवशी अचानक चमत्कार झाल्याप्रमाणे कविता करु लागतात!
चमत्कार म्हणण्याचे कारणच असे की कसलेही कारण त्यान्ना "कवी" बनविण्यास पुरू शकते! मग ती सकाळमधील ग्र्याफिटी असो, शेजारच्या रेडिऑमधून ऐकू आलेली रेडीओ मिर्चीवरील किन्काळी असो वा भाण्डी घासणार्‍या बायकोचा मोरीत भिजुन ओला झालेला पदर असो..... यान्ना कविता स्फुरायला काहीही कारण चालते, अन एकदा का हे कविता करु लागले की थाम्बता थाम्बू शकत नाहीत, त्यातुन त्यान्ना यमक जुळवण्यातली गम्मत कळली की अगदी कहर कहर होतो
बा टण्या, आता मी तर असे म्हणतो की खर तर श्रीयुत अनिल अवचटान्नीच मुक्तान्गणमधे या व्यक्तिन्करता देखिल एखादा विभाग उघडावा! आपण (बहुतेक सर्वचजण) त्यान्ना लागेल ती मदत करायला तय्यार आहोत!

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

ajai:
या वर्षी दिवाळी अंका ऐवजी संपादकांचा "रतन मटका"च्या नंबरा ची बुक छापायचा ईचार दिसतोय

tanyabedekar:

दिवाळी विशेषांक हा मटका विशेषांक काढला तर काय काय लेख असतील?

१. संपादकीय - मटक्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याने, न्युयॉर्क कॉटन मिलचा आकडा ते आजचा मुंबई-कल्याण मटका ह्या प्रवासाचे सिंहावलोकन
२. मटक्याचे तक्ते व जुजबी माहिती
३. 'अर्धा क्लोज आणि पुरा ओपन' - अडीचकी-साडेतीनकीत फिरणारा क्लोज व दोन-चार अश्या समसंख्येत फिरणारा ओपन ह्यांची सांगड सुलभतेने समजाउन देणारा माहितीपूर्ण लेख
४. 'नवटाक-पंजा आणि मेंढीची ढुशी' - नियतीच्या अनाकलनीय खेळावर टिप्पणी करणारी दीर्घकविता
५. संवादः
'विजन२०२०' - मटक्याच्या धंद्याबद्दल मुंबई मटक्याचे सर्वेसर्वा छोटा शकील ह्यांची भ्रमणध्वनीवरुन घेतलेली मुलाखत. मुख्य विषय मटक्यात येउ शकणारी नवनवीन आर्थिक आयुधे (फायनिन्शअल इन्स्टृमेन्ट्स)
'मटक्याची पुरवठा यंत्रणा' - बुकिंग, कलेक्शन आणि लागलेल्या आकड्याचे त्वरीत वितरण अशी मटक्याची बहुपेडी सप्ल्याय चेन उलगडून सांगत आहेत कल्याण मटक्याचे सीओओ सलीम आकडा
६. 'रुपयाला पोळी, शंभराची होळी' - मोठी रिस्क, मोठा फायदा ही मटक्याची मूलभूत संकल्पना कथेच्या माध्यमातून
७. 'मटक्याचे आंतराराष्ट्रीय राजकारणावरील पडसाद' - टण्याबेडेकर
८. 'मटक्याचे आर्थिक आयाम आणि मध्यमवर्गातील उदासिनता' - केदारजोशी - मानद प्राध्यापक, दुबई मटका संशोधन आणि प्रसार विद्यापीठ
९. 'मटक्याच्या तक्त्यांचा तर्काधिष्ठीत अभ्यास' - स्लार्टी
१०. दृक्-श्राव्य विभाग - मटक्याचा आकडा जाहीर होण्यावेळची हुरहुर, लगबग आणि मटका लावणार्‍यांमधील अज्ञाताची ओढ ह्याचा सुंदर मिलाफ साधून सत्यघटनांचे तसेच्या तसे ध्वनिचित्रमुद्रण करुन बनवलेला लघुचित्रपट 'नवरंग' - प्रमुख निर्माते चिनूक्स, ध्वनिचित्रमुद्रण सहाय्यः अरभाट
११. 'चेहरे आणि मटके' - मनुष्याच्या चेहर्‍याचा आणि त्याला लाभणार्‍या आकड्याचा परस्परसंबंध - लिंबुटिंबू

