पुस्तक माहिती आहे का ?

Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57

मी एक दुसर्‍या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्‍या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गामुद्दीन पैल्वान; हे कॅ प्रेम सैगल आणि मी आणि माझा एक मित्र एका हेल्थ आश्रमात एकत्र होतो ८-१० दिवस गेल्या वर्षी. तेच ते पुस्तकाचे लेखक. त्यानी त्या.न्ची ती पुस्तके आम्हाला 'वाचायला लावली 'होती. साधारण तुमचे आणि तुमच्या विचारसरणीचे जे 'विचारधन ' असते ते त्या पुस्तकात ठासून भरलेले होते. त्यामुळे ती आम्ही अर्धवटच सोडून दिली.

म्हणजे कुठल्या तरी नेहरूची आई वेश्या होती वगैरे.
सैन्यात एवढी बालिश विचारा.न्ची माणसे उच्च पदावर असू शकतात हे पहून थक्क झालो होतो....

<<गो. नी. दान्डेकरान्चे 'क्रुष्णवेध' नावाचे एक अप्रतीम पुस्तक आहे. राधा, पेन्द्या आणि कुब्जा यान्च्या नजरेतुन क्रुष्ण...... आता ते पुस्तक आउट ऑफ प्रिन्ट आहे. मी शाळेत असताना वाचले होते. तेव्हापासुन माझ्या मनात घर करुन बसले आहे. कुणाला कल्पना आहे का ते कुठे मिळेल याची?>>

मी गेल्या वर्षी पुण्यात बाजीराव रस्त्यावरील पूर्वीच्या जवाहर होटेलच्या जागेवरील दुकानातून विकत घेतले होते.( I do not remember if it is Crossword or some other book shop, but location is same as described above )

तळटीप : मला स्वतहाला पुस्तक बोअर वाटले होते.

खुप दिवसांनी पुस्तक वाचायला वेळ मिळत आहे...
एखादे आत्मचरित्र वाचायची खुप इच्छा आहे ..
कोणी एखादे नाव सुचवाल काय?

आनंदी, प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा वाचले नसेल तर खूप सुंदर पुस्तक आहे. सुमा करंदीकर यांचे 'रास', नरेद्र जाधव- आमचा बाप आणि आम्ही. सिद्धार्थ पारधे यांचे कॉलनी. बरीच आहेत अजून, आत्ता एवढी आठवली. रांगोळीचे ठिपके- वासंती गाडगीळ.

अंतर्यामी सूर गवसला - श्रीनिवास खळेंचं, किंवा जगाच्या पाठीवर - सुधीर फडकेंचं. नाही तर स्मृतिचित्रे - लक्षुम्बाई टिळकांचं. तीनही मला आवडलेली, म्हणून सहज आठवली.
अजून एक : माझी जन्मठेप - वि दा सावरकर.

छोटी, उदकाचिये आर्ती, झेन गार्डन- मिलिंद बोकील. मधु मंगेश कर्णिक, सानिया, आशा बगे,शं. ना नवरेंचेही चांगले आहेत. जी. ए!

गोवा स्वातंत्र्य संग्रामाबद्दलची कुठली पुस्तकं माहिती आहेत का?
मला एकही नाव माहिती नाही ह्या विषयाबद्दल..

पराग....

"मोहन रानडे" ~ गोवा स्वातंत्र्य आणि मुक्ती संग्रामात ज्यानी प्रत्यक्ष भाग घेतला होता. त्याना अटक झाली, खटला झाल्यावर त्यानी लिस्बन, पोर्तुगाल इथे चक्क १४ वर्षे तुरुंगवास भोगला....त्यातील ४ वर्षे तर एकांतवासात....त्याना तमिळनाडूचे मुख्यमंत्री अण्णादुराई यांच्या मध्यस्थीनंतर १९६९ मध्ये मुक्त करण्यात आले. श्री.रानडे यानी गोवा मुक्ती संग्रामावर जी दोन पुस्तके लिहिली आहेत

१. सतीचे वाण - मराठी आणि कोकणी भाषेत आहे....आत्मचरित्र स्वरुपात...मौज प्रकाशन
२. स्ट्रगल अनफिनिश्ड - इंग्लिश [हे मला माहीत आहे, मात्र वाचायला मिळालेले नाही.]

मी फार पूर्वी एक "पैसा" नावाचं पुस्तक पाहिलं होतं. त्यात पैश्याविषयी खुप इंटरेस्टिंग इन्फो होती.
म्हणजे "आपण जर नको तिथे पैसा वाचवला उदा. रेल्वेचं तिकिट वै. न काढुन.. तर तो पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याकडुन जातोच" अश्या टाईपची इन्फो होती. कोणाकडे असेल तर सांगा. किंवा कुठे मिळेल तेही. मला त्याचं मुखपृष्ठ अर्धवट आठवतंय. कोणाकडे असेल तर फटु तरी टाका प्लीज.

पान क्र. ६ वर शाहिर यांनी शशी भागवतांच्या रक्तरेखा बद्दल विचारलं होतं. तर आता शशी भागवतांची 'रक्तरेखा' आणि बहुधा 'रत्नप्रतिमा' (रत्नप्रतिमा का मर्मभेद हे मला नक्की आठवत नाहीये) ही दोन पुस्तकं रिप्रिंट होऊन पुन्हा दुकानांत आली आहेत. मी गेल्या महिन्यात पुण्याच्या आचार्य अत्रे सभागृहातल्या प्रदर्शनात पाहीली होती. कोणाला हवी असल्यास आता मिळू शकतील.

