हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम अपने फैसलो से जाने जाते है, काबिलियत से नही>>>+१००

Soon, we must all make the choice between what is right and what is easy. ??????>>>>>>>+++++++++१००००००००

हेच मला सांगायचे होते.:)

अरे वॉल्डीने हौसेहौसेने त्याच्या आत्म्याचे तुकडे करून घेतले होते. त्याला काय फिकीर असणार आहे. आणि बाकी डेथ इटर्सनी बाकी डार्क मॅजिक हाताळले असल्याने त्यांनाही त्यामुळे फारसा काही फरक पडणार नव्हता.

सरसकट तो कर्स वापरुन आत्म्याचे तुकडे होतात असं म्हटलेलं नाहिये.. आत्म्याचे तुकडे करायचे असल्यास मोस्ट एविल अ‍ॅक्ट म्हणजे खुन करावा लागतो असं म्हटलेलं आहे..

आता अवारा केडावरा वापरला की खूनच होतो की तो...दुसरा काय होतं...(अपवाद फक्त स्नेपचा)..अवारा केडावरा हाच मोस्ट इव्हील अॅक्ट आहे.

त्यांनी जर किलिंग कर्स वापरला असता तर त्यांच्यात अन डेथ इटर्स मधे काय फरक राहिला असता?

तोच माझा मुद्दा आहे. आणि फॅन फिक्शनमध्ये पण दिला आहे. रॉन आणि हॅरीकडे अँब्रिजला शोधून तिच्यावर खटला दाखल करण्याची जबाबदारी दिली जाते. त्यावेळ रॉन म्हणजो की आपण तिला मगल्सना त्रास देणे गुन्हा आहे असे लिहायला लाऊ..तिच्याच इव्हील क्वीलनी..त्यावेळी हॅरी म्हणतो मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहतो.

माझा प्रश्न सोप्पा आहे. नितिमत्तेच्या गोष्टी अन्य वेळी ठिक आहेत. तुम्ही भले लाख सदाचरणी आहात. पण तुमच्या जीवावर बेतले आहे. कुठल्याही क्षणी समोरचा तुम्हाला ठार मारायच्या बेतात आहे. किंबहुना मारतोच आहे. अशा वेळी तुमच्या हातात पिस्तुल दिले तर तुम्ही गोळी चालवाल कि कुणालाही मारणे हे पाप आहे, असे भोंगळ तत्वज्ञान पाजळत बंदुक टाकून द्याल.
आता हीच परिस्थिती अशी पहा...

तुमच्या जीवावर बेतले आहे. कुठल्याही क्षणी समोरचा तुम्हाला ठार मारायच्या बेतात आहे. किंबहुना मारतोच आहे. अशा वेळी तुमच्या हातात पिस्तुल दिले (पण त्या पिस्तुलाचा एक साईड इफेक्ट असा आहे की गोळी चालवल्या चालवल्या चालवणार्याला एक हलका हार्ट अँटॅक येईल). तर तुम्ही काय कराल...

<नितिमत्तेच्या गोष्टी अन्य वेळी ठिक आहेत. तुम्ही भले लाख सदाचरणी आहात. पण तुमच्या जीवावर बेतले आहे. कुठल्याही क्षणी समोरचा तुम्हाला ठार मारायच्या बेतात आहे. किंबहुना मारतोच आहे. अशा वेळी तुमच्या हातात पिस्तुल दिले तर तुम्ही गोळी चालवाल कि कुणालाही मारणे हे पाप आहे, असे भोंगळ तत्वज्ञान पाजळत बंदुक टाकून द्याल.>

गोळी झाडून समोरच्याला नि:शस्त्र करेन, ठार करणार नाही.

आपल्याला जिवंत राहायचे असेल तर व्हॉल्डीला मारावे लागेल (दोघांपैकी एकच जिवंत राहील, दुसर्‍याला मारून) हे कळल्यावर हॅरीची मनःस्थिती कशी झाली होती?

