मी एक दुसर्या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!
पुस्तक माहिती आहे का ?
Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद हलकंफुलकं पुस्तकं कुणी
एखाद हलकंफुलकं पुस्तकं कुणी सुचवू शकेल का?
ललितलेख संग्रह किंवा तसंच काहीतरी. आत्ताच छावा वाचून संपवलं . डोकं आणि मन दोन्ही सुन्न झालंय. आता काहीतरी light वाचायचंय.
लुइसा मे अल्कॉट यांची 'लिटल्
लुइसा मे अल्कॉट यांची 'लिटल् वुईमेन' या कादंबरीचा शांता शेळके यांनी केलेला अनुवाद. “चौघीजणी”
गोनिदांचे पडघवली आणि ईतर सगळी पुस्तके.
शाली +1
शाली +1
आणि चक्क चिंटू कॉमिक्स वाचा असेल उपलब्ध तर.
लुइसा मे अल्कॉट यांची 'लिटल्
लुइसा मे अल्कॉट यांची 'लिटल् वुईमेन' या कादंबरीचा शांता शेळके यांनी केलेला अनुवाद. “चौघीजणी”
गोनिदांचे पडघवली आणि ईतर सगळी पुस्तके>>
शांता शेळक्यांचं अजून एकही पुस्तकं वाचलेलं नाही. Bookganga वर शोधेन. धन्यवाद शाली.
धन्यवाद प्राचीन.
हा खरं तर धागा माहित आहे का,
हा खरं तर धागा माहित आहे का, असा प्रश्न आहे.
लहान मुलांच्या इंग्लिश पुस्तकांची एक यादी होती. ५० की १०० पुस्तके होती त्यात.
सध्या सुट्टिमुळे पुस्तके कमी पडताहेत. ९ वर्षांचा आहे.
हॅरी पॉटर, Ranger's Apprentice, Wings of Fire, Wimpy kid, Captain Underpants, Dog Man, Spirit Animals या आवडत्या सेरीज. Percy Jackson नाही आवडलं अजून.
अजून काय काय वाचता येईल? लहान मुलांची classics वाचायची इच्छा आहे.
Chioohttps://www.maayboli.com
Chioo
https://www.maayboli.com/node/4271
चिऊ ,
चिऊ ,
जिरॉनिमो स्टिल्टन, मटिल्डा, ( आणि त्याच लेखकांची इतर) , अ रिन्कल इन टाइम, From the Mixed-Up Files of Mrs. Basil E. Frankweiler , bridge to terabithia, शार्लट्स वेब, ही ट्राय करा
मी बालसाहित्य कसे असावे
मी बालसाहित्य कसे असावे ह्यातला तज्ञ नाही पण ९-१० वर्षाच्या मुलांसाठी फँटसी बरोबरच रिअॅलिझम + हिस्टरी + कमिंग ऑफ एज असा वेगळा जॉनरा ट्राय करायचा असेल तर
Little House on the Prairie - by Laura Ingalls Wilder (आणि लिटिल हाऊस सिरिजमधले सगळीच पुस्तके) मस्त आहेत.
ह्या सिरिजचा टेलि ड्रामा पण ऊपलब्ध आहे.
एक इंग्रजी पुस्तक कधी पासून
.
<> +1000000
+1000000 for Little house.
भरत, हाच धागा शोधत होते.
भरत, हाच धागा शोधत होते.
मेधा, मस्त suggestions. Charlotte's Web आणि Roald Dahl बऱ्यापैकी वाचून झालं. बाकीची शोधते.
हायझेनबर्ग, हे मस्त आहे.
खूप धन्यवाद. आता विकांत सत्कारणी लागेल.
आठवणींचं कोलाज - पिंपळपान
आठवणींचं कोलाज - पिंपळपान
लीना माटे यांचे ‘पिंपळपान' हे ललितलेखांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. `सुकृत प्रकाशन'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. लेखिका/कवयित्री अनुराधा नेरूरकर यांची प्रस्तावना ह्या पुस्तकाला लाभली आहे.
