Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशा भाबडी नसते. पँडोराच्या
आशा भाबडी नसते.
पँडोराच्या बॉक्समधून सगळेच चांगले गुण उडून गेल्यावर ती आशाच तर शिल्लक आहे माणसाजवळ!>>>
इब्लिस, हे वाक्य मी ढापणार आहे.. माझ्या प्रोफाइलमध्ये चिकटवतेय! व्हेरी वेल सेड!
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=0Z6B2XoqLqA
Harry Potter-behind the scenes,part -1
नियमावलीसाठी येथे पहा
नियमावलीसाठी येथे पहा :-
http://www.maayboli.com/node/44947
उठा हॅरीवीर हो सुसज्ज व्हा
उठा हॅरीवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, क्वील घ्या नि पत्र ल्ह्या
उठा हॅरीवीर हो
बाप्पा पुढे ठाकले, संयोजकांनी गाठले
मिळुनी सर्व स्पर्धांना, त्वरीत जाऊनी भिडू
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला
एका गोष्टीची लिंक लक्षात येत
एका गोष्टीची लिंक लक्षात येत नाहीये,
कर्कारॉफच्या सुनावणीच्या वेळी (जेव्हा तो बार्टी क्राऊच ज्यु. चे नाव घेतो) डंबलडोर सांगतो की स्नेप डेथईटर होता पण तो नंतर आपल्यासाठी स्पाय म्हणून काम करत होता. म्हणजे स्नेपने पहिल्यावेळी आपल्याला फसविले हे माहित असतांनाही लॉर्ड वॉल्डर्मॉर्ट दुसर्या वेळी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला आपल्या कंपूत सामील का करतो.? 'अनब्रेकेबल व्हाऊ' मुळे का?
वॉल्डर्मॉर्ट trusts snape
वॉल्डर्मॉर्ट trusts snape first then later snape makes unbreakable vow... whatever...
voldemort has no better option than snape whoica work as spy for him as he is giving all the true information inside hogwarts school and dumbledore trusts him. snape also knows occlumency so he shows only those thoughts emotions and incidents to voldemort which he is interested in.
I had not written my school exams also with so much of interest ....
occlumency हो
occlumency
हो म्हणूनच.
म्हणूनच डंबी हॅरीला ती विद्या शिकायला स्नेपकडेच पाठवतो.
हॅरीला ऑर्डर ऑफ फिनिक्स च्या
हॅरीला ऑर्डर ऑफ फिनिक्स च्या सुरुवातीला पहील्यांदाचं थेस्ट्राल्स दिसतात असा उल्लेख आहे, त्याने कोणाचा तरी मृत्यू नुकताचं पाहीला आणि लुनाने तिच्या आईचा मृत्यू पाहीलेला असतो म्हणून तिला दिसतात असं अंधुक आठवत आहे.
खरतरं हॅरीने आई-वडीलांचा मृत्यू पाहीलेला असतो की मग त्याला आधीपासून का नाही दिसत Thestrals ?
हॅरी-विकीच्या म्हणण्यानुसार
हॅरी-विकीच्या म्हणण्यानुसार हॅरीने नुकताच सेड्रिक डिगोरीचा मृत्यू पाहिलेला असतो म्हणून त्याला त्या वर्षी थेस्ट्रल्स दिसतात.
खरतरं हॅरीने आई-वडीलांचा
खरतरं हॅरीने आई-वडीलांचा मृत्यू पाहीलेला असतो की मग त्याला आधीपासून का नाही दिसत Thestrals ? >> मे बी , कळत असताना पाहिलेला असायला हवा ?
हॅरी-विकीच्या म्हणण्यानुसार हॅरीने नुकताच सेड्रिक डिगोरीचा मृत्यू पाहिलेला असतो म्हणून त्याला त्या वर्षी थेस्ट्रल्स दिसतात. >+ १
ह्म्म्म , मला कधी कधी वाटतं
ह्म्म्म , मला कधी कधी वाटतं कथेत जशी गरज असेल तशा गोष्टी इंट्रोड्युस केल्या गेल्या आहेत - फ्लू पावडरचा उपयोग, पॉटकी (?) , अगदी सेड्रिक / लुना आधी कधी दाखवले नव्हते / उल्लेख नव्हता. त्या पाटील सिस्टर्सचा उल्लेख मात्र होता आधीपासून.
