Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
an awesome book does all this
an awesome book does all this to you! Welcome to the club
>> धन्यवाद जिज्ञासा .. निदान कुणी त माझ्यासारख फील करत .. आखीर इस दुनीया मे मै एक अकेलीही ऐसी नही हू .. सुनकर अच्छा लगा ... 
टीना वेल्कम.. तुझ्या
टीना वेल्कम.. तुझ्या निमित्ताने हा धागा पहिल्यापासुन वाचावा असं वाटतय.. वेळ मिळाला की वाचेन परत. तु आत्ता जशी सुसाट हॅपॉ वाचतेय तसं मला अजुन करायला मिळालं नाहिये. पण एकदा तरी तसं करणार हे नक्की..
सध्या मोबाइलवर हॅपॉ वाचायला घेतलेलं ते संपवत आहे..
हॅपॉ हे असं पुस्तक आहे जे कधिही अन कितिदा वाचलं तरी कधीच संपत नाही..
टीना, पुस्तकं वाचून झाल्यावर
टीना,
पुस्तकं वाचून झाल्यावर एकेका घटनेच्या मनात उठणार्या तरंगावर समाधान होईपर्यंत गुगल करून वाचत बसणे हाही एक विरंगुळा होऊन बसतो. पहिली चार पुस्तके वाचून झाल्यावर उरलेले भागही असेच परिक्षेच्या आधीच्या अभ्यासाच्या सुट्टीसारखे झपट्याने संपून जातील या भयाने शेवटची तीन पुस्तके मी अगदी पुरवून पुरवून वाचली होती.
उसासा. वेळ. टाइम टर्नर.
उसासा.
वेळ.
टाइम टर्नर.
चिमुरी, मोबाईलवर म्हणजे
चिमुरी, मोबाईलवर म्हणजे पीडीएफ की काही अॅप आहे?
नुकतच सुरु केलय वाचायला, सहा
नुकतच सुरु केलय वाचायला, सहा महिन्यांपुर्वी पहिले ४ भाग आणुन ठेवले होते पण वेळेअभावी सुरु करता आले नव्हते.
चिमुरी >> माझ्याकडे खुप
चिमुरी >> माझ्याकडे खुप आधीपासुन PDF होत्या . पहिला पार्ट त्यावरच वाचला मी . मग मात्र कळलं कि हे प्रकरण कम्प्युटर वर एन्जॉय करण्यासारख नाहीए .. प्रत्येक पुस्तक उघडायच , नविन कथेची सुरुवात कोर्या करकरीत पानांपासून व्हायला हवी ..
.. अलगद एक एक पान उघडून वाचण्याची मजाच काही और आहे ..
नवं कोरं पुस्तक .. त्याच बाइंडिंग जपत , पानांना धक्काही लागू न देता , चोळामोळा न करता , कोणी जरास पण उचलून ठेवताना आपटलं कि लग्गेच वस्सकन अंगावर धावून जात
पुस्तकांच्या बाबतीत लय मतलबी आहे मी .. खुप्पच प्रेम असल एखाद्यावर तरच शेअर करते मी .. म्हणजे व्यवस्थीत वापर , पान चुरगळू नको , डाग लागला तर मी डाकीण होऊन आंगावर धावेल , त्यासाठी ठेवणीतली जागा घे , बुकमार्क युझ कर , अधे मधे पेन पेन्सिल ठेवलेली मला खपणार नाही वगैरे वगैरे ..
YOU KNOW WHO
) अस मनाशी बोलून परत परत वाचायच ..
पुस्तकं वाचून झाल्यावर एकेका घटनेच्या मनात उठणार्या तरंगावर समाधान होईपर्यंत गुगल करून वाचत बसणे हाही एक विरंगुळा होऊन बसतो. पहिली चार पुस्तके वाचून झाल्यावर उरलेले भागही असेच परिक्षेच्या आधीच्या अभ्यासाच्या सुट्टीसारखे झपट्याने संपून जातील या भयाने शेवटची तीन पुस्तके मी अगदी पुरवून पुरवून वाचली होती. >>> अगदि अगदि .. आणि आवडता सीन असला कि अरे काय झाल आत्ता.. नेमका काय म्हटला तो ( येड घेऊन पेडगावला जायच
भरत मयेकर | 28 January, 2015 - 14:19
उसासा.
