हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे कोणीतरी विचारलेलं की बॅटल चालु असताना स्नेप कुठे असतो.. मी म्हटलेलं तो वोल्डी जवळच असेल वगैरे.. आता परत वाचताना कळलं की वोल्डेमॉर्ट स्नेपला बॅटल मधुन बोलावुन घेतो, याचा अर्थ स्नेप सुद्धा बॅटल मधेच असतो..

तिथे हॅरी, रॉन अन हर्मी जिथे असतील तिथलेच बॅटलचे डिटेल्स दिलेत.. हॅरी समोर स्नेप आलाच नाही म्हणुन त्याला फुटेज नाही...

मी पण मी पण....... चित्रपटांनी साफ निराशा केली आहे.... शेवटच्या भागामध्ये जे दाखवणे अपेक्षीत होते ते अगदी थोडक्यात उरकलेले आहे असं जाणवत राहाते.... पुस्तके एकदम बेस्ट आहेत....

सगळ्या पुस्तकांत मिळून ज्यात हॅरी नाही असे प्रसंग क्वचितच आहेत. मला एक आठवतोय तो मगल प्राइम मिनिस्टरला मिनिस्टर ऑफ मॅजिकने भेटायला जाण्याचा प्रसंग.

Yup.

पहिल्याच पुस्तकांतला पैला चाप्टर. व्होल्डीचा पास्ट दाखवणारा चाप्टर, व्होल्डी रिडल हाऊसमध्ये जातो तो चाप्टर.

असे काहीबाही आठवतायत.

वोल्डी रिडल हाउस मधे जातो त्यात ते हॅरीला पडलेलं स्वप्नच असतं ना?

पहिला चॅप्टर मधे नाही का हॅरीला घराबाहेर ठेवत? हे दुसर्‍या चॅप्टर मधे आहे का?

hajArI

मुद्दाम अ‍ॅज सच नसावं.. हॅरीसमोर स्नेप आला असता तर स्नेपने त्याला तिथेच ते सगळं मेमरी वालं दाखवलं असतं.. इन फॅक्ट जेव्हा स्नेप ला कळलं की हॅरी हॉगवर्ट्स मधे आला आहे तेव्हापासुन त्याची प्रायॉरिटी हॅरीला भेटणं हीच असते. मॅक्गोनॅगलला पण तो हेच म्हणायचा प्रयत्न करत असतो. वोल्डेमॉर्ट समोरही कितिदा म्हणतो

नाही चिमुरी चुकतेयस... डम्बी ने आधीच स्नेप ला सांगीतल असत कि जेव्हा वोल्डी सर्वात जास्त vulnerable होईल आणि नगिनी ला हमेशा सोबत सोबतच वागवायला लागेल तेव्हा हॅरी ला हे सगळं सांगायचं .. त्यामूळे स्नेप exact timing ची वाट बघत असतो .. Last book The Elder Wand chapter मधे स्नेप आणि वोल्डी मधल कन्व्हरसेशन चालु असताना स्नेप च्या रिअ‍ॅक्शन वाच ..

ओक्के टीना...

डंबलडोर स्नेपला फक्त हॅरीमधे वोल्डेमॉर्ट च्या सोल चा एक तुकडा आहे एव्हडंच सांगतात.. हॅरी हॉर्क्रक्स आहे हे नाही सांगत. बाकी कोणत्याही हॉर्क्रक्स बद्दल नाही सांगत. ती माहिती फक्त हॅरी, रॉन आणि हर्मायनीला असते..

उरलेले तीनही पुस्तक बोलावले.. एक आज पोहचलं. दोन उद्या सकाळी मिळतील शायद .. सोबत द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया चे चार भाग सुद्धा घेतले ... केव्हा सकाळी डिलीव्हरी बॉय चा फोन येतो आणि पैसे त्याच्या हातात कोंबुन नवेकोरे पुस्तक हाती घेउन वाचायला बसते अस झालयं . या वेळी नो पीडीएफ.. मस्त पैकी हॅरी पॉटर चे सातही बुक्स टेबलवर लावून खुर्चीत तानून बसणार चहा पीत वाचत.. अर्थात उद्या सेट कम्प्लीट झाला की .. या अ‍ॅमेझॉन च्या त रे .. सरळ सरळ संपूर्ण ऑर्डर हाती द्यावी ना.. एक तर अर्धी विभागली त्यातही दोन्ही सिरीज मधले बुक्स मिक्स केले.. च्यायला इतकिच हौस होती त हॅ पॉ ची एक आणि नार्निया ची एक अशी विभागायची ना ऑर्डर Angry

मी अजुनही येड्यासारखी हा गठ्ठा समोर ठेऊन टापतेय फक्त .. वरची चार वाचली नै ना अजुन आणि छोटी छोटी आहेत ती.. अस वाटतय कि वाचली तर संपून जायची Sad .. म्हणून आय विटॅमीन घेतेय फक्त .. Wink

टीना,
लै भारी सेट..
मला शेवटचे तिन घ्यायचेत अजुन, ह्या विकांताला घेउन्च टाकतो.
पहिले तिन वाचुन झाले, पण झोपेची आणि त्यामुळे डोळ्यांची वाट लगलिये Wink

झोपेची आणि त्यामुळे डोळ्यांची वाट लगलिये >> हे हे हे .. मी रोज ४.३० ते ५.३० सकाळी झोपायची आणि १० ल उठून परत सुरु .. नो दुपारची झोप . परिक्षा होती म्हणून लवकर संपवायच होत ना Wink ..

अभ्यास बोर झाला म्हणून पहिल PDF वाचल.. आवडल म्हणून अक्षरधारा गाठल. म्हटल टिना फक्त दोन घ्यायचे अस करुन २र ३र घेऊन आली .. परत पैसे कमी होते म्हणून ४थ ५व PDF.. दरम्यान मनीबँक ला चुना लावून ६व्या ७व्या ची ऑनलाईन ऑर्डर देऊन टाकली Proud .. आणि आत्ता उरलेले पुस्तकं १ल , ४थ आणि ५व बोलावल..

देवा .. वाचव रे बाबा .. अजुनही खाज आहेच.. आणखी काही लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तक Under 99 या ऑफर मधे दिसताहेत .. द्यावी का ऑर्डर ? विचार करतेय.. Proud

ह्म्म..
बजेटचा प्रोब्लेम आहेच, मागच्या ४-५ महिन्यात ३-३.५ हजार बाकिच्या पुस्तकांवर घालवले मग आता पायरिटेड हॅरी पॉटर घ्यावी लागली.. आणि टॅबवर ईपब फॉरमॅटमधली आहेतच.. मग दिवसा पुस्तक आणि रात्री टॅबवर असं वाचन चालु आहे.

Pages