slarti:
शास्त्री आणखी काही -
'कृष्ण आणि मटका : एक प्राचीन संबंध' - मटक्याची प्राचीनता आणि दैवीरूप सिद्ध करणारा प्रबंध - चिन्या१९८५
'मटक्यात केलेली मटकीउसळ' - शोनू
'प्रकाशातील मटका' - प्रकाश कळेल यांनी काढलेली भगत-खत्री यांची स्टिंग-प्रकाशचित्रे ('मटक्यातील प्रकाश' - केपीकाकांचा स्टिंग-झब्बू)
'मटकत मटकत' - सतीश चौधरी यांची आकडीबाज कविता (जी वाचल्यावर आकडी येते, असे नाही तर 'एक नाही दोन नाही, हाय ! काटला पत्ता, आकड्यांत आकडा असतो सत्ता' वगैरे.)
'भारतीय आणि अमेरिकन मटका' - भारतीय मटका किती गंडलेला आहे हे सांगणारा एक तौलनिक अभ्यास - झक्की ('मी खेळत नाही, पण चार घटका तिथे जाऊन बसतो. हुक्की आली की खेळतो. आकडा बरोब्बर लागतोच. मग लोकांना आवडत नाही, ते शिव्या घालतात. आपण आपले शांतचित्ताने घरी जातो' - या ट्रेडमार्क्ड तळटीपेसकट)

हे आणी त्या पुढचं झक्कींचं उत्तर यायलाच हवं होतं
sampadak | 3 August, 2009 - 05:31
ए शाणे, एक बात सुन. ये घाटीतात्या है ना, ये भोत बडा पंटर. इसने जो घोडे पे पेटी लगाया, वो घोडा कित्ता भी चमनचिंधी होयगा तोभी जितेगा ! क्या, समझा ना ? बोले तो, ये तात्या का जो घोडे के साथ मांडवली, वो घोडा एकदम तेज... एकदम ये घोडे के माफीक !

ऐसा ये तात्या अभी पच्चास साल का हो गयेला है, बोले तो पचासवा हॅप्पी बड्डे, क्या ? वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या ?... हां हां ठिक है) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास ! तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या ? समझा ना ?

और तू भी ए शाणी ! क्या ? बोले तो, ये शाणेको बोला है तो तेरे को अल्लग से बताने का क्या ? ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है ! क्या ? ये अपना सच्चूभाय और माधुरी बी वोहीच... बोले तो, मराठी. तो ये मराठी लोग के बारे में कुछ भी लिख डालने का.

तो सब लोग ये दिमाग के अंदर घुसा लो, क्या ? दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... !! आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या ? आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे?... हां हां) संपादक हटेला, आप्पुन करता जेब फटेला, समझा क्या ?

और एक बात दिमाग में फिट्ट रखने का, क्या ? इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या ? चल चल, अब थोडी हवा आने दे

zakki | 3 August, 2009 - 11:09
नमस्कार मंडळी.

भुताटकी, भुताटकी!! अहो मी संपादक यांनी लिहीलेल्या (काय होते ते देव जाणे!!) नंतर लगेच लिहीले होते, ते गेले कुठे?
आधीच काल रात्रभर बसून मायबोलीचे नियम नि अटी वाचत बसलो होतो, काही कळले नाही. म्हंटले आज इथे येऊन बघावे त्यावर काही चर्चा चालू असेल, तर कळेल काहीतरी. बघतो तर हे संपादक ने लिहीलेले. कळेना आपण बरोबर ठिकाणी आलो की नाही? "डोकं गरगरलं रे!" अशी अवस्था झाली.

तेंव्हा मला वाटले अनिलभाई पन्नास वर्षांचे झाले! त्यांना शुभेच्छा पण दिल्या. पण ते तर नाही म्हणतात!

