पुस्तक माहिती आहे का ?

Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57

मी एक दुसर्‍या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्‍या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पिलोबा' नावाचे पुस्तक कोणी वाचले आहे का? कोणाचे आहे?
मी शाळेत असताना वाचलेले. आता एकदम आठवले. मनात घर करून बसलेली आणखीही काही पुस्तकं आठवली. 'शोभना', 'जीवनसाथी', 'एकच डोळा बोलतो आहे', 'युरी गागारीन', माक्सीम गॉर्कीचं 'माझं बालपण', इत्यादी. 'शोभना', 'जीवनसाथी' यांच्या कथांना बंगाल, कलकत्त्याची पार्श्वभूमी आहे. पुन्हा वाचावीशी वाटतात पण माक्सीम गॉर्की व्यतिरीक्त इतर पुस्तके कोणाची आहेत हे आठवत नाही. इतर काहींच्या कथा आठवतात, पण लेखक, नाव वगैरे काही आठवत नाही. त्यांच्याबद्दल पण नंतर विचारीन इथे.

नमस्कार मायबोलिकर,

मला ऑस्ट्रेलियात 'पडघवलि' हे पुस्तक कुणा कडे मिळु शकेल का? खुप वाचावस वाटत आहे...

धन्यवाद
अकुला

अकुला, तू कॅनबेरात कुठे राहतेस? मी अगदी पडघवली नाही तरी काही मराठी पुस्तकंबद्द्ल तुला माहिती देउ शकेन.

अरे भाग्या , आपण पुर्वि भेटलो नाही पण फोन वर नक्कि बोललो आहोत... मि रुपाली, २ वर्रशा पुर्वि आपण इथेच मायबोलि वर भेटलो होतो, नन्तर मि भारत वारि ला गेले आणी आल्यानन्तर कामात एकदम बिझि असल्या मुळे इथे जास्त आलेच नाहि, पण मध्यन्तरि श्वेता पुरोहित ने मला तुझा नम्बर दिला होता पण कामा ची जागा चेन्ज झालि नि तुझा नम्बर हरवला.
खरच बर झाल तुझ्याशी कॉन्टॅक झाला ते. प्लीझ सान्ग्शील का मला केन्बेरात कुठे मराठी बूक्स मिळतिल ते? खरच खुप वाचन करावस वाटत आहे मला सध्या.
मी माझा पुर्वि चा आयडी आणि पासवरड विसरले तेव्हा परत नवीन लोग इन कराव लागल... (मॉड माफ करा प्लीझ!)

अकुला (रुपाली) तू होय! Happy
इथे मराठी पुस्तके फक्त ए एन यू च्या लायब्ररीत आहेत, पण तुला त्यासाठी विद्यार्थी/स्टाफ होणं जरुरी आहे. बाकी तुझ्या लोकल लायब्ररीत जर तू पुस्तकांची लिस्ट दिलिस (लेखकांसकट) तर ते मागवतील, २-३ महिन्यात. मी बेलकॉनेन ला मागवणार आहे.

बाकी तुझा नवीन फोन नं काय? माझा देउ का परत? हो, श्वेताशी बोलणं झालेलं, तू एअरपोर्ट् जवळ जातेस ना कामाला आता?

अरे भाग्या धन्स झटकन रिपलाय दिल्या बद्दल!
बघते मि आता वोडन च्या लायब्ररित प्रयत्न करुन.

अग मी आता पार्क ला असते... एअपोर्ट च काम सोडल कधीच.
माझा मोबाइल घे ०४३४ ९७० ४०४.

मित्रांनो, मी नुकताच 'मायबोली'चा सभासद झालोय. एक पुस्तक शोधण्यासाठी मला तुमची मदत हवीय. मी जवळपास २० वर्षांपूर्वी म्हणजे शाळेत असताना हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या आयुष्यावर आधारित 'इन्कलाब' नावाची अतिशय सुंदर कादंबरी वाचली होती. कादंबरीचा मुख्य नायक भगतसिंग आहे. अतिशय उत्कृष्ट आणि ओघवत्या भाषाशैलीतील हे पुस्तक त्यातील प्रत्येक प्रसंग जिवंत करते आणि आपल्या मनाची पकड घेते. हे पुस्तक पुन्हा एकदा वाचण्याची खूप इच्छा आहे, पण सध्या परिस्थिती अशी झालीय की पुष्कळ प्रयत्न करुनही ते मला मिळत नाहीय. इतक्या वर्षांनंतर त्यातील काही प्रसंग मला अजूनही आठवतायत, पण दुर्दैवाने लेखिकेचे पूर्ण नाव किंवा प्रकाशन संस्थेचे नाव काही आठवत नाहीय. लेखिकेचे पहिले नाव 'मृणालिनी' आहे. पण एवढ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे मुंबईत बर्‍याच ठिकाणी चौकशी करूनही हे पुस्तक मला मिळू शकलेले नाही; अगदी दादरच्या 'आयडियल पुस्तक त्रिवेणी'मध्येही नाही. आपल्यापैकी कोणी हे पुस्तक वाचलेले आहे का? असल्यास कृपया त्याबद्दलची माहिती येथे कळवावी. माझ्या मते हे पुस्तक पुन्हा-पुन्हा वाचण्यासाठी संग्रही ठेवावे असे आहे त्यामुळे आपल्यापैकी कुणाकडे तरी हे पुस्तक असेल अशी आशा वाटते. तेव्हा हे पुस्तक मला मिळवून देण्यासाठी माझी मदत करणार ना? धन्यवाद!