गो.नी.दांची 'मृण्मयी' शोधतोय कधीपासून, मिळतच नाही.. Sad
तसेच आशापूर्णादेवींची 'सुवर्णलता' (मराठी अनुवाद, मूळ- बंगाली) कोणाला दिसली तर कळवा.

खूप दिवसांपूर्वी पुण्याच्या 'पुणे मराठी ग्रंथालयातून' घेऊन वाचली होती पण आता बाजारात कोठेच मिळत नाही.:अरेरे:

रमड धन्यवाद. मर्मभेद वाचले होते. रक्तरेखा अजून वाचलेले नाही. साधारण तशाच टाईप चे आहे का? संजय सोनवणी यांचे नवीन आलेले एक "हिरण्यदुर्ग" ही साधारण तसेच वाटते.

रक्तरेखा साधारण कसे आहे सांगू? ओमेन सिनेमा सारखे. पण भाषा, प्लॉट आणि सगळ्या धाग्यांची सांगड मस्त घातली आहे. तर रक्तरेखाची सर ओमेन ला नाही Happy

ह्म्म्म, अंकु >>
साधारण १०० वर्षांपूर्वीच्या कलकत्त्यामधील सुवर्णलताची कहाणी आहे, जिचे लहानपणीच वयाने खूप मोठ्या व्यक्तीशी लग्न होते.(फसवून, तिच्या आईच्या विरोधात जाउन ) आणि सासरी आल्यानंतरचे तिचे जीवन यात वर्णिले आहे.

पण ही नेहमीच्या पठडीतील कथा नाही. सुवर्णलता शिकलेली आहे, थोडी पुढारलेली आहे. त्यामुळे पुराणमतवादी सासरी तिचे जगणेश मुश्किल होते, पण तरीही ती ज्या प्रकारे गोष्टी हाताळते त्या बद्दल आहे हे पुस्तक.

या पुस्तकावर बंगाली मध्ये एक सिरियल पण आली होती, अनन्या चटर्जी ने सुवर्णलता साकारली होती... अप्रतिम. त्या सिरियल चे Title song पाहू शकता, आयडीया येइल.

www.youtube.com/watch?v=GKgxSpGZsLE

मला हे पुस्तक सापडत नाहीये.

स्पाय फिक्शन आहे. एका देशाचा स्पाय दुसर्या देशात विषारी वायू सोडतो आणि त्यामुळे शरीराला भोकं/ पुरळ येऊ लागत. आता नेमकी गोष्टही आठवत नाहीये. ७-८ वर्षांपूर्वी आमच्या इंग्रजीच्या बाईंनी सांगितलेली हि गोष्ट आता त्यांनाही आठवत नाहीये. Sad

मृण्मयी मला 'रसिक' मध्ये मिळाली होती. अर्थात घेउन २ वर्ष तरी झाली त्यामुळे आता मिळेल की नाही कल्पना नाही.

मध्यंतरी 'मृण्मयी'ची आवृत्ती संपली होती. एकदोन दिवसांत हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध होईल.

rar >>> मला हवी आहे. पण मी पुण्यात आणि तुम्ही...?

सिंडरेला >>> रसिक मध्ये आता नाही.

एकदोन दिवसांत हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध होईल.>>> ग्रेट, मी चेक करेन एकदोन दिवसांत.
Happy

मध्यंतरी 'मृण्मयी'ची आवृत्ती संपली होती. एकदोन दिवसांत हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध होईल.>>>>>>>>>>. मायबोलीच्या खरेदीविभागात चेक केले, Sorry we are Out of stock
We are out of stock and can not predict availability. हा मेसेज दिसला, आता?:अओ:

पी.व्ही.नरसिंह राव यांची द इन्सायडर, अरुंधती रॉय यांची द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज आणि आणखी दोन पुस्तके ज्यातले एक भारत-पाकिस्तान फाळणीचा घटनाक्रम तपशीलवार नोंदवलेले एका ब्रिटिश अधिकार्‍याने की पत्रकाराने लिहिलेले एक पुस्तक यांचा परिचय करून देणार्‍या, सविस्तर कथानक समाविष्ट असलेल्या चार दीर्घ लेखांचं संकलन असलेलं एक मराठी पुस्तक. कोणतं?

नक्की आठवत नाही पण ते लेख माणूस या नियतकालिकात आले होते बहुतेक.

एक कुमारवयीन मुलांसाठी पुस्तकांची मालिका होती ज्यात प्रत्येक पुस्तकातला कथानायक हा एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात (विषुवतीय, वाळवंटी, गवताळ, बर्फाळ इत्यादी) रहायचा आणि त्याच्या तोंडून एका वर्षाचा साधारण दिनक्रमाचे वर्णन केले होते. फारच सुरेख मालिका होती ती! इथे कोणाला तिचे नाव, लेखक, प्रकाशक माहिती आहेत का? आधीच धन्यवाद!

Pages