ह्यापूर्वी लीना माटे यांचा `विखुरलेल्या चांदण्या' हा कवितासंग्रह आणि `िचऊची सफर' हा बालकवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. `विखुरलेल्या चांदण्या' कवितासंग्रहास दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
` पिंपळपान ' हे त्यांचे तिसरे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखांची धाटणी ही काहीशी कथेच्या अनुषंगाने जाणारी असल्यामुळे हे लेख वाचत असताना आपण लघुकथा वाचत आहोत असे वाटते. भारतीय मध्यम वर्गाच्या संस्कारांमध्ये असणारी मानसिकता, बदलांशी जुळवून घेणं, शिक्षणाच्या माध्यमात झालेले बदल, नोकरीतील कामाचं बदललेलं स्वरूप, सोशल मिडियाची रुजवात ह्या सगळ्या अनुभवांचं, आठवणींचं कोलाज म्हणजेच ह्या पुस्तकातील ललित लेख, ललित लेखांना विषयाचं बंधन किंवा चौकट नसते. कोणत्याही विषयावर त्यात मुक्तपणे व्यक्त होता येतं. भोवतालच्या जगण्याचा, लोकांच्या मानसिकतेचा शोध लेखिका प्रांजळ वृत्तीने घेते हे त्यांच्या लेखातून जाणवतं. आठवणी आणि त्या अंगाने अनुभवांचं उलगडणं हे पुस्तकातील सर्वच लेखांचं वैशिष्ट्य आहे. यात लेखिकेच्या मनावरील संस्कारांचा पगडा, तिची कुटुंब आणि संपर्कात येणाऱया प्रत्येकाविषयीची कळकळ, समाजाविषयीची आस्था जाणवते.
पिंपळ पान या शीर्षक कथेत लहानपणापासून जिवलग मैत्रिणीसोबत हितगुज करण्यासाठीचा एक भावनात्मक दुवा म्हणजे पिंपळपान ! त्याच्या माध्यमातुन एकेक आठवण मोरपिसासारखी जपलेली आहे आणि काळानुरूप बदलत्या विश्वात सामील होत आज त्याच मनमोकळ्या सुसंवादासाठी आलेल्या व्हाट्स अँप या माध्यमाकडे सुद्धा त्याच भावनात्मकतेने पाहत नव्या तंत्रज्ञानाला सुद्धा त्याच सहजतेने आत्मसात करून बदलत्या काळाशी हातमिळवणी करणाऱ्या जुन्या तरीपण नव्यासोबत असणाऱ्या पिढीचा एक चांगला सकारात्मक कंगोरा हा लेख सांगतो.
पुस्तकातील पहिला लेख `गच्ची' आजच्या ज्येष्ठ पिढीचं गच्चीशी असलेलं नातं, गच्चीबद्दल वाटणारा आपलेपणा ह्या लेखात व्यक्त झाला आहे. `पिंपळपान ' या लेखात नेटवर्किंगच्या जमान्यात व्हॉटस्ऍप मुळे कित्येक वर्ष संपर्क विरहित असलेल्या जुन्या मित्र-मैत्रिणींचा शोध लागल्याने झालेला आनंद दिसतो. तर `पूल' ह्या लेखात बहिणीशी चॅट होत असताना अनुभवत असलेली मजा प्रत्यक्ष भेट झाल्यावर मात्र गायब होताना दिसणं याचं वैषम्य चांगल्या रीतीने दर्शवलं आहे. नव्या माध्यमातून नाती नव्याने गवसतात, पण अति व्यस्ततेमुळे ती काहीशी दुरावतात का हा प्रश्न `फेसबुक' ह्या लेखात आपल्यापुढे उभा राहतो. हल्लीच्या पीढीचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन कमलमावशींच्या मुखातून `रोबोट' ह्या लेखात बोलका झाला आहे. `बटाटेवडे' ह्या लेखात आजी-आजोबांचं नातीवरील प्रेम आणि नातीलाही असलेलं त्याचं अप्रूप दिसून येतं.
दोन पिढ्यांमधील झपाट्याने वाढत असलेलं अंतर `पिढीतील बदल' ह्या लेखात लेखिकेने अचूक पकडलं आहे. आपलं गृहिणीपद सिद्ध करताना सदैव सोबत असलेली गॅसची शेगडी तिला आपली `सखी' वाटते. गॅसच्या शेगडीवर इतका सुंदर लेख लिहिता येऊ शकतो हे लेख वाचत असताना त्यातील बारकाव्यांमधून जाणवतं. आपला सुगरणपणा दाखवून सासरच्या लोकांच्या पोटात शिरून त्यांचं प्रेम मिळवायला तिच्या सखीनेच तिला मदत केली होती. तिच्या विविध पाककृती अंगावर मिरवून घ्यायला ह्या सखीलाही आवडत होतं. अशा नेमक्या शब्दात त्या गॅसच्या शेगडीचं वर्णन करतात तेव्हा गॅसची शेगडी हे स्त्रीचं रूपक आहे हे आपण उमजून जातो. `नॉट जस्ट इंक... थिंक' ह्या लेखात गेल्या काही वर्षातील बदलत्या लेखन माध्यमांचा आढावा घेताना पर्सनल आणि सोशल मधील सीमारेषा लेखिका अधोरेखित करते. मुलांना वाढवताना आपण खूप काही त्यातून शिकत जातो, आपला दृष्टिकोन विस्तारत जातो. `तो तिच्या नजरेतून' या लेखात याचं खूप छान विश्लेषण करताना ती म्हणते,`मला माझ्या बुरसटलेल्या चाकोरीबद्ध विचारांपासून तू असं वेळोवेळी बाहेर काढत होतास. आयुष्याकडे, जगाकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन विस्तारत होता. माझ्याही नकळत तू माझी वाटचाल प्रगल्भतेकडे नेत होतास.'
