हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता १२ गोष्टी येणार आहेत ना? कोणाला मिळाल्या तर लिंक द्या इथे प्लीज..

सध्या पारायणाला बसलेय.. एक प्रश्न बर्‍याच वर्षांपासुन मनात घोळतोय..

विच्/विझार्ड अ‍ॅनिमल मधे कन्व्हर्ट होताना त्यांच्या वाँड चे काय होते? तो त्यांच्याबरोबरच रिड्युस होतो का?

वोल्डीने जेव्हा हॅरीला मारायचा प्रयत्न केला, जेम्स अन लिलिला मारल्यावर, तेव्हा कर्स त्याच्यावर उलटला अन तो नॉन ह्युमन फॉर्म मधे रिड्युस झाला. तो तेव्हा वीकेस्ट होता. तेव्हा खरं तर त्याचा वाँड तिथेच पडायला हवा ना? मग तरिही तो जेव्हा ह्युमन फॉर्म परत मिळवतो (बेबी टाइप) तेव्हा त्याच्याकडे त्याचा वाँड कसा असतो परत?

१३ वर्षं नागिनी कुठे असते? त्याच्याबरोबर अल्बिनिया फॉरेस्ट मधे का?

अ‍ॅनिमलमध्ये कन्व्हर्ट होताना कपड्यांचं जे होतं तेच वाँडचं होतं.

हॅरीला मारताना व्होल्डीचा वाँड तिथेच पडला व पीटर पेटिग्र्यूने तो तिथून पळवून सांभाळून ठेवला अशी एक थिअरी मिळाली.

हॅरीला मारताना व्होल्डीचा वाँड तिथेच पडला व पीटर पेटिग्र्यूने तो तिथून पळवून सांभाळून ठेवला अशी एक थिअरी मिळाली.>>>>>>> ओक्के.. लिंक मिळाली तर द्याल का?

गोब्लेट ऑफ फायर मधे इम्पोस्टर मुडी हॅरीकडुन हॉगवर्ट्स चा मॅप घेतो. तो हॅरीला परत कधी अन कोण देतं?

दुसर्‍या वर्षावरील मुलांना शाळेत जायला जे कोच असतात ते इन्व्हिजिबल हॉर्स टाइप प्राणी ओढतात. मृत्यु बघितलेल्यांनाच ते प्राणी दिसतात. ट्रायविझार्डच्या वेळी हॅरी सेड्रिकला मरताना बघतो. तरिही हॉगवर्ट्स मधुन घरी जाताना त्याला ते प्राणी दिसत नाहीत. परंतु पाचव्या वर्षी शाळेत येताना त्याला ते दिसायला लागतात. खरं तर मृत्यु बघितल्यावर त्याला ते दिसायला लागायला हवे होते ना? म्हणजेच जेव्हा तो चौथं वर्ष संपवुन घरी जायला निघतो तेव्हाच त्याला ते दिसायला हवे होते ना?

म्हणजेच जेव्हा तो चौथं वर्ष संपवुन घरी जायला निघतो तेव्हाच त्याला ते दिसायला हवे होते ना? <<< घरी जाताना थेस्ट्रल्सवरूनच जातात का? (म्हणजे जातच असतील. पण आजवर 'पुन्हा कधी एकदाची शाळा सुरू होणार' हा विचाराच्या नादात ही मेंढरं घरी घोड्यावरून की आणि कशावरून जातात हा प्रश्न कधी पडलाच नाही. Proud )

हो.. पॅकिंग करुन ते लोकं डर्मस्ट्रँग अन दुसर्‍या विद्यार्थ्यांना बाय बाय करुन त्या गाड्यांची वाट बघत असताना ना

चिमुरी हे वाचा http://scifi.stackexchange.com/questions/8182/why-couldnt-harry-see-thes...