गोळी झाडून समोरच्याला नि:शस्त्र करेन

समोर एकच जण असेल तर ते ठिक आहे. आख्खी गँगच्या गँग असताना काय...
आणि त्यांच्यामुळे तुमची जिवाभावाची माणसे मारली गेली आहेत. ज्यात नुकतेच आईवडील झालेले एक जोडपे आहे. तेव्हाही संताप न येतो केवळ निशस्त्र करण्यावरच भर असेल तर मग अवघड आहे.
बर नुसते निशस्त्र करून भागणार आहे का...त्या ग्रेबॅकवर दोन तीन वेळेस बेशुद्ध होईपर्यंत स्पेल टाकले जातात. तरीपण तो शेवटपर्यंत लढत असतोच..आणि बाकी लोकांना मारत असतो....
ही कसली तुमची नितिमत्ता

रोलिंगबाईंनी आधीच उत्तर दिलेलं आहे. ऑर्डर ऑफ फिनिक्स- मिनिस्ट्रि ऑफ मॅजिक - बेलाट्रिक्स सिरियस ब्लॅकला मारते आणि मग पळून जाताना तिचा सामना हॅरीशी होतो. हॅरी तिच्यावर crucio curse चालवतो तेव्हा तिला फारसा त्रस होत नाही. ती म्हणते : You need to mean them, Potter! You need to really want to cause pain - to enjoy it- righteous anger won't hurt me for long.

रागाच्या क्षणी एखाद्याचे वाईट चिंतिणे आणि प्रत्यक्ष संधी मिळाल्यावर त्याचे हाल करणे यात फरक आहे.

जौंद्या...आपलं एकमत होणार नाही....
मी तरी फ्रेड, ल्युपिन, टोंक्स मरताना बघून त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांचा बदला घेण्यासाठी किमान एकातरी डेथ इटरला यमसदनी पाठवला असता...

आशू, हॅरी डम्बी गँगच्या 'पुचाटपणाचे' कारण तुम्हाला समजले, की त्या दिवशी हींसेबद्दल बोलू आपण.

मी कुठेही त्यांना पुचाट म्हणले नाहीये....
माझा प्रश्न अतिशय साधा होता आणि आहे...की अवारा केडावरा फक्त आणि फक्त नैतिकता म्हणून वापरला की त्यामागे आत्म्याचे तुकडे होण्याची भिती होती

एक छोटीशी स्पर्धा...
वॉल्डी डम्बल्डोरना काय सांगत असेल....
Happy

केस गळण्यावर काही जालीम उपाय आहे का हो...:) Happy Happy

वोल्डी- हो ना.. काय सांगू सगळे डेथ ईटर्स मागून चेष्टा करायचे असं म्हणाली हो बेला.. मग नीट करुनच घेतलं नाक! आता दिसतो ना हँडसम??? Wink

