पुस्तक माहिती आहे का ?

Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57

मी एक दुसर्‍या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्‍या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कडच्या पुस्तकांमधे नाहीये ही गोष्ट - निळा सावळा, सांजशकुन, ओंजळधारा, हिरवे रावे, रक्तचंदन ही पुस्तकं पाहिली मी आताच.

माफ करा काल मी जी. ऐंची काना कथा कुठल्या पुस्तकात आहे हे विचारले. माझी जरा चुक झाली. त्या कथेचे नाव 'काली' असे आहे. ही कथा कुठल्या पुस्तकात आहे हे माहिती असेल तर कृपया उत्तर लिहा.

इ-सकाळमधे पुस्तक परीक्षण यायचे. आता येत नाही का ?

बरेच दिवस अरुणा ढेरेंचं 'मैत्रेयी' शोधतेय.. विकत घ्यायचय. कुठेही सापडत नाहीये. मुंबई आणि पुणे दोन्हीकडे पाहिलं. जवळ जवळ चार महिने झाले. परवा मॅजेस्टिक वाल्यांनी सांगितल की पुस्तक out of print आहे.
कुणी मदत करु शकेल का?

--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault... Proud

ज्ञानेश्वरीचा (भावार्थदिपीका) उत्तम इंग्रजी अनुवाद कुणाला माहिती आहे का? माझ्या ओळखीचा एक गृहस्थ नुकताच पुल्लेला गोपीचंदला भेटला तेव्हा गोपीचंदने त्याला सांगितले की तो सध्या ज्ञानेश्वरीचा एक अनुवाद वाचतो आहे पण तो इतकासा चांगला नाही (word by word translation).. त्याला अधिक चांगला अनुवाद पाहिजे..

साहसांच्या जगात आणि सत्तर दिवस (हे बहुधा अनुवादीत पुस्तक आहे) ह्या दोन पुस्तकांचे लेखक/प्रकाशक माहिती आहेत का ?

साहसांच्या जगात हे एकेकट्याने वेडी धाडसे मुद्दामहुन केलेल्या अथवा बिकट परिस्थितीत सापडल्यावर हिंमतीने त्यातुन वाट काढलेल्या लोकांवर आहे. शाळेत असताना बरीच पारायणे केलीत ह्या पुस्तकाची. लेखक कुणी देवधर का ?

ते सत्तर दिवस चे लेखक माहित नाही.. पण वाचलं तेव्हा खूप आवडलं होतं.. !!
मी शाळेत मराठीच्या पुस्तकात लपवून वगैरे वाचलं होतं ते.. तास चालू असताना.. Wink
सिंडे, खूप दिवस दिवसांनी आठवण निघाली ह्य पुस्तकाची.. धन्यवाद. Happy

बर्फाळ प्रदेशात निर्जन पर्वतावर विमान पडते अशीच आहे ना गोष्ट त्याची ? नाही, तु अगदी मराठीच्या पुस्तकात लपवून वाचलं म्हणतोस त्यामूळे जरा शंका आली Wink

'ते सत्तर दिवस' या पुस्तकाचा अनुवाद श्री. विजय देवधर यांनी केला आहे. प्रकाशक कोण, ते लक्षात नाही. शाळेत असताना हे पुस्तक वाचलं होतं.

धन्यवाद चिनूक्स. दोन्ही पुस्तकांचे लेखक श्री विजय देवधर च आहेत. मी पण शाळेच्या ग्रंथालयातुन आणुन वाचली आहेत दोन्ही पुस्तके.

ते अँडीज पर्वतात फुटबॉल टीम चे विमान पडते ते का? त्यावर अलाइव्ह नावाचा मस्त चित्रपट आहे.

हो ... तेच...

मी पण वाचलं आहे आणि सिनेमा पण पाहिला आहे...
फक्त सिनेमाचं नाव आठवंत नव्हतं...
_______
हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...!

मूळ पुस्तक हे आहे जर कोणाला वाचायचे असेल तर "Alive: The Story of the Andes Survivors"

शाळेत असताना आम्हाला तरी ते सत्तर दिवस नव्हते. बहुतेक तुम्ही सर्वं आमचे जुनीअर अहात Happy

माझ्यापेक्षा मला माझ्या आधीच्या पिढीला मराठीचा जो अभ्यासक्रम होता तो फार चांगला होता असे वाटते कारण त्यात बरेच चांगले लेखक/कवी निवडले होते.