JK Rowling: At the end of Goblet of Fire, we sent Harry home more depressed than he had ever been leaving Hogwarts. Now I knew that the Thestrals were coming and I can prove that because they are in the book that I produced for Comic Relief, Fantastic Beasts and Where to Find Them, these unlucky black winged horses.

However, if Harry had seen them then and we hadn't explained them then, I thought that would be rather a cheat on the reader in that Harry suddenly sees these monsters but we don't go anywhere with them, so to explain to myself I said that you had to have seen the death and allowed it to sink in a little bit before slowly these creatures became solid in front of you, so that's how I am going to sneak past that one.

गोब्लेट ऑफ फायर मधे इम्पोस्टर मुडी हॅरीकडुन हॉगवर्ट्स चा मॅप घेतो. तो हॅरीला परत कधी <<<<
तिसर्‍या भागाच्या शेवटी ल्युपिन शाळा सोडून जाताना देतो.

तिसर्‍या भागाच्या शेवटी ल्युपिन शाळा सोडून जाताना देतो.>>>>>>>> हो हे झालं. चौथ्या भागात मुडी घेतो परत हॅरीकडुन.. तेव्हाचं विचारतेय मी

http://scifi.stackexchange.com/questions/29003/when-did-harry-get-back-t...

On the prop version of the map made for the films, the lines are made up of what at first glance are just random letters, but upon closer inspection are Latin words. The series makes no mention of Harry recovering the map from Moody's office, even though he continued to use it in later books; when asked about this discrepancy, Rowling answered that Harry had indeed sneaked into the office and recovered it in the days following the Third Task, and that she had forgotten to include this detail in the book. When asked during an online question session, "What child did Harry give the Marauder's Map to, if any?" (after his school years), Rowling responded, "I've got a feeling he didn't give it to any of them, but that James (Harry's eldest son) sneaked it out of his father's desk one day."[3]

नेट वर हे सापडलं

पॉटरमोअरवर रोलिंगबाईंनी ड्रॅकोबद्दल काही लिहिल्याचा आउल आलाय.

कॅसलच्या आताच्या सीझनच्या एका भागात इन्व्हिजिबिलिटी क्लोक होता. अमेरिकन गुप्तचर संस्था असा क्लोक शोधायचा प्रयत्न करत असतात आणि असा शोध हा खूपच खतरनाक असेल असं खून झालेल्या पात्राला वाटत असतं. (फिलॉसॉफर्स स्टोन नष्ट केला ते आठवलं).

ड्रॅको बद्दलचं वाचलं.. ओके ओके वाटलं.. नथिंग मच इन्टरेस्टिंग..

हॉगवर्ट्स चा क्रिसमस मिस करतेय.. काल दिवसभर तेच आठवत होते Happy

मी सर्व मुव्हिज कित्येकदा बघित्ले ..
वाचनाचा छंद आहे पण मराठी साहित्य जास्त आवडत .. इंग्लीश इतक एंटरटेन करत नाही ..
तरीसुद्धा राहावलं नाही म्हणून पीडीएफ घेऊन वाचायला सुरुवात केली .. आणि न रहावून धावत पळत बुक गॅलरी गाठली .. दुसरा आणि तिसरा पार्ट घेऊन आली आणि बाकी ऑनलाईन ऑर्डर दिले ...
आत्तापर्यंत कुठल्याच पुस्तकाने ( इंग्रजी ) इतक वेड लावलं नाही .. आठवडा झाला .. आता शेवटचं डेथली हॉलोज चाल्लय .. Happy

डेथली हॉलोज मधे मिनिस्ट्री मधुन होक्रक्स चोरल्यावर हॅरी, हर्मायनी आणि रॉन अ‍ॅपरेट होतात तेव्हा नंतर ते क्रिचर ला समन का नाही करत ?
मिनिस्ट्री त्याच्यामार्फत या तिघांचा माग काढेल म्हणून ?
पण तो तर हाऊस एल्फ आहे ना तर त्याच्या आणि इतर विझार्ड्स च्या पावर तर वेगळ्या असतात मग ?
जेव्हा तो वोल्डेमॉर्ट सारख्या विझार्ड ने एन्चान्ट केलेल्या इन्फेरी ला चकमा देउन सुटू शकतो तर मग याक्सली क्या चीज है ! ...