`रेसचा घोडा आणि त्याची आई' ह्या लेखात स्पर्धेच्या जगात मुलांचे आईवडिलच कसे मुलांना `आय ऍम दि बेस्ट'च्या दुष्टचक्रात ओढतात हे दाखवलंय. तिच्या मनातली ही खंत कागदावर उतरवताना लेखिका उपदेशाचे डोस न पाजता तिच्यातलि सुजाण आई-आजि म्हणते,`असे पालक घडत गेले तर उद्याची भावी पिढी निकोप-निरोगी निपजणं खरंच कठीण आहे. स्वतचं आत्मपरिक्षण करण्याची शक्तीच ही मुलं हरवून बसणार नाही का? आणि याला जबाबदार कोण?'
या संग्रहात किंबहुना संग्रहातून लेखिका अगदी शेजारी बसून चहा पितपीत आपल्याशी कितीतरी विषयावर गप्पा मारतेय नेमकेपणाने बोट ठेवत आजूबाजूचे किस्से सांगतेय असं आपल्याला वाटत राहतं आणि एकदा सुरू केलेलं वाचन शेवटच्या कथेपर्यंत केव्हा आलं ते ही कळत नाही.मनसोक्त गप्पा मध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच भावना मनात आणत डोळ्याच्या कडा ओल्या करत अंतर्मुख व्हायला होतं
जवळ जवळ सर्वच लेखांमधून प्रत्येकाला आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसे, त्या माणसांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ह्या सगळ्याकडे प्रगल्भतेने पाहण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन विशेषत्वाने जाणवतो . लेखतील घटना आपल्याच जवळपास घडत आहेत असं वाटत रहातं. त्यामुळेच हे लेख म्हणजे लेखिकेने केवळ लेखातील पात्रांशीच नव्हे तर आपल्याशीही केलेला संवाद वाटतो. लेखिकेकडे लेखनाची सुंदर हातोटी आहे. सगळं कसं अगदी सहज अलवार! नेमकं आणि हेच या कथा संग्रहाचं यश आणि म्हणूनच भविष्यात लिहिताना त्यांनी आपल्या अनुभवाचा आणि अभिव्यक्तीचा परीघ आणखी विस्तारायला हवा. त्यांनी वेगवेगळे विषय व साहित्य प्रकार हाताळायला हवेत. त्या ते यशस्वीरित्या करू शकतील याची खात्री वाटते. त्यांच्या पुढील लेखनाला मनपूर्वक शुभेच्छा!
पुस्तक - पिंपळपान
लेखिका - लीना माटे
प्रकाशन - सुकृत प्रकाशन
पृष्ठसंख्या - 168 किंमत –
दोनशेतीस रुपये.
'सुनंदाला आठवताना' ची पीडीएफ
'सुनंदाला आठवताना' ची पीडीएफ कुणाकडे आहे का?
पूर्वी मुक्तांगणच्या संकेतस्थळावर उपलब्ध होती. आता नाहीये.
वर्षा,https://anilawachat
वर्षा,
https://anilawachat.wordpress.com/2007/07/16/sunandala-aathavtaanana/
तिथे पिडीएफची लिंक आहे. त्याशिवाय मी खाली लिंक देतेय.
https://anilawachat.files.wordpress.com/2007/07/baba-article-1-page.pdf
स्वातीताई पहिल्या लिंकवरील
स्वातीताई दुसर्या लिंकवरील पीडीएफमधली अक्षरे नीट दिसत नाहीत (garbled characters)
आणि पहिल्या लिंकमध्ये scribd वर फ्री ट्रायलद्वारे डाऊनलोड करता येईल पण त्यासाठी रजिस्टर करतानाच पेमेंट इन्फो मागत आहेत.
मी देखील वरचा प्रतिसाद वाचून
मी देखील वरचा प्रतिसाद वाचून पिडीएफ उतरवले पण फॉन्ट प्रोब्लेम आहे बहुतेक. मलाही अवचट यांच्या विषयी आदर आहे व त्यांच्या कार्याचा मी प्रशंसक आहे.