कोण बालक पन्नास वर्षाचा झाला? लहान मुले जसे म्हणतात 'आता मी पाच वर्षाचा होणार म्हणजे एकदम मोठ्ठ्ठा होणार! तसेच आपले पन्नास झाल्यावर मुलांना वाटते, आता मी मोठा झालो, शहाणा झालो! सांगावासे वाटते, मुला, अजून दहा वर्षे थांब, म्हणजे कळेल तुला शहाणा म्हणजे काय ते! असो.

आता मला हे भारतातच outsource करावे लागणार! तिथे ते भारतीय भाषेत (म्हणजे हिंदी, इंग्रजी मराठी इ. भाषांचे कडबोळे) करतील, मग ते इथे पुनः भाषांतरीत करायचे, तोपर्यंत काय मायबोली वर येणे बंद करायचे?
(outsource ला मराठी शब्द काय? 'बाहेरख्याली?? बरोबर नाही वाटत. पूर्वी ऐकला होता, पण तो इथे बरोबर नसावा!)
आता हे तरी वाहून जाऊ नये!!

७. 'मटक्याचे आंतराराष्ट्रीय राजकारणावरील पडसाद' - टण्याबेडेकर
८. 'मटक्याचे आर्थिक आयाम आणि मध्यमवर्गातील उदासिनता' - केदारजोशी - मानद प्राध्यापक, दुबई मटका संशोधन आणि प्रसार विद्यापीठ
९. 'मटक्याच्या तक्त्यांचा तर्काधिष्ठीत अभ्यास' - स्लार्टी
'कृष्ण आणि मटका : एक प्राचीन संबंध' - मटक्याची प्राचीनता आणि दैवीरूप सिद्ध करणारा प्रबंध - चिन्या१९८५
'मटकत मटकत' - सतीश चौधरी यांची आकडीबाज कविता >>>

लैच भारी आहेत हे सर्व. Rofl Rofl

चिन्या तुला प्रबंध लिहायला आख्खे महाभारत आहे.
लाभलक्ष्मी नावाचा एक प्रकार कोणाला माहीती आहे का? त्या काळी (९०ज मध्ये) फार गाजला होता. माझ्या अनेक मित्रांना ह्या सत्तीने रडवले. त्याचे तक्ते वगैरे यायचे आणि मी शेअर बाजाराच्या छापील चार्टांचा अभ्यास करायचो म्हणून मित्र हे तक्ते आणून त्या रिलेशन आहे का हे विचारायचे.

आमच्या शेजारच्या मुलाचा दहावीला 'निकाल' लागला तेव्हा मार्क कसे आहेत असे विचारले तर लाभ लक्ष्मी च्या निकाला सारखे ( फक्त एक अंकी ) आहेत असे सांगायचा.

SAJIRA | 29 August, 2009 - 03:03 नवीन
स्लार्ट्या हरविल्याची जाहिरात मी सांभाळून ठेवली आहे. तीच छापतो आता पुन्हा. मागल्या वेळेस त्याने मला जाहिरातीचे पैसे देतो, देतो म्हणून टांग मारली. आता उगवला, की दोन्ही-तिन्ही जाहिरातींचे पैसे वसूल करतो त्याची मानगूट पकडून.
--
हरवले आहेत..