प्लीज कुणीतरी मदत करा ..

Done with deathly hollows...
सातही पुस्तकांमधे सर्वात जास्त Mesmerizing मला डेथली हॉलोज वाटल ...
एक एक गोष्ट हळूहळू उलगडत जाते तेव्हा मज्जा येते ..
हॅरी पॉटर मुव्हीज सर्व छान आहेत पण खरच पुस्तक या सर्वांपासुन बहोत परे आहे .. simply awesome ..

मुव्ही मधे मला सर्वात शेवटी जेव्हा स्नेप च सिक्रेट ओपन होत तो पार्ट खुप खुप जास्त आवडतो .. ते कॅरेक्टर
Alan Rickman ने क्लास निभवलय .. it was heart throbbing ..

आता वाचुन संपलय तर खुप काहीतरी चुकल्या चुकल्या सारख वाटत .. परत परत वाचताही येईल पण पहिल प्रेम.. त्याबद्दलची ओढ.. नवनविन गोष्टी उलगडताना मनात फुटणार्‍या उकळ्या .. आता समोर काय याची आस हे सगळ नाही राहत पहिल्यासारख ..
कुठलही पुस्तक वाचून संपवल्यावर हे सगळ जे मी फिल करते .. कळत नाही ते वाचून संपवल्याचा आनंद मानावा कि दु:ख .. Sad

कोनी अगदी तंतोतंत पुस्तकाप्रमाणे मूव्ही काढला आणि तो अगदी १०-१२ तासाचा झाला तरिही मी बघायला तयार आहे... >> चिमुरी अगदी मी पन ..

टीना, "आपल्यातली" झाली. सीरीयसली हॅरी पॉटर वाचल्यावर खरंच जादू घडते.

मुव्ही मधे मला सर्वात शेवटी जेव्हा स्नेप च सिक्रेट ओपन होत तो पार्ट खुप खुप जास्त आवडतो >>> पुस्तकामध्ये पहिल्यांदा वाचत असताना (प्रीसाईझली रात्रीचे दहा साडेदहा झाले होते) तेव्हा मी एकटीच घरात चक्क ओरडले होते. माझा सर्वात आवडता भाग. आणि हा भाग वाचून झाल्यावर बाईंनी आधीच्या सहा भागामध्ये जे काही क्लूज सोडलेले आहेत ते पुन्हा वाचायला लागल्यावर मिळतात. स्नेप माझं अतिशय आवडतं कॅरेक्टर बनलं.

नंदिनी >> अगदि .. मी पन इतकी excite झालेली मुव्ही पाहताना कि बास रे बास ..
Alan Rickman खुप जास्त आवडला मला त्या कॅरेक्टर मधे ..
सिरियस पन चपखल बसलाय Gary Oldman च्या चेहर्‍यात ..
तसचं वोल्डीच काम Ralph Fiennes ने क्लास केलय ..

आठवड्याभरात सर्व पुस्तक इतके भराभर संपवण्याचं हे पन एक कारण कि पहिल पुस्तक वाचायला घेतल्यावर कळल कि अरे पुस्तक खुप वेगळी आहे मुव्हीज पेक्षा आणि मग म्हटल कि यात स्नेप कसा आणि किती उलगडून दाखवला असणार ... literally सुसाट वाचत सुटली मी .. डेथली हॉलोज हाती घेतल्यावर ठोके वाढायला लागले माझे कि केव्हा तो प्रसंग येणार जो माझा सर्वात आवडता आहे...
खुप खुप वाईट वाटत यासाठी कि तो इतका छान असुन मेल्यावर सर्व काही हॅरी ला कळत .. Sad

मुव्ही मधे चक्क गुंडाळलेला डम्बलडोर चा मृत्यु आणि त्यामुळे हॅरी च्या मनातला कल्लोळ कित्ती अप्रतीम मांडलाय जे के रोलींग ने... मृत्युंजय नंतर पहिल्यांदा पुस्तक वाचताना अक्षरश: रडलीय मी .. सिरियस , डम्बलडोर आणि स्नेप या तिघांच्या हि वर्णनाला ..