डंबलडोर गुढगेदुखीवर धनगरी औषध कितपत उपयोगी आहे ते विचारताहेत.
*
आशू,
>>माझा प्रश्न अतिशय साधा होता आणि आहे...<<
तुमचा प्रश्न साधा नव्हता, अन नाही.
तुम्ही पुचाट हा शब्द वापरला की नाही हा प्रश्नच नाहीये.
तुम्ही लिहिलीत ती उत्तरे, वा आर्गूमेंट्स आजकालच्या हिंदी पिक्चरमधले हीरो लोक सिक्ष पॅक दाखव दबंग बनून बिनदिक्कत खून करतात, व पब्लिक त्यांना ते तसले वागणे माफ करेल असे अपेक्षित आहे. कारण व्हिलन मेलाच पाहिजे, अन त्याला हीरोनेच व्हिलन बनून विकृतपणे मारले पाहिजे. विथ मॅक्स ब्लड अँड गोअर.. असे गृहितक न्याय्य असते, या प्रकारच्या समजूतीवर आहेत.
यात 'धर्म' कुठेच येत नाही. सद्सद्विवेक बुद्धी येत नाही, सभ्यता नाही, नाही न्यायपद्धतीवर वा न्यायदानप्रक्रियेवर विश्वास.
दुनिया चुकली तरी "मी" चूक वागणार नाही, वागायला नको, मी नेहेमीच 'चांगल्या'च्या पक्ष घेईन! हा मूळ मुद्दा हॅरि पॉटर ची पुस्तके लहान मुलांना समजवून सांगताहेत. 'त्या'ने खून केला तरी मी फक्त एक्स्पेलिआर्मस! म्हणेन अन समहाऊ, ट्विन कोअर्स म्हणा किंवा आणिक काही म्हणा, मधे येऊन मला वाचवेल. व्हॉल्डीची हार होईल, अन हॅरी जिंकेल. का? तर ही इज 'गुड' अन त्या व्हॉल्डीला शिक्षा देण्यासाठी 'नियम' अर्थात कायदे पुरेसे आहेत.
गुड म्हणजे खाकी घालून रस्त्यात नाचणारा, वर्दी न घालता मुंडि पिरगळून 'व्हिलनचा' खून करणारा पिच्चरमधला सलमान, नव्हे, अन पब्लिक म्हणजे त्याच्या निर्लज्जपणाला 'एंडॉर्स' करणारा जाड्या डीआयजी नव्हे. अन प्रत्यक्ष आयुष्यात सदोष मनुष्यवधाकरता त्याच्यावर खटला सुरू आहे हे विसरणारा मी म्हनजे पब्लिक नव्हे.
हिंसा, अन अ‍ॅवेलेबल असूनही हिंसा न वापरण्यातला "माज" याबद्दलचे ते चिंतन आहे, आशूजी.
पॉवर करप्ट्स. तुमच्या हातात बंदूक दिली तर ती वापरण्यासाठी जबाबदारी हवीच! हा संदेश हॅरीपॉटर पदोपदी देते.
त्या हीरोंनी मूर्खपणे अतिरेकी बळाचा वापर का केला नाही, अन का करायला नको, हीच बेसिक शिकवण त्या पुस्तकांतून मिळते.
ही पुस्तके जगभर लाडकी होणे, मुलांनी आनंदाने वाचणे अन त्याचवेळी प्रौढांनाही त्यांनी मोहिनी घालणे, यापाठी मूलतः त्या पुस्तकातून व्हॅल्यू एज्युकेशन मिळते, व त्या व्हॅल्यूज लोकांना आवडतात, हेच खरे कारण असावे..

यात 'धर्म' कुठेच येत नाही. सद्सद्विवेक बुद्धी येत नाही, सभ्यता नाही, नाही न्यायपद्धतीवर वा न्यायदानप्रक्रियेवर विश्वास.
दुनिया चुकली तरी "मी" चूक वागणार नाही, वागायला नको, मी नेहेमीच 'चांगल्या'च्या पक्ष घेईन! हा मूळ मुद्दा हॅरि पॉटर ची पुस्तके लहान मुलांना समजवून सांगताहेत. 'त्या'ने खून केला तरी मी फक्त एक्स्पेलिआर्मस! म्हणेन अन समहाऊ, ट्विन कोअर्स म्हणा किंवा आणिक काही म्हणा, मधे येऊन मला वाचवेल. व्हॉल्डीची हार होईल, अन हॅरी जिंकेल. का? तर ही इज 'गुड' अन त्या व्हॉल्डीला शिक्षा देण्यासाठी 'नियम' अर्थात कायदे पुरेसे आहेत.

हम्मम..तुम्ही म्हणताय ते पटतंय...पण कुठेतरी हा भाबडा आशावाद नाही का असे वाटत राहतयं...

हॅरीने क्रुशिएटस कर्स वापरला. इंपेरियस देखिल वापरला. मग त्याला का काहीच झाले नाही?
हा प्रश्न आशूजींनी विचारला.
हॅरी, हा अपीलींग हीरो आहे माझ्या दृष्टीने. अगदी लहानपणी त्याच्यावर व्होल्डीची छाप उमटली. जादूनेका होईना त्याच्यात व्होल्डीचा एक अंश रहायला आला.
आपल्या प्रत्येकात एक राक्षस रहात असतो म्हणे..
तरीही त्याने बाय चॉईस ग्रिफिंडॉर निवडले.
तो ना फार हुषार विद्यार्थी होता, हुषारी हर्मायनीकडे होती.
नाही हॅरी उत्तम लीडर होता. प्रिफेक्ट रॉन ला बनवले गेले.
हॅरीच्या चुका अनेक होत्या. त्या सगळ्या व्हिविडली रंगवल्या गेल्यात त्या पुस्तकांतून.
तरीही आपण हॅरीशी आयडेंटीफाय करतो.
आपल्याला हर्मायनिसारखे हुशार बनावेसे वाटते, अन रॉनसारखे डीपेंडेबल खंबीर.
पण आपण हॅरी आहोत हे आपण जाणून असतो.
त्याच्यासारख्याच, प्रत्येकजण चुका करतो. होतात. प्रस्थापिताच्या विरोधी बंड करणे, हूड गिरी करणे, जीवनातल्या वाईट बाजूंचे आकर्षण वाटणे हे हॅरीसारखे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटते.
एकेका आकर्षणातून तो कसा सावरतो, कोण त्याला हात देऊन उचलते.. कोण दुसर्‍या बाजूस ये म्हणून भुरळ घालते..
त्याचे रोल मॉडेल डंबलडोर यांचे देखिल संपूर्ण कॅरॅक्टर असॅसिनेशन पुस्तकातच केलेले आहे. की कसे डंबी त्यांच्या तारुण्यात 'वाया' जाऊ घातले होते.
मस्त आहेत ती पुस्तके.
चॉइसेस, चॉइसेस! चॉईसेस...
लाईफ इज नथिंग बट, 'चॉइसेस'!