असाम्या धन्यवाद हं!

बी... ते पुस्तक आम्हाला शाळे नव्हतं... आम्ही शाळेत शिकत असताना ते वाचलं होतं... इतर गोष्टींची पुस्तकं वाचायचो तसं...

गो. नी. दान्डेकरान्चे 'क्रुष्णवेध' नावाचे एक अप्रतीम पुस्तक आहे. राधा, पेन्द्या आणि कुब्जा यान्च्या नजरेतुन क्रुष्ण...... आता ते पुस्तक आउट ऑफ प्रिन्ट आहे. मी शाळेत असताना वाचले होते. तेव्हापासुन माझ्या मनात घर करुन बसले आहे. कुणाला कल्पना आहे का ते कुठे मिळेल याची?
मी पुण्यामधली सगळी दुकान पालथी घातली. पण नाही मिळाले. खुप जणाना नावही माहीत नव्हते. Sad

क्रुष्णाच स्पेलिन्ग चुकलय.....:(

मला कृपया कोणीतरी पु.लं च्या "ती फुलराणी" मधलं भक्ती बर्वेंनी अजरामर केलेल्या "तुला शिकवीन चांगला धडा' सुप्रसिद्ध स्वगताचे स्क्रिप्ट (ऑनलाईन) कुठे मिळेल ते सांगा ...! किंवा कुणाकडे असेल तर प्लिज मला इमेल करा....!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिन आरतीला तालिबान-लश्कर (चाँद तारे) सारे... Happy
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

बर्फाळ प्रदेशात निर्जन पर्वतावर विमान पडते अशीच आहे ना गोष्ट त्याची ? नाही, तु अगदी मराठीच्या पुस्तकात लपवून वाचलं म्हणतोस त्यामूळे जरा शंका आली >>> Rofl
.
ऍडम : अनूमोदन. सत्तर दिवस , बर्म्युडा ट्रँगल, ओशन ट्रँगल ही पुस्तक शाळेच्या तासाला वाचताना ज्याम मजा यायची Proud
.
परवा मादाम बोव्हरी (अनूवाद) वाचायला घेतल पण नाही आवडल इतक. असाच कंटाळा ललिता गौरी कवळींच्या ऍना कॅरनीना (अनूवाद ) वाचताना आला होता. Sad

इथे डोकावुन पहा.
http://www.myemagazines.com/

===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

ओरिगामी साठी सोप्पेसे पुस्तक माहित आहे का कोणाला. लायब्ररीच्या कॅटलॉग मधे डझनानी नोंदी आहेत ...

ओरिगामी साठी सोप्पेसे पुस्तक माहित आहे का कोणाला. >> बाकी बरीच चांगली पुस्तके बाजारात उपलब्ध असतील. मराठीत हवे असल्यास अनिल अवचटांचे 'मजेदार ओरिगामी' हे पुस्तक या वर्षी बाजारात येणार होतं. आलं की नाही कल्पना नाही.

शोनू, माझ्याकडे एक ओरिगामीवरचं पुस्तक आहे. जापनीज मधे आहे. माझ्या जापनीज शिक्षीकेनी दिलं होतं. पण सुरेख चित्रं आणि स्टेप बाय स्टेप कृती आहेत. त्यामुळे वाचायला / करून पाहायला काही त्रास पडत नाही.
तुला हवं असेल तर पत्ता मेल कर. मी पाठवून देईन.

ओरिगामी साठी सोप्पेसे पुस्तक माहित आहे का कोणाला. >> कोणासाठी ? तुझ्यासाठी कि मुलीसाठी ?

मुलीसाठीच असणार. ती नंतर शिकवेन की आईला त्यात काय एव्हढं.

मुलीला शिकवण्यासाठी . बाबा काही शिकवणार नाही , म्हणजे मलाच शिकवावं लागेल Happy
शक्यतो इंग्रजी पाहिजे ( कारण इथे मिळेल म्हणून ).
डेट्रोईटकर - इमेल करतेय मायबोलीवरुन

शोनू - रिप्लाय केला आहे.

"हर्ष खेद ते मावळले" नावाचे एक आत्मचरित्रपर पुस्तक काही वर्षांपुर्वी वाचले होते.
लेखकाला आलेले डिप्रेशन आणी त्याची ट्रीटमेंट असे होते ते.
त्याचे लेखक कोण आहेत?

Pages