चिमुरी | 4 August, 2011 - 13:47
मी सगळ्यात जास्त तिरस्कार अम्ब्रिजचा केला आहे आणि त्यानंतर बेलाट्रिक्स... >>
अम्बिजचा रोल करणारी Imelda Staunton ( मला ती हसते ते फार आवडत Lol कुणाला काही कल्पना आहे का हिंदी मधे तिच डबींग कुणी केलय ते ? ) तसेच बेलाट्रिक्सचा रोल करणारी Helena Bonham Carter भयंकर दाखविल्या आहेत ..

चिमुरी >> मला वाटतं तोवर हॅरीची हॉगवर्ट्स मधे अ‍ॅडमिशन झालेली नसल्याने त्याला हा नियम माहित नसल्याने अशा मॅजिकवर अ‍ॅक्शन घेतली जात नाही.>>>> ओके.. असं आहे होय ते... हो बरोबर.. >> भरत मयेकर >> डेथली हॉलोज मधे स्नेप लिली ला सांगतो ना कि ११ वर्षांचे होईपर्यंत वॉन्ड हाती नसताना जादू केली तर कळत नाही पण त्यानंतर हाती वॉन्ड आल्यावर मग तुमच्यावर मिनीस्ट्रीचा वचक राहतो .

इब्लिस | 15 October, 2011 - 02:18
Ancient magic of LOVE...
अगदी स्नेप सुद्धा याच जादूने बांधला गेलेला आहे. प्रेम. त्याने 'जेम्स' च्या पोराचा कितीही द्वेष केला तरीही तो 'लिली'च्या पोराचं कधीच काहीही वाईट -खर्‍या अर्थाने- करू शकत नाही. कसलं खतरनाक पात्र बनवलं आहे त्या स्नेपचं.. काय मानसिक त्रास सहन केला असेल त्या हाफ ब्लड प्रिन्स ने.. सिवरस स्नेप.. लई झक्कास.. अजिबात आश्चर्य वाटत नाही हॅरीच्या पोराचं नाव सिवरस अल्बस असण्याचं.. >>>+११००००००००००००००००
उलट कौतुक वाटत कि त्याची आठवण ठेवली .

ऋयाम | 18 January, 2012 - 18:03
रच्याक! रिसरेक्शन स्टोन मिळाल्यावर हॅरी स्नेपला (पण) का बोलावत नाही असं कोणाला कोणाला वाटलं ? >> +१ मला Sad

.l पूर्वा l Poo... | 7 March, 2012 - 17:19
हॅपॉ मधे Peeves ने दिलयं ना त्याला वॉल्डी हे नाव?>>>

हो का? कोणत्या भागात?
Peeves Harryला पॉटी म्हणतो ते महित आहे...
मी ६ भाग वाचलेत, ७व्या भागासाठी झुरतेय सध्या! >>>>>

७वा पार्ट डेथली हॉलोज मधे वॉल्डी मेल्यावर आहे ते गाण ..

We did it, we bashed them, wee Potter's the one,
And Voldy's gone mouldy, so now let's have fun !

कुठलही पुस्तक वाचून संपवल्यावर हे सगळ जे मी फिल करते .. कळत नाही ते वाचून संपवल्याचा आनंद मानावा कि दु:ख .. अरेरे>>> टीना, an awesome book does all this to you! Welcome to the club Happy - A not yet but wannabe deeply buried fan of HP and JKR Happy

Pages