गेल्या काही दिवसांपासून आमच्या "१६११, वाडेश्वर पेठ" या पत्त्यावरनं न सांगता गायब झाले आहेत. वयाचे अनेक अंदाज आहेत, आणि त्यातला एकही खात्रीशीर नाही. परंतू मोठी पांढरी दाढी, लवलवती मान, पिचपिचे डोळे अन प्रचंड सुरकूत्या यावरून जेष्ठ नागरिकत्वाचा निकष पार करूनही अनेक वर्षे झाली असावीत. वाड्यातून गेले तेव्हा उद्गारवाचक चिन्हे असलेले कपडे घातलेले होते.
आसू आणि हसूचा प्रचंड शोक. मराठी भाषेचा जाज्वल्ल्य असा अभिमान, परंतू सही मात्र इंग्रजीतच असते. शब्दांची मोडतोड करून नवनवीन शब्दांना जन्माला घालण्याचा प्रचंड सोस. ठायीठायी आपण बुद्धीप्रामाण्यवादी आणि तर्कनिष्ठ असल्याचे दाखले कुणीही न मागता, विचारता देखील देत असतात. न्युट्रॉन पृथ्वीच्या पोटाला धडक देवो, नाहीतर वारकरी यादवांच्या दाराला धडक देवोत; यांची घंटी प्रत्येक वेळेला सारख्याच तन्मयतेने वाजते. प्रत्येक वेळी वाजलेल्या त्यांच्या घंट्यांमुळे आणि प्रचंड हजरजबाबी असल्यामुळे यांचे नाव घंटासिंगही ठेवायला हरकत नाही.
नावांचा फार शोक. नावांमध्ये काय काय सापडते त्याचही ते नेहेमी औत्सुक्यपूर्ण शोध घेत असतात. अनेक नावा अन अनेक नावे पदरी बाळगून आहेत. त्यातीलच एक 'स्लार्टी बार्टफास्ट' असे शिवीसदृष नाव. ते घेववत नसले, तरी हरविल्याच्या जाहिरातीत देणे भाग आहे.
अश्वथ्थाम्यासारखे समुद्रकिनारी विपन्नावस्थेत सापडण्याची शक्यता आहे. अनेक किनारे त्यांच्याच मालकीचे असल्याचा त्यांचा समज असल्यामुळे ते यालात्याला किनारे वाटत, बक्षीस देत सुटत असतात.
कुणाला सापडल्यास वाड्यात वर्दी द्यावी. काही माहिती दिल्यास आवडीचा (किंवा जनीचा) किनारा बक्षीस देण्यात येईल.
--
फाष्टाजोबा, हे तुम्ही वाचत असाल, तर वाचल्यासरशी निघून या. तुमच्यावर कुणी रागवणार नाही. तुमच्या सर्व रोगा-मॅनिया-फोबियांवर आम्ही पैसे खर्च करून इलाज करू. शिवाय आणखी किनारे पण मिळवून देऊ.
--

माहेरी निघालेल्या सर्व मायबोलीकर सुनांसाठी ही एक "गझल". वृत्त आहे- कार ल्याचा वेल. काव्यरस आहे- कितीतो भोच कपणा

वाड्याचे दरवाजे उघड गं सुने मग जा आपुल्या माहेरा
वाड्याचे दरवाजे उघडले हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

गडावर वर्दी दे गं सुने मग जा आपुल्या माहेरा
गडावर वर्दी दिली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

कट्ट्यावर गप्पा हाण गं सुने मग जा आपुल्या माहेरा
कट्ट्यावर गप्पा हाणल्या हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

शिट्टीला सुसकाळ म्हण गं सुने मग जा आपुल्या माहेरा
शिट्टीला सुसकाळ म्हणाले हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

बाराला नमस्कार घाल गं सुने मग जा आपुल्या माहेरा
बाराला नमस्कार घातला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

पार्ल्यात मेनु टाक गं सुने मग जा आपुल्या माहेरा
पार्ल्यात मेनु टाकला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

अटलांटात (एक तरी) पोस्ट टाक गं सुने मग जा आपुल्या माहेरा
अटलांटात पोस्ट टाकले हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

गुलमोहोरात चक्कर मार गं सुने मग जा आपुल्या माहेरा
गुलमोहोरात चक्कर मारली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

रंगीबेरंगीत कायतरी खरड गं सुने मग जा आपुल्या माहेरा
रंगीबेरंगीत खरडले हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा

अ‍ॅडमिनची विपू वाच गं सुने मग जा आपुल्या माहेरा
अ‍ॅडमिनची विपू वाचली हो सासूबाई आता नाही जात मी माहेरा

आणा लॅपटॉप, जोडा इंटरनेट, भिडुद्या राणीसाहेब ड्युआयला
आणला लॅपटॉप, जोडले इंटरनेट, लागल्या राणीसाहेब भांडायला !!!