लुना खालच्या वर्गात होती.
लुना खालच्या वर्गात होती.
त्याला आधीपासून का नाही दिसत
त्याला आधीपासून का नाही दिसत Thestrals ? >> JKR ने एक्स्प्लनेशन दिले आहे एका interview मध्ये की Thestrals दिसण्यासाठी प्रत्यक्ष मुत्यू होतांना बघणे महत्वाचे आहे. हॅरीने आई-वडीलांचा प्रत्यक्ष मृत्यू पाहीलेला नाही. त्यांना मारले जात असतांना तो पाळण्यामध्ये होता.
यॅस, लुना जिनीच्या वर्गात
यॅस, लुना जिनीच्या वर्गात दाखवली आहे, तसा तर त्या एका मुलाचा उल्लेख आहे ना जो फोटो काढत असतो - Colin Creevey - बहुदा. सध्या कोणत्या तरी चॅनेलवर शुक्रवारी रात्री ९ ला हॅपॉ मूव्ही होते त्यामुळे काही प्रश्न आठवले, आता पुस्तकं वाचावं लागणार असं दिसतयं
http://ibnlive.in.com/news/ha
http://ibnlive.in.com/news/harry-potter-and-hermione-granger-should-have....... हे वाचा - हॅरी आणि हर्मायनीचं लग्नं व्हायला हव होतं असं रोलिंग बाईंनाही वाटतं... मला नाही पटतं पण.. तुमचं काय मत आहे लोकहो?
ह्म्म.. ५ व्या भागापर्यंत मला
ह्म्म.. ५ व्या भागापर्यंत मला वाटत होते की हॅरी आणि हर्मायनी एकत्र येतील. पण नंतर हॅरी-जिनी पण चालून गेले.शेवटच्या भागात हॅरी रॉनचा गैरसमज दूर करतांना म्हणतो 'she is like my sister'. तेव्हा हॅरी ते संवाद मनापासून म्हणतो ते जाणवते, पटते.
चालला असता.
पण somehow मला रॉन-हर्मायनी एकमेकांना match आहेत असं कधीच जाणवल नाही. रॉन तिच्याबाबतीत पझेसिव दिसतो. पण हर्मायनीचे रॉनवरचे प्रेम ओढून ताणून वाटते. त्याऐवजी victor
चैत्रगंधा , वरच्या संपूर्ण
चैत्रगंधा , वरच्या संपूर्ण पोस्टला +१
रोलिंगबाईंना रॉनचंही कुणाशीतरी जुळवायला पाहिजे हे लक्षात आल्यावर त्याला हर्मायनीच्या पदरात घालायचं ठरवलं असाव्ं.
मला जेकेबाईंच्या एपिलॉगमधे
मला जेकेबाईंच्या एपिलॉगमधे बर्याच गोष्टी पटल्या नाहीत. सगळ्या पात्रांना आपापसांतच लग्नं लावून द्यायची गरज नव्हती. हॉगवर्ट्स नंतर त्यांना नवीन कुणी भेटलंच नाही का?
पण तरीही तिने जेवढं लिहिलंय त्याअमधे मला हॅरी आणी हर्मायनी जोडी आवडली नसती.
हर्मायनीचं एकंदरीत जे काही कॅरेक्टर आहे (फार तत्ववादी, हुशार, रूल्स फॉलो करणारी इत्यादि) आणि तिचं हे काही वागणं आहे (हॅरी, रॉनसारख्या टवाळ पोरांबरोबर उपद्व्याप करत फिरणं वगैरे) ते पाहता ती रॉनच्या प्रेमात पडली ते पटतं. रॉन चित्रपटांमधे फार विनोदी दाखवला असला तरी पुस्तकामधे तोअदेखील बर्यापैकी प्रॅक्टिकल अक्कल असलेला आहे. (चेस किंवा सर्वात शेवटी हॉरक्रक्स माराय्ला चेंबरमधे जातो असे प्रसंग) त्यामुळे हर्मायनी अगदीच काही येड्याशी लग्न करत नाही.
