पुस्तक माहिती आहे का ?

Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57

मी एक दुसर्‍या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्‍या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला "मैत्रेयी" पुण्याच्या रसिक पुस्तकालयातून मिळाले. पुस्तकालयाचे श्री. योगेश नान्दुरकर यान्नी खूप मदत केली.

हा प्रश्न इथे योग्य नाही पण कुठे टाकावा माहिती नाही.
माझ्या मुलीची NIIT (१९९९/२०००) ची बरीच पुस्तके आहेत. ती फेकून देववत नाहीत. ती आता तिच्या उपयोगाची नाहीत तर त्याचे मी काय करू शकते कुणी सुचवेल काय?
डीटेल्स नंतर देऊ शकते.

हो केदार हा ऑप्शन होता डोक्यात पण आम्ही नगरला असतो तिथल्या लायब्ररीत कितपत उपयोग होईल माहीत नाही.

वाचायला पुस्तकं सूचवा असा धागा सापडला नाही म्हणुन हे इथेच टाकतेय.

hawa_hawai | 14 August, 2009 - 06:38
पुस्तके सुचवा बरं दोन चार. विषय कुठलाही चालेल. (फक्त कादंबरी नको.) दोन दिवसाची सुटी वाचनात घालवायचा विचार आहे.
shonoo | 14 August, 2009 - 07:26
गंधर्व - बाळकॄष्ण प्रभुदेसाई, बखर बिम्मची - जी ए कुलकर्णी - ही दोन्ही छोटेखानी आहेत . लवकर वाचून झाली तरी पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत.
कुंपणापलिकडला देश- मीना टिकेकर - २००१ च्या नंतर एका मराठी बाईने पाकिस्तानात केलेल्या वास्तव्याची , प्रवासाची, अभ्यासाची , निरीक्षणांची हकिकत.
प्रतिभा रानडेंचं कुठलं ही...
रॉय किणीकरांचं उत्तररात्र

शोभा चित्रेंची वाच - मंगला गोडबोलेंच्या पुस्तकांपेक्षा थोडी वेगळी ( प्रासंगिक , तात्कालिक नाहीत ) पण तरिही हलकी फुलकी.

हरिवंशराय बच्चन यांच्या आत्म चरित्राचे तिन्ही खंड
लहानपणी भानू शिरधनकर यांनी लिहिलेली आगगाडीची कुळकथा, मोटरगाडीची कुळकथा, उत्तरधृवावर मोहीम, अशी पुस्तकं वाच. ती मिळाल्यास अवश्य वाच.

sayonara | 14 August, 2009 - 07:10
छोटेखानी ना, प्रकाशवाटा वाच च. वाचलं नसशील तर. अगदी दोन दिवसांत होईल

sayonara | 14 August, 2009 - 07:29
शोभा चित्रेंचं 'गोठलेल्या वाटा' माझं एकेकाळी प्रचंड आवडतं होतं. आता त्या बद्दल तसंच वाटेल की नाही कोण जाणे.

tanyabedekar | 14 August, 2009 - 07:40
भारत सासणे, राजन खान ह्यांच्या लघुकथांची/कादंबर्‍यांची
नॅशनल बूक ट्रस्टने गेल्या ६०-७० वर्षातील मराठी लघुकथांचा संकलित संग्रह काढला आहे. चांगला आहे.
नॅशनल बूक ट्रस्टचे राग दरबारी - श्रीलाल शुक्ल भाषांतर - श्रीपाद जोशी
कॉन्टिनेंटलनचे गाडगीळ, गोखले, माडगुळकरांचे संकलित लघुकथांचे ७०च्या दशकातले संग्रह आहेत.
रात्र वैर्‍याची आहे - जी ए कुलकर्णी (मूळ हंगेरिअन महिलेच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद)
जास्वंद - टिकालेख

robeenhood | 14 August, 2009 - 10:37 नवीन
कुंपणापलिकडचा देश मीना नाही मनीषा टिकेकर....

ह ह,
शोभा चित्रेंपेक्षा मला अजिता काळेंची पुस्तकं आवडतात. देशांतरीच्या गोष्टी सांगता मला चांगल वाटलं.
वासंती मुझुमदारांचं 'नदीकाठी' हे अजुन एक आवडतं पुस्तक. त्यांचच 'झळाळ' मला थोडं गूढ, Dark वाटलं.

दोन दिवसांत वाचायच्या असतील तर -
अनिल बर्वेंचा एक कथासंग्रह आहे. नाव विसरलो Sad त्यात जाहिरातक्षेत्रावर आधारित कथा आहेत.
हाजीबाबाच्या गोष्टी (भारांनी केलेला 'हाजीबाबा ऑफ इस्फाहान'चा सुरेख अनुवाद)
श्याम मनोहर कथासंग्रह
चिं वि जोशींचे कुठलेही
तेंचे 'हे सर्व कोठून येते ?' आणि 'रामप्रहर'
अनंत भालेरावांचे 'कावड'
अतुल देऊळगावकरांनी लिहिलेले लॅरी बेकरांवरचे पुस्तक
केनेथ अँडरसनच्या शिकारकथांचे अनुवाद, खासकरून 'शिवानीपल्लीचा काळा चित्ता'
जिम कॉर्बेटच्या 'माय इंडिया' या पुस्तकाचा मराठी अनुवाद (अप्रतिम पुस्तक !)
गोनीदांची शिवकालीन महाराष्ट्र मालिका
नारळीकर, फोंडके, घाटे यांचे विज्ञानकथासंग्रह