लेखिकेचे नाव - मृणालिनी जोशी.

इन्किलाब खूपच छान पुस्तक आहे, त्यांचे अजून एक छान पुस्तक - मुक्ताई.
मी पुण्यात चौकशी करुन सांगेन.
-अनिता

धन्यवाद अनिता! पुस्तक मिळविण्याच्या दिशेने एक पाऊल तर पुढे पडले. मी तुमच्या पोस्टची वाट पाहीन आणि 'मुक्ताई' सुद्धा मिळवून वाचेन.

माझ्या एका मित्राला य. दि. फडकेंची खालील पुस्तकं हवी आहेत -

मराठी :
शोध सावरकरांचा
नथुरामायण (हे रसिक.कॉमवर सापडलं)
डॉ. आंबेडकरांचे मारेकरी अरूण शौरी
आंबेडकरी चळवळ

इंग्रजी:
Maharashtra in the 20th Century
Women in Maharashtra

मुंबई/पुण्यात ही पुस्तकं कुठे मिळतील, कोणी सांगू शकेल का? धन्यवाद Happy

gandharva हे पुस्तक मी कर्वे रोड वर च्या देसाई बंधुचा हॉल आहे ना त्याच्या शेजारि पुस्तक प्रदर्शनात बघितले आहे...सध्या तिथे ते चालु आहे का नाही माहित नाही..पण नक्कि कुठल्या तरि अशाच प्रदर्शनात मिळेल्..

साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात आनंद अभ्यंकर ह्यांनी लिहिलेल्या मीठ ह्या पुस्तकाचा उल्लेख आहे. हे पुस्तक रॉय मॉक्सहम यांनी लिहिलेल्या The Great Hedge of India ह्या पुस्तकाचा अनुवाद आहे असा उल्लेख आहे. दोन्हीपैकी कुठले पुस्तक कुणी वाचले आहे का ?

नमस्कार.

मी ह्या सदरात नविन आहे..मला एका कवीतेचि महिति पहिजे आहे..
पलिकडे ओढ्यावर,
माझे गाव ते सुंदर,
झाडा झुडपात आहे,
लपलेले माझे घर....

कुनाला हि कविता पूण येते का?

गन्धर्व त्या लेखिकेच नाव "मृणालिनी जोशी " आहे ते पुस्तक तुम्हाला अत्रे सभागृहात लागणार्‍या पुस्तक प्रदर्शनात किंवा उत्कर्ष बुक डेपो, अप्पाबळवंत चौकात मिळेल

नमस्ते
Laura Wilder हिचे लिटील होम हे मराठीमधले पुस्तक कुठे मिळेल? फार वर्षापुर्वी वाचला होता.
आता काहीच लक्षात नाही .माहिती सान्गितल्यास आनन्द वाटेल.साधारण ८-९ पुस्तके तरी वाचली होती. नेट वरुन पण मिळालि तरी चालतील

मी एक पुस्तक शोधते आहे - जी. ए. कुलकर्णी यांचे - पुस्तकाचे नाव माहित नाही म्हण्ण्यापेक्षा कुठल्या पुस्तकात त्यांची "लक्ष्मी" नावाची कथा आहे असे विचारते आहे. कोणाला माहित असल्यास कळवावे. धन्यवाद! जी. ए.ची सगळीच पुस्तकं हवी आहेत विकत - कुठे खात्रीने मिळू शकतील हे जाणकारांनी सूचित करावे. मी अमेरिकेत आहे.

खादाडमावशी, धन्यवाद त्वरित उत्तराबद्दल! पिंगळावेळ "आउट ओफ प्रिन्ट" आहे असे कळते. तुमचे नाव मी ठीक लिहिले आहे न?

अमी

रुनी, धन्यवाद त्वरित उत्तराबद्दल! मायबोलीवर "खरेदी" विभागात पुस्तके आहेत हे मी अगदीच विसरले होते!

अमी

मला डॉक्टर्सनी लिहिलेली पुस्तक हवी आहेत. मी नुकतेच वॉर्ड नं. पाच डॉ. रवि बापट)आणि लाख मोलाचा जीव (डॉ. अरुण लिमये)वाचलेत. अजुन काही सजेशन्स?

ग्रंथालीचं डॉक्टरबाबू नावाचं धमाल पुस्तक आहे. लेखकाचं नाव विसरलो. महाराष्ट्र टाइम्समध्ये हे लेख प्रसिद्ध होत होते. मेडिकल कॉलेज आणि नंतर रुग्णालयांतल्या जीवनावरचं हे पुस्तक आहे.
डॉ. रामाणी यांचं 'ताठ कणा' (आत्मचरित्र)
डॉ. पुरंदरे यांचं 'शल्य - कौशल्य' (आत्मचरित्र)
डॉ. प्रकाश आमटे - 'प्रकाशवाटा' (आत्मचरित्र

डॉ. श्रीखंडे यांचं आत्मचरित्रही ग्रंथालीनं प्रकाशित केलं आहे. नाव लक्षात नाही. हे आत्मचरित्र बरंच विस्कळीत आहे, पण मला आवडलं.
या आत्मचरित्रासंदर्भात डॉ. श्रीखंडे यांची मुलाखत - http://www.youtube.com/watch?v=hrRCh4LtLO0

Pages