हॅरी आणी हर्मायनीचं नातं एका वेगळ्याच पातळीवरचं आहे. ते रोमॅन्टिक वगैरे कधी बनूच शकत नाही. हॅरी सुरूवातीला हर्मायनीशी थोडा लांब् आहे. तिच्या हुशारीचा, नो-ऑल अॅटीट्युडचा त्याला राग आहेच, शिवाय तो थोडासा तिला घाबरतोदेखील. पुढे पुढे नंतर जेव्हा त्यांची मैत्री जुळत जाते तेव्हा हे घाबरणं रीस्पेक्टमधे बदलतं. आणि हर्मायनी हळूहळू हॅरीच्या एकंदरीत गुणांबद्दल कदर करायला लागते. समहाऊ, त्याचं अनाथपण ती व्यवस्थितरीत्या समजून घेऊ शकते (सिंगल चाईल्ड असल्यामुळे असेल अथवा मगल आईवडील असल्यामुळे असेल) पण हॅरीचा एकटेपणा तिच्याव्यतीरिक्त कुणीही समजून घेताना दिसत नाही. म्हणूनच सातव्या भागामधे रॉन जेव्हा हॅरीला सोडून निघतो, तेव्हा ती येत नाही. कारण, या टप्प्यावर जर हॅरी एकटा पडला तर त्याला परत सावरणे कठिण जाईल याची तिला पूर्ण कल्पना आहे.
मला या तीन व्यक्तीरेखांमधे रॉनची व्यक्तीरेखा सर्वात गुंतागुंतीची आणि रीअल वाटते. कुठलीही भावना तो लपवत नाही. जे त्याच्या मनामधे आहे ते सरळ बोलतो. प्रेम, राग, तिरस्कार, द्वेष, अपमान, संशय या सगळ्या भावना तो कुठल्या ना कुठल्या प्रसंगामधे दाखवतो. हॅरीबद्दल वाटनारी किंचित असूया तर कित्येक प्रसंगामधे दिसून येते.
मुळात, हॅरी, हर्मायनी आणी रॉन या तिघांचाही हा प्रवास त्यांच्या टीनेजमधला आहे. मॅजिक, मगल्स, आणि व्होल्डमार्ट्सारखा प्रच्ड मोठ्या शत्रूशी युद्ध करत असतानादेखेल जेकेआर चुकूनही विसरत नाही, की हे तिघंही नॉर्मल टीनेजर आहेत. म्हणून रॉनने हॅरी-हर्मायनीवर संशय घेतला तरे ते चुकीचे वाटत नाही. आणि हॅरी जिनीबद्दल विचार करताना रॉनची प्रतिक्रिया काय असेलत्याचा विचार करतो. ११ ते १८ पर्यंतच्या या प्रवसामधे तीनही व्यक्तीरेखा वेगवेगळ्या पद्धतीने इवॉल्व्ह होताना दिसतात.
मला या तीन व्यक्तीरेखांमधे
मला या तीन व्यक्तीरेखांमधे रॉनची व्यक्तीरेखा सर्वात गुंतागुंतीची आणि रीअल वाटते. कुठलीही भावना तो लपवत नाही. जे त्याच्या मनामधे आहे ते सरळ बोलतो. प्रेम, राग, तिरस्कार, द्वेष, अपमान, संशय या सगळ्या भावना तो कुठल्या ना कुठल्या प्रसंगामधे दाखवतो. हॅरीबद्दल वाटनारी किंचित असूया तर कित्येक प्रसंगामधे दिसून येते. >> +१ . तो टिपीकल साईडकिक नाहीये .
हॅरी आणि जिनीचे जुळणार हे
हॅरी आणि जिनीचे जुळणार हे दुसर्या भागातच दिलेले आहे.
हॅरी तळघरात जाण्याआधी मोनिंग मर्टल म्हणते .... तू मेलस तर मी तुझ्याशी लग्न करीन.
तेंव्हा रॉन की कुणीतरी म्हणतं .. चला, म्हणजे जिनीला आणखी एक काँपिटिटर आली.