PDF बद्दल कल्पना नाही. पण
PDF बद्दल कल्पना नाही. पण अनिल अवचटांच्या स्वतः विषयी या पुस्तकात सुनंदाला आठवताना हा लेख आहे. मी काल -परवाच हे पुस्तकं bookganga वर पाहिलं. मी त्यांच्या आप्त ह्या पुस्तकात सुनंदा आवचटांबद्दल वाचलं तेव्हा मी गूगल वर सर्च केलं होतं. त्यांच्यावर एक documentry पण आहे. त्यांच कार्य आणि त्यांना झालेला कॅन्सर हे सगळं वाचून संमिश्र भावना दाटून आल्या. मी ते पुस्तकं bookganga वरून ऑर्डर करायचा विचार kartiy.
मला फक्त शिर्षक नीट दिसत
मला फक्त शिर्षक नीट दिसत नाहीये बाकी लेख व्यवस्थित दिसतोय. माझा हा लॅपटॉप बराच जुना आहे. त्यावर कदाचित जुने फॉन्ट्स असावेत.
डॉ जयंत नारळीकरांवर पुस्तक
डॉ जयंत नारळीकरांवर पुस्तक आहे का? त्यांच्यावर लिहिलेले.
नारळीकरांवर पुस्तक असेल तर
नारळीकरांवर पुस्तक असेल तर माहिती नाही, पण त्यांचं आत्मचरित्र वाचलं आहे. 'चार नगरांतले माझे विश्व' . खूप आवडलं.
थँक्स अ लॉट वावे! हे नक्की
थँक्स अ लॉट वावे! हे नक्की बघते.
मुलखावेगळी माणसं या नावाचे
मुलखावेगळी माणसं या नावाचे पुस्तक कोणाला माहित आहे का?
मी लहानपणी वाचले होते. प्रकाशक वगैरे माहित नाहीत.
पण त्यात थोर व्यक्तींनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील काही प्रसंग लिहिले होते.
उदा:भीमसेन जोशी, मोगुबाई कुर्डीकर, हंसा वाडकर वगैरे.
http://library
http://library.punenagarvachan.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionum...
हे का?
हो. हेच आहे.
हो. हेच आहे.
Thank you भरत.
नगर वाचन मंदिर मध्ये कोणाची मेम्बरशिप आहे का ते चेक करते
श्रीविद्या मध्ये पण चेक करते
मी फार वर्षे झाली "वैमानिक
मी फार वर्षे झाली "वैमानिक गूढकथा " हे पुस्तक शोधात आहे
बाळ चितळे का बाळ फोंडके लेखक होते .
पहिली गोष्ट अमेलिया एअरहार्ट ची होती. सगळ्या गोष्टी अश्याच रहस्य type होत्या पण काल्पनिक नव्हत्या.
कुणाला माहित आहे का कुठे मिळेल? फार लहानपणी वाचले होते ग्रंथालयात .
आज दिसला हा धागा
अमेलिया एअरहार्ट >>> हीची कथा
अमेलिया एअरहार्ट >>> हीची कथा 'बर्म्युडा ट्रँगल' मधे वाचल्यासारखी वाटते आहे. कदाचित 'ओशन ट्रँगल' पण असू शकेल. बर्म्युडा ट्रँगल मधे वैमानिक गूढकथा जास्त होत्या. "वैमानिक गूढकथा" या नावाचं पुस्तक पाहिल्याचं आठवत नाही. बघायला पाहिजे.
हि गोष्ट पण होती त्यात
हि गोष्ट पण होती त्यात
https://www.planeandpilotmag.com/article/mysteries-of-flight-wrong-way-c...
त्यावेळेस वाटले नव्हते मी आयर्लंड मध्ये ५ वर्षे राहीन
बर्मुडा ट्रँगल ची पण गोष्ट होती त्यात (Flight 19) पण मला खात्री आहे कि ते 'ओशन ट्रँगल' नव्हते
बाळ भागवतांचंच एक 'स्पेस
बाळ भागवतांचंच एक 'स्पेस ट्रँगल' म्हणून पुस्तक वाचलं होतं लहानपणी, त्याची आठवण झाली. ती वैमानिक गूढकथा नाही, पण गूढकथा आहे. ही पुस्तकं अनुवादित आहेत की बाळ भागवतांनी स्वतः लिहिली आहेत?
मला चंद्रावरचा खून हवं आहे द
मला चंद्रावरचा खून हवं आहे द पां खांबेटें चं. ऑनलाइन भारतात मिळत नाही बहुतेक.कोणाला सापडल्यास कळवा.
गुलजार यांची ' अपार्टमेंट '
गुलजार यांची ' अपार्टमेंट ' नावाची कथा आहे. ती कोणत्या पुस्तकात / नियतकालिकात छापली आहे, याची माहिती हवी आहे.
धन्यवाद.
Pages