मामींचा झब्बू-

Ashwinimami | 7 September, 2009 - 10:13
एक बीबी झेलू बाई एक बीबी झेलू.
इकडे रेसीपी घालू अन तिकडे चला भांडू.

दोन बीबी झेलू बाई दोन बीबी झेलू
भामरागडला जाऊ की ललित पाहू

तीन बीबी झेलू बाई तीन बीबी झेलू
बारा की शिट्टी की एस्जी रोडला लिहू.

चार बीबी झेलू बाई चार बीबी झेलू
जाऊद्या झक्कीन्चे रंगीबिरन्गी वाचू.

पाच बीबी झेलू बाइ पाच बीबी झेलू
बाळाचे आजार/दाताचे आजार्/कविता पाडू.

हे माझ्या विपूत रैनाने लिहिलेलं. हरवुन जाऊ नये म्हणून इथे डकवते आहे-

पण मग ह्या बाईंच्या यादीत फक्त पुरुष का ? आणि काहीतरी थातुर मातुर कारणे देऊन हे प्रेम शारिरीक पातळीवर न्यावे का ? जी गोष्ट केल्याबद्दल वनमाळीला दोषी ठरवले तीच गोष्ट केल्याबद्दल नायिकेचे अथवा तिच्या स्वभावाचे उदात्तीकरण केवळ ती स्त्री आहे किंवा स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा म्हणुन का करावे ? नवरा-बायको/स्त्री-पुरुष समानता म्हणजे मला तरी हे अपेक्षित नाही. >>>>
सिंडी. आर्वजून तुझे विचार शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
उदात्तीकरण करावं का- हा लेखिकेचा प्रश्न.
Feminist Writings मध्ये, "परिपूर्ण प्रेमाचा शोध" सापडतोच सापडतो.
स्वैराचार- पुरुषांनी केला तर चालतो आणि स्त्रियांनी केला तर चालत नाही ही प्रस्थापीत समाजाची मनोभुमिका, कारण स्त्रिया भोगवस्तू आणि त्यांच्यावरचा मालकी हक्क ही पुरुषी मक्तेदारी. जशी मालमत्ता, शिकार तशीच स्त्री. तर तिला तिचं अस्तिस्व, विचार असणं, आणि तिलाही शारीरीक जाणीवा असणं, आणि त्या व्यक्त करता येणं, यावर फेमिनीस्ट लेखिकांनी खूप फोकस केला. विद्रोहासाठी विद्रोह.
काही ठळक उदाहरणं म्हणजे मादाम बोव्हारी, अ‍ॅना कॅरेनिना (ह्या पुरुष लेखकांना तो शोध पूर्ण होतो वगैरे दाखवण्याची लिबर्टी घेता आली नाही. अधःपतन आणि -हास आणि विफलतेतून करुण अंत असा प्रवास त्यांनी मांडला). स्त्रीवादी लेखिकांनी मुद्दाम ती लिबर्टी घेतली. unapologetic शारीरीक जाणीवा त्यांनी मांडल्या.
दुसरं- Men can compartmentalize sex & love. Women can't . पण एका वादाचा पुरस्कर करताना जशी टोकाची भुमिका घेतात तशीच टोकाची भुमिका स्त्रीवादी लेखिकांनी घेतली. ते बरोबर आहे की नाही हे विवाद्य आहे, पण ती घेण्याची त्यांना गरज वाटली.

स्त्रीवादी लेखनातही दोन तट पडतात. स्त्रियांच्या म्हणून वेगळ्या जाणीवा असतात का, आणि त्यांच्या world-view मुळे साहित्याला वेगळी मिती लाभते का, हा एक प्रश्न. (Austen, Nadine Gordimer, Virgina Woolf, Sylvia Plath वगैरे.)
दुसरा- विद्रोह आणि इरॉटिका टाईपचे शारिर पातळीवरचे लेखन. (Anais Nin, Erica Jong,Greer वगैरे)

माझा जेंडर स्टडिज चा अभ्यास अतिशय तोकडा आहे. तर ही फक्त मतं आणि ऑब्झर्वेशन.