इब्लिस +१
आशु, आपल्या आजुबाजुलाही अशी लोकं दिसतात की.. म्हणजे मी तरी पाहिली आहेत, अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नितीमुल्ये जपणारी. तूही बघितली असशीलच.
नक्षलवादी एरियात बदली झाली तरी (शक्य असुनही) नेत्यांकडे वशिला लावून ती रद्द न करवणारे सरकारी अधिकारी, लाचखोर डिपार्टमेंटमध्ये सगळ्या "लिंक"च्या डोळ्यात खुपलं तरी एक पैसा न खाणारे अधिकारी, स्वतःच्या जीवाला धोका असुनही व्हिसलब्लोअरचे काम करणारे लोक, जीवाचा धोका पत्करुन राजकीय नेत्यांच्या/बिल्डर्सच्या विरोधात जाणारे सामान्य लोक, सगळी दुनिया कट्-प्रॅक्टीस करत असताना तसे न करणारे अन प्रसंगी "शटर डाउन" करावं लागणारे डॉक्टर्स.
हे सगळे शिक्षेच्या भितीमुळे नाही, स्वतःच्या समाधानासाठी, "मी चूकीचं वागणार नाही" या बाण्यासाठीच.

आशूजी,
आशा भाबडी नसते.
पँडोराच्या बॉक्समधून सगळेच चांगले गुण उडून गेल्यावर ती आशाच तर शिल्लक आहे माणसाजवळ!

आशा नाम मनुष्यानाम् काचिदाश्चर्यश्रुंखला
बद्धा यया प्रधावन्ती, मुक्तास्तिष्ठंती पंगुवत।

सगळीकडे आशाच तर सांगितली आहे?

आजचा दिवस कालच्यापेक्षा चांगला आहे, उद्या आजच्यापेक्षा चांगला असेल, (कारण "मी' आज अन उद्याही चांगल्याचीच बाजू घेईन), ही आशा (अन म्हणूनच विश्वास) लहान मुलांच्या अन उद्याच्या तरुणांच्या मनात तेवती ठेवणार्‍या प्रत्येकच प्रयत्नास नेहेमीच माझा सॅल्यूट, अन सहमती.

आशुचॅम्प, हे फक्त हॅरी विरूद्ध व्होल्डीमधेच घडत नाही. सतरा वर्षापूर्वी जेव्हा हॅरीचे आईवडील (आणी इतर लोक) व्होल्डीविरूद्ध लढत असतात तेव्हा देखील कुणी डेथ इटर्सना मारत नाही. उलट व्होल्डीचा पाडाव झाल्यावर डेथ इटर्सना पकडून रीतसर खटला चालवून त्यांना शिक्षा दिली जाते. शिक्षेमधे देखील ते तीन कर्स वापरले जात नाहीत. त्यांना शिक्षा का दिली जाते याचे नियम अगदी काटेकोरपणे आखून घेतलेले आहेत. एकदा काय योग्य आणि काय अयोग्य हे निर्धारित झाले की कसे वागायचे हे ठरवायला वेळ लागत नाही. परिस्थिती पाहून मग योग्यायोग्य ठरवले की मग वागणे चूक की बरोबर याच्या साईड्स बदलत राहतात.