स्मृतींमध्ये रमायचे असेल तर - फाफे, नवाथे, बुकलवार, मालती बेडेकरांचे भिंगरी, चल उडुनी पाखरा, गोट्या, समग्र किशोरचे खंड, भाग्यवान असाल आणि मिळाली तर इंद्रजाल कॉमिक्स (मराठी), आनंदचे अंक, कुमारचे अंक, वसंत शिरवाडकरांनी लिहिलेली पुस्तके

अनिल बर्वेंच्या पुस्तकांची यादी (काय चार-दोन आहेत ती) टाका कुणीतरी. आणि दुसरे कुणी ती सगळी पुस्तके माझ्यासाठी घेऊन ठेवा. कोण आहेत ते पुस्तकांच्या दुकानात नेहेमी जाणारे ? Proud

अनिल बर्वे नावाच्या लेखकाची एक कादंबरी आहे.. नाव विसरलो..

एक कोटी गॅलन पाणी लिहिलेला आणि डाव्या चळवळीतला लेखक कोण? अनिल दामले का? की बर्वेच?

अनिल बर्वे म्हणजे तेच. एक कोटी गॅलन पाणी आणि डोंगर म्हातारा झाला वाले. त्यांची एक होरपळ नावाची सुद्धा छोटी पण छान कादंबरी मी वाचली आहे.
अच्युत बर्वे त्यांचे भाऊ. अन्नपुर्णा आणि एकवीस मेजवान्या (हो तेच लाल सोनेरी वाल्या मेजवान्या : )) ) लिहिणार्‍या मंगला बर्वे म्हणजे अच्युत बर्वेंची पत्नी. त्यांनी त्यांच्या मुक बधीर मुलीवर एक खूप वाचनीय पुस्तक लिहिले आहे सुखदा नावाचे.

सत्तर दिवस हा मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे . मूळ लेखक :- पिअर्स रीड आणि अनुवाद रवींद्र गुर्जर .

एक कोटी गॅलन पाणी ?
माझ्या मते अकरा कोटी गॅलन पाणी असे पुस्तक आहे.
ज्यातील कथा थोडिफार काला पत्थर शी मिळती जुळती आहे. (चु.भु.दे.घे.)

ज्यातील कथा थोडिफार काला पत्थर शी मिळती जुळती आहे. (चु.भु.दे.घे.)

>>>

कारन दोन्ही गोष्टी एकाच सत्यघटनेवर आधारित आहेत. बिहारमधल्या चासनाला येथील कोळशाच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत शेकडो मजूर ठार झाले होते. त्यावर बर्व्यानी गम्भीर लेखन तर यश चोपडानी उथळ चित्रपट काढला. त्याचे नाव काला पत्थर . नेहमी प्रमाणे प्रेम कहाण्या, गाणी नाच ई. मागे बॅकग्राउन्डला दुर्घटनेचा कॅनव्हास....

<याची इ-बुक्स आहेत का?>

विषयांतराबद्दल क्षमस्व, पण बहुतेक सर्व मराठी पुस्तकांची इ-बुक्स अनधिकृत आहेत. त्यामुळे प्रताधिकारकायद्याचा भंग होतो.
इ-बुक्स मोफत उपलब्ध करून देणार्‍या संकेतस्थळांविरुद्ध मराठी प्रकाशकांनी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. IIT, Powaiच्या serverवर उपलब्ध असलेली पुस्तकं काढून टाकण्यात आली आहेत. इतरही काही संकेतस्थळांना कायदेशीर नोटिशी पाठवल्या गेल्या आहेत. तेव्हा कृपया इ-बुक्स वापरू नका. पुस्तकं विकत घ्यायची असतील, तर बहुतेक सर्व प्रकाशकांची पुस्तकं मायबोलीवर विक्रीस उपलब्ध आहेत.

याची इ-बुक्स आहेत का?
>>>
नसावीत. असली तरी ती अधिकृत आहेत का ते बघा. शक्यतो मराठी पुस्तके विकत घ्या व वाचा. त्याने अनेक गोष्टी साध्य होतील. आता परदेशातदेखील जवळपास सर्व मराठी पुस्तके विकत मिळू शकतात.

एका विशिष्ठ शहरातील प्रसंग. काऊन्टरवर एक मराठी पुस्तक मागितले. चितळे जिलेबी सम्पल्यावर ज्या स्थितप्रज्ञतेने 'नाही' म्हणून सांगतात तेव्ढ्याच निर्विकारपणे 'शिल्लक नाही' असे सांगण्यात येते. मग मी त्याना काऊन्टरच्या बाहेरून आतले पुस्तक दाखवतो. त्यावर ते कोणतेही ओशाळवाणे भाव न आणता तितक्याच कोडगेपणाने बिल करून देतात आणि पुस्तक देतात....

मोराल ऑफ द स्टोरी:- पुस्तक असले तरी ते मिळेलच याची खात्री नाही.

धन्यवाद रुनी आणि ईतर सगळे. मला माहित नव्हतं असाही बा.फ. आहे म्हणून.

ट्यु अनिल बर्वेंची 'डोन्गर म्हातारा झाला' आणि 'होरपळ' ही दोन वेगळी पुस्तके आहेत का?

प्रतिमोराल (लांडोर ?) : स्थितप्रज्ञतेचे खुद्द भगवंताने विसरलेले लक्षण.

आणखी अशीच दोन-तीन दिवसांत वाचायची पुस्तके म्हणजे ज्योत्स्ना देवधरांचे 'उत्तरयोगी' आणि गवाणकरांचे 'सालिम अली'. दोन महामानवांची छोटेखानी सुंदर चरित्रे.

Pages