वेळ.
टाइम टर्नर. >> मला हवाच ..
सद्ध्या खुप आवश्यक्ता आहे .
इबुक्स आहेत.. हॅपॉ ची सुरुवात
इबुक्स आहेत..
हॅपॉ ची सुरुवात पुस्तकं इकडुन तिकडुन मिळवुन १२-१४-२४ तासात परत करते या बोलीवर आणुन वाचली आहेत. शेवटचा भाग मात्र प्रिबुक करुन नवं कोरं पुस्तक वाचलय.
नंतर पहिल्यापासुन एकेक भाग विकत घेतले. ती पुस्तकं वाचली..
नंतर कॉम्प वर पीडीएफ गोळा करुन वाचल्या..
आता मोबाइलवर वाचतेय..
पुस्तक वाचायला सुरुवात
पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर हा धागा वर काढला . एक दोन प्रतिसाद वाचले आणि मग म्हटल श्श ! पहिले वाचुया मग हे वाचुया .. एक से बढकर एक आहे प्रतिसाद पन ..
एक प्रश्न पडलाय आणखी ..
डे हॉ मधे हॅरी हॉगवर्ट्स मधे परत येतो आणि मग मॅग्गोनगल स्नेप ला तिथून हुसकावून लावते त्यानंतर तो कुठ जातो ? मग त्याचा काही उल्लेखच तर नाही ..
The Prince's Tale chapter मधे स्नेप Expecto patronum use करतो ते कुणासाठी असत ? लिलीवर असलेल प्रेम डम्बलडोर ला कळायला कि हॅरी ला वाचवायला (पण कुठल्या प्रसंगात स्नेप चा डोए पॅट्रोनस त्याला मदत करतो ? तलवार च्या वेळी सोडून ते माहितीए आणि तेव्हा डम्बलडोर नसतात पण सीन मधे तो त्यांच्यासमोर युझ करतो .. ). ?
यावेळेच संभाषण कन्फ्युज करत मला .. स्नेप हॅरीवर पन जीव लावायला लागला असं आहे का ते ?
प्लीज याचं तरी उत्तर द्या मला .
मग मॅग्गोनगल स्नेप ला तिथून
मग मॅग्गोनगल स्नेप ला तिथून हुसकावून लावते त्यानंतर तो कुठ जातो ?>>>>>>>> वोल्डी कडे जात असणार
यावेळेच संभाषण कन्फ्युज करत मला .. स्नेप हॅरीवर पन जीव लावायला लागला असं आहे का ते ?>>>>> नाही.. अजुनही लिलीवर प्रेम आहेच, अन तिच्यासाठी हॅरीला प्रोटेक्ट करण्याकरता इतके दिवस तो स्पायगिरी करत होता.. अन शेवटी काय तर त्याला स्वतःहुन वोल्डीकडे जायला सांगायचं, यामुळे स्नेप ला राग येतो. अन त्याचं लिलीवर अजुनही प्रेम आहे हे सांगण्याकरता तो पेट्रोनस दाखवतो..
लिलीवर असलेल प्रेम डम्बलडोर
लिलीवर असलेल प्रेम डम्बलडोर ला कळायला कि हॅरी ला वाचवायला <<<< दोन्ही. पण एखाद्यावर असं जीव तुटेस्तोवर प्रेम केलं की त्या व्यक्तीचा पेट्रोनस बदलतो असा जादूचा नियम आहे. स्नेपचा पेट्रोनस आधीपासूनच लिलीचा पेट्रोनस आहे. कारण त्याचं खूप आधीपासून लिलीवर प्रेम आहे.
यावेळेच संभाषण कन्फ्युज करत मला .. स्नेप हॅरीवर पन जीव लावायला लागला असं आहे का ते ?<<< टीना, सगळंच समजावून सांगता येणार नाही, पण हे फार फार विचित्र आहे. लहानग्या स्नेपला जेम्ससारख्या लोकांचा फार राग आहे, चांगल्या घरातले, लाडावलेले, आई आणि वडेल दोघांचंही प्रेम मिळालेले, सुस्थितीत असलेली मुलं. यांचे दुष्टपणादेखील "खोड्या" म्हणून सहज दुर्लक्षित होतात. शाळेमध्ये असताना तर तो आणि जेम्स दुष्मन होतातच.