तळघरातून आल्यावर की जाताना, हे आहे, इतकं मला आठवत नाही. कुणीतरी कन्फर्म करा.
हॅरी आणि जिनीचे जुळणार हे
हॅरी आणि जिनीचे जुळणार हे दुसर्या भागातच दिलेले आहे.<<< हो. दुसर्या भागातच जिनीचा हॅरीवर असणारा क्रश् दाखवलाय. अगदी पहिल्या चॅप्टरपासूनच. शिवाय जिनी "त्या" डायरीमधे हॅरीबद्दलदेखील लिहत असते त्यामुळे जिनीच्या मनात कुछ कुछ आधीपासून आहे, पण ते हॅरीला नंतर कळतं!
जिनी तर दुसर्याच नव्हे तर
जिनी तर दुसर्याच नव्हे तर पहिल्या भागापासूनच हॅरीच्या मागे आहे. रॉनलाही हे माहित असतं. ( अर्थात सगळ्यांनाच माहित असत.. आठवा जिनीचा velentine message ) पण हॅरीने तिला सहाव्या भागापर्यंत seriously घेतलेलं नाही. तो
तिच्याकडे रॉनची बहिण म्हणूनच बघतो. म्हणूनच हॅरी-जिनी का हॅरी-हर्मायनी हे confusion पाचव्या भागपर्यंत वाटत रहात. पाचव्यात रॉन-हर्मायनी जोडी clear होते आणि सहाव्यात हॅरी-जिनीची.
रच्याकने मला तिचा तो
रच्याकने मला तिचा तो valientine message खूप आवडला.. आणि नंतर फ्रेड आणि जॉर्जचे ते गात बसणे
lol
His eyes are as green as a fresh pickled toad,
His hair is as dark as a blackboard.
I wish he was mine, he's really divine,
The hero who conquered the Dark Lord
नंदिनी मस्त पोस्ट
नंदिनी मस्त पोस्ट
अनुमोदन नंदिनी...
अनुमोदन नंदिनी...
३ फेब्रुवारीला मीनाक्षी
३ फेब्रुवारीला मीनाक्षी कुलकर्णींनी दिलेली लिंक वाचलीच नव्हती. आत्ताच ती बातमी वाचनात आली.
J.K. Rowling thinks she should have married Hermione Granger with Harry Potter instead of their friend Ronald Weasley. one of the reasons she believed this to be true is because Hermione and Ron would have needed relationship counseling.
she had written the Hermione/Ron relationship on the grounds of what she called a “wish fulfillment.. The relationship between the two characters was an intention the author had upon first writing the series and expresses how she stuck to the relationship due to her own desire to cling to her original plot line and far less to do with actual literature credibility. She told the actress that after getting an amount of distance from the series she has discovered that her initial reasoning for putting the two in a relationship were no longer seen in the same light.
लेखकांनी आपण निर्माण केलेल्या पात्रांचे आयुष्य त्यांनाच ठरवू द्यायला हवे असे म्हणताहेत का रोलिंगबाई?
बातमीत पुढे म्हटलेय : In relation to Ron’s character, CNN News reports, that in a past interview Rowling had also considered knocking Ron off all together, but chose against such plot directions
रोलिंगबाईंनी हॅपॉचा पुढचा भाग
रोलिंगबाईंनी हॅपॉचा पुढचा भाग आणलाय... http://www.mirror.co.uk/3am/celebrity-news/harry-potter-grown-up-reveale...
आताच वाचलं हे.. रिटा चा गॉसिप
आताच वाचलं हे.. रिटा चा गॉसिप कॉलम... तितकासा आवडला नाही... यातुन पुढे काही टिपीकल हॅपॉ टाईप स्टोरी लिहिली बाईंनी तर आवडेल बहुदा...
पॉटरमोअर वर आहे का ही नवीन
पॉटरमोअर वर आहे का ही नवीन स्टोरी ? ऑफीसमधे ओपन नाही करता येत पॉटरमोअर
मी नुकतीच आलेय पॉटरमोअर वर,
मी नुकतीच आलेय पॉटरमोअर वर, NightWing2412 Gryffindor मधे आलेय आता पुढे काय करु???
Pages