हॅरी डेथ इटर्सना मारत नाही, कारण ते त्याचे काम नव्हे. डेथ इटर्सना पकडून त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल याची त्याला खात्री आहे. त्या लोकांवर आवडा केडावरा कर्स घालण्याची त्याला गरज नाही, ते काम न्यायप्रक्रियेमधे होइल.

इब्लिस आणि नताशा धन्यवाद....

तुमचे दोघांचेही प्रतिसाद मनाला भिडले....

फारच सुंदर

इब्लिस सगळ्या पोस्ट्स आवडल्या.
हे वाचताना ट्रायविझार्ड कप आपण दोघे जिंकूया असे म्हणणारा हॅरी आठवला.

इब्लीस, काय सुंदर लिहिलेत तुम्ही. वा! मी आधिपासुन चॉईसेस च्या कन्सेप्टलाच चिकटुन होते. परंतु आशुने लिहिलेले पण काही वेळा पटायचे. पण तुमच्या पोष्टींमुळे सगळ्या शंकांचे स्पष्टीकरण मिळते. विशेषता:

"त्याच्यासारख्याच, प्रत्येकजण चुका करतो. होतात. प्रस्थापिताच्या विरोधी बंड करणे, हूड गिरी करणे, जीवनातल्या वाईट बाजूंचे आकर्षण वाटणे हे हॅरीसारखे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटते''

आणि

"चॉइसेस, चॉइसेस! चॉईसेस...
लाईफ इज नथिंग बट, 'चॉइसेस'""
>>>+++१

खुपच छान रीतीने तुम्ही रोलींग बाईंच्या विचारांचा योग्य अर्थ नव्याने सांगीतलात. त्याबद्द्ल thanks. कारण आपल्याही आयुष्यात हॅरीसारखे प्रसंग (मानसीक द्वंद्व) येतच असते.

नतशा>>>>>+++++१

आशु, वॉल्डी आणि डंबीचे पिक्चर आणी कॉमेंट्स ---लई भारी!!!

सर्वप्रथम हा अमूल्य धागा सुरू केल्याबद्दल चिमुरी यांना धन्यवाद... या धाग्यामुळे हॅरी पॉटरच्या आठवणींना तर पुन्हा उजाळा मिळालाचा पण तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचायला जाम मजा येत्ये, ब-याच नवनवीन गोष्टीही कळल्या मला... Happy
दोन शंका होत्या .... पहिली ही की सातव्या भागात हॅरीला जेव्हा त्याच्या घरातून घेऊन जायचे असते, तेव्हा सात हॅरी बनलेले असतानाही व्हॉल्डमॉर्ट ख-या हॅरीवर हल्ला चढवतो. तेव्हा त्याने ल्यूसियसकडून घेतलेली छडी कशामुळे तुटते? मला माहिती आहे की ऑलिव्हॅंडर आणि हॅरीच्या संभाषणात ते स्पष्ट केलयं, तरी मला नीटसं कळलं नाहीये... सो ते एकदा सांगाल का?
आणि दुसरी शंका अशी की शेवटी जेव्हा व्हॉल्डमॉर्ट आणि हॅरीमध्ये युद्ध होते तेव्हा एकदा मारूनही पुन्हा जीवंत झालेल्या हॅरीला पाहून व्हॉल्डमॉर्ट आश्चर्यचकित होतो. त्यांच्या युद्धाच्या वेळेस व्हॉल्डमॉर्टकडे एल्डर वॅन्ड आहे असं दाखवलयं, तो ती डम्बलडोर यांची कबर फोडून घेतो. पण डम्बलडोर मरण्यापूर्वी ड्रॅकोने त्यांना नि:शस्त्र केलेलं असतं आणि ती छडी त्याच्या मालकीची झालेली असते ना... आणि मॅल्फॉय मॅनरमध्ये हॅरी ड्रॅकोच्या हातातून तीन छड्या हिसकावून घेतो त्यातलीच एक एल्डर वॅन्ड असते ना... मग हॅरीला मारताना व्हॉल्डमॉर्टकडे जी छडी येते ती नक्की कोणती छडी असते? आणि व्हॉल्डमॉर्टने हॅरीवर मारलेला मृत्यूदंशम शाप त्याच्यावरच पुन्हा कसा उलटतो? माझा जाम गोंधळ झालाय या शेवटच्या प्रकरणात? प्लीज कोणी जरा समजावून सांगेल का?