त्यामुळे स्नेपला याच जेम्सच्या कार्ट्याचा प्रचंड राग आहे, त्याच वेळी... त्याचवेळी हॅरी लिलीचं पण पोरगं आहे. अशी लिली जिच्यावर त्याचं अतिप्रचंड प्रेम आहे. जेम्सच्या तिरस्कारापेक्षा हे प्रेम खचितच जास्त आहे. स्नेपला हॅरीकडे बघितल्यावर जेम्सची आठवण येते कारण हॅरी जेन्ससारखा दिसतो पण हॅरीचे डोळे बघितल्यावर मात्र त्याला लिलीची आठवण येते. तो हॅरीचा राग करतो कारण जेम्समुळे पण त्याचवेळी हॅरीवर कसलीही आच येऊ देऊ शकत नाही कारण लिली.
व्होल्डमार्टने लिलीला मारू नये म्हणून तो डंबलडोअरकडे मदत मागायला येतो. जेम्स मेला तरीत्याला पर्वा नाही. पणलिलीआला काही होता कामा नये असा त्याचा सरळ हिशोब आहे. लिली मेल्यावर मात्र त्याचं आतपासून कोसळून जाणं, आणि त्यामधून व्होल्डमार्टबद्दल आलेला प्रचंड द्वेष हे जेकेबाईंनी इतक्या कमी शब्दांत घेतलंय त्याला तोड नाही.
पुढे शाळेमध्ये हॅरी शिकत असताना स्नेपचे आणि त्याच्या संबंधामधले हे दुवे हॅरीला माहितच नाहीत. त्यामुळे स्नेपच्या वागण्याचा हवा तसा अर्थ काढून मोकळा होतो. आता परत पहिली सहा पुस्तकं वाचायला घेशील तेव्हा तुला या खुब्या कळत जातील.
आणखी एक - सर्वात शेवटी हॅरी
आणखी एक -
सर्वात शेवटी हॅरी हर्मी आणि रॉन हेडमास्टर ऑफिस मधे जातात तेव्हा स्नेप का नसतो पोट्रेट मधे ?.. कि फक्त फनरल झाल्यावरच येत असतात फोटो फ्रेम मधे ?
टीना.. वेलकम तो क्लब.. ते
टीना.. वेलकम तो क्लब..
ते दोन्ही सीन वेग्वेगळे आहेत.
१. स्नेप डो पॅट्रोनस डंबेलडोरला दाखवतो.. लिलीवरचे प्रेम अजूनही तितकेच आहे हे दाखवायला. ही घटना ६व्या भागात घडते पण आपल्याला ७ व्या भागात कळते.
२. ७ व्या भागात स्नेपला हॅरीकडे तलवार द्यायची असते तेव्हा. पॅट्रोनस वापरून तो हॅरीला तळ्यापाशी यायला लावतो.
माझा प्रतिसाद टायपेपर्यंत
माझा प्रतिसाद टायपेपर्यंत बरेच प्रतिसाद आले
तेच पेट्रोनस पुढे जाऊन हॅरीला
तेच पेट्रोनस पुढे जाऊन हॅरीला तलवार कुठे आहे ते सांगतं. >> नंदिनी >> तेच कस ? तलवार द्यायला तो परत जातो त्या तळ्याजवळ अस दाखवलय ना पण .. रॉन म्हणतो सुद्धा कि कुणीतरी आहे इथे तो स्नेपच असतो ना !
तसही त्यानंतर ती मेमरी संपुन जाते याचा अर्थ तेवढीच मेमरी स्नेप extract करु शकला असा आहे का ?
वोल्डी कडे जातो अस कस ? इतक फुटेज दिलय त्याला पण हुसकावून दिल्यानंतर एका शब्दानेही उल्लेख नाही त्याचा त्याला वोल्डी मारेपर्यंत .. नही पट्या मेको ..
डेथली हॉलोज मधे मिनिस्ट्री
डेथली हॉलोज मधे मिनिस्ट्री मधुन होक्रक्स चोरल्यावर हॅरी, हर्मायनी आणि रॉन अॅपरेट होतात तेव्हा नंतर ते क्रिचर ला समन का नाही करत ?
मिनिस्ट्री त्याच्यामार्फत या तिघांचा माग काढेल म्हणून ?