जगातल्या कुठल्याही भाषेतल्या शिव्या अर्ध्याअधिक स्त्रीयांवरुन देण्यात येतात त्यामागचे कारण हेच.

हे टण्याने माझ्या विपुत लिहिलेलं. कोणाबद्दल ते सांगत नाही. हे पण हरवु नये म्हणून इथे. -

शाब्दिक कोट्या करतात म्हणुन सुमार दर्जाचे असा अर्थ होत नाही त्या वाक्याचा. दोन्ही विशेषणांमध्ये एक अर्धविरामचिन्ह आहे ना.
तिथे सुमारपेक्षा सामान्य हा शब्द वापरायला पाहिजे होता. माझ्या मते सारे प्रवासी घडीचे हे मराठीतल्या फार उत्तम विनोदी पुस्तकांपैकी एक आहे. शंकर पाटलांचा विनोद (धिंड) हे एक अजुन उत्तम विनोदाचे उदाहरण. विनोदी लेखन हे केवळ संपूर्ण विनोदी पुस्तकातच करता येते ह्या समजाला छेद देणारे पुस्तक म्हणजे 'माणसे अरभाट आणि चिल्लार'.
पुलंचे साहित्य आणि त्यामुळे पुलं तथाकथित महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट साहित्यिक झाले ह्याची दोन प्रमुख कारणे:
१. पुलंच्या उमेदीच्या काळात मराठी साहित्य वाचणारा वर्ग हा मुख्यतः पुण्या-मुंबै-(आणि सांगली-नाशिक-नागपुर अशा शहरातील पण सवर्ण) इत्यादी शहरातील उच्चभ्रू वर्ग होता. पुलंनी त्या वर्गाला रुचेल असे विनोदी साहित्य लिहिले.
२. पुलं लेखकापेक्षा कलाकार (पर्फॉर्मर) म्हणुन अधिक कतृत्ववान होते. त्यांचे बहुतांशी साहित्य हे कथाकथनाला कसे उपयोगी पडेल ह्या अंगाने लिहिलेले आहे. तसेच त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा ह्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तिंचे वर्णन होते (हे त्यांनीच अनेकदा लिहिले आहे). अश्या प्रकारच्या आत्मचरित्रात्मक-व्यक्तिचित्रणात्मक लिखाणाच्या मर्यादा आणि त्याचा काल्पनिक-कसदार व्यक्तिचित्रांनी उभ्या केलेल्या कादंबर्‍यांबरोबरची तुलना अनेकांनी ताकदीने लिहिली आहे. (मी ते तेव्हड्या ताकदीने लिहु शकेन असे वाटत नाही. श्रीनांनी रथचक्र किंवा ऑक्टोपसच्या प्रस्तावनेत तसेच नायपॉलने लेटर्स टू ऑथर का अश्याच एका पुस्तकात अश्या लिखाणावर सविस्तरपणे लिहिले आहे.)

आता एक कादंबरी-कथा लेखक म्हणुन पुलं कुठे उभे राहतात? ह्या प्रश्नाचे स्वतःच उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मला पुलं ह्या मनुष्याबद्दल आकस नाहिये. मला गंमत वाटते ती त्यांना मराठीमधले सर्वोत्कृष्ट लेखक म्हटले जाते तेव्हा.

बाकी म्हैस, बिगरी ते मॅट्रिक, रावसाहेब (वा व्यक्ति आणि वल्ली मधली इतर पात्रे) ह्या कॅसेटी लावून हसणे आणि आइ-बापानी शिकवले म्हणुन आयुष्यभर देवाला नमस्कार करणे ह्यात मला फारसा फरक जाणवत नाही. दोन्हीमध्ये उपजत आवडीपेक्षा ठोकून-ठाकून केलेले संस्कार अधिक दिसतात.

वरच्या post बद्दल आधी विचार करत होतो कि बहरामधे लिहिण्यासारखे ह्यात काय आहे पण शेवटचा महान para वाचला नि कळले कि का लिहिले असेल हे Lol

Pages