आज खूप दिवसांनी इकडे आले. मस्त चर्चा सुरू आहे. इब्लीस तुमच्या पोस्ट आवडल्या.

जान्ह्वी, हॅरी आणि व्होल्डी ग्रेव्हयार्ड मध्ये लढतांना व्होल्डीच्या वॉन्ड्च्या power हॅरीच्या वॉन्डमध्ये आलेल्या असतात. त्यामुळे तो आपला (म्हणजे हॅरीचा) शत्रू ओळखतो आणि त्यात आलेली पॉवर वापरून व्होल्डीवर हल्ला चढवतो.

हॅरी ड्रॅकोच्या हातातून तीन छड्या हिसकावून घेतो त्यातलीच एक एल्डर वॅन्ड असते ना >>>>>>>
नाही. ती ड्रॅकोची स्वतःची असते. ड्रॅको एल्डर वॅन्डचा मालक झाला तरी ती त्याच्या ताब्यात physically नसते.
डम्बलडोरच्या फ्युनरलला ती कबरीत ठेवली जाते.

म्हणजे काय? म्हणजे जेव्हा ड्रॅको डम्बलडोरना नि:शस्त्र करतो तेव्हा ती छडी त्याच्या हातात येत नाही का? डम्बलडोरच्या हातातून पडून ती तिथेच राहते का ड्रॅकोला मिळते? कारण जेव्हा हॅरी व्हॉल्डमॉर्टशी बोलतो ( शेवटच्या युद्धात)तेव्हा तो म्हणतो, की मॅल्फॉय महालात मी ड्रॅकोला नि:शस्त्र करून / हरवून त्याच्याकडून छडी घेतली होती, त्यामुळे मी त्या(एल्डर)छडीचा मालक आहे. म्हणजे जर हॅरीकडे ती छडी आहे, तर व्हॉल्डमॉर्टने डम्बलडोरच्या कबरीतून घेतलेली छडी कोणती? आणि हॅरीकडे जर छडी असेल तर शेवटच्या युद्धात व्हॉल्डमॉर्ट त्याच्यावर जो मृत्यूदंशम शाप मारतो तो कोणत्या छडीने आणि तो परत त्याच्यावर का उलटतो ? आणि हॅरी सूर मारून कोणती छडी पकडतो? ( पुस्तकात लिहील्याप्रमाणे- हॅरी फक्त नि:शस्त्र भव शाप देतो, आणि व्हॉल्डमॉर्टची छडी हवेत उडते आणि हॅरी कुशल शोधकाप्रमाणे सूर मारून छडी पकडतो.)
कृपया याचे स्पष्टीकरण द्या.... मी जाम गोंधळले आहे Sad

असं समजा की एल्डर वाँड म्हणजे मोबाईल अन् तिची पॉवर म्हणजे सिमकार्ड आहे.
ते सिमकार्ड ज्याच्या मोबाईलात आहे त्याला नि:शस्त्र केले की ते सिमकार्ड (पॉवर) ज्याने नि:शस्त्र केलेय त्याच्या मोबाईलात आपोआप येते. आधीचा मोबाईल जरी त्या आधीच्या मालकाकडे राहिला तरी त्यात ते पॉवरबाज सिमकार्ड नसल्याने त्याला त्याचा उपयोग नाही.

आता त्या घटनांकडे पुन्हा बघा, मग गोंधळ कमी होईल. Happy

ओह... म्हणजे ड्रॅकोने डम्बलडोरना नि:शस्त्र केले, तेव्हा त्यांची छडी तिकडेच पडली आणि पॉवर ड्रॅकोच्या छडीत आली. आणि मॅल्फॉय महालात हॅरीन ड्रॅकोला हरवले किंवा त्याच्याकडून छड्या हिसकावून घेतल्यावर त्याच्या छडीत शक्ती आली. म्हणजे जरी व्हॉल्डीने डम्बलडोरची छडी ढापली [ Sad चोर कुठला ] तरी त्या छडीत शक्ती आलीच नाही. आणि हॅरीला जी छडी मिळाली त्या छडीत एल्डर वॉन्डमधील शक्ती आली. हे बरोबर का?

Pages