पण तो तर हाऊस एल्फ आहे ना तर त्याच्या आणि इतर विझार्ड्स च्या पावर तर वेगळ्या असतात मग ?
जेव्हा तो वोल्डेमॉर्ट सारख्या विझार्ड ने एन्चान्ट केलेल्या इन्फेरी ला चकमा देउन सुटू शकतो तर मग याक्सली क्या चीज है ! ...
हे अस का ते पन सांगा प्लीज
रॉन म्हणतो सुद्धा कि कुणीतरी
रॉन म्हणतो सुद्धा कि कुणीतरी आहे इथे तो स्नेपच असतो ना !>>>>> हो स्नेपच असतो तो
तसही त्यानंतर ती मेमरी संपुन जाते याचा अर्थ तेवढीच मेमरी स्नेप extract करु शकला असा आहे का ?>>>>> नाही, त्याने सिलेक्टिव्ह मेमरी दिलीय हॅरीला. हॅरीला जेव्हडं समजायला हवय तेव्हडं
वोल्डी कडे जातो अस कस ? इतक फुटेज दिलय त्याला पण हुसकावून दिल्यानंतर एका शब्दानेही उल्लेख नाही त्याचा त्याला वोल्डी मारेपर्यंत .. नही पट्या मेको >>>>> त्यानंतर डेथ इटर्स बरोबर फाइट असल्याने अन वोल्डीला स्नेपने एव्हड्यातच त्या वॉर मधे जाणे नको असेल (टॉप मोस्टचा डेथ इटर असल्याकारणाने).. म्हणुन स्नेपचा उल्लेख आला नसेल.
डेथली हॉलोज मधे मिनिस्ट्री मधुन होक्रक्स चोरल्यावर हॅरी, हर्मायनी आणि रॉन अॅपरेट होतात तेव्हा नंतर ते क्रिचर ला समन का नाही करत ?
मिनिस्ट्री त्याच्यामार्फत या तिघांचा माग काढेल म्हणून ?
पण तो तर हाऊस एल्फ आहे ना तर त्याच्या आणि इतर विझार्ड्स च्या पावर तर वेगळ्या असतात मग ?
जेव्हा तो वोल्डेमॉर्ट सारख्या विझार्ड ने एन्चान्ट केलेल्या इन्फेरी ला चकमा देउन सुटू शकतो तर मग याक्सली क्या चीज है ! ...>>>>>>>>> एल्फ ला पकडुन त्याच्यासोबत कोणी येउ नये म्हणुन.. हॅरीने क्रिचरला समन केल्यावर तो आहे तसा तिथे येणार ना, त्याच्या लक्षात नाही येणार की बाकीच्यांना चकवा देउन जावं वगैरे.. ऑर्डर फर्स्ट...
चिमुरी >> एल्फ ला पकडुन
चिमुरी >> एल्फ ला पकडुन त्याच्यासोबत कोणी येउ नये म्हणुन.. हॅरीने क्रिचरला समन केल्यावर तो आहे तसा तिथे येणार ना, त्याच्या लक्षात नाही येणार की बाकीच्यांना चकवा देउन जावं वगैरे.. ऑर्डर फर्स्ट... >> तस पाहता मग तो पाण्यात पडतो आणि इन्फेरी त्याला पकडतात .. मग इन्फेरींनी पन यायला हव त्याच्यासोबत नै का .. सगळे नाही पण मग निदान २ ३ तरी
इन्फेरी आर डेड पीप्ल. दे
इन्फेरी आर डेड पीप्ल. दे कान्ट अपेरेट.
विझार्ड मॅजिकने क्रिचर बरोबर
विझार्ड मॅजिकने क्रिचर बरोबर येउ शकतात ना.. विझार्ड मॅजिक + एल्फ मॅजिक.. असं काहितरी असावं..
नंदिनी | 28 January, 2015 -
नंदिनी | 28 January, 2015 - 16:42 नवीन
इन्फेरी आर डेड पीप्ल. दे कान्ट अपेरेट. >>> थोडुस पटल .. एल्फ ऑर्डर फॉलो करतात .. आणि ते अगदि कुठेही अॅपरेट होऊ शकतात . मग मास्टर नी फक्त त्याला समन केल्यावर त्यानच यायला हव ना ? हे ट्रियो हमेशा प्रोटेक्टिव्ह स्पेल युज करायचे . त्यानंतर जर त्याने क्रीचर ला समन केल असत तर फक्त तो एल्फ तिथे येउ शकला असता न ! इतर विझार्ड्स थोडी ना !
(टॉप मोस्टचा डेथ इटर
(टॉप मोस्टचा डेथ इटर असल्याकारणाने) >> बिचारी बेला .. तिलाच मॉली काकुंनी मारल्यावर वोल्डी पेटतो न तरीही ...
बिचारी बेला >> बेलाट्रिक्स
बिचारी बेला >> बेलाट्रिक्स आणि बिचारी ??
अरे वा ... धागा परत वर टीना
अरे वा ... धागा परत वर

टीना वेलकम टू क्लब .
तसे काढायला गेले तर अनेक लूप होल्स निघतील , पण ते दर्या मे खसखस
टिना, पण क्रिचरला समन करून
टिना, पण क्रिचरला समन करून पुढे फायदा काय झाला असता? ग्रिमॉल्ड प्लेसला ते परत जाऊ शकत नव्ह्ते. त्याला बरोबर घेऊन हॉरक्रक्स शोधणे अवघड झाले असते ना ?
नंदिनी मस्तच.. जेम्सचं कार्टं
नंदिनी मस्तच.. जेम्सचं कार्टं म्हणुन द्वेष, अन लिलीचा मुलगा म्हणुन त्याची काळजी...
तसे काढायला गेले तर अनेक लूप होल्स निघतील , पण ते दर्या मे खसखस>>>>>>>> +१
परत एकदा, बाई महान आहेत
त्यानंतर जर त्याने क्रीचर ला
त्यानंतर जर त्याने क्रीचर ला समन केल असत तर फक्त तो एल्फ तिथे येउ शकला असता न ! इतर विझार्ड्स थोडी ना !>> हर्मायनी म्हणते की इट्स टू रिस्की. प्लीज नोट, क्रीचरवर माल्फॉयदेखील ओर्डर देऊ शकतात आणि एल्फ मॅजिकबद्दल फारशी कुणाला माहित नसते त्यामुळे हर्मायनीच्या मतानुसार याक्सली जर फिडेलीअस चार्म भेदू शकला असेल तर आता पर्यंत ग्रिमॉल्ड मध्ये डेथ इटर्स घुसले असणार. त्याऐकी माल्फॉय असतील तर क्रीचर्वर त्यांची ऑर्डर चालणार. सो ती तसं न करण्याचा सल्ला देते.
ते समन करत नाहीत कारण ते त्यांना "रिस्की" वाटतं.
नंदिनी +१ इथे "रिस्की वाटण"
नंदिनी +१ इथे "रिस्की वाटण" हा महत्वाचा पॉईंट आहे...
रच्याकने, क्रिचरवर हॅरीचा मालकी हक्क आहे त्यामुळे मॅलफॉयची ऑर्डर चालणार नाही. बाकी तुझ्या प्रतिसादाला +१
स्नेप बद्दल इतर कुठल्याच शंका
स्नेप बद्दल इतर कुठल्याच शंका नाहीत बाकी .. सर्वात आवडत पात्र आहे बुक्स मधल .. त्याच्या लिली बद्दलच्या हळूवार भावना आणि जेम्स बद्दलचा द्वेष खुप सुंदर रित्या मांडलाय.. आणि या दोन्ही गोष्टींमूळे हॅरीवर असलेला राग आणि प्रेम .. हुश्श .. एकाच व्यक्तीला काय काय सहन कराव लागत .. त्यामूळेच त्याच्याबद्दल जरा जास्तच सॉफ्ट कॉर्नर आहे माझा ..

तुम्ही सर्वांनी दिलेल्या उत्तरांमूळे समाधान झाल .. धन्यवाद ..
हॅरी पॉटर ची खुप आधीपासुन पंखा आहे पण चर्चा पुस्तकांबद्दल होती त्यामूळे फिरकायची हिम्मत नव्हती केली मी..
अरे व्वा.. टीनामुळे धागा परत
अरे व्वा.. टीनामुळे धागा परत वर आलाय ब-याच दिवसांनी
खरच खूप मस्त आणि खिळवून ठेवणारी पुस्तकं आहेत ही... नंदिनी खूप छान लिहीलं आहेस स्नेपबद्दल. सगळ्यांना अनुमोदन!
Pages